ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक » ऑनलाईन बाजाराचा चक्रव्यूह

ऑनलाईन बाजाराचा चक्रव्यूह

॥ अर्थपूर्ण : यमाजी मालकर |

Online Shopping1

Online Shopping1

जागतिकीकरणापासून आपल्या देशात होणारे बदल योग्य आहेत की अयोग्य, हा प्रश्‍न अजूनही अनेक भारतीयांच्या मनात घर करून आहे. पण या बदलाला आता तब्बल २७ वर्षे होऊन गेली असून बहुतांश भारतीयांनी हे बदल स्वीकारले आहेत, असे म्हणता येईल. या बदलांनी आता असा वेग घेतला आहे की, त्या वेगात आपण कधी ओढले गेलो, हे लक्षातही येत नाही. त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे मोबाईल फोन आणि इंटरनेट. या दोन सोयी नसताना आपण कसे जगत होतो, असा प्रश्‍न पडावा अशीच सध्या स्थिती आहे. या दोन गोष्टींनी आयुष्य सुकरकेले असेही म्हणता येईल, तसे त्याने माणसातील सबुरी कमी करून तणाव वाढविला असेही म्हणता येईल. काहीही असो, या बदलाला भारतीय नागरिक नाही म्हणू शकला नाही आणि त्या माध्यमातून आलेल्या सर्व बदलांत त्याने स्वत:ला झोकून दिले, असे आता म्हणता येईल.
हे बदल अर्थातच बाजारातून घडले आहेत. म्हणजे बदल आधी अर्थकारणात झाले, तंत्रज्ञानात झाले आणि त्याचे समाजावर परिणाम होऊ लागले. ज्यांना नव्या बदलाचे फायदे दिसत असतात, अशी धोरणी माणसे मग या बदलाला आपलेसे करतात आणि त्यामुळे इतरांनाहीते बदल हवेसे वाटू लागतात. या बदलाला आधी ग्लॅमर येते आणि मग ते सर्वांनाच हवेहवेसे वाटू लागते. भारताचा गेल्या २७ वर्षांचा प्रवास तेच सांगतो. अर्थात, हेही लक्षात घेतले पाहिजे की हे बदल भारताने स्वीकारलेले नसून, ते त्याला स्वीकारावे लागले आहेत. इंधन आयातीसाठी रिझर्व बँकेकडे १९९० साली डॉलर शिल्लक नसल्याने आपल्याला आपली अर्थव्यवस्था जगासाठी खुली करावी लागली. अनेक जागतिक करारांवर आपण सह्या केल्या आणि जगातील नव्या बदलांत भारत सामील झाला. भारताला याचा किती लाभ झाला, याची एक मोठी यादी देता येईल आणि काय तोटे झाले, याचीही यादी देता येईल. पण आता काळाच्या मागे जावून हे बदलता येणार नाही, हे अधिक खरे आहे.
बदल ही एकमेव गोष्ट अशी आहे, जी शाश्‍वत आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे यापुढेही बदल होतच राहणार आणि त्या सोबत राहण्याची आपल्याला शिकस्त करावी लागणार आहे. त्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे ऑनलाईन खरेदी होय. ती करावी की नाही, हा अजून वादाचा विषय असला तरी, ती भारतातील तरुणांनी हा बदल स्वीकारला आहे, हे मान्य करावे लागते. त्यामुळे बाजारात मोठे बदल होत असून त्यातून भारतीयांना नवा विचार करावा लागणार आहे. या बदलाच्या मूळाशी तीन गोष्टी आहेत. पहिली म्हणजे, नव्या बदलाची नस ओळखण्याची क्षमता असणे. दुसरे म्हणजे हा बदल करण्यासाठी पुरेसे भांडवल असणे आणि तिसरे म्हणजे जे करायचे आहे, त्यासाठी ग्राहक मिळविणे. ऑनलाईन बाजार कंपन्यानी या तीनही गोष्टी आता चांगल्याच आत्मसात केल्या आहेत.
ऑनलाईन बाजार क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवहार फ्लीफ कार्त आणि वॉल मार्त यांचा झाला. तो आहे अब्ज डॉलरचा ! या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी अमेझॉन या स्पर्धेत उडी न घेईल तरच आश्‍चर्य. तिने या करारानंतर भारतातील आघाडी कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आणि नव्या जोमाने भारतात जम बसविला. हे सर्व करताना अमेझॉन ही कंपनी काय काय करते आहे, हे जाणून घेतले तर पुढे काय होणार आहे, याची कल्पना येण्यास मदत होते. अमेझॉनविषयीची अशी काही माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली.
अमेझॉन कंपनी जगातील सर्वात श्रीमंत कंपनी ठरली आहे, हे आपल्याला माहीत आहे. पण त्यासाठी तिने काय स्वरुपाची तयारी केली आहे, हे समजून घेतले पाहिजे. भारत हा त्या कंपनीसाठी अतिशय महत्त्वाची बाजारपेठ आहे. भारताचा आकार तर मोठा आहेच, पण भारतात ग्राहकांची संख्याही मोठी आहे. या बाजारपेठेच्या गरजा भागविण्यासाठी काय काय करावे लागेल, याचा अतिशय बारकाईने विचार तिने केला आहे. त्यामुळे मालाची खरेदी, त्याचा साठा करणे, त्यातील पाहिजे त्या वस्तू योग्य वेळी बाजूला घेऊन त्या हजारो किलोमीटरवरील ग्राहकाला घरपोच पोचविणे, याची एक मोठी बिनचूक आणि वेगवान प्रोसेस तिने तयार केली आहे. आज ही कंपनी २० हजार ५०० पिन कोडपर्यंत पोचली आहे. याचा अर्थ भारतातील सहा लाख गावांपैकी किमान ५० हजार गावांत अमेझॉनच्या वस्तू पोचल्या आहेत. त्यासाठी देशात तिने ५० अत्याधुनिक वेअर हाउस उभे केले आहेत. त्यातील डीइएल ५ हे दिल्लीजवळील त्यातीलच एक. हे वेअर हाउस तीनलाख चौरस फुट म्हणजे बास्केटबॉलच्या ५५ ग्राऊंडइतके मोठे आहे! अमेरिकेत तर तिच्या एका वेअर हाऊसचा आकार १० लाख चौरस फुट इतका मोठा आहे. अशा वेअर हाऊसमध्ये काय व्यवस्था असेल, याचे एक उदाहरण या कंपनीने दिले. समजा आगीची दुर्घटना घडली तर केवळ ९० सेकंदात अशी वेअरहाउस रिकामे केले जाऊ शकतात! अमेरिकेतील वेअर हाउसमधील कामे रोबो करतात, ही सुविधा अजून भारतात आलेली नाही, कारण भारतात अजून मनुष्यबळ स्वस्त आहे.
अमेझॉनच्या वेअर हाउसमध्ये वस्तू ट्रकने कशा येतात, त्याला अमेझॉनचा बारकोड कसा लागतो, त्या किती कमी वेळांत आकाराप्रमाणे ठेवल्या जातात, त्यांची मागणी आली की किती कमी वेळांत त्या पुढील प्रवासासाठी काढल्या जातात आणि कमीत कमी वेळेत आणि कोणतीही चूक न होता ग्राहकापर्यंत पोचविल्या जातात, याची अशी सुनियोजित साखळी या कंपनीने तयार केली आहे. त्यामुळे हा सर्व अवाढव्य बाजार सुरळीत चालत राहतो. अर्थातच, त्यामुळे त्यात वाढ किती वेगाने होते, पहा. जून २०१३ मध्ये अमेझॉनचे फक्त मुंबईत एक वेअर हाऊस होते आणि ती १०० उत्पादकांकडून वस्तू घेत होती. आता १३ राज्यांत ५० वेअर हाऊस आहेत आणि उत्पादकांची संख्या ३.४ लाखांवर गेली आहे. या ५० वेअर हाऊसची साठा करण्याची क्षमता दोन कोटी क्युबिक फूट म्हणजे ऑलिंपिकचे २५० पोहण्याच्या तलावाइतकीआहे. इतक्या वेगवेगळ्या वस्तू तेथून पाठविल्या जातात की त्यांच्या खोक्यांचा आकार ४० प्रकारचा आहे. अमेझॉनचा कारभार कसा चालतो, यासंबधीची ही माहिती यासाठी महत्त्वाची आहे की त्यातून जगातील सर्वात श्रीमंत माणूस निर्माण झाला, जो स्वत: कशाचेच उत्पादन करत नाही, पण जगात सर्वाधिक वस्तू विकतो!
अत्याधुनिक जगात येऊ घातलेले बदल अशी क्षमता घेऊन येत आहेत आणि आपल्या देशातील व्यापारी, उद्योजक, ग्राहक यांना त्याच्याशी सामना करायचा आहे. कार्यक्षमता आणि स्पर्धा जेथे असते, तेथे ग्राहकांचे हित असते, या न्यायाने ग्राहक म्हणून आपण या कंपन्यांना केव्हाच स्वीकारले आहे. ते जे देत आहेत, त्याला आपण नाही म्हणूच शकत नाही, असे म्हटले तर ते जास्त योग्य ठरेल. तात्पर्य, जागतिकीकरणाने व्यापार उदीम संघटीत, अधिक संघटीत करण्यास जी सुरुवात केली होती, त्याचे एक टोक गाठले जाते आहे असे आज वाटत असले तरी ती प्रक्रिया अजून सुरूच आहे. ती प्रक्रिया यापुढे आणखी वेगवान होणार आहे. भारतीय तरुणांना ती प्रक्रियाही हवी आहे आणि तो वेगही हवा आहे. याचा अर्थ, त्यांनाते बदल हवे आहेत. त्यामुळे हे बदल रोखण्याचे मार्ग पुढील पिढीने बंद केले आहेत.
अशा परिस्थितीत भारतीय नागरिकांनी काय केले पाहिजे? उपाय एकच आहे. उद्या सरकारला यात काही हस्तक्षेप करण्याची वेळ आलीच, तरच सरकार तेवढे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असले पाहिजे. याचा अर्थ सरकारची आर्थिक क्षमता वाढली पाहिजे. ती वाढेल चांगल्या करपद्धतीने. ती चांगली करपद्धती म्हणजे अर्थक्रांती प्रतिष्ठानने सुचविलेला बँक व्यवहार कर. या कराच्या माध्यमातून आपण अशा बदलांत सर्वसामान्य भारतीय नागरिकाचे हितही साधले गेले पाहिजे, असे म्हणू शकू. पण त्यासाठी अर्थक्रांती प्रस्तावावर आधारित व्यवस्था देशात आली पाहिजे, अशा प्रयत्नांना आपण बळ दिले पाहिजे.

Posted by : | on : 26 Aug 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक (558 of 1287 articles)

Balshastri Hardas
विशेष : डॉ. कुमार शास्त्री | या राष्ट्राला ज्यांनी ‘वेदातील राष्ट्रदर्शन’ घडविले, शाश्‍वतसत्य, धर्म आणि संस्कृतीवर आपल्या ओघवत्या, ऊर्जस्वल आणि ...

×