ads
ads
हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

►संघाचा कुणीही शत्रू नाही • : सरसंघचालक मोहनजी भागवत…

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

►सीबीआयने घुसविल्याचा सोहराबुद्दिनच्या भावाचा दावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८…

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

रुपयातील घसरण किमान सात टक्के

रुपयातील घसरण किमान सात टक्के

►नाणेनिधीचा अंदाज ►नोटबंदी, जीएसटीमुळे विकासाला वेग, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १८…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

►सहकारी बँका अडचणीत ►नेत्यांना बजावली नोटिस, वृत्तसंस्था मुंबई, १८…

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

►अर्थमंत्री मुनगंटीवार यांना विश्‍वास, तभा वृत्तसेवा मुंबई, १८ सप्टेंबर…

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

►राष्ट्रवादी काँग्रेसची वित्त आयोगाकडे कैफीयत, तभा वृत्तसेवा मुंबई, १८…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:23
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, मल्हार कृष्ण गोखले, स्तंभलेखक » एल्व्हिस प्रिस्ले नावाचं गारूड

एल्व्हिस प्रिस्ले नावाचं गारूड

॥ विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले |

प्रिस्ले रंगमंचावर नुसता दिसला, तरी लोक बेभान होत होते. संपत्ती इतकी अमाप मिळत होती की, मोजदाद ठेवायलाही फुरसत मिळत नव्हती, पण या सगळ्यात कौटुंबिक आयुष्याचे पार बारा वाजले होते. १९६७ साली प्रिस्लेने लग्न केलं. १९६८ साली एक मुलगी झाली. १९७३ साली घटस्फोट झाला. ध्वनिमुद्रणं, तालमी, लाईव्ह-शो हे सगळं आटपून प्रिस्ले रात्री २-३ वाजता आपल्या अलिशान प्रासादावर परतायचा. स्वागतासाठी घरचं कुणीच नसे. छोटी मुलगी केव्हाच झोपलेली असायची.

Elvis Presley

Elvis Presley

अमेरिकेत ‘टेनिसी’ या राज्यात ‘मेंफिस’ म्हणून शहर आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात मेंफिसमध्ये लोकांचे लोंढे येऊन थडकू लागतात. त्यात केवळ अमेरिकेतलेच नव्हे, तर जगभरातले संगीतप्रेमी असतात. १६ ऑगस्टला एल्व्हिस प्रिस्लेचा स्मृतिदिन असतो. त्यासाठी ही वार्षिक जत्रा भरते. ती आठवडाभर चालते, प्रिस्लेचं निवासस्थान असणार्‍या ‘ग्रेसलँड’ नावाच्या टोलेजंग प्रासादासमोर आठवडाभर ‘रॉक अ‍ॅन्ड रोल’ संगीताचा धुमाकूळ उसळतो. अनेक जण त्यात प्रिस्लेसारखाच वेश घालून भाग घेतात. जगात सर्वत्र वेगवेगळ्या स्थानिक देवदेवतांचे वार्षिक उत्सव आणि त्यानिमित्ताने जत्रा भरत असतात. काळाच्या ओघात मानवी व्यक्तीचं दैवतीकरण कसं होत जातं, या दृष्टीने एल्व्हिस प्रिस्ले आठवडा, ही वार्षिक जत्रा अभ्यासण्यासारखी आहे.
एल्व्हिस प्रिस्लेचा जन्म १९३५ सालचा. ‘मिसिसिपी’ राज्यात मिसिसिपी या प्रचंड नदीच्या काठावरच्या असंख्य गावांपैकी ‘ट्युपेलो’ या गावचं प्रिस्लेचं घराणं अत्यंत सामान्य, दरिद्री होतं. पोटापाण्यासाठी त्यांनी जवळच्या टेनिसी राज्यात मेंफिसला स्थलांतरण केलं. लहान वयापासून अनेक हलकी-सलकी, मिळतील ती कामं करीत एल्व्हिस वयाच्या १९ व्या वर्षी ट्रक ड्रायव्हर बनला. ते साल होतं १९५४. एल्व्हिसचा भाग्योदयाचा काळ आला.
एल्व्हिसला लहानपणापासूनच गाण्यांची फार आवड होती. एक दिवस सहज तो मेंफिसमधल्या एका रेकॉर्डिंग स्टुडिओत शिरला. ४ डॉलर्स एवढे भाडे देऊन त्याने स्वत:च्या आवाजात एक गाणं रेकॉर्ड करून घेतलं. त्याला ते गाणं आपल्या आईला भेट म्हणून द्यायचं होतं. १९५४ साली अमेरिकेत अवघ्या ४ डॉलर्स भाड्यात कुणीही माणूस जे करू शकत होता, ते आपल्याकडे आजही शक्य नाही. सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही, स्टुडिओचा मालक सॅम फिलिप्स हा एल्व्हिसचा आवाज ऐकून चकित झाला. त्याने एल्व्हिसला मुद्दाम बोलावून घेतलं. उत्तम वादकांबरोबर त्यांच्या तालमी घेतल्या आणि मग त्यांची ध्वनिमुद्रिका काढली.
आपल्याकडे रेकॉर्डिंग कंपनी कवी, संगीतकार आणि गायक यांना एकत्र आणून गाणं निर्माण करीत असते. गाणं चित्रपटासाठी असेल, तर हे काम चित्रपटनिर्माता करीत असतो. अमेरिकेत किंवा एकंदरीत पाश्‍चिमात्य संगीतात बरेचदा गायक हाच तो गात असलेल्या गीताचा कवी आणि संगीतकारही असतो.
एल्व्हिस प्रिस्लेची गीतं आणि संगीतरचना बर्‍याचशा त्यांच्या कृष्णवर्णीय मित्रमंडळींच्या संगीतावर आधारलेल्या होत्या. प्रिस्ले स्वत: गोरा होता. ख्रिश्‍चन उपासना पद्धतीच्या प्रोटेस्टंट या पंथाच्या असंख्य उपपंथांपैकी पेन्टेकोस्टल चर्च या उपपंथाचा प्रिस्ले अनुयायी होती. या चर्चचं जे एक विशिष्ट संगीत होतं, त्याचाही प्रभाव प्रिस्लेच्या रचनांवर होता. एकंदरित त्याच्याकडे काहीतरी वेगळं होतं, नवीन होतं.
१९५४ च्या जुलै महिन्यात एल्व्हिस प्रिस्लेची, ‘दॅट्स ऑल राईट ममा’ ही रेकॉर्ड बाजारात आली आणि अमेरिका वेडी झाली. एकापाठोपाठ एक भव्य रेकॉर्ड्स आणि अमेरिकाभर, शहरोशहरी प्रत्यक्ष रंगमंचावरील कार्यक्रमांनी एल्व्हिस प्रिस्ले देशभर पोहोचला. अमेरिकन संगीत क्षेत्रात फ्रँक सिनात्रानंतर एका नव्या तार्‍याचा उदय झाला. सिनात्राइतकीच अफाट कीर्ती आणि अमाप पैसा प्रिस्लेलाही मिळू लागला.
पुढची २० वर्षे कापरासारखी उडाली. असंख्य रेकॉर्ड्स, असंख्य चित्रपट, अगणित लाईव्ह शोज यात प्रिस्ले आकंठ बुडाला होता. लोकप्रियता इतकी अफाट होती की, प्रिस्ले रंगमंचावर नुसता दिसला तरी लोक बेभान होत होते. संपत्ती इतकी अमाप मिळत होती की, मोजदाद ठेवायलाही फुरसत मिळत नव्हती, पण या सगळ्यात कौटुंबिक आयुष्याचे पार बारा वाजले होते. १९६७ साली प्रिस्लेने लग्न केलं. १९६८ साली एक मुलगी झाली. १९७३ साली घटस्फोट झाला. ध्वनिमुद्रणं, तालमी, लाईव्ह शो हे सगळं आटपून प्रिस्ले रात्री २-३ वाजता आपल्या आलिशान प्रासादावर परतायचा. स्वागतासाठी घरचं कुणीच नसे. छोटी मुलगी केव्हाच झोपलेली असायची. नोकर-चाकर स्वागत करायचे, तशा अपरात्री प्रिस्ले जेवायला बसायचा.
तो पक्का खवैया होता. नाना प्रकारचे पदार्थ त्याला प्रत्येक वेळी लागायचेच. साहजिकच जेवण फार जड व्हायचे. मग हातांचा तळवा भरून नाना प्रकारच्या औषधाच्या गोळ्या खायच्या. आता एवढे सगळे निसर्गाविरुद्ध झाल्यावर झोप येणार कशी? मग ती यावी म्हणून अमली पदार्थांच्या गोळ्या खायच्या. सकाळी ६ वगैरेच्या सुमारास अशाप्रकारे प्रिस्लेची रात्र सुरू व्हायची. दुसर्‍या दिवशी जे कार्यक्रम ठरलेले असतील त्यानुसार उठून तयार व्हावंच लागायचं.
असं किती दिवस चालणार? अशा जीवनशैलीमुळेच बहुसंख्य नट-नट्या लिव्हरच्या दुखण्याने किंवा हृदयविकाराने मरतात. १६ ऑगस्ट १९७७ या दिवशी एल्व्हिस प्रिस्लेचं तेच झालं. हृदयविकाराच्या जबर झटक्याने प्रिस्ले कोसळला. एक चालतीबोलती दंतकथा संपली. वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षीच संपली. १९४३ साली अफाट लोकप्रिय असलेल्या राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडींचा खून झाला, तेव्हा अमेरिका हादरली होती, पण प्रिस्लेच्या मृत्यूने अमेरिका सुन्न झाली.
प्रिस्ले मरू शकतो, यावर विश्‍वास ठेवायलाच लोक तयार होईनात. त्यामुळेच अशी अफवा पसरली की, अफाट लोकप्रियतेला कंटाळलेला प्रिस्ले आपल्या मृत्यूची बातमी सोडून देऊन कुठेतरी भूमिगत झाला आहे. काही काळानंतर तो परतेल. लोकांचा या अफवेवर चटकन विश्‍वास बसला, पण प्रिस्ले परतला नाही. आपल्याकडे जसा चित्रगुप्त असतो, तसा ख्रिश्‍चन समजुतींत सेंट पीटर असतो. प्रिस्ले सेंट पीटरला रॉक अ‍ॅन्ड रोल संगीत ऐकवायला गेला, तो कायमचाच. हा, आता सेंट पीटरला तसलं संगीत आवडतं की नाही, कोण जाणे!
एल्व्हिस प्रिस्लेचं संगीत कशा प्रकारचं होतं, याचा चटकन अंदाज येण्यासाठी आपल्याकडच्या ‘तिसरी मंझिल’ या चित्रपटाचं संगीत आठवा. १९६६ साली तिसरी मंझिल या नाझिर हुसेन निर्मित, विजय आनंद दिग्दर्शित रहस्यपटाने धुमाकूळ घातला होता. त्यातल्या राहुल देव बर्मनच्या संगीताने हिंदी चित्रपट संगीतात पुन्हा एकदा क्रांती घडवली, असं मानलं जातं. त्या संगीताचा एकूण बाज प्रिस्लेच्या रॉक अ‍ॅन्ड रोल संगीतावर आधारलेला होता.
आपल्याकडे पूर्वी सिनेमा-नाटक-संगीताची आवड असणार्‍या माणसाकडे तिरस्काराने पाहिलं जायचं. गाण्या-बजावण्याचे शौक म्हणजे चांगली लक्षण नव्हेत, असं म्हटलं जायचं. ते एक टोक होतं. हल्ली दुसरं टोक गाठलं गेलं आहे. चित्रपटातले नट- नट्या म्हणजे प्रत्यक्ष जीवनातलेही महानायक, विचारवंत वगैरे समजले जाऊ लागले आहेत. चित्रपट लोकांना बिघडवतात, असं म्हणणं हे प्रतिगामी, बुरसटलेल्या विचारांचं, आधुनिकताविरोधी समजलं जातं, परंतु प्रिस्लेच्या संगीताने आणि चित्रपटांनी अमेरिकन जीवनातला स्वैराचार व बालगुन्हेगारी वाढवली, असा अमेरिकन समाजशास्त्रज्ञांचा स्पष्ट अभिप्राय आहे.
क्रूर थट्टा
स्वच्छतागृह हा आपल्या दृष्टीने अगदीच बिनमहत्त्वाचा विषय असतो. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याकडे वेगाने शहरीकरण होऊ लागलं. पण वाढत्या शहरांमध्ये लोकांच्या सोयीसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह असणं, हा विषय आपल्या लोकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने सतत दुय्यम, तिय्यम स्थानावर राहिला. जसे लोक तसे त्यांचे प्रतिनिधी! भर शहरात उघड्यावर नैसर्गिक विधी करायला बहुसंख्य लोकांना कसलीही लाज वाटत नाही. थोड्या लोकांना लाज वाटते, पण ते काहीही करू शकत नाहीत. कारण, लोकशाहीत बहुसंख्येला महत्त्व असतं ना! याबाबतीत महिलांची जी कुचंबणा होते, ती तर दयनीय. पण, त्याकडे कुणाचेही लक्ष नसते. कारण बहुसंख्य पुरुष हे महिलांच्या सोयी-गैरसोयींकडे कधीच लक्ष देत नाहीत. मुळात स्त्रीला माणूसच समजत नाहीत आणि तथाकथित महिला लोकप्रतिनिधी, पुरुष लोकप्रतिनिधींप्रमाणेच स्वार्थी राजकारणात दंग असतात.
साधारण गेल्या दहा एक वर्षांत आपल्याकडे हळूहळू याविषयी जाणीव निर्माण होत आहे. केवळ शहरातच नव्हे, तर गावपातळीवरही स्वच्छतागृहांची निर्मिती होऊ लागली आहे. ती कितपत स्वच्छ असतात, हा भाग अलहिदा; पण लोकांना आपल्या शरीराची स्वच्छता करायला निदान आडोसा तरी पुरवला जातो.
युरोप-अमेरिकेत गेल्या किमान शतकभरापासून सार्वजनिक स्वच्छतागृहाची उत्तम सोय आहे. ही गृहे खरोखरच अतिशय स्वच्छ दिसतात. तिथे भरपूर पाणी असतं. मोठ्या शहरांमध्ये स्वच्छतागृहाच्या निगराणीसाठी वाजवी दराने पैसे घेतले जातात. आता स्वच्छता म्हणजे नेमकं काय? असाही प्रश्‍न सवयीच्या फरकामुळे आपल्याला पडू शकतो. कारण मलविसर्जनासाठी खुर्चीत बसल्याप्रमाणे कमोडवर बसणे आणि उरकल्यावर पाण्याऐवजी टिश्यू पेपर वापरणे, हे आपल्या भारतीय मनाला कधीच पटणार नाही. तर ते असो. घडलं असं की, एक वयस्कर अमेरिकन मनुष्य एका सामाजिक स्वच्छतागृहात शौचाला गेला. विधी उरकल्यावर तो उठायला लागला, तर त्याला असं आढळलं की आपली बैठक कमोडला जाम चिकटून गेली आहे. तो जाम घाबरला. त्या भीतीने त्याला तिथेच हार्ट अ‍ॅटॅक आला. त्याच्या तोंडून बाहेर पडणार्‍या विचित्र आवाजामुळे बाहेरच्यांना संशय आला. धावपळ झाली नि अखेर त्याची सुटका झाली.
घडलं होतं ते असं की, त्याच्या अगोदर आत जाऊन आलेल्या एका इरसाल कार्ट्याने कमोडच्या कडांवर फेविकॉलसारखा चिकट द्रव टाकून ठेवला होता. आता त्या माणसाने आपल्याला अशी अटक झाल्याबद्दल नि त्याच्या टेन्शनमुळे आपला रक्तदाब व शुगर वाढल्याबद्दल स्वच्छतागृह चालविणार्‍या कंपनीवर खटला भरला आहे. डॉक्टरच्या बिलासह कित्येक लाख डॉलर्स भरपाईची मागणी केली आहे.

Posted by : | on : Aug 19 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, मल्हार कृष्ण गोखले, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, मल्हार कृष्ण गोखले, स्तंभलेखक (89 of 1369 articles)

Ustad Vilayat Khan
॥ कलारंग : अजय देशपांडे | मुगलांच्या शासनात शास्त्रीय संगीताची साधना करणार्‍या विशेषतः उत्तरेतील अनेक हिंदू कलाकारांना बळजबरीने इस्लाम कबूल ...

×