ads
ads
जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – स्वयंपाकाच्या (एलपीजी) गॅसच्या देशातील…

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक…

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

•एकाच वेळी १२ कोटी खात्यात होणार जमा, नवी दिल्ली,…

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

•जैश-ए-मोहम्मदचा स्पष्ट उल्लेख •भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय, संयुक्त राष्ट्रसंघ, २२…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

•रक्कम ‘नमामि गंगे’ला समर्पित, सेऊल, २२ फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

मुंबई, २२ फेब्रुवारी – महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » केरळ पूरसंकट : नैसर्गिक की मानवनिर्मित?

केरळ पूरसंकट : नैसर्गिक की मानवनिर्मित?

॥ विशेष : विश्‍वराज विश्‍वा, कोची |

केवळ हे सर्व तज्ज्ञच नाही, तर मेट्रोमॅन व विख्यात इंजिनीअर श्री. ई. श्रीधरन् यांनीही आपले मत व्यक्त करताना म्हटले की, केरळचे हे महापुराचे संकट अयोग्य हाताळणी आणि प्रचंड पावसात सर्व धरणांची दारे एकसाथ उघडल्यामुळे उद्भवले आहे. केरळच्या तीन माजी सिंचन मंत्र्यांनीही एकत्रित पत्रपरिषद घेऊन आपले मत मांडले आहे. त्यातही त्यांनी, सर्व धरणांची दारे एकसाथ उघडल्यामुळे केरळमध्ये ही प्रलयासारखी स्थिती निर्माण झाली आणि त्यात लाखो लोक रातोरात पाण्याखाली बुडाल्याचे म्हटले आहे. आपापल्या क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या अनेक लोकांनीही हेच मत व्यक्त केले आहे की, धरणांचे गलथान व्यवस्थापन, केरळ सरकारची तसेच संबंधित अधिकार्‍यांची बेजबाबदार वागणूक यांचा केरळच्या या महाविनाशक पूरसंकटात मोठा हात आहे.

भाग-२

Kerala Flood

Kerala Flood

केरळमधील पूरसंकट नैसर्गिक की मानवनिर्मित? याच्या निष्कर्षावर येण्याआधी आपण काही तज्ज्ञांची मते जाणून घेऊ या. केरळमधील बहुतेक सर्व धरणांची दारे एकसाथ उघडल्यामुळे जो प्रचंड महापूर आला आणि केरळला उद्ध्वस्त करून गेला, तो दिवस लक्षात घ्या. तो होता १४ ऑगस्ट. आता श्री. मुरली तुम्मरुकुडी यांचे मत जाणून घेऊ. श्री. मुरली हे संयुक्त राष्ट्र संघाच्या आपदा निवारण समितीचे गेल्या २५ वर्षांपासून प्रमुख आहेत. पदाच्या जबाबदारीमुळे त्यांनी गेल्या दोन दशकांत जगभरातील सर्व प्रमुख आपदा जवळून बघितल्या आहेत. श्री. मुरली हे केरळचे आणि त्यातल्या त्यात माझ्याच गावचे असल्याने मला त्यांचा अभिमान आहे. केरळ राज्य सरकारशी त्यांचे चांगले संबंध आहेत आणि हे संकट येण्याआधी त्यांनी केरळ विधानसभेत आपदा निवारणसंबंधी व घ्यावयाच्या दक्षतेविषयी भाषणही दिले होते. केरळी समाजाकडून फेसबूकवर ते सर्वाधिक फालो केले जातात. अगदी सेलेब्रिटी, मंत्री, नोकरशाह आणि अनेक उच्चपदस्थ मंडळी फेसबूकवरील त्यांच्या पोस्ट काळजीपूर्वक वाचत असतात. हे सांगण्याचा उद्देश हा की, श्री. मुरली हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात, तसेच बाहेरच्या जगातही ते चर्चेत असतात. श्री. मुरली यांनी १४ जून २०१८ च्या आपल्या फेसबूक पोस्टवर राज्य प्रशासनाला तसेच लोकांना स्मरण करून दिले होते की, राज्यात पडत असलेला प्रचंड मुसळधार पाऊस व त्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत होणारी वेगाने वाढ याकडे गंभीरतेने लक्ष द्या. दोन्ही ठिकाणी पाणी धोकादायक पातळीपर्यंत वाढत आहे आणि त्याबाबत सावध राहा. धरणातील पाण्याची पातळी येत्या जुलै महिन्यात कमाल स्तरावर येऊ शकते आणि म्हणून धरणातील पाणी कमी करण्यासाठी आम्हाला टप्प्या-टप्प्याने कार्यवाही करावी लागेल. मोसमी पावसाळ्याच्या मध्यात जून महिन्यातील ही स्थिती असल्याने, जलविद्युतनिर्मितीसाठी नंतर येणार्‍या पावसाने धरणात आवश्यक पाणी साठविता येईल. तसेच हवामान खात्याकडून आलेला पावसाचा अंदाज बघता, धरणात सध्या पुरेसे पाणी नाही म्हणून चिंतित होण्याचे कारण नाही. म्हणून धरणातील पाणी हळूहळू सोडणे सुरू करा. जेणेकरून बाहेर पडणारे पाणी नद्यांमध्ये सहज सामावले जाईल आणि काठावरच्या लोकांना कुठलेही नुकसान न पोहचविता ते समुद्रात निघून जाईल. कारवाईसाठी इतका पुरेसा अवधी असतानादेखील राज्य सरकारने, वीज मंडळाने किंवा राजकारण्यांनी या तज्ज्ञाच्या सल्ल्याकडे लक्ष दिले नाही. २६ जुलै २०१८ ला पुन्हा श्री. मुरली यांनी लोकांना व प्रशासनाला इशारा दिला की, पावसाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आणि सर्व धरणांतील पाण्याची पातळी पूर्ण भरली आहे. धरण व्यवस्थापन धोरण संहितेनुसार अधिकतम किती पाणी साठवायचे याची एक योजना असते. त्या योजनेची शक्य तितकी ताबडतोब अंमलबजावणी करा. आम्ही जर तातडीने हालचाल केली नाही, तर संकटाला टाळणे शक्य होणार नाही. कुणीही याकडे लक्ष दिले नाही. मग कोण जबाबदार आहे?
पुन्हा एकदा ४ ऑगस्ट २०१८ ला या तज्ज्ञाने आपल्या अधिकृत सरकारी फेसबूक पेजवरून, धरणात साठलेल्या प्रचंड पाण्यामुळे काय संकट ओढवू शकते, याचा गंभीर इशारा दिला. त्यांनी २०१० सालच्या पाकिस्तानमधली तसेच २०११ मधील थायलंडच्या महापुराचा दाखलाही दिला. यात धरणाच्या गैरव्यवस्थापनामुळे किती प्रचंड नुकसान झाले, हेही सांगितले. अशीच परिस्थिती केरळमध्येही उद्भवू शकते, असा इशारा दिला. त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना, धरण व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य धरण सुरक्षा प्राधिकरण, इंजिनीअर्स, जलसाठा व्यवस्थापक, केरळ राज्य वीज बोर्ड, मंत्री व जिल्हा प्रशासन यांची ताबडतोब बैठक बोलावून त्यात कुठल्याही क्षणी अर्धे केरळ पाण्याखाली बुडण्याच्या संभाव्य धोक्याबाबत चर्चा करण्यास सांगितले. जर या ४२ धरणांची दारे एकसाथ उघडली तर भयानक स्थिती निर्माण होऊन परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. परंतु, ४ ऑगस्टलादेखील कुणीही या गंभीर इशार्‍याची दखल घेतली नाही. मग याला कोण जबाबदार आहे?
या क्षेत्रातील आणखी एका तज्ज्ञाने काय म्हटले ते पाहू. जेएनयूतील आपदा संशोधन केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अमिता सिंग यांनी, केरळच्या पुराबाबत दुसरी धक्कादायक माहिती उघड केली आहे. लोकांना पुरेशा आधी पूर्वसूचना देण्याचे केरळ प्रशासनाने पूर्णपणे टाळले. अत्यंत धोकादायक भाग कोणता तो आधीच रेखित करणे, अति आवश्यक नेमके बचावकार्य मार्गी लावणे, लोकांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची स्थाने आधीच निश्‍चित करणे, औषधी व आवश्यक धान्यासाठी गोदाम तयार ठेवणे, जनावरांसाठी निवारा शिबिरांची व्यवस्था करणे, तसेच धरणाद्वारे आणि भूस्खलनामुळे येणार्‍या संकटाचा, फास्ट ट्रॅक जीआयएस आणि हवामानाची शक्यता यांच्यामाध्यमातून विचार करून ठेवणे इत्यादी कामे प्रशासनाने करणे अपेक्षित होते. परंतु, प्रशासनाने वरीलपैकी काहीही केले नसल्याचे लक्षात आले. आश्‍चर्य म्हणजे, ईडब्ल्यूएस (अर्ली वार्निंग सिस्टम) स्थापन केलेली असतानाही ती कार्यरत आहे की नाही याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. मानवी तसेच उपकरणे या दोन्ही बाजू अजीबात सिद्ध नव्हत्या. ईडब्ल्यूएस एक अशी यंत्रणा असते, ज्याद्वारे मदत व बचाव कार्याची नेमकी कुठे आवश्यकता आहे त्याचा शोध व तदनुसार ते कार्य तिथे उपलब्ध करून देण्याचे काम तंत्रज्ञानाने होत असते. ईडब्ल्यूएसने लोकांना इशारा देण्याचे आपले काम चोख केले; परंतु एकीकडे या यंत्रणेवर लोकांचा नसलेला विश्‍वास व दुसरीकडे प्रशासनाचा गलथानपणा यामुळे या इशार्‍यांना योग्य प्रतिसाद देण्याचे काम झालेच नाही. भारतातील सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून गणल्या गेलेल्या केरळला कॉम्पट्रोलर अ‍ॅण्ड ऑडिटर जनरल (कॅग) यांच्या कार्यालयाने ताकीद दिली होती की, २.३४ कोटी रुपयांची प्रचंड गुंतवणूक या ईडब्ल्यूएसमध्ये केल्यानंतरही, राज्य सरकारने या ईडब्ल्यूएसची स्थापना आणि त्यांची दुरुस्ती याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, ३५१ पैकी २८९ ईडब्ल्यूएस निकामी आढळून आले. थोडक्यात काय, ईडब्ल्यूएस ही एक तांत्रिक यंत्रणा आणि मुख्यत: प्रशासकीय उपकरण आहे आणि ते योग्य पद्धतीने हाताळून, संकटाच्या आधी सर्व संबंधित विभाग व यंत्रणांमध्ये तुम्हाला समन्वय घडवून आणायचा असतो.
केवळ हे सर्व तज्ज्ञच नाही, तर मेट्रोमॅन व विख्यात इंजिनीअर श्री. ई. श्रीधरन् यांनीही आपले मत व्यक्त करताना म्हटले की, केरळचे हे महापुराचे संकट अयोग्य हाताळणी आणि प्रचंड पावसात सर्व धरणांची दारे एकसाथ उघडल्यामुळे उद्भवले आहे. केरळच्या तीन माजी सिंचन मंत्र्यांनीही एकत्रित पत्रपरिषद घेऊन आपले मत मांडले आहे. त्यातही त्यांनी, सर्व धरणांची दारे एकसाथ उघडल्यामुळे केरळमध्ये ही प्रलयासारखी स्थिती निर्माण झाली आणि त्यात लाखो लोक रातोरात पाण्याखाली बुडाल्याचे म्हटले आहे. आपापल्या क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या अनेक लोकांनीही हेच मत व्यक्त केले आहे की, धरणांचे गलथान व्यवस्थापन, केरळ सरकारची तसेच संबंधित अधिकार्‍यांची बेजबाबदार वागणूक यांचा केरळच्या या महाविनाशक पूरसंकटात मोठा हात आहे.
हवामान खात्याचा इशारा :
भारतीय हवामान खात्याने तर स्पष्टच इशारा दिला होता की, या वर्षीच्या पावसाळ्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. जुलै महिन्यात बहुतेक सर्व प्रमुख प्रसिद्धिमाध्यमांनी हवामान खात्याचा हा इशारा प्रसिद्ध केला होता. या संदर्भातील इंडियन एक्सप्रेसच्या १० जुलै २०१८ च्या बातमीचे- ‘अतिप्रचंड पाऊस व वादळाचा हवामान खात्याचा केरळला इशारा’ हे शीर्षक तर स्पष्टच गंभीर ताकीद देणारे होते. आधीच्या सर्व अंदाजांना व सरासरी आकड्यांना चुकवत, सतत पडत असलेल्या विक्रमी पावसाबाबतचे स्पष्ट इशारे पुरेशा एक महिना आधी देण्यात येत असतानाही, कमीतकमी नुकसान व्हावे म्हणून कुठलेही प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले नाहीत. नेहमीप्रमाणे याही वेळेस सरकार अपयशी ठरले. पुन्हा ९ ऑगस्ट २०१८ रोजी भारतीय हवामान खात्याने पत्रक प्रसिद्धीस देऊन केरळ सरकारला इशारा दिला की, येत्या पाच दिवसांत प्रचंड पाऊस पडणार आहे. त्यासाठी तयार राहा. हा इशाराही पाण्यातच गेला. ज्यांच्या अधिपत्याखाली धरणे येतात ते मंत्री एम. एम. मणी यांनी तर या आगावू इशार्‍यांची थट्टाच केली आणि म्हणाले, धरणे सुरक्षित आहेत आणि आम्हाला जलविद्युत निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी साठविण्याची गरज असल्यामुळे आम्ही धरणातून पाणी सोडणार नाही. या महासंकटाच्या एक आठवडाआधी हेच मंत्री एम. एम. मणी बोलले होते की, प्रचंड पावसाचे इशारे आल्यावरही धरणांचे दरवाजे उघडण्याची आमची कुठलीच योजना नाही. मग आता हे संकट नैसर्गिक आहे की, प्रशासकीय गलथानपणाचे आहे?
वीजमंत्र्याचे बेताल बोल :
वीज मंत्री एम. एम. मणी हे, केरळमध्ये कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी केलेल्या राजकीय हत्यांवरील त्यांच्या निलाजर्‍या प्रतिक्रियेने प्रसिद्धीच्या झोतात आले होते. एका जाहीर सभेत ते म्हणाले होते की, आम्ही विरोधकांची यादीच तयार केली आहे आणि त्यांना एका मागोमाग एक संपविणार आहोत. एवढेच नाही तर त्यांनी खून कसे करणार, याची पद्धतही जाहीरपणे सांगितली होती. यामुळे ते खूप अडचणीतही आले होते. इडुक्की जिल्ह्याच्या डोंगराळ भागातून आलेल्या या व्यक्तीची केरळच्या राजकारणाला अशा रीतीने पहिली ओळख झाली होती. आता हाच कम्युनिस्ट राजकारणातील धटिंगण केरळच्या सर्व धरणांचे नियंत्रण करणार्‍या खात्याचा मंत्री आहे. याच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार?
८ ऑगस्टला पत्रकारांनी यांना विचारले होते की, काठोकाठ भरलेल्या धरणांचे दरवाजे केरळ राज्य वीज मंडळ का उघडत नाही? सर्व धरणांमध्ये सर्वात मोठे असलेल्या व २४०३ फूट कमाल क्षमता असलेले इडुक्की धरण तर २३९९ फुटांच्या पातळीवर भरले आहे. फक्त चार फूटच बाकी आहे. अजूनही मुसळधार पाऊस पडतच आहे आणि येत्या काही दिवसात तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. मंत्रिमहोदयांनी स्मित करत म्हटले की, मग वीज तयार करायला पाणी कोण आणणार? तुम्ही? अपुर्‍या पाण्यामुळे जर येत्या काळात वीजनिर्मिती कमी होऊन लोड शेडिंग करावे लागले तर तुम्ही स्वत:च मला त्यासाठी दोष द्याल. म्हणून काहीही झाले तरी आम्ही धरणाचे दरवाजे उघडणार नाही. धरण सुरक्षित आहे आणि त्याची काळजी करण्याचे कारण नाही. कदाचित अपुर्‍या शिक्षणामुळे किंवा ताठरपणामुळे म्हणा, नुकसान टाळण्यासाठी धरणाची दारे उघडून हळूहळू पाण्याचा विसर्ग सुरू करावा, या बर्‍याच तज्ज्ञांनी दिलेला सल्ला मंत्र्यांनी धुडकावून लावला. १४ ऑगस्ट रोजी धरणांनी पाणीसाठ्याची आपली कमाल पातळी गाठली आणि आता धरण वाहू लागण्याची शक्यता निर्माण झाली तेव्हा, केरळ राज्य वीज मंडळ, धरण सुरक्षा प्राधिकरण व या मंत्र्यापुढे सर्व धरणांचे दरवाजे एकसाथ उघडण्यावाचून दुसरा पर्यायच शिल्लक राहिला नव्हता. आणि त्यानंतरच्या पाच दिवसांमध्ये केरळमध्ये काय हाहाकार उडाला, याची सर्वांना कल्पना आहे. अर्धे केरळ राज्य पाण्यात बुडाले. शेवटी एकदाचे धरणाचे दरवाजे उघडल्यावर मंत्रिमहोदयांची प्रतिक्रिया ऐकून तर तुम्ही आश्‍चर्यचकित व्हाल. ते म्हणाले, माझ्या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत सर्व धरणे काठोकाठ भरली आहेत, हे बघून मी आनंदाने समाधानी आहे. परंतु, सोबतच ज्या पाण्यापासून मी वीज तयार करू शकलो असतो, ते पाणी असे वाहू देण्यात येत असल्याचे बघून मला अत्यंत खेद होत आहे. धरणांची दारे उघडल्यानंतर लगेचच त्यांचे हे शब्द होते, हे लक्षात ठेवा. घनदाट लोकवस्तीत असलेल्या धरणांची सर्व दारे एकसाथ उघडल्यावर काय हाहाकार माजेल, याची थोडीही कल्पना राज्याच्या या मंत्र्याला नसावी, हे आश्‍चर्यच म्हटले पाहिजे. आणि आता सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात या मंत्र्यांनी जे उद्गार काढले ते केरळच्या जनतेचा अपमान व मस्करी करणारे होते. ते म्हणाले, जेव्हा पूर येतो तेव्हा काही जण मरणार आणि काही वाचणार, हे तर स्वाभाविकच आहे. केरळच्या या संकटाला प्राधान्याने जबाबदार असलेल्या या मंत्र्याच्या या शब्दांशी तुम्ही सहमत आहात का? राज्याचा एक मंत्री असे बोलू शकतो यावर तुमचा विश्‍वास आहे? दुसर्‍या राज्याच्या एखाद्या मंत्र्याने असे म्हटले असते तर मीडियाची हीच प्रतिक्रिया राहिली असती काय?
चौकशीची मागणी :
प्रचंड पाऊस पडत असतानाही धरणांची दारे उघडून या शतकातील सर्वात भयानक संकटाला ओढवून घेणार्‍या सरकारी धोरणाची आणि धरण सुरक्षा संहितेचे उल्लंघन केल्याची, तज्ज्ञ समितीकडून चौकशी, राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन प्राधिकरणाने केली पाहिजे. आगावू इशारे आणि तज्ज्ञांचे सल्ले पूर्णपणे धुडकावून लावण्यात आले. धरणांची दारे उघडण्यापूर्वी संबंधित नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात राहणार्‍या लोकांना पुरेशा आधी सूचित करणे, तसेच पुरेशा आधी त्यांना तिथून सुरक्षित जागी हलविणे, याची आवश्यक काळजी घेण्यात आली नाही. ज्यांनी या राज्याला पाण्याखाली बुडविले, शेकडो लोकांचे बळी घेतले आणि कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान केले त्या गुन्हेगारांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करावेच लागेल व ते आपल्या कर्तव्याला जागले नाहीत म्हणून त्यांना अद्दल घडेल अशी शिक्षा केली पाहिजे. पंतप्रधान कार्यालयाने या सामूहिक हत्येच्या प्रकरणात दखल देत, या प्रकरणाची शास्त्रीय चौकशी करण्यासाठी समिती गठित केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

Posted by : | on : 7 Oct 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (245 of 835 articles)

Separatists Stone Throwing
अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव | तीन वर्षांपूर्वी भाजपाला जो जनादेश मिळाला अन् त्यानंतर भारताला जे वैश्‍विक समर्थन मिळाले, मिळत आहे, ...

×