ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक » करदात्याची खुशामत की करपद्धतीत बदल?

करदात्याची खुशामत की करपद्धतीत बदल?

॥अर्थपूर्ण : यमाजी मालकर |

Taxes

Taxes

मृत्यू, बदल आणि कर या तीन गोष्टी कोणालाच टाळता येत नाहीत. या तीनही गोष्टींचे माणसांच्या आयुष्यात चांगलेच महत्त्व आहे. जन्माला आलेल्या माणसासाठी मृत्यू ही अटळ बाब आहे, पण तो चांगल्या पद्धतीने यावा, अशी प्रार्थना माणूस करत असतो. पण तो कसा येईल, हे कोणीच सांगू शकत नाही. बदल ही गोष्टही अटळ आहे आणि त्यानुसार मानवी जीवन बदलून जाते, बदलाचे वारे ओळखले तर माणसाच्या आयुष्यात चांगले बदल होण्याची शक्यता असते तर ते ज्यांना ओळखता येत नाहीत, त्यांचा जगण्याचा लढा कठीण होतो, असे व्यवहारात पहायला मिळते. कर ही पण अशीच अटळ गोष्ट आहे. जन्माला आलेल्या माणसाला कोणत्या ना कोणत्या स्वरुपात कर हा द्यावाच लागतो. समाज चालण्यासाठीची ती एक गरज आहे. या तीनही गोष्टीत एक साम्य आहे, ते म्हणजे माणूस या तीनही गोष्टींचा स्वीकार करण्यास उशीर करतो किंवा त्या नाईलाजाने स्वीकारतो आणि त्यातून तो दु:खी होतो.
बदल आणि मृत्यू या गोष्टी नैसर्गिक असल्याने त्याविषयी आपण येथे चर्चा करणार नाही. पण मानवनिर्मित करांविषयी अधिक विवेचन करणार आहोत. कारण करांची चर्चा झाली नाही, असा दिवस जगाने पाहिलेला नाही. कर देताना कोणाला फार आनंद झाला, असे सहसा घडत नाही. त्याला एक करपद्धती अपवाद आहे. ती म्हणजे धार्मिक कर. मुस्लीम धर्मात जकात दिली जाते आणि ती देताना सहसा सक्ती होत नाही. ते आपले कर्तव्यच आहे, या भावनेने जकात अदा केली जाते. त्यातून धर्माचे व्यवहार चालतात. हिंदू आणि इतर धर्मांत लोक देवाच्या नावाने दान देतात, देवस्थानाला देणगी देतात आणि त्यातून धर्मासंबंधीच्या व्यवहारांची काळजी घेतली जाते. अर्थात, जकात जशी पवित्र मानली जाते आणि आपापल्या परीने प्रत्येक मुस्लीम नागरिक जकात देतोच, तसे देवाला देणगी देण्याचे होत नाही. कर देण्याची ही आदर्श पद्धत असली तरी जग मात्र त्यावर चाललेले नाही. जगाने सध्या जी करपद्धती शोधून काढली आहे, तिलापिनल कोड मॉडेल म्हटले जाते. ज्याला सक्तीचा सहभाग असेही म्हटले जाते. आता सक्तीचा आणि सहभाग, हा एकत्र कसा नांदू शकतो, हे कोणीच सांगू शकत नाही. पण अशा या सक्तीमुळे कर देण्याविषयी नागरिक नाराज असतात. जगातील सरकारे जनतेचे शत्रू होण्याचे तेच प्रमुख कारण आहे. आज सर्व देशांत हेच मॉडेल वापरले जाते. ज्यात कर न भरणार्‍यांना दंड, शिक्षाकेली जाते. वेळप्रसंगी त्यांची संपत्ती जप्त केली जाते. या मॉडेलमध्ये सरकारच्या वतीने जे कर वसूल करत असतात, त्यांच्या हातात दंडुका दिलेला असतो आणि त्याच्या धाकाने नागरिक कर भरत असतात. ही सक्ती असल्याने कर बुडविण्याची इच्छा होणे, तो बुडविणे, अशा सर्व गोष्टी सध्या होताना दिसत आहेत. विकसित देशांत कर बुडविणे, ही फार गंभीर बाब मानली जाते, कारण कर दिले नाहीत, तर समाजाच्या सार्वजनिक गरजांची काळजी कोण घेईल, असा रास्त प्रश्‍न समोर उभा राहतो.
आपल्या देशात तर करदायित्व आणि कर वसुली हे अतिशय कटकटीचे विषय आहेत. कर देण्यास तयार आहोत, पण चांगल्या मार्गाने घ्या, असे बहुतांश भारतीय नागरिकांचे म्हणणे आहे, असा चांगला मार्ग आपण अजून अनुसरलेला नाही. त्यामुळे सरकार करत असलेली करवसुली हा नागरिकांच्या कायमच त्राग्याचा विषय राहिला आहे. नोटबंदी आणि जीएसटीसारखे बदल करांचा भरणा वाढविणारे बदल आहेत. पण कर वसूल करताना नागरिकाला जी वागणूक दिली जाते, त्याविषयी साहजिकच नाराजी वाढत चालली आहे. या नाराजीची दखल घेण्याचे सरकारने आता ठरविले आहे. जेनियमानुसार आणि नियमित कर देतात, त्यांचा सन्मान केला पाहिजे, असे सरकारला वाटू लागले असून हा बदल महत्त्वाचा आहे. कारण त्यामुळे किमान कर देणार्‍यांना तरी थोडे समाधान देण्याचे पुण्य सरकार आणि करवसुली करणार्‍या यंत्रणांना मिळणार आहे. अर्थात, समोर जी माहिती आली आहे, त्यात सरकार जे करू इच्छिते आहे, ते अगदीच तोकडे आहे.
जे चांगले करदाते आहेत, त्यांना राज्यपालांसोबत चहा, विमानतळावर ‘चेक इन’साठी प्राधान्य,टोल नाक्यावर प्राधान्य, विमानतळावरील गेस्ट हाऊसमध्ये प्रवेश अशा काही सवलती सन्मान म्हणून देण्याचे सरकारदरबारी घाटते आहे. हे प्रत्यक्षात कधी येईल आणि त्यातून काय साध्य होईल, यापेक्षा ही गरज सरकारने मान्य केली, हे अधिक महत्त्वाचे आहे. दक्षिण कोरियात अशा करदात्यांना प्रमाणपत्र दिले जाते आणि विमानतळावर पार्किंग शुल्क घेतले जात नाही, फिलिपाईन्समध्ये तेथील राष्ट्रीय लॉटरी तिकिटावर वर अशा करदात्यांचा गौरव केला जातो, पाकिस्तानात अशा पहिल्या १०० करदात्यांना शुल्काविना पासपोर्ट, विमानप्रवासासंबधीच्या अधिक सोयी दिल्या जातात, तर जपानमध्ये अशा करदात्यांना राजासोबत फोटो काढून घेण्याची संधी दिली जाते. विकसित देशात करदात्याला त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाते. त्याच धर्तीवर भारत सरकार विचार करते आहे, असे दिसते.
पण, आणखी एक करपद्धती आहे, ज्या पद्धतीत करदात्याची अशी खुशामत करण्याची गरज नाही. तिचे नाव अर्थक्रांतीचा बँक व्यवहार कर. जो कौटिल्याच्या विचारधारेवर आधारित आहे. मधमाशी फुलावर बसून जशी मध गोळा करते, त्याच वेळी परागकण तिच्या पायाला चिकटतात आणि परागसिंचनही होते, अशा पद्धतीने राजाने जनतेकडून कर घ्यावा, असे कौटिल्याने म्हटले आहे. यात वसुली होत नाही, यात देवघेव होते. असा देवघेवीचा व्यवहार पूर्ण करण्यास माणूस नेहमीच तयार असतो. बँक व्यवहार करांत नेमके हेच होणार आहे. बँकेचे व्यवहार करणार्‍या करदात्याला आर्थिक पत मिळणार आहे तर सरकारला पुरेसा महसूल मिळणार आहे. तोही करदात्या नागरिकांना त्रास न देता. सध्या करवसुलीसाठी जी यंत्रणा कामकरते आहे, ती भ्रष्ट तर आहेच, पण प्रचंड जाचकही आहे. करदाते नागरिक त्यामुळे दु:खी आहेत. त्यांच्या नाराजीची दखल सरकारला घ्यावी वाटते, ही चांगली गोष्ट आहे. पण आता अशा मुलाम्याऐवजी करपद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची वेळ आली आहे. त्याविषयी सरकारने आता बोलले पाहिजे.

Posted by : | on : 21 Oct 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक (248 of 1137 articles)

Dilip Kapoor
अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव | दिलीप कपूर यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीने आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. असं करताना प्रदूषण किंवा ...

×