ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » कृष्णमय जग…

कृष्णमय जग…

॥ विशेष : ऊर्मिला राजोपाध्ये |

श्रीकृष्ण भारतभूमीच्या कणाकणांत सामावलेला आहे. त्याचं सावळं रूप इथल्या काळ्या मातीत आणि काळ्याशार ढगांमध्ये दिसतं, तर त्याच्या मंजूळ पाव्याचा स्वर वार्‍याच्या प्रत्येक झुळुकीवर स्वार होऊन येतो. त्याची तेजस्वी आणि प्रेमळ मुद्रा तनामनाचा शीण घालवते, त्याच्या भक्तिरंगाचा लेप समस्त भारतीयांच्या जीवनगाभ्यावर चंदनासमान दरवळत राहतो. म्हणून श्रीकृष्णजयंती, गोकुळाष्टमी यांसारखे सण महोत्सव ठरतात…

Shri Krishna

Shri Krishna

सृष्टीच्या पालनकर्त्या विष्णूने विविध अवतार घेतले. वेगवेगळ्या रूपांमध्ये दुष्ट, अनिष्ट शक्तींचा नि:पात केला. कृष्णावतार हा त्यापैकीच एक… नरसिंह, वराह, मत्स्य, वामन आदी रूपांमध्ये विष्णूने आपल्या सामर्थ्याचा साक्षात्कार घडवला तसाच तो कृष्णावतारातही घडवला. कंसाचा वध, कालियाचा वध, पूतनामावशीचा कपटी डाव तिच्यावरच उलटवणं, या आणि अशा अनेक विस्मयकारक घटनांनी, प्रसंगांनी कृष्णचरित्र सजलं आहे. म्हणूनच विष्णूच्या एकूण अवतारांमध्ये कृष्णावतार विलक्षण आहे. इतका की, जवळपास पाच हजार वर्षांचा काळ उलटला तरी जनांना कृष्णजन्माचं स्मरण आहे. वसुदेव-देवकीच्या पोटी जन्मलेल्या आणि नंद-यशोदेच्या अंगणी वाढलेल्या कृष्णाचा जन्मोत्सव आजही भारतातील गल्लीबोळातील देवळांमध्ये आणि घराघरांमध्ये साजरा होतो. पाळण्यात ठेवलेल्या त्या सावळ्या रूपाला जोजावण्यासाठी आजही अनेक हात पुढे सरसावतात आणि हलकेच झोके घेणारं ते मनोहर रूप पाहून हरखून जातात. कधी काळी याच सावळ्या रूपाने, घनश्यामाने गोप-गोपींना इंद्राच्या कोपापासून वाचवण्यासाठी करंगळीवर पर्वत तोलून धरला होता. पांडवांपुढील धर्मसंकट त्याच्याच धूर्त नीतीने दूर झालं होतं. कर्तव्यनिष्ठेचा परिपाठ त्यानेच घालून दिला होता. कर्तव्यापुढे रक्ताची नाती गौण समजली जावीत, हा वस्तुनिष्ठ विचार रुजवणारा हाच तो महात्मा आहे. प्रणय आणि पराक्रम, नीती आणि निष्ठा, शौर्य आणि सौंदर्य यांचं बेमालूम मिश्रण म्हणजे कृष्ण. म्हणूनच युगं उलटली तरी आपल्याला कृष्णजन्माचं कौतुक आहे. दरवर्षी तितक्याच आनंदात, भक्तिपूर्ण वातावरणात त्याचा जन्मोत्सव साजरा होतो.
जन्मोत्सवानंतर गोपाळकालादेखील तितक्याच उत्सवी वातावरणात साजरा होतो. गोकुळात गोधन चरायला सोडल्यानंतर सगळे बालगोपाळ घरून आणलेली शिदोरी सोडत आणि रानातच सहभोजन रंगे. कोणताही भेदाभेद न पाळता कान्हा सगळ्यांचे पदार्थ एकत्र करून आस्वाद घेत असे. दहीहंडी अथवा गोपाळकाला त्याचंच प्रतीक आहे. शिंकाळ्यावर बांधलेल्या मडक्यांमधून दही-दूध-लोणी चोरणार्‍या आणि मित्रांसवे त्याचं सेवन करणार्‍या कृष्णाच्या या बाळलीलांचं स्मरण आणि बंधुभावाचा परिचय म्हणून आजही कालाष्टमी साजरी होते. आता या परंपरेचं उत्सवी स्वरूप अंगावर येणारं आहे, यात शंका नाही. या निमित्ताने रचले जाणारे उंचच्या उंच मानवी थर, त्यात जखमी होणारे गोविंदा, दहीहंडी फोडणार्‍यांना दिली जाणारी लाखांच्या घरातील बक्षिसं, त्यानिमित्ताने भरणारा सेलिब्रिटींचा मेळा हे आणि यांसारखे मुद्दे वादाचे आहेत, याबाबत दुमत नाही. मात्र, क्षणभर हे सगळं बाजूला सारून विचार केला तरी समाजात एकी, सख्य निर्माण करण्यासाठी या सणाचं औचित्य आणि महत्त्व आपण लक्षात घ्यायला हवं.
बदलणं हा काळाचा भाव असला, तरी न बदलणं हा कदाचित माणसाचा स्वभाव आहे. म्हणूनच आजच्या आधुनिक युगातल्या माणसामध्येही आदिम काळातली बरीचशी स्वभाववैशिष्ट्यं दिसतात, जी बदलण्यासाठी कृष्णासारख्या महात्म्याची गरज आहे. आजही माणूस हिंस्र आहे, अपराधी आहे, पाखंडी आहे, सर्व प्रकारच्या लालसांनी युक्त आहे. मानवी शरीरातला ७०-७५ टक्के भाग पाण्याने भरलेला असतो, तसा वृत्तीतील जवळपास ९० टक्के भाग तमोगुणांनी भरलेला असतो, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. महाभारतकाळातच नव्हे, तर प्रत्येक काळात कौरव संख्येने अधिकच असलेले दिसतात. लोभी, स्वार्थी, मत्सरी, कपटी प्रवृत्तीचं नेहमीच प्राबल्य असतं. त्यांची कपटी कारस्थानं हाणून पाडायची, तर मोजक्या पांडवांच्या पाठी उभा राहण्यासाठी सामर्थ्यशाली कृष्ण हवा. कारण तो साधा आहे तसा काट्याने काटा काढणाराही आहे. दुष्टांच्या मनातील कपट ओळखून तितक्याच धूर्तपणे उत्तर देणारा आहे. ‘जशास तसे’ हा मंत्र आळवणारा तो एक सजग आहे. त्याच्याकडे परमशक्तिशाली असं सुदर्शनचक्र आहे. पण, जाता-येता प्रत्येकाला आपला धाक दाखवत सुटण्याइतका बालिशपणा त्यामध्ये नाही. एखाद्याच्या अपराधांचा घडा १०० टक्के भरल्यानंतर, दुसर्‍या शब्दांत सांगायचं तर त्याला सुधारण्याच्या सर्व संधी देऊन झाल्यानंतरही अपेक्षित परिणाम दिसले नाहीत तरच कठोर शासन करण्याचा शहाणपणा त्याच्याकडे आहे.
महाभारताच्या रणसंग्रामाला सुरुवात होण्यापूर्वी अर्जुन आणि दुर्योधन हे दोघेही मदतीच्या अपेक्षेने बसले असताना, दुर्योधनाला आपलं सर्व सेनासामर्थ्य देऊन आपण मात्र नि:शस्त्र होऊन अर्जुनाच्या रथाचं सारथ्य स्वीकारणं, ही घटना त्याच्या ठायी असलेला द्रष्टेपणा दाखवून देते. शेवटी योग्य ठिकाणी सामर्थ्य दाखवलं तरच परिणामकारकता वाढते. शक्तीचा योग्य जागी केलेला उपयोगच यशोवर्धक ठरतो. त्याचप्रमाणे प्रयत्नांची योग्य दिशाच परिणामांपर्यंत पोहोचवते. या सर्वाचं भान राखूनच कृष्णाने महाभारतातल्या महान योद्ध्याची, महानायकाच्या रथाची सूत्रं हातात घेतली आणि याद्वारे त्याच्या वेगावरच नव्हे, विचारांवर अंकुश ठेवण्याचं महत्त्वपूर्ण काम पार पाडलं. पुढे या महासंग्रामात अर्जुन रथ अडला असताना पडला नव्हता एवढा विचारांच्या गुंत्यात अडकला आणि तो सोडवण्यासाठी कृष्णाने धर्मग्रंथांमधील महामेरू निर्माण केला. अर्जुनाला उपदेश करताना सांगितलेलं गीताभाष्य आजही भारतीयच नव्हे, तर समस्त विश्‍वातील मानवांना जीवनाभिमुख करणारा स्तंभ आहे. त्यातला एक एक श्‍लोक म्हणजे आयुष्यरूपी घडणीतील प्रत्येक कोनाड्यात जपून ठेवावी अशी पणती आहे. तिची तेजोशलाका आयुष्याचा प्रत्येक टप्पा, प्रत्येक पर्व, प्रत्येक पळ उजळून टाकणारी आहे. म्हणूनच कृष्णाची महानता आजही तीळमात्र कमी झालेली नाही.
कृष्णचरित्र अभ्यासण्यासाठी ना वयाची कुठली मर्यादा, ना बौद्धिक अथवा शारीरिक कुवतीचं कुठलं बंधन… प्रत्येकाला आवडतं तसं त्याचं रूप या चरित्रात दिसू शकतं. बालगोपाळांना तो ‘माखनचोर’, यशोदेला सतावणारा, तिच्या खोड्या काढणारा, दंगा घालून गावकर्‍यांच्या नाकी नऊ आणणारा कान्हा भावतो. पौगंडावस्थेतील मुला-मुलींना- त्याच्या गोपिकांना छेडणार्‍या, राधिकेला सळो की पळो करून सोडणार्‍या, गोपींची वस्त्रं पळवणार्‍या, रासलीलेत दंग होणार्‍या रूपाची भुरळ पडते. प्रौढांना-संसारी लोकांना पतिरूपातली त्याची युक्ती भावते. दारी पारिजातक लावण्याचा हट्ट धरणार्‍या सत्यभामेला तिच्या दारी हे झाड लावून संतुष्ट करणारा, पण रुक्मिणीच्या दारी फुलांची रांगोळी घालणारा कृष्ण आदर्श भासतो, तर वयस्करांना गीतेतून प्रकट होणारा, आभाळापेक्षा अधिक उंचीचा संदेश देणारा श्रीकृष्ण जवळचा वाटतो. त्याचं चरित्र शूरवीरांसाठी आहे, धुरिणांसाठी आहे, राजकारण्यांसाठी आहे, प्रापंचिक जनांसाठी आहे, नीतिज्ञांसाठी आहे आणि आध्यात्मिक पातळी गाठू इच्छिणार्‍या साधकांसाठीही आहे. अशी सर्वव्यापकता अगदी मोजक्या जीवनचरित्रांमध्ये पाहायला मिळते. हा वेगळेपणा आहे म्हणूनच आजही कृष्णाचं अप्रूप आहे. या मातीत सामावलेला त्याचा अंश, त्याचं तत्त्वज्ञान जाणून घेण्याची आस आहे.
श्रीकृष्णचरित्र तुमच्या-आमच्या प्रत्येकाच्या आयुष्याशी सहज समरस होणारं आहे. कारण या महात्म्यानेही तोच कल्लोळ अनुभवला आहे जो सर्वसामान्य अनुभवतात. राजघराण्यात जन्म घेऊन त्याला सहजतेने राजवैभव उपभोगता आलं नाही. लहानपणी अनेक क्रूर, दुष्ट शक्तींचा नि:पात करण्याचं धारिष्ट्य त्याला दाखवावं लागलं. गुरं चारण्यासाठी कुरणांमध्ये दिवस काढावे लागले. वाईट शक्ती भेटल्या तशाच आयुष्यात कृष्णाला पेंद्या, सुदामा यांसारखे जिवाभावाचे मित्र भेटले. राधा-मीरासारख्या मनस्विनींच्या प्रेमभावाने त्याच्या आयुष्याचा प्रेमार्द कंगोरा अधिक गहिरा झाला. भार्यासुखाने परिपूर्ण असणार्‍या या विभूतीला सोळा सहस्त्र नारींचा नाथ होणं भाग पडलं. बंदिवासातील या स्त्रियांच्या संरक्षणासाठी त्यांना आपल्या नावाचा आधार देणं, हे त्याला कर्तव्य वाटतं. या कृतीने त्याला ‘भोगी योगी’ हे संबोधनही स्वीकारावं लागलं. पण, जन काय म्हणतात याची तमा न बाळगता योग्य ती कृती करण्याचं धैर्य दाखवणारा तो युगपुरुष असल्याने, अशी वृत्ती असणार्‍यांना तो जवळचा वाटतो. कर्ण अर्जुनाइतकाच महान योद्धा आहे, धनुर्धर आहे, हे माहीत असूनही दुर्जनांच्या पक्षातल्या या शक्तीचा नि:पात करण्याची गरज ओळखून त्याने चिखलात रुतलेलं रथाचं चाक काढण्यात मग्न असणार्‍या कर्णावर बाण सोडण्याचे आदेश दिले आणि महाभारतातील एका महत्त्वपूर्ण अडथळ्याला हलकेच वळसा घालण्याची तत्परता दाखवली. त्याच्या या निर्णयामुळे कवचकुंडलंरहित ‘कर्ण’ नावाचा एक तेजस्वी अध्याय संपला आणि अर्जुनाच्या धनुर्विद्येला नवी धार चढली. कृष्ण असाच आहे. व्यक्तिमत्त्वांमधील विविध कौशल्यं उजळवून टाकणारा, नव्या रूपात त्यांची ओळख करून देणारा, स्वत्व जपण्याचे संकेत देणारा…
असा यथार्थ महिमा असल्यामुळे श्रीकृष्णाशी संबंधित प्रत्येक घटनेचा महोत्सव होतो. त्याच्याच स्मरणाने होळीच्या प्रणयी रंगाला अध्यात्माची गहिरी डूब मिळते. त्याच्या जीवनचरित्राचा संदर्भ आहे म्हणूनच दरवर्षी दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे वेगळी उंची गाठतात. त्याच्याच अनुषंगाने गोपाळकाला साजरा होतो. रासलीला रंगते ती त्याच्याच प्रेरणेने आणि तुळशीविवाह साजरा होतो तोही त्याच्याच संदर्भाने. असा लंगडा बाळकृष्ण घरोघरी गोकुळ वसवतो आणि तोच नववधूसवे सासरी तिची पाठराखण करण्यास जातो. पावा आणि डोक्यावरील मोरपीस कोणाही लहानग्याने धारण केलं की, त्या बाळरूपात कृष्णरूप दिसतं ते याच समरसतेमुळे. ही समरसताच आहे ज्यामुळे आजच्या उत्सवांचे धागे थेट कृष्णयुगापर्यंत पोहोचतात. आता समुद्राकाठी विसावलेल्या द्वारकेमध्ये कोणे एके काळी असा राजा राज्य करत होता, हा विचार मनाला सुखावून जातो. कोण्या पारध्याच्या बाणाने त्याच्या कमळपाकळीसमान कोमल दिसणार्‍या पावलाचा वेध घेत एका अलौकिक युगपुरुषाचा अंत केला, तरी ती तेजोमय शक्ती तो विझवू शकला नाही. खरंतर ती कोणीही विझवू शकणार नाही… •••

Posted by : | on : 2 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (360 of 875 articles)

E Project
मानसरंग : मयुरेश उमाकांत डंके | गेल्या पाच-सहा वर्षांत ‘कॉपी-पेस्ट’ ही अभ्यासाची एक नवी पद्धत रूढ झाली आहे. शाळेपासूनच मुलांना ...

×