ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक » कुलीच्या मुलाची गगनभरारी

कुलीच्या मुलाची गगनभरारी

॥ अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव |

सहाव्या इयत्तेत अनुत्तीर्ण झाल्यानंतरही आज १०० पेक्षा जास्त कोटींचं साम्राज्य उभं करणार्‍या केरळातील एका कुलीच्या मुलानं हे पुन्हा एकदा दाखवून देत इतरांसमोर आदर्श प्रस्थापित केला आहे. स्वत: एक उद्योगक व्हायचं, असा निर्धार करून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यास उत्सुक असलेले पी. सी. मुस्तफा हे आयडी फ्रेशचे मालक खरोखरच इतरांसाठी प्रेरणास्रोत आहेत.

P C Mustafa

P C Mustafa

प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येतं, हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणं देता येतील. मग हे यश मिळविताना एखाद्या व्यक्तीची पृष्ठभूमी कोणती आहे याने काहीच फरक पडत नाही. सहाव्या इयत्तेत अनुत्तीर्ण झाल्यानंतरही आज १०० पेक्षा जास्त कोटींचं साम्राज्य उभं करणार्‍या केरळातील एका कुलीच्या मुलानं हे पुन्हा एकदा दाखवून देत इतरांसमोर आदर्श प्रस्थापित केला आहे. स्वत: एक उद्योगक व्हायचं, असा निर्धार करून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यास उत्सुक असलेले पी. सी. मुस्तफा हे आयडी फ्रेशचे मालक खरोखरच इतरांसाठी प्रेरणास्रोत आहेत. आज मुस्तफा यांच्या आयडी फ्रेशच्या माध्यमातून ताजी इडली व डोसा बंगळुरू, चेन्नई, पुणे, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, मंगळुरूच नव्हे तर सातासमुद्रापार थेट दुबईतील लाखो घरांपर्यंत पोचत आहे. ‘‘जर काहीतरी वेगळं करण्याची तुमची इच्छाशक्ती असेल तर ते तातडीनं करा, उद्याची वाट बघू नका’’, असा मोलाचा संदेश देणार्‍या मुस्तफा यांची यशोशिखरापर्यंतची वाटचाल खूपच प्रेरणादायी आहे.
४२ वर्षीय मुस्तफा यांचा जन्म केरळमधील वायनाड जिल्ह्यातील एका दुर्गम खेडेगावात झाला. मुस्तफा यांचे वडील कुली होते, तर त्यांच्या आईनं कधीही शाळेचं तोंड बघितलं नव्हतं. सहाव्या इयत्तेत अनुत्तीर्ण झालेल्या मुस्तफा यांनी नंतर कालिकत येथील अभियांत्रिकी महाविद्यालय (सध्याचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) आणि बंगळुरूच्या इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेतलं. आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाबाबत बोलताना मुस्तफा म्हणाले, वायनाडच्या कलपट्टानजिक असलेल्या चेन्नालोडे येथे माझं बालपण गेलं. हे गाव इतकं दुर्गम होतं की त्याठिकाणी प्राथमिक शाळासुद्धा नव्हती. माध्यमिक शाळेत जाण्यासाठी किमान चार किमी पायी चालावं लागत असे आणि त्यामुळेच बहुतांश मुलं प्राथमिक शाळेनंतरच शिक्षण सोडून देत. माझे वडील अहमद यांनी चौथीनंतर शिक्षण सोडलं आणि कॉफीच्या मळ्यात कुली म्हणून काम करू लागले. आई फातिमा कधीही शाळेत गेली नाही. मी सर्वात मोठा आणि तीन लहान बहिणी आहेत. मला शिक्षणात मुळीच रस नव्हता. अभ्यास किंवा गृहपाठ करण्याऐवजी मी दररोज शाळा सुटल्यानंतर किंवा सुटीच्या दिवशी वडिलांना मदत करत असे. घरी फक्त केरोसीन लॅम्प होते. त्यामुळं वीज नसल्याने रात्री पुस्तक उघडण्याचा प्रश्‍नच नव्हता. इतर विषयांमध्ये मी सर्वसाधारण असलो तरी माझं गणित पक्कं होतं. परंतु, सहाव्या इयत्तेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर मी शाळेत जाणं थांबवलं, असे मुस्तफा म्हणाले.
शाळा सोडल्यानंतर वडिलांनी रोजंदारीवर सोबत काम करण्यास सांगितले. परंतु, माझे गणिताचे शिक्षक मॅथ्यू यांना माझं एकाच झटक्यात शाळा सोडणं रुचलं नाही. त्यांनी माझ्या वडिलांशी संपर्क केला. वडील आणखी एक संधी देण्यास तयार झाले. तुला कुली व्हायचं की शिक्षक? असा प्रश्‍न मॅथ्यू सरांनी मला विचारला. मी त्यांच्याकडे बघितलं असता वडील आणि शिक्षकांमधील फरक मला जाणवला. मग मी लगेच उत्तर दिलं, सर मला तुमच्यासारखं शिक्षक व्हायचंय्. मी पुन्हा शाळेत गेलो तेव्हा ज्युनियर्ससोबत बसावं लागायचं. माझे सर्व वर्गमित्र वरच्या वर्गात पोचले होते. माझं इंग्रजी व हिंदी खूपच कच्चं होतं, त्यामुळे मॅथ्यू सर मला शाळेनंतर शिकवायचे. सरांनी मला एवढी मदत केली की, सातव्या वर्गात मी पहिला आलो. सर्वच शिक्षकांना याचं आश्‍चर्य वाटलं. मात्र, त्यानंतर कधीही मागं वळून बघितलं नाही, असंही मुस्तफा यांनी सांगितलं. दहावीच्या परीक्षेत मी शाळेतून पहिला आलो. त्यावेळी मॅथ्यू सरांसारखं शिक्षक व्हायचं हीच माझी महत्त्वाकांक्षा होती आणि तेच माझे आदर्श होते.
दहावी उत्तीर्ण होईपर्यंत मी वायनाडच्या बाहेर पडलो नव्हतो. महाविद्यालयात प्रवेशासाठी मला कोझिकोडला जावं लागलं. वडिलांना याबाबत काही समस्या नसली तरी शिक्षणासाठी आवश्यक असलेला पैसा त्यांच्याकडे नव्हता. मी कोझिकोडच्या फारुक महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे वडिलांच्या मित्राने वसतिगृहात राहण्याची व खाण्याची मोफत सोय करून दिली. माझ्यासोबत आणखी १४ मुलं होती. महाविद्यालय परिसरात चार वसतिगृहं होती आणि नाश्ता, दुपारचं व रात्रीच्या जेवणासाठी आम्हाला तीन वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत असे. यामुळे मला खूप अवघडल्यासारखं व्हायचं. इतर विद्यार्थी आमची टिंगलटवाळी करायचे. तो फारसा आल्हाददायक अनुभव नसला तरी शिक्षणासाठी ते सगळं पचवावं लागलं. मागं वळून बघितलं असता महाविद्यालय व्यवस्थापनानं आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांची काळजी घेऊन खूप मोठं काम केलं, असं मला वाटतं.
या आमूलाग्र बदलानंतर मी अभियांत्रिकीची प्रवेश परीक्षा दिली आणि राज्यात ६३ वा क्रमांक पटकावला. त्याआधारे मला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. शिक्षणानंतर उद्योजक वगैरे होण्याचं काहीही स्वप्न नव्हतं. मला फक्त निष्णात अभियंता होण्याची इच्छा होती. कठोर परिश्रम करून अभ्यासात यश मिळवलं. १९९५ मध्ये पदवी संपादन केल्यानंतर मला मॅनहॅटन असोसिएट्स या अमेरिकेतील भारतीय स्टार्टअपमध्ये जॉब मिळाला. बंगळुरू येथे स्टार्टअपमध्ये नोकरी केल्यानंतर मला मोटोरोलाकडून कॉल आला आणि वायनाड जिल्ह्यातील एका खेडेगावातून आलेल्या माझ्यासारख्या मुलासाठी ते स्वप्नवत होतं. बंगळुरू येथे काही काळ काम केल्यानंतर मला आयर्लंडला पाठविण्यात आलं. मी सायंकाळी ६.३०च्या विमानाने रवाना झालो. तेव्हा प्रथमच विमानात बसलो आणि त्यावेळचं बंगळुरू शहराचं हवाई दृश्य मी कधीच विसरू शकत नाही.
आयर्लंडमध्ये मी माझी माणसं आणि जेवण मिस करत होतो. तीन महिन्यांनंतर मी सिटीबँक दुबईत जॉईन झालो. १९९६ साली माझं वेतन लाखांत होतं आणि शैक्षणिक कर्ज फेडल्यानंतर मी पहिलं कोणतं काम केलं असेल तर ते म्हणजे मित्राकरवी वडिलांना एक लाख रुपये पाठविले. त्यावेळी वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळल्यांचं मित्रानं सांगितलं. त्यानंतर मी गावातच वडिलांना घरही बांधून दिलं.
२००३ साली मी भारतात परतलो. याची तीन कारणं होती. एकतर कुटुंबीयांसोबत वेळ घालवायचा होता, उच्च शिक्षण घ्यायचं होतं आणि समाजाला काहीतरी परत द्यायचं होतं. गावात अशी काही मुलं होती जी हुशार असूनही त्यांना काहीच हाती लागत नव्हतं. अशा मुलांना संधी देण्याची इच्छा होती आणि नोकरी देऊनच ते शक्य होतं. त्यासाठी मला उद्योजक व्हावं लागणार होतं. यासाठी मला गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडावी लागली आणि तो आयुष्यातला सर्वात कठीण निर्णय होता. या निर्णयामुळे वडिलांना धक्काच बसला. परंतु, चुलत भाऊ नासिर व पत्नीनं पाठिंबा दिला.
भारतात परतल्यानंतर मी आठवड्यातून एकदा कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावी जात असे. त्यामुळे माझा पहिला हेतू यशस्वी झाला. त्यानंतर नासिर, शमसू, जाफर, नौशाद आणि मी अशा पाच जणांनी मिळून व्यवसाय सुरू केला. यामध्ये माझा ५० टक्के आणि इतर चार जणांचा ५० टक्के वाटा होता. आम्हाला शहरात एक ५५० चौरस फुटांची जागा सापडली. त्याठिकाणी दोन ग्राईंडर्स, मिक्सर व सिलिंग मशिनसह आम्ही व्यवसाय सुरू केला. आम्ही दुकानाच्या नावाचा विचार करत असताना भावाने इडली, दोसासाठी आयडी असं नाव सुचवलं. आम्हाला ताजा तोसा व इडली द्यायची असल्याने आम्ही आयडी फ्रेश, असं नाव ठेवलं. प्रारंभी आजूबाजूच्या परिसरात २० स्टोअर्स सुरू करण्याची योजना होती. सहा महिन्यात दररोज १०० पाकिटं विकल्या गेली, तर मी आणखी गुंतवणूक करीन व मशिन घेईन असं ठरवलं होतं. आधी ब्रॅण्डची ओळख नसल्याने प्रसार, प्रचार करण्यासाठी सर्व प्रयोग केले. आम्ही पहिल्या दिवशीपासूनच नफा कमावला. आधी कुणीही वेतन घेतलं नाही. ५०० रुपये भाडं आणि सर्व खर्च वजा झाल्यानंतर पहिल्या महिन्यात आम्हाला ४०० रुपये नफा झाला. १०० पाकिटांचे लक्ष्य गाठल्यानंतर मी आणखी ६ लाख रुपये गुंतविण्याचा निर्णय घेतला. ८०० चौरस फुटांची मोठी जागा घेतली आणि क्षमता दोन हजार किलोपर्यंत वाढवली.
२००७ साली मी एमबीएची पदवी घेतली. दोनच वर्षात आम्ही क्षमता ३५०० किलोपर्यंत वाढवली. आमची भागीदारी असलेल्या स्टोअर्सची संख्या ३०० ते ४०० झाली. शिवाय आमच्याकडे ३० कर्मचारी काम करू लागले. २००८ साली मी आणखी ४० लाख रुपये गुंतविले आणि हॉस्कोट इंडस्ट्रीयल एरियात २५०० चौरस फुटांचं शेड विकत घेतलं. आम्ही अमेरिकेतून पाच मोठे ग्राईंडर्स मागवले. २००८ साली आम्ही आमच्या उत्पादनात पराठ्याचाही समावेश केला. लवकरच आम्ही वडा बटर व रवा इडली सामील केली. २०१२ साली आम्ही चेन्नई, मंगळुरू, मुंबई, पुणे आणि हैदराबाद या शहरांमध्ये प्रवेश केला. मित्र आणि नातेवाईकांनी आयडीला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी खूप मदत केली. २०१३ साली आम्ही दुबईत प्रवेश केला. दुबईत डोसा बटरला सर्वात जास्त मागणी होती आणि आम्ही ती पूर्ण करू शकत नव्हतो. आता आम्ही आंतरराष्ट्रीय बाजारातही प्रवेश केला आहे.
आज आम्ही आमच्या कारखान्यातून ५० हजार किलोचं उत्पादन करतो. यासाठी चार कोटींची गुंतवणूक झाली, तर आमचा महसूल १०० कोटी आहे. आता आमची उलाढाल १५० कोटींची झाली आणि याचा आनंद आम्ही साजरा केला. पुढल्या काळात ही उलाढाल एक हजार कोटींपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. मी फक्त ग्रामीण भागातील युवकांनाच रोजगार देण्याचा प्रयत्न करतो. फक्त तो स्मार्ट, प्रामाणिक आणि एकनिष्ठ असावा. परिश्रम करणार्‍यांना आम्ही दरमहा ५० हजारांपर्यंत वेतन देतो, असे सांगत मुस्तफा थांबले. यशस्वी होण्यासाठी उत्पादनाचा दर्जा कायम ठेवणे आवश्यक असते, असा सल्ला देतानाच योग्य शहर, योग्य उत्पादन आणि योग्य वेळ यामुळेच यश मिळाल्याचे मुस्तफाने सांगितले. •••

Posted by : | on : 23 Sep 2018
Filed under : आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक (477 of 1287 articles)

Mob Lynching
टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे | ‘मॉब लिंचिंग’ हा शब्द काही आताशा नवीन वा अपरिचित राहिलेला नाही. आपल्यादेशातील विचारवंत म्हणवणार्‍या ...

×