ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक » कायदा-सुव्यवस्था; काही उपाययोजना

कायदा-सुव्यवस्था; काही उपाययोजना

॥ अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव |

पोलिसांवर कामाचा अतिरिक्त भार पडणार नाही याची काळजी घेत त्यांची कार्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जावा. त्यांचे ड्युटीचे तास निर्धारित केले जावेत, त्यांच्या सुट्या आवश्यकतेप्रमाणे मंजूर केल्या जातील याकडे लक्ष द्यावे आणि त्यांना मानसिक शांती प्रदान करून एकूणच पोलिस दलाची कार्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न व्हावा. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत, ही अभिनंदनीय बाब होय.

Maharashtra Police2

Maharashtra Police2

राजकीय नेते आणि त्यांचे दौरे यात पोलिस बळाचा बराच वापर होत असल्याने गावा-शहरांमधील कायदा-सुव्यवस्थेकडे पोलिसांचे अनेकदा दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:पासून सुरुवात करीत आपल्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानांची आणि वाहनांची संख्या कमी करत एक आदर्श प्रस्थापित केला आहे. पोलिसांवर अनेकदा राजकीय दबाव येत असल्याने पोलिसांचे हातही बांधलेले असतात. इच्छा असूनही पोलिस कारवाई करू शकत नाहीत, हे वास्तव आहे. अनेक ठिकाणी नेतेमंडळीच गुंड-पुंडांना स्वत:च्या स्वार्थासाठी उचकवण्याचे काम करतात. त्यामुळे गुन्हेगार बेडर होतात. यात सामान्य माणूस मात्र पिचला जातो. त्याच्या मनात सतत भीती असते. भाजपाचे सरकार आल्यापासून सर्वप्रथम सामान्य माणसाच्या मनात विश्‍वास निर्माण करण्याचे जे प्रयत्न गृहमंत्रीही असलेल्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेत ते प्रशंसनीयच! असे असले तरी भयमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ठोस कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता आहे. पोलिस यंत्रणा आणखी मजबूत केली जावी आणि कायदा-सुव्यवस्था चोख ठेवली जावी. कोणीही केव्हाही कुठेही निर्धास्त फिरू शकेल, असे पोषक वातावरण निर्माण केले जावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेच्या हितगला प्राधान्य देतात आणि जनहिताचेच निर्णय करतात, यात शंका नाही. राज्यात कायदा-सुव्यवस्था उत्तम असावी, यादृष्टीने काही चांगल्या उपाययोजना नक्कीच करता येतील.
पोलिस दल सक्षम व्हावे
कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि नागरिकांच्या जीविताचे व त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील पोलिस दल सक्षम करायला हवे. पोलिस शिपाई, पोलिस उपनिरीक्षक, सहायक पोलिस आयुक्त यांच्या रिक्त जागा कालबद्ध कार्यक्रमांतर्गत भरल्या जाव्यात. पोलिस दलात हुशार अधिकार्‍यांना प्राधान्याने स्थान दिले जावे. पोलिसांनी त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे यासाठी त्यांच्या वेतन आणि भत्त्यात भरघोस वाढ केली जावी. पोलिसांवर कामाचा अतिरिक्त भार पडणार नाही याची काळजी घेत त्यांची कार्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जावा. त्यांचे ड्युटीचे तास निर्धारित केले जावेत, त्यांच्या सुट्या आवश्यकतेप्रमाणे मंजूर केल्या जातील याकडे लक्ष द्यावे आणि त्यांना मानसिक शांती प्रदान करून एकूणच पोलिस दलाची कार्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न व्हावा. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत, ही अभिनंदनीय बाब होय.
प्रशिक्षणासाठी विदेशातही पाठवावे
पोलिस दलात काम करणार्‍या अधिकार्‍यांना त्यांचे कर्तव्य अतिशय प्रभावीपणे पार पाडता यावे यादृष्टीने काही निवडक हुशार अधिकार्‍यांची निवड करून त्यांना विदेशात प्रशिक्षणासाठी पाठविण्याची व्यवस्था करण्यात यावी. जगात आज सगळ्यात प्रभावी पोलिस दल स्कॉटलंड यार्डचे मानले जाते. त्यामुळे स्कॉटलंड यार्डसह अन्य देशांत निवडक अधिकार्‍यांना पाठविले तर भविष्यात त्याचे सकारामक परिणाम अनुभवास येऊ शकतात. त्यादृष्टीने संबंधित देशांच्या सरकारांशी संपर्क करून आवश्यक तो करार केला केल्यास उत्तम. त्याठिकाणचे पोलिस गुन्हा घडल्यानंतर नेमकी कृती कशा पद्धतीने प्रारंभ करतात आणि टप्प्याटप्प्याने गुन्हेगाराला कसे पकडतात याविषयीची कार्यपद्धती आपले अधिकारी जाणून घेतील, तिथल्या पोलिस दलाची आणखी काही वैशिष्ट्ये असतील तर ती माहिती करून घेतील आणि तिथल्या कायद्यांचा, गुन्ह्यांसाठी झालेल्या शिक्षेचा बारकाईने अभ्यास करतील. याचा उपयोग त्यांना आपल्या राज्यात गुन्ह्यांचा वेगाने छडा लावण्यासाठी निश्‍चितपणे होईल.
नैतिक मूल्य शिक्षण द्यावी
पोलिस खात्यातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी पोलिस दलात भरती होणार्‍या प्रत्येकाला नैतिक मूल्यांची जाणीव करून दिली द्यावी. त्यांना त्यांचे कर्तव्य आणि अधिकार याची जाणीव करून दिली जावी. पोलिस दलात जो भ्रष्टाचार बोकाळला आहे, तो कमी करण्यासाठी नैेतिक शिक्षणाची मदत हाईल. पोलिस शिपाई आणि अधिकार्‍यांचे वर्षभराचे जे प्रशिक्षण असते, त्यात कायद्याच्या अभ्यासासोबतच नैतिक मूल्यांच्या जोपासनेचेही पाठ शिकवले जातील, जेणेकरून जनतेच्या सेवेत रुजू होणारा पोलिस हा अत्यंत जबाबदार आणि प्रामाणिक असेल.
पोलिस ठाणी अत्याधुनिक करावी
राज्यातील सर्व पोलिस ठाणी ÷अत्याधुनिक करण्यावर भर दिला जावा. पोलिस ठाण्याचा परिसर स्वच्छ आणि सुंदर राखण्याचा प्रयत्न केला जावा. पोलिस ठाण्यातील वातावरण प्रसन्न कसे राहील यादृष्टीने उपाय केले जावेत. पोलिस ठाण्यात सर्व अत्याधुनिक यंत्रणा बसविल्या गेल्यास, जेणेकरून नागरिकांना पोलिसांशी संपर्क करताना आणि पोलिसांना गुन्हेगारांचा शोध घेताना अडचणी येणार नाहीत. सगळी पोलिस ठाणी इंटरनेटने जोडली जावीत, एक दूरध्वनी क्रमांक हा फक्त नागरिकांना तक्रार नोंदविता यावी यासाठी असावा, त्याचा उपयोग ठाण्यातील कर्मचारी फोन करण्यासाठी करणार नाहीत, गुन्हेगारांची रेकॉर्ड अपडेट ठेवण्याच्या दृष्टीने संगणक प्रणालीत वेळोवेळी होणारे बदल स्वीकारून यंत्रणा सक्षम केली जावी. यासाठी निधीची कमतरता कधीच पडू दिली जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
पोलिसांचे मनोबल वाढवावे
स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता नागरिकांच्या संरक्षणासाठी लढणार्‍या पोलिसांचे मनोबल वाढविण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. ही बाब लक्षात घेऊनच पोलिसांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी उपाय केले जावे. पोलिसांनी मानसिक ताण घेऊन आत्महत्या करू नये याकडे विशेष लक्ष दिले जावे. पोलिसही शेवटी एक माणूसच आहे आणि त्यालाही भावभावना आहेत. त्यामुळे त्याचे खच्चीकरण होणार नाही आणि त्याचा कायदा-सुव्यवस्था राखण्यावर परिणाम होणार नाही, यासाठी खास कार्यक्रम राबविला जावा. मनोबल वाढविण्यासाठी वेळोवेळी आवश्यक असा रिफ्रेशर कोर्सही त्यांच्यासाठी घेतला जावा. समाजकंटकांकडून पोलिसांवर हल्ला होणार नाही यासाठी उपाययोजना केली जावी. मुंबईच्या आझाद मैदानावर पोलिसांचा जो अपमान गुंडांकडून झाला होता, त्याची पुनरावृत्ती होणार नाही असा बदल रचनेत व कार्यपद्धतीत केला जावा. पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप होणार नाही यासाठी कडक धोरण तयार केले जावे.
अत्याधुनिक शस्त्रास्त्रे द्यावीत
पोलिसांना गुन्हेगारांचा प्रभावीपणे सामना करता यावा आणि त्याचबरोबर स्वत:च्या व नागरिकांच्या जीविताचेही संरक्षण करता यावे यासाठी त्यांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे दिली जावीत. गुंडांजवळ असलेल्या शस्त्रास्त्रांचा प्रभावीपणे मुकाबला करता येईल अशा क्षमतेची ही शस्त्रास्त्रे असावीत. शिवाय, जिथे बुलेटप्रूफ जॅकेट घालून काम करण्याची आवश्यकता आहे, अशा सर्व ठिकाणी पोलिसांना उच्च दर्जाची बुलेटप्रूफ जॅकेटस पुरविली जावीत. नुसते आधुनिकीकरणच करून काम भागणार नाही, तर ही शस्त्रे वापरण्याबाबतचे कौशल्यही त्यांच्यात निर्माण केले जावे. त्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जावा.
खबर्‍यांचे जाळे विणावे
पोलिसांना अनेकदा गुन्हेगारांचा शोध घेताना अडचणी येतात. अनेकदा गुन्हा घडण्याआधी कटकारस्थानाची माहिती मिळू शकत नाही. त्यामुळे परिस्थिती गुंतागुंतीची होते. असे होऊ नये यासाठी पोलिसांना मदत करण्याच्या दृष्टीने राज्यभर खबर्‍यांचे जाळेे विणले जावे आणि या खबर्‍यांना आर्थिक मदत दिली जावी. या खबर्‍यांच्या जीविताला धोका पोचणार नाही याची काळजी पोलिस दलाने घ्यावी. अनेकदा पोलिस दलातील अधिकार्‍यांमध्ये असलेल्या बेबनावामुळे खबर्‍यांचा जीव धोक्यात येतो आणि प्रसंगी त्यांना प्राण गमवावा लागतो. असे प्रकार टाळण्याच्या दृष्टीने एक खास योजना तयार केली जावी, ज्यायोगे पोलिसांना गुन्हेगारांचा छडा लावता येईल आणि खबर्‍यांच्या जीविताला धोका न पोचता त्यांचा उदरनिर्वाहही चालेल.
स्थानिक गुप्तवार्ता विभागाची कार्यक्षमता वाढवावी
पोलिसांना जशी खबर्‍यांची मदत होते, तशीच ती स्थानिक गुप्तवार्ता विभागाचीही होऊ शकते. त्यामुळे स्थानिक गुप्तवार्ता विभाग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने योजना आखली जावी. या विभागात नोकरभरती करताना उमेदवारांच्या बौद्धिक क्षमतेची आणि निर्णयक्षमतेची चाचणी घेतली जावी. सोबतच शारीरिक क्षमताही तपासली जावी. स्थानिक गुप्त वार्ता विभागाला त्याचे काम परिणामकारक रीतीने करता यावे यादृष्टीने आवश्यक सगळी यंत्रणा उपलब्ध करून दिली जावी. कुठल्याही गावात किंवा शहरात काही अनुचित घडणार असेल तर त्याची माहिती या विभागामार्फत आधीच पोलिसांना कळविली जाईल, जेणेकरून पोलिसांना सावधगिरी बाळगता येईल आणि पुढला अनर्थही टाळता येईल. यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत होईल.
नागरिकांचा सहभाग
कायदा-सुव्यवस्था राखणे ही जरी पोलिसांची जबाबदारी असली तरी नागरिकांच्या सहभागाशिवाय पोलिसांना उद्दिष्टपूर्ती करता येणे शक्य नाही. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कामात समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचे सहकार्य घेतले जावे. संबंधित पोलिस ठाण्यांच्या हद्दीत राहणार्‍या नागरिकांमधून कायद्याचे जाणकार, सामाजिक समस्यांचे जाणकार, राजकीय जाणकार, वकील, डॉक्टर, शिक्षक अशा सर्व क्षेत्रातील नागरिकांना निमंत्रित करून त्यांची एक समिती नेमली जावी आणि नागरिकांना येणार्‍या अडचणींवर मात केली जावी. अनेकदा पोलिस कारवाई करूनही प्रश्‍न सुटत नाहीत. त्यामुळे या समितीच्या माध्यमातून प्रश्‍नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करून कायदा-सुव्यवस्था स्थिती राखली जाऊ शकते.
एफआयआर नोंदविण्याची प्रक्रिया सुलभ करावी
एखाद्या नागरिकाला पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करायची असेल तर अनेकदा वाईट अनुभवाला सामोरे जावे लागते. अनेकदा पोलिस तक्रारकर्त्यालाच दमदाटी करतात अन तक्रार नोंदवून न घेता परत पाठवितात. अनेकदा एफआयआर नोंदविण्यासाठी दुसर्‍या पोलिस ठाण्यात पाठविले जाते. गुन्हा कुठेही घडो, नागरिकांना जवळच्या पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदिवता येईल अशी सुधारणा पोलिस दलात करण्यात आली असली तरी तिची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही. आज जी पद्धत अस्तित्वात आहे, त्यात बदल केला जावा. कोणताही नागरिक तक्रार करायला पोलिस ठाण्यात जाताना घाबरणार नाही, अशा प्रकारची ही सुधारणा असावी. एफआयआर दाखल करून घेतल्याबरोबर संबंधिताला त्याची कॉपी दिली जाईल, याचीही व्यवस्था केली जाईल.
वाहतुकीला शिस्त लावावी
राज्यात वाहतुकीत शिस्त निर्माण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत. पोलिसांचा वाहतूक विभाग कार्यक्षम करण्यात यावा. शहरांमधील रस्त्यांवर होणारे अपघात कमी करण्यासाठी वाहतूक यंत्रणा अधिक सक्षम केली जावी. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन काटेकोर करावे यासाठी वाहतूक पोलिस जिवाचे रान करतील, अशी मजबूत फळी तयार करावी. वाहतूक पोलिसांना वेळोवेळी विशेष प्रशिक्षण दिले जावे. नागरिकांनाही वाहतूक नियमांची माहिती देण्यासाठी शहराशहरांमधून कार्यशाळा घेतल्या जाव्यात. शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांसमोरही वाहतूक नियमांचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केले जावे. लहान वयातच मुलांना वाहतूक प्रशिक्षणाचे धडे दिले तर ते एक जबाबदार वाहनचालक म्हणून पुढे येतील.

Posted by : | on : 2 Sep 2018
Filed under : आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक (533 of 1287 articles)

Atalji1
आदरांजली : दिलीप धारूरकर | राजहंसाकडे दूध आणि पाणी वेगळे करण्याचा नीरक्षीर विवेक असतो असे म्हणतात, पण अटलजींची झेप त्याच्या ...

×