ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, मयुरेश डंके, स्तंभलेखक » खर्‍याची दुनिया स्वप्नातच पहायची का?

खर्‍याची दुनिया स्वप्नातच पहायची का?

॥ मानसरंग : मयुरेश डंके |

पंजाबात घडलेल्या दुर्घटनेशी तसं पहायला गेल्यास प्रत्यक्षपणे महाराष्ट्राच्या मीडीयाचा काय संबंध? दुर्घटनेविषयी सहानुभूती असणं, वाईट वाटणं, दु:ख वाटणं हा तर माणुसकीचा भाग झाला. पण या घटनेची ढाल करून सरकारवर टीका करण्याची आयती संधी साधून घेण्याचा उद्योग महाराष्ट्राने का करावा? पण हाच महाराष्ट्र केरळमधील उघड चाललेल्या हत्याकांडाविषयी एका शब्दाने बोलायला तयार नाही. जे दु:ख आपल्याला आज अमृतसर मधील पीडीत बांधवांविषयी वाटतंय तेच दु:ख केरळमधील बांधवांविषयी का वाटत नाही? त्यांच्या तर उघडपणे निर्घृण हत्या करण्यात आल्या आहेत. पण आपल्या वृत्तवाहिन्या या घटनांना ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवायला तयार नाहीत.

Media

Media

विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळी अमृतसरची रेल्वे दुर्घटना घडली आणि त्याला जबाबदार रेल्वे प्रशासनच आहे, असं म्हणणार्‍या अनेकांनी त्यांचा लेखन स्वातंत्र्याचा अधिकार फेसबुकवर वापरून घेतला. अनेकांनी तर यातही संघाला आणि मोदी सरकारलाच दोष देऊन स्वत:च्या पोटातली मळमळ ओकून टाकली.
मला या प्रसंगी मुंबईतल्या एलफिन्स्टन पूल दुर्घटनेची आठवण झाली. त्याही घटनेला प्रशासनच जबाबदार होते आणि याही घटनेला प्रशासनच जबाबदार असा सरसकट न्याय लावला तर आपल्या बुद्धिमत्तेवरच थेट प्रश्‍नचिन्ह उपस्थित होईलच! ज्यांचा या घटनेशी दुरान्वयानेही संबंध नाही त्यांना अचानकच त्यांच्या नागरिक असण्याची जाणीव झाली, पण प्रत्यक्षदर्शींच्या कडून नेमके काय घडले हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा कुणी केला नाही. माझ्या परिचयातलाच एक महाभाग तर असा निघाला की, अपघाताच्या ठिकाणी आता स्मृतीस्तंभ उभारला गेला पाहिजे असं त्याचं मत होतं. कारण काय तर म्हणे, ‘यामुळे सरकार आणि प्रशासनाचा गलथान कारभार कायमस्वरूपी लोकांसमोर राहिल!’ वा रे हुशार..!
रेल्वे ट्रॅकवरच्या दैनंदिन अपघातांची संख्या आणि त्यांची कारणं हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे. ‘एका क्षणात अनेक माणसं रेल्वेखाली चिरडून मेली’ हे सकृतदर्शनी दिसतं, पण त्याच्या खर्‍या कारणांमध्ये घुसण्याच्या भानगडीत कुणी पडलेलं नाही. सरळ स्पष्ट आणि उघडउघड दिसणारी कारणं शोधण्याची गरजच नाही. आणि त्या कारणांची ब्रेकिंग न्यूज होण्यासारखं त्यात काहीच नाही. आता हॅपनिंग म्हणावं असं काहीच नसतानाही निष्पक्ष, निर्भीड, सत्यवादी म्हणवणार्‍या माध्यमांनी या गोष्टीला ब्रेकिंग न्यूज करून टाकलं.
चला, क्षणभर गृहित धरून चालूया, व्यावसायिक कारणासाठी किंवा टीआरपीसाठी ब्रेकिंग न्यूज करून टाकलीही असेल. पण मग अशा घटनांना प्रसिद्धी देऊन टीआरपी पदरात पाडून घेणार्‍या वाहिन्या ‘रेल्वे ट्रॅक रिकामे ठेवा, बंद केलेली रेल्वे फाटके ओलांडू नका’ अशा विषयांवर दररोज किमान १०० वेळा तरी प्रबोधनात्मक जाहिरातींद्वारे जनजागृती करण्यास तयार आहेत का? कुणीही तयार नाही. स्वत:चा प्राईम टाईम जनहितार्थ फुकट जाहिरातींसाठी कोण देणार हो? शक्यच नाही. पण टीका करायला, चर्चांचं गुर्‍हाळ लावायला मात्र सगळ्या वृत्तवाहिन्या पदर खोचून तयार..!
हाच तो मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा उद्योग…!!!
एकीकडे आजवर लाखांच्या संख्येनं अपघात होऊनही माणसंही सुधारायला तयार नाहीत आणि दुसरीकडे या दुर्घटनांचं भांडवल करून स्वत:च्या पोळीवर तूप ओढून घेण्याचा उद्योग मीडीयाही बंद करायला तयार नाही. मग प्रश्‍न संपवायचा तरी कसा? मी मला हवं तसंच वागत राहणार, प्रत्येकवेळी चुकांची खापरं दुसर्‍याच्याच माथी फोडणार आणि सरकार, प्रशासन किंवा यंत्रणांकडून वारेमाप अपेक्षा मात्र करणार. मग परिस्थितीत सुधारणा कधी आणि कशी होणार?
अगदी खरं मनापासून सांगायचं झालं तर, पंजाबात घडलेल्या दुर्घटनेशी तसं पहायला गेल्यास प्रत्यक्षपणे महाराष्ट्राच्या मीडीयाचा काय संबंध? दुर्घटनेविषयी सहानुभूती असणं, वाईट वाटणं, दु:ख वाटणं हा तर माणुसकीचा भाग झाला. पण या घटनेची ढाल करून सरकारवर टीका करण्याची आयती संधी साधून घेण्याचा उद्योग महाराष्ट्राने का करावा? पण हाच महाराष्ट्र केरळमधील उघड चाललेल्या हत्याकांडाविषयी एका शब्दाने बोलायला तयार नाही. जे दु:ख आपल्याला आज अमृतसर मधील पीडीत बांधवांविषयी वाटतंय तेच दु:ख केरळमधील बांधवांविषयी का वाटत नाही? त्यांच्या तर उघडपणे निर्घृण हत्या करण्यात आल्या आहेत. पण आपल्या वृत्तवाहिन्या या घटनांना ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवायला तयार नाहीत.
आणखी पन्नास-साठ वर्षांनी एखाद्याने याच घटनेविषयीचा आनंद व्यक्त करण्यासाठीच विजयादशमी साजरी करतात, अशा प्रकारची वक्तव्यं केल्यास त्याविषयी कुणालाही आश्‍चर्य वाटणार नाही.
ज्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी दुर्घटना घडत असतानाचा व्हिडीओ मोबाईल फोनमध्ये शूट केला, त्यांच्या सामाजिक भान आणि माणुसकीला तर त्रिवार वंदनच करायला हवं. या घटनेनंतर शूटिंग करणार्‍यांपैकी किती जण पीडीतांच्या मदतीला धावले, याचा कसून शोध मीडीया आणि पोलिसांनी घ्यायला हवा. मीडियाने या हौशी माणसांना देशाच्या जनतेसमोर आणून ‘आप की अदालत’ सारख्या कार्यक्रमात प्रश्‍न विचारायला हवेत. अशा घटनांचे शूटिंग करून ते सोशल मीडीयातून व्हायरल करण्याचा आचरट उद्योग या माणसांनी का केला? याचं उत्तर समाजाला मिळालं पाहिजे.
रेल्वे कशी धावते, तिचा वेग कसा असतो, इंजिन कसं काम करतं, ब्रेक कसे काम करतात, रेल्वे ड्रायव्हर नेमकं काय काम करतात, त्यांनी किती अंतरावरून ब्रेक लावणं अपेक्षित असतं या गोष्टींची चर्चा अशा दुर्घटनेनंतर जाहीररित्या घडते, हे संतुलित सामाजिक मनोवृत्तीचं लक्षण आहे का? या विषयांवर चर्चा घडवून मूळ मुद्दा का टाळला जातो आहे?
या प्रकरणातला मूळ मुद्दा होता तो संयोजकांच्या चुकीचा. रावणदहन दुरूनच छान दिसतं आणि अंगाला झळ न बसता पाहता येतं, म्हणून लोक दूर अंतरावर बसायला गेले असावेत. पण, प्रतिकात्मक दहनाऐवजी भव्यदिव्य आवाजी दहन सुरू झालं आणि इतक्या प्रचंड आवाजात रेल्वेचा आवाजच ऐकू येऊ शकला नाही, असे मत प्रत्यक्षदर्शींनी नोंदवलेले आहे. म्हणजे, कार्यक्रमाचे संयोजन करणार्‍यांनी योग्य ती काळजी घेतलेली नव्हती, हे आता स्पष्ट झालेले आहे. कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा सुरू झाला आणि जर तो वेळेत सुरू होऊन वेळेत संपला असता तर हा दु:खद प्रसंग ओढवलाच नसता, असेही पीडीतांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. रेल्वेमार्गाच्या अगदी जवळ असा कार्यक्रम आयोजित केला असल्यासंबंधीची कसलीही रेल्वे प्रशासनास देण्यात आलेली नव्हती, हेही उघड झाले आहे.
दुसरा मुद्दा होता तो प्रेक्षकांच्या चुकीचा. एखाद्या मंत्र्यांचा किंवा अतिमहत्वाच्या व्यक्तीचा दौरा जात असेल तर अचानकच ट्रॅफिक थांबवली जाते. लोकही मुकाट थांबतात. पण रेल्वे अशी कुठेही कधीही थांबवता येते का? हा साधा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. रेल्वेगाडी तिच्या नियोजित वेळापत्रकानुसार निघाली होती आणि तिने कुठेही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. जर रेल्वेगाडीच रूळ सोडून मैदानात घसरली असती किंवा तत्सम अपघात घडला असता तर रेल्वे प्रशासनास दोषी ठरवणे संयुक्तिक होते.
आता तिसरा मुद्दा आहे तो तुमचा-आमचा. घडलेल्या घटनेची चिकित्सा करणे, कारणांचा शोध घेणे, दोषींना शोधणे, गुन्हा दाखल करणे, त्यांना न्यायालयासमोर हजर करणे हे सर्व काम करण्यासाठी आपल्याकडे वेगळी यंत्रणा आहे. त्या यंत्रणेने ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपण त्यांना सहकार्य करणे अपेक्षित होते. पण, समाजाचीच चूक असतानादेखील समाजानेच संयम सोडला आणि ही घटना जगभर पोचवण्याचे काम अगदी इमानेइतबारे केले. आपण घटनेची मूळ कारणे व तथ्य मांडणारा पोलिसांचा रिपोर्ट येईपर्यंत संयम का ठेवला नाही? पीडीतांच्या नातेवाईकांचा क्षोभ अनावर झाला होता, ते दिसत होतेच. अवघ्या १५-२० सेकंदांमध्ये ज्यांचे सगळे संपून गेले होते, त्यांना दु:ख होणे स्वाभाविकच होते.
पण नागरिक म्हणून आपली नेमकी भूमिका काय आहे? आपण काळवेळाचे भान राखून प्रतिक्रिया द्यायला कधी शिकणार? की प्रत्येक गोष्टीत कानगोष्टींचा खेळ करणार? याविषयी कुणीतरी भूमिका घेणं गरजेचं आहे. अशा प्रसंगांमध्ये आपण कसं वागावं आणि कसं वागू नये, दुर्दैवी प्रसंगांमध्ये मोबाईल फोन किंवा सोशल मीडीयाचा वापर नेमका कशासाठी करावा आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याविषयीच्या प्रशिक्षणाचं काय? यावर योजना तयार व्हायला हवी आणि तिची अंमलबजावणीसुद्धा व्हायला हवी. अन्यथा ‘प्रसंगावधानाची ऐशी तैशी’ ही स्थिती सगळ्यांनाच गाळात घेऊन जाईल.
चौथा मुद्दा आहे तो वृत्तवाहिन्यांचा.. वृत्तवाहिन्या तर वाटेल त्या हेडलाईन्स दाखवत होत्या. लोगों के उपर से गुजरी ट्रेन अशी बातमी बीबीसी न्यूज ने दाखवली. वास्तविक सत्य तर हेच आहे की, रेल्वे तिच्या मार्गावरूनच गेली. लोकच त्या रेल्वे मार्गावर बसलेले किंवा उभे होते. एबीपी न्यूज वर अमृतसर शहर में ट्रेन ने लोगों को रौंद डाला , ५ सेकैंड में लोगों को कुचलती गई ट्रेन, लोग रातभर रोते रहे, कैप्टन रातभर सोते रहें अशा हेडलाईन्स दाखवत होते. आज तक वर यह हादसा नहीं नरसंहार है असा मथळा दिसत होता. एबीपी माझा ने तर ट्रॅकवरील लोकांना रेल्वेची अचानक धडक ट्रेन ने ५० जणांना चिरडलं अशी बातमी केली. या मथळ्यांमधील सत्यता किती? असा मथळा दाखवल्यास घटनेविषयी लोकांच्या मनात काय संभ्रम निर्माण होतो? प्रत्यक्ष घटनेतील सत्य आणि मथळ्यातून ध्वनित होणारा अर्थ यांतील अंतर किती आहे? संपादकांनी असे मथळे का प्रसारित होऊ दिले? वृत्तमाध्यमे असं का वागतात? त्यांनी या घटनेची संतुलित संयमित बातमी का केली नाही? की, पत्रकारांना अशाच बातम्या करणे बंधनकारक करण्यात आले आहे?
छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला तेव्हा समर्थांनी ‘आनंदवनभुवनी’ ची रचना केली. आनंदवनभुवनी ऐकत असताना एका खर्‍या लोकहितदक्ष राज्यव्यवस्थेची आणि समाजहितैषी प्रजेची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. ‘अभक्तांचा क्षयो जाहला’ असे समर्थांनी म्हटले आहे. आज त्याचीच आवश्यकता अधिक आहे. दुर्घटनेतूनही स्वत:च्या फायद्याचाच विचार करणारे अप्पलपोटे अभक्त आम्हांला नको आहेत, त्यांचा क्षय व्हायला हवा.
स्मार्ट सिटीज् अवश्य करा, पण आधी आम्हांलाच साधे साधे नियम तरी कटाक्षाने पाळायला शिकवून स्मार्ट सिटीझन्स करा, ही सर्वच सामान्य भारतीयांची अपेक्षा आहे. लोकांनी नियम पाळले असते तर शेकडो कुटुंबांमध्ये ऐन दसर्‍यादिवशी बांगडी फुटली नसती. संसारांना अवकळा आली नसती. सभ्यता, शुचिता, सत्यता, सन्मती, सचोटी मनामनांत राहिली तरच समाज प्रगती करेल. याच गोष्टी औषधालाही शिल्लक राहिल्या नाहीत तर काय करावं? असं घडलं तर मग खर्‍याची दुनिया स्वप्नातच पहायची वेळ येईल, हे निश्‍चित. – मानसतज्ञ, संचालक-प्रमुख,आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

Posted by : | on : 11 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, मयुरेश डंके, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, मयुरेश डंके, स्तंभलेखक (338 of 1287 articles)

Yashwantrao Chauvan Gadima
विशेष : निलेश मदाने | महाराष्ट्र वाल्मिकी, पटकथालेखक आणि अभिनेते ग. दि. माडगूळकर तथा अण्णा (१५ ऑक्टोबर, १९१९ ते १४ ...

×