ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » खाजगी क्लासवाल्यांना चाप बसेल का?

खाजगी क्लासवाल्यांना चाप बसेल का?

॥ प्रासंगिक : अरुणकुमार मुंदडा |

खाजगी क्लासचालकांच्या मनमानीला अटकाव करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कायदा करण्याचे ठरवले आहे. शासनाने महाराष्ट्र खाजगी शिकवणी (विनियम) अधिनियम २०१८ नावाने मसुदा जाहीर केला आहे. यामध्ये क्लासचालकांसाठी काही कडक नियम घालून दिले आहेत. विद्यार्थ्यांसाठी विविध सोयी सुविधा देणे बंधनकारक केले आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड व पोलिस कारवाईही करण्याचे प्रयोजन आहे. आता जी शिक्षण व्यवस्था आहे, तिच्यावर शासनाचा योग्य प्रकारे अंकूश नाही तर या खाजगी क्लासेसवरती कसा ठेवू शकेल? असा प्रश्‍न पडतो. खाजगी क्लासची महाराष्ट्रातील उलाढाल ही शिक्षण खात्याच्या बजेटपेक्षाही मोठी खाजगी क्लासचालकांची लॉबीपुढे शासन किती नमेल की क्लासचालकांना शासन वेसन घालेल? हे कायदा पास झाल्यानंतर कळेल.

Private Coaching Classes

Private Coaching Classes

लातूरमध्ये खाजगी क्लासचालकाचा खून झाल्याने शिकवणी क्षेत्रातही अपप्रवृत्तीने शिरकाव केल्याचे सिध्द झाले. ज्या क्षेत्रात वारेमाप पैसा आहे व प्रचंड नफेखोरी आहे, अशा प्रत्येक क्षेत्रात अशा प्रवृत्ती कार्यरत होत असतात. खाजगी शिकवणी क्षेत्रही त्याला अपवाद कसे ठरू शकेल/ करोडो रुपयांच्या या उद्योगातही खंडणी, दहशत, धमक्या असे प्रकार घडत असल्याने अनेक क्लासचे संस्थाचालक सुरक्षारक्षकांच्या गराड्यात वावरत आहेत. हे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे. शिक्षण क्षेत्रातही ही किड घुसली आहे, हे या लातूरच्या घटनेमुळे अधोरेखित झाले आहे.
मुळातच खाजगी क्लासचा बाजार का वाढला? याकडे आपले लक्ष गेले पाहिजे. विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शनाची किंवा शिकवणीची गरज आहे असे पालकांना वाटू लागल्याने खाजगी क्लासला चांगले दिवस आले आहेत. शिक्षण व्यवस्थेत त्रुटी निर्माण झाल्यामुळेच या समांतर व्यवस्थेचा जन्म जाला आहे. आता ही समांतर व्यवस्था महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर गल्लीबोळातून उभी राहिली आहे. विविध प्रकारच्या प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, पात्रता परीक्षा यांच्या नावाखाली या खाजगी क्लासचालकांचा बाजार सुरु आहे. दिवसेंदिवस बाजारात मागणी वाढल्याने शिकवणीवर्गाची संख्याही वाढु लागली आहे. बारावी नंतरच्या अभियांत्रिकी, वैद्यकीय अन्य तत्सम विविध प्रवेशासाठी सीईटी, नीट, जेईई, आयईईई, आयआयटी अशा अनेक प्रवेश चाचण्या परिक्षांसाठी लाखो विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रातून बसलेले असतात. या प्रवेश चाचणी परीक्षा काठिण्य पातळीच्या असतात. पंरतू त्यांचा अभ्यासक्रम किंवा सराव बारावीत फारसा घेतला जात नाही. बारावीचा अभ्यासक्रम व प्रात्याक्षिके हे घेण्यातच कॉलेजचा वेळ जातो. त्यांना या प्रवेश चाचण्या परीक्षांचा सराव विद्यार्थ्यांकडून घेण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. म्हणूनच खाजगी क्लासेसचे फ़ावले आहे. विद्यार्थ्याचे दहावी, बारावी चे गुण व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ग्राह्य धरले जात नाहीत तर या प्रवेश चाचणी परिक्षांचे गुण ग्राह्य धरले जातात. ही महत्वाची कमकुवत बाब आहे. यातूनच ही क्लासंस्कृती फोफावली आहे. आपल्या शालेय व उच्च शिक्षण व्यवस्थेतील त्रुटीमुळे उभी राहिलेली ही समांतर व्यवस्था आहे.
गेल्या काही वर्षात अनेक अशा खाजगी क्लासचालकांनी इंट्रिगेटेड स्कूल व क्लासेस उभारली आहेत. ही स्कूल अशा चाचणी परीक्षांची तयारी अकरावीत, बारावीत विद्यार्थ्यांकडून करून घेतात. राहणे, खाणे, खेळ, शिक्षण प्रयोगशाळा अशा विविध सुविधा एकाच छताखाली मिळत असल्याने ही इंटिग्रेटेड स्कूल्स वर्षाला एका विद्यार्थ्याकडून लाखो रुपयांची फी घेत असतात. असे इंटिग्रेटेड क्लासही आहेत. सरकारी हॉस्पिटल व खाजगी हॉस्पिटल असा जो फरक आहे तसा सरकारी शाळा कॉलेज व इंटिग्रेटेड स्कूलमध्ये आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये साफसफाई, चकचकीतपणा नजरेत जसा भरून येतो. पण खिसा मात्र खाली होतो. तसाच अनूभव या खाजगी क्लासबाबतीत पालकांना येतो.
खाजगी क्लासकडे ओढा का?
आज आपली शिक्षण व्यवस्था नोकरी सन्मूख आहे. आजकाल शिक्षण हे आधुनिक दुनियेत आवश्यक आहे, शिक्षणाच्या बाबतीत सर्वसमान वर्गात जागृती निर्माण झाली आहे. आपल्या पाल्याला आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी पालक वर्ग आग्रही आहे व जागरूकही आहे. आपली शिक्षण व्यवस्था परीक्षाकेंद्रीत आहे. घोकंपट्टीचा, मार्कच्या रेसमध्ये विद्यार्थ्याला उतरवले जाते म्हणून या क्लासचे विद्यार्थ्यांच्या गुणांकडे लक्ष असते, गुणात्मक दर्जाकडे त्यांचे फारसे लक्ष नसते. क्लासमध्ये विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास होतो का? सामाजिक विकास होतो का? त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होते का? तर याचे कसलेही, काहीही देणेघेणे क्लासला नसते. उलट शाळा, कॉलेजात हे मात्र अनपेक्षित असते. मुलांचा सर्वांगीण विकास करणे, त्यांची बौध्दीक क्षमता वाढविणे, त्यांच्यात सदभावना निर्माण करणे, सुजाण नागरिक घडविण्यासाठी शाळा आटोकाट प्रयत्न करतांना दिसतात. तसा प्रयत्न क्लास करताना फारसे दिसत नाहीत. कोणत्याही क्लासमध्ये प्रतिज्ञा घेतली जात नाही. पण प्रत्येक शाळांमध्ये प्रतिज्ञा आवर्जुन घेतली जाते. क्लासमध्ये कमी जागेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना शिकविले जाते. सोईसुविधा कमी पुरविल्या जातात. विद्यार्थी आकर्षित व्हावा म्हणून बर्याचदा फसव्या व भंपक जाहिराती दिल्या जातात.
क्लासेसचा बाजार का वाढला?
खाजगी क्लासेसकडे पालक व विद्यार्थी का आकर्षित होतात? तर त्याची नस, मर्मबिंदु क्लासेसवाल्यांनी पकडला आहे. जगाच्या बाजारपेठेत तुम्हाला चांगली नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला व्यावसायिक शिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध स्पर्धा परीक्षा, प्रवेश चाचण्या परीक्षा, पात्रता परीक्षा देणे आवश्यक आहे. या परिक्षांमधून गेल्याशिवाय विद्यार्थ्यांना गत्यंतर नसते. या परीक्षा काठीण्य पातळीवरच्या असतात. थोडक्यात अवघड असतात. त्यासाठी खूप घोकंपट्टी करावी लागते, पाठांतर करावे लागते, आकलनशक्ती वाढवावी लागते, ग्रहणशक्ती मजबुत करावी लागते, बौध्दिक क्षमता विकसित करावी लागते, स्मरणशक्ती कौशल्याने तीक्ष्ण करावी लागते असे क्लास संस्कृतीने, भांडवलदारांनी सर्वसामान्य, मध्यमवर्गीय माणसांच्या मनावर बिंबवले आहे.
या परीक्षांसाठी नियमितपणे अभ्यास करावा लागतो. त्यासाठी खुप मेहनत करावी लागते, त्यासाठी खुप खर्च येतो. त्यासाठी खाजगी क्लासच योग्य प्रकारे या परीक्षांची तयारी करवून घेतात. यामध्ये विद्यार्थी यशस्वी होतात, असाही पालकांचा भ्रम निर्माण करण्यात क्लासंस्कृती यशस्वी ठरली आहे. विविध जाहिरातींच्या माध्यमतून हा भ्रम पालकांच्या मनावर बिंबवण्यात आला आहे. अशा या घोकंपट्टीच्या शिक्षणाचा मोबदला म्हणून पालक क्लासला भरमसाठ फी देण्यास तयार होतात. दहावी व बारावीचे गुण प्रवेश चाचणी परीक्षांसाठी ग्राह्य धरले जात नाहीत व प्रवेश चाचणी परीक्षांचे शिक्षण शाळा, कॉलेजमध्ये व्यवस्थीतपणे दिले जात नाही. या शिक्षण व्यवस्थेच्या त्रुटीतूनच या क्लासचालकांना रान मोकळे मिळाले आहे. यातूनच मनमानी करून पालकांची लुट केली जाते.
राजकीय व्यवस्थेचे पाप
जागतिकीकरण भारतात आले, ते वाढले, ते रुजले आणि ते स्थीर झाले. त्यामुळे भारतीय समाज या आर्थिक प्रगतीला, भौतिक चंगळवादी दुनियेला भुलू लागला. त्यांच्या मनामध्ये पैशांतून मिळणारी समृध्दी ही सर्वोप्रिय आहे, अशी खुळी समजूत भारतीय समाजमनामध्ये पेरण्यामध्ये भांडवलदार वर्ग यशस्वी झाला. ही भांडवलदारी व्यवस्था आहे. जगभरात ही व्यवस्था आधुनिक पध्दतीने कारभार करते. याच व्यवस्थेने पैसे मिळवणार्या क्लासंसस्कृतीला पाठीशी धरले आहे आणि मुल्य मिळवणार्या शालेय व्यवस्थेला दूर लोटले आहे. हे पाप करण्याचे काम राजकीय व्यवस्थेने केले आहे. राजकीय लोकांनी भांडवलदार वर्गाची री ओढत या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा प्रवेश, चाचणी परीक्षा, पात्रता परीक्षा, यांना अधिक महत्व दिले जे भांडवलदारांच्या हिताचे आहे. त्याला पाठबळ राजकीय व्यवस्थेने दिले आहे. ही राजकीय व्यवस्था मातृभाषेतून शिका, कमी पैशातून शिका, मानवी मुल्यांचे शिका असे सांगण्यात कमी पडली, राजकारणी मंडळींनी शिक्षण व्यवस्था सक्षम, समृध्द, सुदृढ फारशी केली नाही, महानगरपालिका, जिल्हा परिषद याशासकीय शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा म्हणूनच खालवलेला आढळतो. या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न राजकीय व्यवस्थेने केला नाही. तो नेहमी कमकुवत राहील याची दक्षता घेतली गेली त्यामुळे आपल्या पाल्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळण्याची आशाच समाप्त झाल्याने पालकांचा कल खाजगी शाळांकडे तसेच खाजगी क्लासकडे अधिक वळला. आज छोट्या मोठ्या सर्व शहरामधून पालकमंडळी इयत्ता पहिलीपासूनच खाजगी क्लासमध्ये मुलांना टाकतांना दिसतात. शहरांमधून आई-वडिल ही पालक मंडळी दिवसभर नोकरी करताना दिसतात त्यामुळे त्यांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, त्यामुळे ते क्लासवर जबाबदारी ढकलून मोकळे होतात.
सरकारी शाळांना पुरेसे विद्यार्थी मिळत नसल्याने व सोईसुविधांची कमतरता असल्याने या सरकारी शाळांची दुर्दशा झाली आहे. म्हणूनच ही खाजगी क्लासंस्कृती फोफावली आहे. हे सर्व क्लास बाजारू व्यवस्थेशी जोडले आहेत. व्यवहारी वृत्तीने जोडले आहेत. त्यामुळे धंदेवाईक असलेल्या क्लासचालकामधील स्पर्धेमुळे पराकोटीचे वैर निर्माण होत आहे. आता ही स्पर्धा जीवघेणी ठरत असल्यानेच लातूर येथील खुनाच्या घटनेने स्पष्ट झाले आहे. याचे कारण करोडो रुपयांचा हा समांतर व्यवसाय आहे.
अशी भांडणे शाळा, शाळांमध्ये, कॉलेज – कॉलेजमध्ये कधी झाली नाहीत. कारण त्यांच्यात पैसा कमावण्यासाठी स्पर्धा कधी नव्हती. विद्यार्थी सुजाण, सुशिक्षित, संस्कारी घडवा यासाठी या शाळांमध्ये स्पर्धा होत असतात. विविध प्रकारच्या सांस्कृतिक, कला, क्रीडा स्पर्धा शाळांमध्ये होत असतात, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला फारसे स्थान क्लाससंस्कृतीमध्ये नसते, परंतु शाळेमध्ये कॉलेजमध्ये असते.
विद्यार्थी हा रेसचा घोडा
शिक्षण व्यवस्थेतील शाळा व खाजगी क्लास यामधील भांडण आहे. ते गरीब व श्रीमंतीचे आहे. हे सर्व भांडण जागतिकीकरणाने, चकचकीत दुनियेत आधुनिकीकरणाने निर्माण केलेले आहे. विद्यार्थी हा रेसचा पळणारा घोडा आहे, असे समजणार्या भांडवलदारी शिक्षण व्यवस्थेने आणलेले खुळं आहे.
चांगले शिक्षण म्हणजे खाजगी क्लास, चांगले शिक्षण म्हणजे फक्त चांगले मार्क पडायला हवेत हे समिकरण आज दृढ झाले आहे ते खोटे आहे. खाजगी क्लासचा कधीही वापर न केलेली सरकारी शाळा, कॉलेजमधूनही शिकलेली माणसेही महान झालेली आहेत. त्यांच्या कार्य कर्तृत्वाने अजरामर झालेली आहेत. खाजगी क्लासचे भूत अलिकडच्या २५ वर्षात उभे राहिलेले आहे.
महात्मा फुले यांनी इंटर कमिशननं एक पत्र पाठवले होते, त्यात त्यांनी म्हटले होते की, बहुजनांच्या मुलांना शिक्षण द्यायचे असेल तर त्यांना स्पर्धेच्या बाजारात उभे न करता त्यांना मुल्यांचे शिक्षण द्यायला हवे, असे झाले तरच आपला समाज विचारी होवू शकेल.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. शिक्षण हेच माणसाच्या प्रगतीचे केंद्रस्थळ आहे, असे अनेक महापुरुषांनी सांगितले आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे, महर्षी शिंदे, यांनी समाजाच्या उन्नतीसाठी शाळा, कॉलेज सुरु केल्या, त्यांनी समाज प्रबोधनासाठी शाळांचा उपयोग केला आज मात्र भांडवलदार वर्ग स्वत:चा फायदा लाटण्यासाठी शिक्षण क्षेत्राचा उपयोग करत आहे.
क्लासचालकांची अनागोंदी
बर्याच क्लासचालकांकडे पार्किंगची स्वतंत्र जागा नसल्यामुळे शेकडो विद्यार्थी क्लास शेजारील रस्त्यावर वाहने पार्किंग करत असतात. त्यामुळे वाहतुकीसाठी या रस्त्यावर कोंडी होते. इतर येणार्या, जाणार्या वाहनांना अटकाव होतो, त्याविरुध्द तक्रारी केल्या तरी काही कारवाई होत नाही. कमी जागेत अनेक विद्यार्थी बसविले जातात. एका छोट्या वर्गात १०० पेक्षा जास्त विद्यार्थी बसविले जातात. विद्यार्थ्यांना शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय केली जात नाही. मुलामुलीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नसतात. विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींना या खाजगी क्लासमध्ये तोंड द्यावे लागते. शासनाकडे बरेच क्लास नोंदणी करत नाहीत, केली तरी दोन तीन शाखांची नोंदणी केली जाते व इतर शाखा बेकायदेशीरपणे चालविल्या जातात. कमी विद्यार्थी संख्या दाखवली जाते. त्यामुळे उत्पन्नाचा स्त्रोतही कमी दाखवून शासनाची फसवणुक केली जाते. पालकांना फी ची कॅश मेमो पावती दिली जात नाही. सहाजिकच उत्पन्नावरही कर भरण्यासाठी त्यांच्यावर कडक बंधन नव्हते किंवा इतरही बाबतीत त्यांच्यावर शासनाचे कसलेही नियंत्रण नव्हते. प्रस्तावित कायद्यामुळे यामध्ये काही प्रमाणात सुधारणा होवू शकेल.
हे खाजगी क्लासवाले अनेक मोठ्या कॉलेज संस्थांबरोबर गुप्त समझोता करून विद्यार्थी आपल्याकडे वळवतात. कॉलेजमध्ये विद्यार्थी अडमिशन घेतात पण शिक्षण मात्र या खाजगी क्लासेसमध्ये घेतात. कॉलेजमध्ये शिकतही नाहीत असे समझोते केल्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजकडून मोकळीक दिली जाते. आत्ता मात्र कॉलेजमधील हजेरी बायोमेट्रिक केल्यामुळे या गोष्टीला अटकावू होवू शकले.
भेदभावपूर्ण शिक्षण हा गरिबांवरचा अन्याय
दुसरी बाजु म्हणजे या क्लासमध्ये सर्वसामान्य व्यक्ती आपल्या पाल्याला प्रवेश घेवू शकत नाही. कारण यांची फी लाखांच्या घरात असते. बांधकाम मजूर, हमाल, शिक्षावाले, फेरीवाले, शेतकरी, शेतमजुर, असंघटित कामगार यांच्यासह श्रमिक, कष्टकरी, आदिवासी, शोषित, वंचित, दलित, वर्गातील करोडो पालक ज्यांचे हातावर पोट आहे, अशी माणसे एक लाख रुपये कुठून आणणार? म्हणजेच जो वर्ग श्रीमंत आहे तेच लाखो रुपये फी भरून प्रवेश घेवू शकतात. ज्यांची भरण्याची कुवत नाही ते या खाजगी क्लासमध्ये आपल्या मुलांसाठी प्रवेश घेवू शकत नाहीत. यातून एक सामाजिक भेदभावाची दरी निर्माण होत आहे. जे पैसा भरून प्रवेश घेतात त्यांच्यासाठी या प्रवेश परिक्षा पास होण्याची शक्यता निर्माण होते परंतू जे प्रवेश घेवू शकत नाहीत. त्यांच्यात न्युनगंड निर्माण होतो. विद्यार्थी दशेतच उच्च -नीच, बडे-छोटे, गरीब – श्रीमंत, हायक्लास – लोकलक्लास असे भेदभावाची दरी निर्माण होते. यातून सामाजिक विषमता अधोरेखित होते. ङ्गसारे भारतीय माझे बांधव आहेतङ्ख या प्रतिज्ञेतील वाक्याला तडा जातो. विद्यार्थी दशेतील हे असमानतेचे संस्कार पुढे जन्मभर कायम राहत असतात. श्रीमंतांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण मिळणार व गरीब वर्ग त्यापासून वंचित राहणार अशी भेदभावपूर्ण शिक्षण व्यवस्था यातून स्पष्ट दिसून येते.
हजारो वर्षातील जात व्यवस्थेमुळे हा देश दुर्बल झाला आहे. ती जात व्यवस्था गरीब-श्रीमंतांच्या रुपात आजही अशा कारणामुळे कायम असल्याचे म्हणता येईल. गरीब वर्गाला उच्च शिक्षण घेण्याची संधी यामुळे मिळत नाही. किंबहुना त्याची संधी हिरावूण घेतली जाते. शिक्षणाची समान संधी त्यांना मिळत नाही हा सुध्दा गरीब वर्गावरचा अन्याय आहे.
प्रस्तावित कायद्यामध्ये गरीबांसाठी ५ टक्के ऐवजी १० टक्के कोठा ठेवणे आवश्यक आहे तसे केले तरच क्लासचालकांना सामाजिक उत्तराई होण्याचे पुण्य मिळेल. आपल्या कमाईतील थोडा हिस्सा गरीब वर्गासाठी खर्च करणेहे सामाजिक कर्तव्य आहे.
क्लासचालकांसाठी येणार कायद्याचा अटकाव
खाजगी क्लासचालकांच्या मनमानीला अटकाव करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कायदा करण्याचे ठरवले आहे. शासनाने महाराष्ट्र खाजगी शिकवणी (विनियम) अधिनियम २०१८ नावाने मसुदा जाहीर केला आहे. यामध्ये क्लासचालकांसाठी काही कडक नियम घालून दिले आहेत. विद्यार्थ्यांसाठी विविध सोयी सुविधा देणे बंधनकारक केले आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड व पोलिस कारवाईही करण्याचे प्रयोजन आहे.
आता जी शिक्षण व्यवस्था आहे, तिच्यावर शासनाचा योग्य प्रकारे अंकूश नाही तर या खाजगी क्लासेसवरती कसा ठेवू शकेल? असा प्रश्‍न पडतो. खाजगी क्लासची महाराष्ट्रातील उलाढाल ही शिक्षण खात्याच्या बजेटपेक्षाही मोठी खाजगी क्लासचालकांची लॉबीपुढे शासन किती नमेल की क्लासचालकांना शासन वेसन घालेल? हे कायदा पास झाल्यानंतर कळेल. -समुह संपादक

Posted by : | on : 12 Aug 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (358 of 835 articles)

Aarakshan Law
जागता पहारा : भाऊ तोरसेकर | मराठा आरक्षणाचे घोडे कुठे अडून पडलेले आहे, त्याचे खरेखुरे उत्तर कुठला राजकारणी देणार नाही. ...

×