ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » केरळचे पूरसंकट नैसर्गिक की मानवनिर्मित?

केरळचे पूरसंकट नैसर्गिक की मानवनिर्मित?

॥ विशेष : विश्‍वराज विश्‍वा, कोची |

हजारो लोक मरत होते, जीव वाचविण्यासाठी लष्कर आणि नौदलाची मदत मागत होते. कुणाचा विश्‍वास बसणार नाही की, धरणातील जलविसर्ग रात्री इतका वाढविण्यात की, आसपासचा संपूर्ण परिसर जलमय होऊन गेला. रात्रीच्या अंधारात सुरक्षित जागी जाण्याचीही उसंत लोकांना मिळाली नाही. रात्रीच्या वेळी जलविसर्ग वाढविणे हे कुठल्याच धरण व्यवस्थापनात आणि आचारसंहितेत बसत नाही. रात्री घरांची दारे तोडून अनेकांना वाचविण्यात आले. पम्बा नदीच्या काठच्या लोकांना, धरणातून इतके प्रचंड पाणी सोडणार असल्याची कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती.

Kerala Flood 2

Kerala Flood 2

केरळच्या सुंदर भूमीची पाण्याशी संबंधित अनेक वैशिष्ट्ये आहेत. दक्षिणेतील या राज्याला ५८० किमीचा समुद्र किनारा असून, एकूण १४ जिल्ह्यांपैकी उत्तरेकडील कासरगौड ते दक्षिणेतील तिरुवनंतपुरम अशा ९ जिल्ह्यांना हा किनारा लाभला आहे. याशिवाय, केरळ राज्यात ४४ नद्या, अनेक तळी, सरोवरे आणि बॅक वॉटर जलसाठे आहेत. यावरून तुमच्या लक्षात येईल की केरळची ३ कोटी लोकसंख्या कशी जलसाठ्यांच्या आसपासच वसली आहे. केरळला ५८० किमीचा सागरी किनारा असला तरी या राज्याची, पश्‍चिम घाट ते अरबी समुद्र रुंदी केवळ ३५ ते १२० किमीच आहे. राज्यात ४४ प्रमुख धरणे आणि ४० लहान चेक डॅम्स असे एकूण ८४ आहेत.
मोसमी पावसाचे दोन ऋतू मे महिन्यापासून ६ ते ८ महिने भरपूर पाऊस आणतात. कालडी व अलुआ यांच्यामधील पेरियार नदीवरील पेरुम्बवूर हे माझे गाव, गेल्या ९० वर्षांत प्रथमच झालेल्या या भयानक पुराने पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. जलसाठे, पाऊसमान आणि भौगोलिक वर्णन मी यासाठी करत आहे की, आम्हाला दरवर्षी दोन मोसमी पावसापासून भरपूर पाणी मिळते आणि कालवे, नद्या इत्यादींच्या माध्यमातून हे पाणी जलसाठ्यांमध्ये आणि तिथून अरबी समुद्रात सहजपणे जात असते. या राज्याच्या उत्तर-दक्षिण १०० किमीच्या पट्ट्यात तर पावसाच्या पाण्याला अरबी समुद्रात जाण्यास जास्तीतजास्त ४ ते ५ तासच लागतात. असे असताना १४ ऑगस्टच्या रात्रीपासून केरळमध्ये असे काय घडले? संपूर्ण केरळ राज्याला कुणी पाण्यात बुडविले? या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न आहे.
अचानक जाग
१२ ऑगस्टनंतर केरळ सरकारला अचानक जाग आली की, मे महिन्यापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने आपल्या सर्व सीमा पार केल्या आहेत. जुलै २०१८ पर्यंत तर राज्यातील सर्व धरणे तुडुंब भरली होती. काठोकाठ भरलेल्या धरणांची दारे उघडली नाहीत आणि त्यातून पाणी वाहू दिले नाही तर, धरणे फुटण्याचा आणि त्यामुळे प्रचंड विध्वंस होण्याचा धोका होता. अचानक केरळ सरकारने, घनदाट लोकवस्तीत असलेल्या ८० धरणांची दारे उघडून टाकली. त्यामुळे चार तासातच सर्व नद्यांना महापूर आलेत आणि सर्व जलाशये भरून गेलीत. सर्व काही सामान्य असल्याचे समजून नदीकाठचे लोक झोपायला गेले होते. सकाळी उठले तर त्यांची घरे अर्धी पाण्यात बुडालेली होती. शहरातील प्रत्येक जागेवरून पुराचे पाणी वेगाने वाहात होते. घरे सोडून जीव वाचविण्याशिवाय लोकांपुढे दुसरा पर्यायच नव्हता. पाण्याने अतिशय वेगाने पाच फुटाची पातळी गाठल्यामुळे अनेक जण घरातच अडकले. सुरक्षेसाठी जे लोक गच्चीवर गेलेत ते तिथेच अडकले. पाण्याची पातळी किती वाढणार याची लोकांना काहीच कल्पना नव्हती. कारण, सरकारने विहित पद्धतीनुसार नदीकाठी, धरणाकाठी राहणार्‍या लोकांना पुरेशी आगावू कल्पना किंवा इशारा दिलाच नव्हता. त्यामुळे आयुष्यभरात जी काही कमाई केली, ती सर्व नष्ट झाली. घर, पैसे, शेतजमीन, धान्य, घरातील वस्तू, व्यवसाय, जनावरे, वाहने, दुकाने सर्व काही. २४ तासांच्या आत ७५ टक्के केरळ पाण्यात होता आणि ३८ प्रमुख मोठी धरणे संलग्न नद्यांमध्ये मोकळी केली गेली होती. नेमके काय झाले आहे, हे लोकांना कळेपर्यंत, केरळमधील रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक कोलमडली होती.
काही तासांनी संपूर्ण वीजही गेली. त्यामुळे नंतरच्या काही तासांत जी मंडळी सुटकेसाठी सुरक्षित मार्गांच्या शोधात होती, त्यांचे मोबाईल फोनही बॅटरी संपल्यामुळे बंद पडले. लोक पूर्णपणे जगापासून तुटून गेले होते. आता फक्त सुटकेसाठी प्रार्थना करण्यापलीकडे काहीच उरले नव्हते. म्हणून एक प्रश्‍न पुन्हा पुन्हा विचारला जात आहे- केरळला महापुरात कुणी ढकलले?
वस्तुस्थिती ती वस्तुस्थितीच
यावर्षी मे महिन्यात सुरू झालेला मुसळधार पाऊस, केरळला नेहमी जितका येतो त्यापेक्षा दुप्पट होता. चार महिन्यांच्या काळात या पावसाने नद्यांना पूर आलेले होते. या चार महिन्यांच्या काळात, पूरस्थिती तसेच त्यामुळे होणार्‍या प्रचंड नुकसानीला टाळण्यासाठी, केरळच्या राज्य सरकारने, भारतीय हवामान खात्याकडून आलेले इशारे तसेच आतापर्यंत होत असलेल्या जास्तीच्या पावसाचे आकडे जाहीरच केले नाहीत. हवामान खात्याकडून आलेल्या माहितीनुसार १ जून ते २४ ऑगस्ट या काळात गेल्या वर्षीपेक्षा सुमारे २०० टक्के अधिक पाऊस पडला होता. जुलै महिन्यातच केरळची सर्व धरणे जवळपास तुडुंब भरली होती. ही सर्व माहिती जाहीर झाली होती. तसेच ती केरळचे वीज मंत्री एम. एम. मणी यांच्या फेसबूक पोस्टमध्येही होती. परंतु राज्य सरकार झोपेत होते.
केरळमधील बहुतेक सर्व प्रमुख धरणांची मालकी आणि व्यवस्थापन केरळ राज्य वीज मंडळाकडे आहे. अनेक तज्ज्ञांनी राज्य सरकारला जूनपासून इशारे देण्यास सुरवात केली होती की, तुम्ही आतापासूनच धरणांचे दरवाचे हळूहळू उघडणे सुरू केले नाही तर, सततच्या मुसळधार पावसामुळे ते तुडुंब भरतील आणि नंतर परिस्थिती हाताबाहेर जाईल. तज्ज्ञांच्या या सल्ल्याकडे राज्य सरकारने साफ दुर्लक्ष केले. या सर्व बाबींचा एकच निष्कर्ष निघतो की, २४ तासाच्या काळातच सर्व प्रमुख धरणांचे दारे उघडण्याचा निर्णय, धरण व्यवस्थापन धोरण तसेच धरणांसाठी असलेली किमान जलसाठा व्यवस्थापन यंत्रणेच्या विहित संहितेचे पालन न करता घेण्यात आला होता.
संबंधित खात्याकडून तसेच केरळ राज्य वीज मंत्रालयाच्या फेसबूकवर पोस्ट करण्यात आलेल्या माहितीवरून असे दिसून येते की, जुलै महिन्याच्या शेवटी पावसाळ्याच्या मध्यातच धरणांची पाणीसाठवण क्षमता जवळपास पूर्ण झाली होती. येणार्‍या काळात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली होती. ७ ऑगस्ट रोजी धरण सुरक्षा प्राधिकरणाने आपल्या प्रसिद्धिपत्रकात सुरक्षेच्या मुद्यावरून धरणांची दारे उघडण्याची कुठलीही योजना नसल्याचे स्पष्ट केले होते आणि बरोबर एका आठवड्याने त्यांना राज्यातील ३८ मोठ्या धरणांचे सर्व दरवाजे एकसाथ उघडावे लागले.
केरळमधील सर्वात मोठे असलेले इडुक्की धरण २० जुलैलाच २३७० फुटापर्यंत भरले होते. इडुक्की धरणाचे चेरुतोनी कालव्यात उघडणारे दरवाजे २३७० फुटांवर आहेत. पाणी जेव्हा या पातळीवर येते तेव्हा दरवाजे हळूहळू उघडून अतिरिक्त पाणी बाहेर वाहू द्यावे लागते. जेणेकरून पाणीसाठ्याची पातळी मर्यादित ठेवता यावी. केरळ सरकार आणि वीज मंडळ, पाण्याची पातळी २४०३ फूट होईपर्यंत वाट बघत बसले आणि नंतर पाचही दारे एकसाथ उघडण्यात आली. हे धरण बांधून झाल्यानंतर ४० वर्षांत एकसाथ पाचही दारे कधीही उघडण्यात आली नव्हती, हे लक्षात घ्या. इडुक्की धरणातील पाणी पेरियार नदीतून वाहत पाच तासात अरबी समुद्राला जाऊन मिळते. इडुक्कीच्या खालच्या भागात याच नदीवर आणखी दोन मोठी धरणे आहेत. इदमलायर आणि भोततकेट्टू. त्यामुळे तुम्हाला जेव्हा इडुक्की धरणाची दारे उघडायची असतात तेव्हा पुरेशा आधी या दोन धरणांची संपूर्ण दारे उघडून ठेवावी लागतात. जेणेकरून इडुक्की धरणातील पाण्याने ही धरणे ओसंडून वाहू नयेत. परंतु झाले काय की, या तीनही धरणांची दारे एकदमच उघडण्यात आली आणि पेरियार नदीतून प्रती सेकंदाला लाखो लिटर पाणी वेगाने वाहू लागले. पेरियार नदीतील या पाण्याच्या प्रवाहाने काही वेळातच कालडी, अलुवा आणि कोची विमानतळ पुरात बुडाले. विमानतळाच्या मुख्य इमारतीत पुराचे पाणी घुसल्यामुळे कोची विमानतळ १५ दिवस बंद ठेवावा लागला. त्याचप्रमाणे, त्रिचुर जिल्ह्यात, उफाणत्या नदीने प्रवाह बदलल्यामुळे करुवन्नुर गाव पूर्णपणे पाण्यात बुडाले. पेरिंगलकुतु व शोलायर धरणांचे दरवाजे उघडल्यामुळे चलकुडी पुळा नदीने चलकुडी गाव पाण्याखाली घातले. शोलायर धरण उघडले गेले आणि त्याचे पाणी पेरिंगलकुतु धरणात आले व तुलनेने लहान असलेल्या पेरिंगलकुतु धरणाला ते पाणी सांभाळता आले नाही आणि ते धरण सर्व बाजूंनी ओसंडून वाहू लागले. त्यामुळे आजपासच्या परिसरात पूरसंकट आले. तसेच जेव्हा कुरुमली आणि मनाली नद्यांवरील अनुक्रमे पीची व चिम्मिनी धरणांची दारे उघडण्यात आली, त्यातील पाण्याच्या वेगाने या नद्यांनी अनेक ठिकाळी आपला प्रवाहच बदलून टाकला आणि काठावरील सर्व गावे, शहरांमध्ये पुराचे प्रचंड पाणी घुसले. नदी प्रचंड वेगाने शेतातून आणि रस्त्यातून वाहात असलेली बघून लोक स्तंभित झाले होते. या लोकांचा फक्त जीव वाचला; पण सर्व काही वाहून गेले. त्यासाठी भारतीय नौदल, लष्कर आणि पोलिसांना धन्यवाद द्यायला हवे.
पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या पतनमतिट्टा जिल्ह्यातील स्थिती जरा वेगळी आणि भयानक होती. चेंगन्नुर, पंडनाड, अरानमुला ही गावे तर सतत तीन दिवस पाण्याखाली होती. आता देखील या भागातील जनजीवन सामान्य झालेले नाही. ही जी भयानक आपत्ती ओढवली आणि जे भयंकर नुकसान झाले त्याला स्पष्टपणे जबाबदार, पम्बा व कक्की- अनतोड धरणांचे गैरव्यवस्थापनच आहे. चेंगन्नुरचे आमदार साजी चेरियन त्याच्या नागरिकांना वाचविण्यासाठी सोशल मीडियावरून आक्रोश करताना तुम्ही बघितले असेल. हजारो लोक मरत होते, जीव वाचविण्यासाठी लष्कर आणि नौदलाची मदत मागत होते. कुणाचा विश्‍वास बसणार नाही की, धरणातील जलविसर्ग रात्री इतका वाढविण्यात की, आसपासचा संपूर्ण परिसर जलमय होऊन गेला. रात्रीच्या अंधारात सुरक्षित जागी जाण्याचीही उसंत लोकांना मिळाली नाही. रात्रीच्या वेळी जलविसर्ग वाढविणे हे कुठल्याच धरण व्यवस्थापनात आणि आचारसंहितेत बसत नाही. रात्री घरांची दारे तोडून अनेकांना वाचविण्यात आले. पम्बा नदीच्या काठच्या लोकांना, धरणातून इतके प्रचंड पाणी सोडणार असल्याची कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. लष्कर, नौदल आणि एनडीआरएफ चमू तसेच वायुदलाने याच परिसरात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी सर्वाधिक फेर्‍या केल्या आहेत.
उत्तर केरळच्या वायनाड जिल्ह्यातील बाणसुर सागर धरण तर, या धरणाच्या आसपासच्या लोकांना सोडूनच द्या, जिल्हा प्रशासनालाही न कळवता उघडण्यात आले. बाणसुर सागर धरण हे देशातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. या आधी ९ ऑगस्टला धरणाच्या आसपास राहणारे सुमारे हजार लोक त्यांच्या घरात अचानक पाणी घुसत असल्यावरून जागे झाले होते. पाणी जेव्हा गुडघ्यापर्यंत आले तेव्हा लहान मुले व वृद्धांना हातावर घेऊन ही मंडळी सुरक्षित जागी जाण्यासाठी धडपडू लागली. आसपासचा शेजार पाण्याखाली जात असलेला बघून लोकांना वाटले की, आठवड्यापासून वायनाड परिसरात जो मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळेच अशी स्थिती आली आहे. परंतु, नंतर त्यांना समजले की बाणासुर सागर धरणातून पाणी सोडल्यामुळे हे झाले. या धरणाची व्यवस्था पाहणार्‍या केरळ वीज बोर्डाने कुठलीही पूर्वसूचना न देता, धरणाचे दरवाजे उघडले होते. (क्रमश:) •••

Posted by : | on : 30 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (259 of 835 articles)

Metro Railway Platform
अर्थपूर्ण : यमाजी मालकर | देशातील वाहतूक सेवा आणि साधने यांच्या एकीकरणाचे स्वागतार्ह प्रयत्न सुरू झाले आहेत. सेवा आणि साधनांचा ...

×