ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:

खरे चेहरे!

॥ टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे |

ऑगस्ट २०१८ मध्ये महाराष्ट्रात मोठेच अटकसत्र उघडले गेले. दाभोळकरांच्या हत्येचा शोध घेण्यासाठी एटीएसने हाती घेतलेल्या तपासाचा भाग म्हणून या सार्‍या अटका झाल्या. आरोपींपैकी सगळेच या ना त्या कारणाने हिंदुत्वाशी संबंधित असल्याने ‘हिंदू अतिरेक्यांना अटक,’ अशी शीर्षके वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांतही झळकू लागली. आरोपींचे अशाच प्रकारचे उल्लेखही वारंवार होऊ लागले. पुन्हा एकदा हिंदू दहशतवादाचे मढे उकरून काढण्याची आयती संधीच जणू प्रसारमाध्यमांना मिळाली. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, या सार्‍या वातावरणात कुणाही हिंदुत्ववादी संघटनेने वा विचारवंतांनी या अटकसत्राविरोधात काहीही टिप्पणी केली नव्हती. पोलिसांच्या ताब्यात असलेले संशयित हे सनातन संस्थेचे साधक आहेत, असे चित्र प्रसिद्धिमाध्यमांनीच तयार केल्याने, त्या संस्थेच्या प्रवक्त्यांनी या आरोपाचे पत्रकार परिषद घेऊन खंडण केले इतकेच. मात्र पोलिस, न्यायव्यवस्था यांच्या विरोधात किंवा संशयितांच्या बाजूने असे कुणाही हिंदुत्ववादी संघटनेने मत मांडल्याचे दिसले नाही. नालासोपारा येथून अटक करण्यात आलेला गौरक्षक वैभव नाईक याच्या समर्थनार्थ मात्र भव्य मोर्चाचे आयोजन स्थानिकांनी केले होते. नाईकला या प्रकरणात गोवले जात असल्याचे या मोर्चेकर्‍यांचे मत दिसले. असा मोर्चा निघताच काही विवेकवादी विचारवंतानी मात्र मुळीच वेळ न दवडता या मोर्चाची तुलना, लष्कराने मारलेल्या अतिरेक्याच्या अंत्ययात्रेशी केली. जर अशा अंत्ययात्रेला जमलेले लोक आपल्याला देशद्रोही वाटत असतील, तर या मोर्चेकर्‍यांनाही तोच न्याय लावायला हवा, असे या विचारवंतांचे म्हणणे होते. मात्र, अतिरेकी हा गुन्हेगार असतो आणि जोवर गुन्हा सिद्ध होत नाही तोवर वैभव नाईक वा अन्य कुणीही संशयित हे गुन्हेगार नाहीत; त्यामुळे कुणाला त्यांना समर्थन द्यावे असे वाटत असल्यास तो घटनादत्त अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा भाग असून देशद्रोह नव्हे, या तथ्याचा तथाकथित विद्वानांना सोयिस्कर विसर पडला होता.
ऑगस्टच्या अखेरीस देशभरातून आणखी काही अटका होताच, हे सारे चित्र आणि वरील विवेकवादी विचारवंतांचे सूर एकाएकी बदलले! यावेळी नक्षलवादाशी संबंधित असण्याच्या संशयावरून देशातील काही व्यक्तींना अटक करण्यात आली. तसे करण्यापूर्वी आपल्याकडे पुरेसे पुरावे आहेत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले होते. मात्र, या अटका झाल्या आणि प्रसारमाध्यमांत बातम्या येऊ लागल्या; कथित शहरी नक्षलींना अटक किंवा डाव्या विचारवंतांना अटक. पहिल्या घटनेत संशयित हे हिंदू दहशतवादी असतात; दुसर्‍या घटनेत मात्र ते कथित शहरी नक्षली असतात. हाच काही ठरावीक माध्यमांचा खरा चेहरा आहे! या घटनेनेनंतर बर्‍याच जणांचे खरे चेहरे समोर आले. त्यावरही धावती नजर टाकणे आवश्यक आहे. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी एका वाहिनीवरील चर्चेत, सनातनचे प्रवक्ते सुनील घनवट यांना उद्देशून हरामखोर, हरामजाद्या, भटूकड्या असे अपशब्द वापरले. याबाबत घनवट यांनी आक्षेप घेतल्यावर कोळसे-पाटील यांना आवर घालण्याऐवजी- ‘‘ते माजी न्यायमूर्ती आहेत, त्यांना मी काय सांगणार?’’ अशी धक्कादायक भूमिका घेत, सूत्रधार आशिष जाधव यांनी या प्रकाराला जणू मूकसंमतीच दिली! एकदा भीड चेपली की पुन्हा दुष्कृत्य करायला धजावले जाते, याचा प्रत्यय देत, माजी न्यायमूर्तींनी अन्य एका वाहिनीवर तक्रारकर्ते तुषार दामगुडे यांना उद्देशून ‘कुत्र्या’ असा अपशब्द वापरला. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे काय? पुरोगामी महाराष्ट्राला हेच अपेक्षित आहे काय? स्वतःला विवेकवादी म्हणवणार्‍यांची हीच वैचारिक बैठक आहे काय? हे सारे गंभीर प्रश्‍न आहेत. वाहिन्यांतील अनेक सूत्रधारांनीही अतिशय बेताल आणि एकांगी वर्तन ठेवल्याचे सातत्याने समोर आले. राजदीप सरदेसाईनी तर चक्क दामगुडे यांना- ‘‘तुम्ही तक्रार करायला कोण मोठे लागून गेलात?’’ अशी अरेरावी केली. स्वतंत्र देशातील स्वतंत्र नागरिकाने पोलिस तक्रार करणे, याला काही अर्हता वगैरे कधीपासून लागू झाली? नक्षलवादाच्या अभ्यासक असलेल्या स्मिता गायकवाड यांना एका अशाच चर्चेत फारसे बोलू न देताच, पोलिसांनी कोरेगाव-भीमा प्रकरणाचा नक्षलवादाशी संबंध नाही, असं जाहीरपणे सांगितलं आहे. असं मत सूत्रधार प्रसन्न जोशी यांनी मांडलं. त्यावर, ती क्लिप दाखवा, अशी रास्त मागणी गायकवाड यांनी केली. जोशींनी ती क्लिप थोड्या वेळाने दाखवतो असे सांगितले. ती न दाखवता आल्यास माफी मागणार काय? असा प्रश्‍नही गायकवाड यांनी उपस्थित केला होता. ना ती क्लिप अजून दिसली, ना माफी वाचायला मिळाली! लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा तोल इतका का ढासळू लागलाय्?
या सार्‍या प्रकरणाचा राजकीय वापर करून घेताना काँग्रेसच्या काही प्रवक्त्यांनी तर हा सगळा मोदी सरकारचा डाव असल्याचे बिनदिक्कत सांगितले. मात्र, सध्या अटक करून नंतर न्यायालयीन आदेशानुसार नजरकैदेत ठेवलेल्या संशयितांपैकी अरुण फरेरा आणि वर्नोन गोन्साल्वेस यांना २००७ साली काँग्रेसच्या राजवटीतदेखील अशाच तर्‍हेच्या आरोपांखाली अटक करण्यात आली होती, हे सांगण्याचे मात्र टाळले जाते. याच वेळेस गोन्साल्वेस दोषी असल्याचे आढळून आले होते आणि त्याला शिक्षाही झाली होती, हेदेखील सांगितले जात नाही. नजरकैदेत असलेल्या गौतम नवलखाला २०११ साली श्रीनगर विमानतळावर अडवून दिल्लीला परत पाठवण्यात आले होते. भारतीय दंडविधानाच्या कलम १४४ नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नक्षलवाद- ग्रामीण असो वा शहरी… संवैधानिक लोकशाहीला तसेच राष्ट्राच्या एकात्मतेला धोका आहे. त्यातही शहरी नक्षलवाद हा गुरील्ला लष्करापेक्षा अधिक घातक आहे; असे काँग्रेसनेच २०१३ साली मा. सर्वोच्च न्यायालयासमोर सांगितले आहे. अशा परिस्थितीत राजकीय मतभेद बाजूला सारून या प्रकरणाकडे पाहायला हवे, हे कुणीही सुज्ञ व्यक्ती मान्य करेल. असे असतानाही काही पोपट एकाच स्वरात का गाऊ लागतात, काही सरपटणारे प्राणी शेपटीवर पाय पडल्यासारखे का चिडतात, हे न कळण्याएवढी जनता दूधखुळी नसते. हा प्रश्‍न उजवे-डावे, काँग्रेस-भाजपा इतकाच मर्यादित नसून देशाच्या एकसंधतेचा आहे. या निमित्ताने कित्येकांचे विवेकवादाचे मुखवटे बाजूला सारले जाऊन जातीयवादी चेहरे उघड झाले आणि होत आहेत, हे न बदलणारे सत्य आहे!

https://tarunbharat.org/?p=61555
Posted by : | on : 9 Sep 2018
Filed under : आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक (510 of 1287 articles)

Ved
विशेष : प्रशांत आर्वे | उपलब्ध तथ्यांच्या आधारेच व्हायला पाहिजे, असा परिपाठ महाराष्ट्रात अनेक थोर इतिहासकारांनी घालून दिला आहे. त्यात ...

×