ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, प्रशांत आर्वे, स्तंभलेखक » ऐतिहासिक वारसा आणि सामाजिक उत्तरदायित्व

ऐतिहासिक वारसा आणि सामाजिक उत्तरदायित्व

॥भारत भाग्य विधाता : प्रशांत आर्वे |

…याचा वसा गेले पाचशेपन्नास दिवस चंद्रपुरातील तरुणांच्या ‘इको प्रो’ या स्वयंसेवी संस्थेने घेतला आहे. या संस्थेच्या कार्याची दखल घेणे यासाठी आवशक ठरते, कारण या संस्थेचे प्रमुख बंडू धोत्रे आणि त्यांचे सर्व तरुण सहकारी यांनी ऐतिहासिक वारसा जतनाचा जो आदर्श घालून दिला तो केवळ महाराष्ट्राला मार्गदर्शक नाही, तर त्याची राष्ट्रीय स्तरावर आज दखल घेतली जाऊ लागली आहे…

Historical Haritage

Historical Haritage

आम्ही ज्याला संस्कृती म्हणतो ती तयार होते कशातून? आमची जीवननिष्ठा, आमच्या परंपरा, जगण्याच्या पद्धती, वारसा, इतिहास आणि आम्ही वर्षानुवर्षे जोपासलेल्या धारणा याचे संचित एकत्र येऊन तयार होत असते ती संस्कृती. संकृतीचे एक महत्त्वाचे अंग म्हणजे इतिहास. हडप्पा आणि मोहनजोदारोचा उल्लेख आपण जेव्हा म्हणून करतो तेव्हा आम्हाला विचारात घ्यावा लागतो तेथील पुरातत्त्वीय उत्खननातून समोर आलेला इतिहास आणि वारसा. ज्याचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज असते. भारत अशा ऐतिहासिक वारसा स्थळांच्या बाबतीत अत्यंत श्रीमंत आहे. परंतु, युरोपने त्यांच्या ऐतिहासिक वारसा स्थळांची ज्याप्रमाणे निगा राखली तशी आम्हाला अजूनही राखता आलेली नाही. वास्तविक, भारताचा इतिहास उर्वरित जगाच्या तुलनेत अगदी प्रागैतिहासिक म्हणावा असाच असला, तरी त्या इतिहासातून निर्माण झालेल्या वास्तू, किल्ले, तत्कालीन पाणीपुरवठा व्यवस्था, मंदिरे, स्तूप, विहार यांबाबत आपल्याकडे जागृती नसल्याने, आपले त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आलेले आहे. याउलट, आपण आपल्याच ऐतिहासिक वारशाची अक्षम्य हेळसांड केली आहे. अर्थात, त्याला शहरीकरणाचा रेटादेखील कारणीभूत ठरला आणि त्यात कित्येक ऐतिहासिक वास्तू गाडल्या गेल्या.
या पार्श्‍वभूमीवर आपला संपन्न इतिहास आणि वारसा पुढील पिढीपर्यंत जावा आणि त्याकरिता त्याचे जतन, स्वच्छता आणि संवर्धन व्हावे, याचा वसा गेले पाचशेपन्नास दिवस चंद्रपुरातील तरुणांच्या ‘इको प्रो’ या स्वयंसेवी संस्थेने घेतला आहे. या संस्थेच्या कार्याची दखल घेणे यासाठी आवशक ठरते, कारण या संस्थेचे प्रमुख बंडू धोत्रे आणि त्यांचे सर्व तरुण सहकारी यांनी ऐतिहासिक वारसा जतनाचा जो आदर्श घालून दिला तो केवळ महाराष्ट्राला मार्गदर्शक नाही, तर त्याची राष्ट्रीय स्तरावर आज दखल घेतली जाऊ लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये ‘इको प्रो’च्या कार्याचा आवर्जून उल्लेख करणे, यातून संस्थेच्या कार्याचे महत्त्व लक्षात येईल.
चंद्रपूर शहराला पाचशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे.
पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात या शहराच्या निर्मितीला सुरुवात झाली. गोंड राजा खांडक्या बल्लाळशहा याने हे शहर वसविले. शहराला ११ कि.मी. लांबीची परकोटाची भिंत, चार प्रशस्त दरवाजे, पाच खिडक्या व ३९ बुरूज आहेत. शहराभोवती असलेली ही परकोटाची भिंत बांधायला तब्बल १२५ वर्षे लागली! साधारणपणे गोंड राजांनी २५० वर्षे या शहरावर राज्य केले. १७५१ मध्ये नागपूरच्या भोसल्यांनी हे राज्य जिंकून घेतले. पुढे १८१८ नंतर या शहरावर ब्रिटिशांचा अंमल राहिला. गोंड राजसत्तेच्या काळात असंख्य वास्तू, मंदिरे, विहिरी यांचे बांधकाम झाले असले, तरी आपल्याच ऐतिहासिक वारशाची हेळसांड करण्याचा जो आपला राष्ट्रीय स्वभाव आहे त्यानुसार ही परकोटाची भिंत आणि शहरातील वास्तू निसर्गाच्या मार्‍यामुळे ढासळू लागल्या. सर्वत्र झाडे, गवत, लोकांनी केलेला कचरा, भिंतीला तोडून केलेली बांधकामे यामुळे परकोट आणि अन्य वास्तूंकडे दुर्लक्ष होत होते. पुरातत्त्व खात्याची संपूर्ण भारतात जी अवस्था आहे तीच या शहरात होती. पण, ‘इको प्रो’ने या सगळ्या परिस्थितीचा साकल्याने विचार करीत आणि २०१५ मध्ये केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ला प्रतिसाद देत ऐतिहासिक वारसा स्वच्छता आणि संवर्धन कार्याला सुरुवात केली. रोज सकाळी ही तरुण मंडळी कुदळ, पावडे, घमेले घेऊन घराबाहेर पडते आणि श्रमदान करते. आपला वारसा आपणच वाचविला पाहिजे, या भावनेने ते सारे झपाटले आहेत. आज या कार्याला पाचशेपन्नास दिवस पूर्ण झाले, परंतु ‘इको प्रो’चे हे जवान ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता आपल्या शहराच्या ऐतिहासिक परंपरेला वाचविण्यात व्यग्र आहेत. या संस्थेने आपले सामाजिक उत्तरदायित्व बरोबर ओळखले आहे. सुरुवातीला टिंगल करणारा, सफाई कामगार म्हणून हिणवणारा समाज, आता मदत देऊ करतोय्. ‘इको प्रो’च्या या किल्ला स्वच्छता अभियानाचे आता एका प्रचंड मोठ्या चळवळीत रूपांतर झाले आहे.
या संस्थेचे संस्थापक बंडू धोत्रे यांना या कार्याच्या प्रेरणेबद्दल विचारले असता ते, ‘स्वच्छ भारत अभियान’ हीच त्यांची प्रेरणा असल्याचे सांगतात. एकेकाळी आपण शहरात जन्माला आलो नसतो, तर आपल्यालादेखील अण्णा हजारे यांच्यासारखे एखादे आदर्श गाव घडविता आले असते, हा विचार त्यांच्या मनात वारंवार येत असे. मात्र, ज्या शहरात जन्माला आलो त्या शहराला आदर्शवत घडविले तर? हा विचार त्यांच्या मनात आला आणि कामाला सुरुवात झाली. ‘इको प्रो’ ही संस्था सुरुवातीला पर्यावरण विषयाला वाहिलेली संस्था होती. राळेगण सिद्धी, हिवरे बाजार या गावांनी आदर्श ग्राम निर्माण केले, परंतु संपूर्ण देशात लोकसहभागातून आदर्श शहर निर्माण होण्याच्या दिशेने चंद्रपूरसारख्या लहान शहराने पाऊल टाकायला सुरुवात केली आहे.
या चळवळीतून समोर आलेल्या गोष्टी अत्यंत धक्कादायक आहेत. ज्या वेळी किल्ला स्वच्छता अभियान सुरू झाले त्या वेळी सर्वात मोठा प्रश्‍न होता तो या भिंतीला खेटून लोकांनी घरे बांधली होती. किल्ला स्वच्छ करायचा म्हणजे सामान्य लोकांची घरे काही प्रमाणात पाडणे ओघाने आलेच. पण काय आश्‍चर्य! ‘इको प्रो’च्या कार्याने प्रभावित होऊन लोक स्वतःहून आपली घरे तोडू लागली आहेत. ‘हा माझा ऐतिहासिक वारसा आहे,’ ही भावना हळूहळू लोकांमध्ये रुजू लागली आहे. आपले गाढ झोपलेले पुरातत्त्व खाते या अभियानामुळे खडबडून जागे झाले. वरिष्ठ स्तरावरील अधिकारी भेटी देऊ लागले. ज्या ठिकाणी किल्ल्याची भिंत उद्ध्वस्त झाली होती त्याचे बांधकाम सुरू झाले. पर्यटनाच्या दृष्टीने विचार सुरू झाला. झुलते पूल उभारले गेले. कचरा आणि जंगलाने व्यापलेले ३९ बुरूज आता लखलखीत झाले होते. आता इथेच हे थांबणार नव्हते. ‘इको प्रो’ने शासन स्तरावरदेखील मोठ्या प्रमाणात पाठपुरावा सुरू केला. केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांना कार्याची माहिती करून दिली. सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा या कामावर लक्ष देऊ लागले. सचिवस्तरावर बैठकी सुरू झाल्या. बंडू धोत्रे आणि ‘इको प्रो’च्या अनेक कार्यकर्त्यांना त्यात बोलावले जाऊ लागले. कधी नव्हे ते भारतीय पुरातत्त्व आणि ‘इको प्रो’ यांच्यामध्ये एक सामंजस्य करार घडून आला. स्वतंत्र भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच करार होता! या कराराने चंद्रपूर जिल्ह्यातील २१ संरक्षित स्मारकांचे जतन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी ‘इको प्रो’कडे सोपविण्यात आली. एखाद्या गैरसरकारी संघटनेला संरक्षित स्मारकांची जबाबदारी सोपविण्याची ही पहिलीच घटना होती. आपल्या देशात पुरातत्त्व खात्याचा निधी जाऊन थांबायचा तो राजस्थानात! महाराष्ट्राचा विचार झालाच तर तो केवळ अजिंठा आणि वेरूळपर्यंत मर्यादित होता. मात्र, चंद्रपूरच्या या कार्याने आता निधी चंद्रपूर आणि विदर्भाकडे वळू लागला आहे. याच निधीतून परकोटाच्या भिंतीपासून साधारण बारा फुटांवर एक नवी संरक्षण भिंत उभी करण्यात येत आहे. नव्याने बांधली जाणारी भिंत आणि किल्ल्याची भिंत यामधून शासन सायकल मार्ग निर्माण कारीत आहे. हा मार्ग ११ कि.मी. लांबीचा असेल.
या कामात ‘इको प्रो’ने कामाचे टप्पे आखून घेतले. किल्ला स्वच्छता अभियान करून ते थांबणारे नव्हते. कारण त्यांच्यासमोर मुख्य प्रश्‍न आहे तो समाजाला स्मारक व इतिहासाप्रती उत्तरदायित्वाची. जो वारसा आमचे पूर्वज आमच्यासाठी सोडून गेले तो वारसा आपुलकीने जपण्याची भावना समाजाची असली पाहिजे. एखादी संस्था पुढाकार घेऊन हा वारसा स्वच्छ करेलही, पण अंतिमतः ती जबाबदारी असते. साठ वर्षांपूर्वी दक्षिण इंग्लंडमधून वाहणार्‍या थेम्स नदीला मृत घोषित करण्यात आले होते. मात्र, लोकांनी थेम्सच्या स्वच्छतेचा विडा उचलला आणि आज थेम्स जगातील सगळ्यात स्वच्छ नदी आहे! १८२ प्रकारच्या माशांच्या प्रजाती आज तिथे सापडतात. बाहेरच्या जगाचे कौतुक करताना त्यामागे उभी असलेली सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव आपल्याला तपासून बघावी लागेल. ज्यात आम्ही भारतीय फार मागे आहोत.
शहरात जनतेला पाणीपुरवठा करण्याची सक्षम यंत्रणा होती. जी काळाच्या ओघात नष्ट झाली. त्याचे पुरुज्जीवन होऊ शकते, या कामी ‘इको प्रो’ने प्रयत्न सुरू केले आहेत. शहरात आणि शहराबाहेर साठ फूट खोल अशा त्रिस्तरीय विहिरींचे बांधकाम अलीकडे आढळले आहे. या विहिरींमध्ये प्लास्टिक, कचरा टाकून आम्हीच अक्षरशः त्या बुजवून टाकल्या. या विहिरी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांना स्वच्छ करण्याचे काम आता हाती घेण्यात आले आहे. या विहिरी येत्या काळात पर्यटकांना आकर्षित करू शकतात. त्यांचे बांधकाम अभ्यासकांचा विषय होऊ शकतो. शिवाय त्या काळातील पाणीपुरवठा करणारी संपूर्ण यंत्रणा पुढील पिढ्यांना आपल्या तांत्रिक कौशल्याची साक्ष पटवून देणारी आहे.
विशेष म्हणजे ‘इको प्रो’ आणि चंद्रपूरकर ज्या उद्देशाने या संरक्षण आणि संवर्धनाच्या कामी गुंतले आहेत, त्यातून त्यांचा मुख्य हेतू साध्य होऊ लागला आहे. विदर्भात वाशीम, पवनी, अमरावती या शहरांनी त्यांच्या ठिकाणी असलेला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी कार्य सुरू केले आहे आणि हेच या कार्याचे फलित आहे! यापुढे दुर्लक्षित स्मारकांकडे बघून केवळ हळहळ व्यक्त न करता त्याकरिता काम करणे महत्त्वाचे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देवाजी तोफा या आदिवासी माणसाने लेखामेंढाचा प्रयोग यशस्वी केला. या प्रयोगात ‘आमच्या गावात आमचे सरकार’ ही घोषणा दिली. गावाची जबाबदारी गावाने स्वतः स्वीकारली पाहिजे, हा त्याचा अर्थ होता. आता बकाल झालेली शहरे आणि ऐतिहासिक वारसा, स्मारके याची जबाबदारी आम्हीच स्वीकारायची हीच योग्य वेळ आहे!

Posted by : | on : 7 Oct 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, प्रशांत आर्वे, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, प्रशांत आर्वे, स्तंभलेखक (367 of 1224 articles)

Cia
विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले | हेरकथा वाचण्याची आणि पाहण्याची सवय आपल्याला जेम्स बाँड वगैरेंमुळे लागलेली आहे. गुप्तहेरांच्या प्रत्यक्ष कामात ...

×