ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » क्रमश: विकसित संघकार्याचे प्रकटीकरण

क्रमश: विकसित संघकार्याचे प्रकटीकरण

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य |

प्रत्येक आव्हानाला संधी मानून त्यानुरूप प्रशिक्षण तसेच संघटनात्मक रचना उभी करण्याची संघाची परंपरा, आपल्या मूळ शाश्‍वत तत्त्वाचा त्याग न करता, बाह्य रचना आणि बांधणीत युगानुकूल परिवर्तन करण्याच्या भारताच्या परंपरेनुरूपच आहे. मूळ विचार आणि मूल्यांना कायम ठेवत हिंदू जीवनाचे ज्याप्रमाणे कालानुरूप प्रकटीकरण होत राहिले, तसेच संघकार्याचेही होत आहे. संघाच्या ९२ वर्षांच्या प्रवासात अनेक चढाव-उतार आलेत. विरोध, दुष्प्रचार, कुठाराघाताचे अनेक प्रयत्न झालेत. या सर्वांतून संघकार्य आणि संघविचार सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी होत आहे, वाढत आहे. या सर्वांमागे, मूळ हिंदू चिंतनाने प्रेरित युगानुकूल परिवर्तनशीलता आणि ‘लवचीक कट्टरता’च कदाचित कारणीभूत आहे…

Sangh

Sangh

परिवर्तन, बदल निसर्गाचा नियम आहे. आपल्या शाश्‍वत मूलतत्त्वाचा त्याग न करता कालानुरूप परिवर्तन करणे, ही भारताची म्हणा किंवा हिंदुत्वाची परंपरा राहिली आहे आणि म्हणून, हजारो वर्षांपासून अनेक आक्रमणे, आघात सहन केल्यावरदेखील या समाजाचा सांस्कृतिक विचारधारेचा प्रवाह अविरत सुरू राहिला आहे. डॉ. राधाकृष्णन् यांनी म्हटले आहे-
There has been no such thing as a uniform stationary unalterable Hinduism whether in point of belief or practice. Hinduism is a movement, not a position; a process, not a result; a growing tradition, not a fixed revelation. It’s past history encourages us to believe that it will be found equal to any emergency that the future may throw up, whether in the field of thought or of history.”
याच हिंदुत्वाच्या वैचारिक अधिष्ठानावर आधारित असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ९० हून अधिक वर्षांच्या प्रवासात आपल्या मूल अधिष्ठानाच्या आधारे, आपल्या ध्येयाला साकार करण्यासाठी क्रमश: विकसित होत, काळानुसार कार्यानुकूल परिवर्तन करीत राहिला आहे.
संघाचे कार्य, राष्ट्रीय भावनेने ओतप्रोत संपूर्ण समाजाचे सक्रिय संघटन करणे आहे. संपूर्ण समाजाची एकता, परस्पर आत्मीयता आणि नि:स्वार्थ भावाने समाजाच्या हितास्तव कार्य करणार्‍या अनुशासित स्वयंसेवकांच्या माध्यमातून हे कार्य साकार होत आहे. अशा कार्यकर्त्यांना घडविण्यासाठी नियमित संस्कारांची आवश्यकता असते. म्हणून त्यासाठी संघशाखा आणि त्याला जुळलेली कार्यपद्धती विकसित होत गेली.
संघसंस्थापक डॉ. हेडगेवार अत्यंत आधुनिक विचारांचे होते. त्यामुळेच त्यांनी संघाच्या कार्यपद्धतीत अनेक नव्या गोष्टींचा समावेश केला. हिंदू समाजाचे संघटन करणे, हे स्पष्ट होते. संघटनेत एकात्म भाव राहावा म्हणून त्यांना गणवेश (युनिफॉर्म) आवश्यक वाटला. गणवेशाची कल्पना हिंदू समाजात नव्हती. म्हणून, गणवेशाची कल्पना पाश्‍चात्त्य असली, तरीही त्यांनी संघात ती लागू केली. धोतर, कुडता, टोपी, गंध, माळ, शेंडी असा गणवेश स्वीकारण्याऐवजी, काहीसा ब्रिटिश सेनेसारखा, त्या काळातील अत्याधुनिक गणवेश संघात स्वीकारण्यात आला. हिंदू समाजात परेड किंवा कवायतीची परंपरा नव्हती. परंतु, ब्रिटिश सेना परेड करायची. अनुशासनासाठी ही बाब चांगली आहे हे बघून, संघातही ही कवायत सुरू करण्यात आली, ज्याला संघात आज ‘समता’ असे म्हणतात. सुरुवातीची पंधरा वर्षे या कवायतीच्या सर्व आज्ञा इंग्रजी भाषेतील होत्या. १९४० साली त्या संस्कृत झाल्या. हीच गोष्ट घोष (बॅण्ड) आणि घोषाच्या तालावर संचलनाची आहे. संघाच्या कार्यपद्धतीत पहिले परिवर्तन १९३९ सालच्या सिंदी येथील ऐतिहासिक बैठकीत आले. ते १९४० सालच्या संघशिक्षा वर्गापासून लागू करण्यात आले. यात हिंदी व मराठीत असलेली संघाची प्रार्थना संस्कृतमध्ये आली, गणवेषाचा खाकी सदरा पांढरा झाला आणि समतेच्या (कवायतीच्या) आज्ञा इंग्रजीऐवजी संस्कृतमध्ये आल्या.
प्रारंभी संघाच्या प्रतिज्ञेत म्हटले जायचे- ‘‘हिंदू राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटक झालो आहे.’’ भारत स्वतंत्र झाल्यावर प्रतिज्ञेत परिवर्तन करत- ‘‘हिंदू राष्ट्राची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटक झालो आहे,’’ असे म्हटले जाऊ लागले.
प्रारंभीच्या २५ वर्षांपर्यंत, केवळ संघटनेसाठी संघटन, संघटनेशिवाय दुसरे काहीही नाही, याचा आग्रह राहिला. परंतु, समाजाचे स्वरूप खूपच व्यामिश्र (सरमिसळ) असते. त्यात विद्यार्थी, शेतकरी, कामगार, कलाकार, वैज्ञानिक, डॉक्टर, वकील, शिक्षातज्ज्ञ, सुरक्षा कर्मचारी, व्यापारी, इतर कर्मचारी अशा अनेक श्रेणी असतात. म्हणून संघकार्यासाठी आवश्यक पाया तयार झाल्यावर, १९५० पासून संघाच्या योजनेनुसार स्वयंसेवक विविध क्षेत्रात जाऊन, समाजजीवनाच्या एका विशिष्ट क्षेत्रात राष्ट्रीय विचारांवर आधारित संघटन उभे करण्यासाठी जाऊ लागले. संघाचे क्रमश: विकसित (progressive unfoldment) होण्याचे हे पहिले चरण होते. विविध क्षेत्रांत सक्रिय झालेल्या या स्वयंसेवकांना, श्रीगुरुजींनी त्या त्या क्षेत्रातील संघाचे गटनायक, राजदूत तसेच सेनापती म्हटले. आज ३५हून अधिक संघटनांच्या माध्यमातून स्वयंसेवक शिक्षण, कृषी-शेतकरी, विद्यार्थी, श्रमिक-कामगार, इतिहास, कला, आर्थिक, क्रीडा, सहकारक्षेत्र, आरोग्य, वकील, विज्ञान, दिव्यांग, सेवा, सीमा सुरक्षा, सुरक्षा, वैचारिक इत्यादी अनेक क्षेत्रांत केवळ सक्रियच नाही, तर अग्रेसर आहेत. या सर्व संघटना एकाच राष्ट्रीय विचारांनी प्रेरित असल्या, तरी स्वतंत्र आणि स्वायत्त आहेत. या संघटना संघाचा भाग किंवा शाखा नाहीत.
संपूर्ण समाजाप्रती असीम आत्मीयतेचा संस्कार असल्यामुळेच, कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक अथवा मानवनिर्मित संकटांच्या वेळी स्वयंसेवक तत्परतेने सेवाकार्यात सहभागी होत राहिले आहेत. म्हणून RSS म्हणजे Ready for Selfless Service असे संघाचे वैचारिक विरोधकही मान्य करतात.
आपल्याच समाजाचा एक फार मोठा भाग- उपेक्षित, वंचित वर्ग अनेक प्रकारच्या अभावांनी ग्रस्त होता. त्यांच्याजवळ जाऊन आत्मीयतापूर्वक त्यांच्या कष्टांना दूर करण्याच्या हेतूने, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीनंतर (१९९० पासून) ‘सेवा विभागा’चे निर्माण झाले. संघकार्याच्या विकास-प्रवासाचे हे दुसरे चरण होते. झोपडपट्टीत राहणार्‍या वंचित वर्गातील बांधवांमध्ये स्वयंसेवकांचा संपर्क, सेवा विभाग गठित झाल्यानंतर व्यापक स्तरावर सुरू झाला. अनेक ट्रस्टस्च्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, सुरक्षा आणि संस्कार आदी क्षेत्रात एक लाख सत्तर हजारांहून अधिक सेवा प्रकल्प स्वयंसेवक चालवीत आहेत.
संपूर्ण समाजाचे संघटन तर करायचे आहे; परंतु संपूर्ण समाज काही संघस्थानावर म्हणजेच शाखेत येऊ शकत नाही. म्हणून त्यांच्यापर्यंत संघाचा राष्ट्रनिर्माणाचा विचार आणि कार्याची माहिती पोहोचविणे तसेच समाजातील प्रमुख, प्रभावी सज्जनशक्तीपर्यंत संघाच्या नाते स्वत: पोहोचणे आवश्यक होते. या हेतूने १९९४ साली प्रचार व संपर्क विभाग सुरू करण्यात आला.
संघस्थापनेपासूनच वृत्तपत्रांत संघाचा विचार, म्हणणे कुणी प्रकाशित करीत नव्हते. वृत्तपत्रांचा संघाबाबतचा दृष्टिकोन काहीसा भेदभावपूर्ण होता. (या भेदभावाला राजकीय आश्रय होता, असेही म्हणता येईल.) म्हणून लोकांना तसेच स्वयंसेवकांनाही विविध विषयांवर राष्ट्रीय दृष्टिकोन काय आहे, हे सांगण्यासाठी १९४६ ते १९५० या काळात इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ, मलयालम्, उडिया, बंगाली इत्यादी भाषांमध्ये स्वयंसेवकांनी साप्ताहिक नियतकालिक सुरू केले. संघाचे म्हणणे इतर कुठलेच माध्यम देत नव्हते. केवळ या साप्ताहिकांमध्येच ते यायचे. म्हणून लोक यांनाच संघाचे मुखपत्र मानू लागले. खरे म्हणजे, संघाचे कुठलेच मुखपत्र नाही. परंतु, १९९४ साली प्रचारमाध्यमाचे स्वरूपच बदलले. त्यात जनसंवाद (Mass communication) हा एक नवा आयाम जुळला. तेव्हा संघाचा ‘प्रचार विभाग’ सुरू झाला.
संघकार्य सतत वाढत होते. परंतु, समाजाच्या सर्व सज्जन आणि प्रभावी लोकांपर्यंत संघाची योग्य माहिती पोहोचली नव्हती. तेदेखील समाजाच्या हितास्तव अनेक चांगल्या रचनात्मक कार्यांमध्ये लिप्त होते; असे असूनही संघाचा त्यांच्याशी संपर्क नव्हता. There was no connect. संघाचे लक्ष्य राष्ट्राची सर्वांगीण उन्नती करणे हे असले, तरी हे कार्य केवळ स्वयंसेवकच करू शकणार नव्हते. समाजातील सज्जन आणि सक्रियशक्तीला सोबत घेऊनच हे शक्य आहे. म्हणून समाजाच्या हितास्तव सक्रिय अशा या सज्जनशक्तीचा संघाशी आणि संघाचा या सज्जनशक्तीशी परिचय वाढण्याच्या दृष्टीने ‘संपर्क विभागा’चा प्रारंभही याच वर्षी झाला.
संघाची वाढती शक्ती आणि स्वयंसेवकांची संख्या बघून, काही विशेष कार्यांमध्ये समाजाच्या सहकार्याने स्वयंसेवक विशेष सक्रिय असावेत, याची गरज भासू लागली. यादृष्टीने १९९५ पासून काही निवडक सामाजिक कार्यांमध्ये स्वयंसेवक एकतानतेने सक्रिय झालेत. या कार्यांना ‘गतिविधी’ म्हटले गेले.
लक्षात आले की, काही कारणास्तव अनिच्छेने सामूहिक मतांतरणास (conversion) बळी पडलेल्या अनेक लोकांना आपल्या मूळ परंपरेशी आस्था आहे आणि ते पुन्हा आपल्या ‘घरी’ परत येऊ इच्छितात. म्हणून हिंदू समाजाच्या ज्या वर्गातून ते मतांतरित (convert) झाले होते, त्या समाजानेही त्यांना पुन्हा स्वीकारावे यासाठी त्या समाजाचे मन तयार करणे तसेच ‘घरी’ परत आल्यानंतर त्यांची सुयोग्य सामाजिक व्यवस्था लावून देण्यासाठी ‘धर्मजागरण’ ही गतिविधी सुरू करण्यात आली.
सरकारवर आश्रित न राहता, स्वत:च्याच संकल्पाने व परिश्रमाने आपल्या गावाचा विकास आम्हीच करू शकतो, असा विश्‍वास उत्पन्न करून संकल्प, योजना, प्रयत्न आणि परिणामापर्यंत प्रवास सुरू करण्याच्या दृष्टीने ‘ग्रामीण विकास’ गतिविधी सुरू झाली. आज ५५० गावांमध्ये या अशा स्वावलंबी विकासाचे प्रत्यक्ष परिणाम दिसू लागले आहेत. आसपासच्या गावातील लोक तिथे जाऊन हे परिवर्तन प्रत्यक्ष बघतात आणि नंतर त्यांच्या गावात तसेच प्रयत्न करताना दिसून येत आहेत. याशिवाय सुमारे एक हजार गावांतही स्वयंसेवक या दिशेने सक्रिय झाले आहेत आणि त्याचेही परिणाम दिसू लागले आहेत.
अस्पृश्यतेसारख्या कलंकामुळे जातिभेदाचा व्यवहार समाजात दिसून येतो, हे अत्यंत वेदनादायक आहे. या भेदभावाला दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. या भेदभावाचा फायदा घेण्यासाठी काही राजकीय शक्ती, समाजात विद्वेष पसरविण्याचे कार्य करताना दिसतात. यामुळे समाजातील सामंजस्य बिघडते. या कुप्रथांना दूर करून, समाजाची मूलभूत एकता जागृत करण्याच्या हेतूने ‘सामाजिक समरसता’ ही गतिविधी सुरू झाली.
देशी वंशाच्या गाईचे वैज्ञानिक व औषधी महत्त्व समजावून सांगत, भारतीय शेतीला गोआधारित बनविले, तर शेतकर्‍यांचे अनेक प्रश्‍न सुटू शकतात. असे अनेक प्रयोग सफल झाले आहेत. या हेतूने गौसंवर्धन, जागरण, प्रशिक्षण आणि प्रयोग करण्यासाठी ‘गौ संवर्धन’ ही गतिविधी सुरू आहे. भारतात एक हजारहून अधिक नव्या गोशाळा आणि गो अनुसंधानासह अनेक प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत.
तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या प्रगतीमुळे जगण्याची साधने व सोयी तर वाढल्या आहेत; परंतु कुटुंबात परस्परांशी संवाद कमी होत चालला आहे, तणाव वाढत आहे, मनुष्यांमधील संबंध र्‍हास पावत आहेत, कुटुंबव्यवस्थेची आधारशीला असलेली आत्मीयता हळूहळू कमी होत चालली आहे आणि कुटुंबाला सामाजिक जबाबदारीचे विस्मरण होताना दिसत आहे. भौतिकवादाचा पगडा वाढल्याने मानवी मूल्यांचा र्‍हास होताना दिसत आहे. म्हणून ‘कुटुंबप्रबोधन’ ही गतिविधीदेखील समाजाच्या सहयोगाने स्वयंसेवक चालवीत आहेत.
समाज-परिवर्तनाच्या कुठल्या ना कुठल्या कार्यात सक्रिय होऊन, स्वयंसेवक राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीचा वाहक (Carrier)बनावा, असा संघाचा आग्रह राहिला आहे. सतत विकसनशील (progressively unfolding) असे संघकार्य करण्यासाठी सर्वांत आवश्यक कार्य म्हणजे संघशाखा, तिच्या माध्यमातून व्यक्तिनिर्माणाचे कार्य अविरत चालावे, यासाठीही संघात गेल्या काही वर्षांत जागरण आणि संघटन असे दोन विभाग तयार करण्यात आले आहेत. समाज जागरण आणि परिवर्तनाच्या कार्यात समाजाला सोबत घेऊन अधिकाधिक स्वयंसेवक सक्रिय व्हावेत, या हेतूने जागरण विभाग (सेवा, संपर्क आणि प्रचार विभाग) आणि व्यक्तिनिर्माणाच्या कार्याला अधिक सघन बनविण्यासाठी संघटन विभाग (शारीरिक, बौद्धिक व व्यवस्था विभाग) असे कार्याचे विभाजन करण्यात आले आहे.
व्यक्तिनिर्माणात दैनिक संघशाखेचे विशेष महत्त्व आहे. म्हणून दैनिक शाखेचा आग्रहही आहे. संपूर्ण भारतात ५८ हजार दैनिक शाखा आहेत. परंतु, संघकार्याचा परीघ अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने साप्ताहिक मिलन आणि विशेषत: ग्रामीण भागात मासिक मिलन (संघ मंडली) यांच्या माध्यमातून संघाचा विस्तार वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नवी पिढी तंत्रज्ञानाचा (technology) अधिक वापर करते. म्हणून ती जगाच्या संदर्भातही स्वत:बद्दल, आपल्या सांस्कृतिक ओळखीबाबत अधिक जागृत आणि जिज्ञासू होत आहे. तिला आपल्या सांस्कृतिक, राष्ट्रीय ओळखीबाबत अधिक जाणून घ्यायचे आहे, त्याबाबत गौरव अनुभवायचा आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करत अधिकाधिक तरुणांशी संपर्क आणि संवाद ठेवण्याच्या हेतूने वेबसाईट www.rss.org – 80,000 followers per month, फेसबूक rssorg – 55 lakh likes, ट्विटर Twitter@rssorg – 10 lakh followers इत्यादी माध्यमांचा उपयोगही उचित प्रमाणात होत आहे.
नव्या बदलत्या वातावरणात, समाजात संघाची वाढती स्वीकारार्हता, अपेक्षा आणि कार्य करण्याची अनुकूलता लक्षात घेऊन, मूळ तत्त्वाला कायम ठेवून, नवनवे प्रयोग करण्याची प्रयोगशीलता वाढविण्याची आवश्यकता आहे. या आवश्यकतेला पूर्ण करण्यासाठी संघशिक्षा वर्गांतून होणार्‍या नियमित प्रशिक्षणाशिवाय, जिल्हा तसेच विभागस्तराच्या कार्यकर्त्यांच्या क्षमतावर्धनासाठी ‘कार्यकर्ता विकास वर्ग’ आणि प्रांत तसेच क्षेत्रस्तरावरील कार्यकर्त्यांसाठी पाच दिवसीय ‘योजक वर्गा’चीही रचना करण्यात आली आहे.
प्रत्येक आव्हानाला संधी मानून त्यानुरूप प्रशिक्षण तसेच संघटनात्मक रचना उभी करण्याची संघाची परंपरा, आपल्या मूळ शाश्‍वत तत्त्वाचा त्याग न करता, बाह्य रचना आणि बांधणीत युगानुकूल परिवर्तन करण्याच्या भारताच्या परंपरेनुरूपच आहे.
मूळ विचार आणि मूल्यांना कायम ठेवत हिंदू जीवनाचे ज्याप्रमाणे कालानुरूप प्रकटीकरण होत राहिले, तसेच संघकार्याचेही होत आहे. संघाच्या ९२ वर्षांच्या प्रवासात अनेक चढाव-उतार आलेत. विरोध, दुष्प्रचार, कुठाराघाताचे अनेक प्रयत्न झालेत. या सर्वांतून संघकार्य आणि संघविचार सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी होत आहे, वाढत आहे. या सर्वांमागे, मूळ हिंदू चिंतनाने प्रेरित युगानुकूल परिवर्तनशीलता आणि ‘लवचीक कट्टरता’च कदाचित कारणीभूत आहे…
– सह सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Posted by : | on : 9 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (337 of 875 articles)

Violent Protests
राष्ट्ररक्षा : हेमंत महाजन | आंदोलक संघटनांना आंदोलनात झालेले नुकसान भरून देणे न्यायालयाने बंधनकारक केले पाहिजे. जेणेकरून भविष्यातील हिंसाचार, नुकसान ...

×