ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर » खेलेंगे कूदेंगे बनेंगे नवाब!

खेलेंगे कूदेंगे बनेंगे नवाब!

Winners 2018

Winners 2018

॥ रोखठोक : हितेश शंकर |

आधी हॉकी आणि कबड्डीत सारे जग आमचे प्रभुत्व मानत होते. परंतु, या दोन्ही खेळात आमचे प्रदर्शन अपेक्षेनुरूप राहिले नाही. दुसरीकडे, इतक्या जोरदार प्रदर्शनानंतरही पदक तालिकेत वरच्या क्रमांकावर जाण्यासाठी आम्हाला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. बळकट तरुण खांदे आणि या पथकाच्या डोळ्यांमधील चमक सांगत आहे की, परिश्रमाची पराकाष्ठा करण्यात आमचे खेळाडू कुठलीच कसर सोडणार नाहीत, असे आम्ही म्हणू शकतो. आज तुम्ही-आम्ही पदकांची चमक बघितली आहे. आता येणार्‍या काळात, नव्या रोपांच्या बळावर पदकांचे भरघोस पीक बघायला मिळणार, हे नक्की!

पूर्वी म्हटले जायचे-
पढ़ोंगे लिखोगे बनोगे नवाब।
खेलोगे कूदोगे होगे खराब॥
खरे म्हणजे हा, दरबारी चाकरी, सरकारी नोकरीतच स्वत:ला बादशाह समजण्याची चूक आणि या एवढ्यालाच जीवनाचे सार्थक मानणारा, गुलामीच्या काळात उत्पन्न झालेला आणि लायसन्स-कोटा राज्यात अभिलाषा धुळीत मिळाल्याने गडद झालेला अनुभव होता.
हा भूतकाळ होता. जेव्हा कारकुनीपणा खेळ आणि खेळाडूंच्या वरचढ होता. हा वर्तमान आहे. जिथे खेळाडूंनी सामाजिक प्रतिष्ठेचे मैदान मारले आहे.
सांगायलाच नको की, स्वातंत्र्याच्या आधी राजे-महाराजांच्या चाकरीत पिढ्या आणि स्वातंत्र्यानंतर गटबाज राज्याच्या नोकरीत, चप्पल झिजवता-झिजवता जे झिजायला हवे होते त्या सामाजिक व्याख्यादेखील झिजल्या.
हा ‘खेलोगे कूदोगे बनोगे नवाब’वाला नवा काळ आहे.
जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे आतापर्यंतचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे. संपूर्ण देश आपल्या क्रीडा-तारकांसाठी सन्मानाचे गालीचे अंथरून आहे. कारण यांच्यामुळेच आज आपला भारत ‘क्रीडा महाशक्ती’ बनण्याच्या दिशेने वेगाने अग्रेसर होताना दिसत आहे.
१५ सुवर्ण आणि २४ रौप्य पदके सांगत आहेत की, खेळाच्या जगात आशियाचा हा निद्रिस्त गजराज आता आळस झटकून जागा होत आहे. १९५१ सालच्या पहिल्या आशियाई स्पर्धेतही आम्ही १५ सुवर्ण पदके जिंकली होती, असे सांगून काही लोक या आजच्या कर्तृत्वाचे महत्त्व कमी लेखत आहेत. हे तर बरोबरच आहे; परंतु हा एकांगी आणि अपुरा तर्क आहे. या तथ्याशी जुळलेले आणखी एक तथ्य हे आहे की, १९५१ च्या आशियाई स्पर्धा दिल्लीत झाल्या होत्या. त्यामुळे स्वाभाविकच यजमान म्हणून आम्हाला आपल्या घरीच खेळण्याचा फायदा मिळाला होता. जकार्तामध्ये परिस्थिती वेगळी होती. दुसरी महत्त्वाची आणि अधोरेखित करणारी बाब म्हणजे पहिल्या आशियाई स्पर्धेतील प्रदर्शनाची पुनरावृत्ती करण्यास आम्हाला ७० वर्षे लागली आहेत.
हे स्पष्टच आहे की, एक ऑलिम्पिक पदकविजेता खेळाडू केंद्रीय मंत्री झाल्यामुळे प्रशासनाचा आळस आणि अव्यावहारिक अडचणींची साखळी तुटली आहे.
हेही लक्षात घ्यायला हवे की, देशाला गौरव प्राप्त करून देणारे अधिकांश चेहरे तरुण आहेत आणि लब्धप्रतिष्ठित ओळख आणि चकाकीपासून दूर असलेले आहेत.
उदाहरणार्थ, मीरतच्या ऊस उत्पादकाचा अप्रतिम प्रतिभाशाली मुलगा १६ वर्षीय सौरभ चौधरी आणि १५ वर्षांचा शार्दूल असे खेळाडू आहेत की, ज्यांना अजून नीट मिसरूडही फुटलेली नाही आणि त्यांनी नेमबाजीत (ट्रॅप शूटिंग) थेट सुवर्ण व चांदीवरच निशाणा लावला.
भालाफेकीत नीरज चोपडाच्या बाहूंतील दम सांगतो की, तो ऑलिम्पिकमध्येही कमाल करू शकतो. खेळाडू खेळाडूच असतात; परंतु, तरीही कमी वय आणि सामान्य पृष्ठभूमी हे दोन असे महत्त्वपूर्ण कारक आहेत, ज्यांना दुर्लक्षित करता येणार नाही आणि करायलाही नको.
एकतर हे की, तुमच्याकडे तरुण, उत्साही पिढी असल्यामुळे त्यांच्या खेळण्याचा कालावधीदेखील बर्‍याच वर्षांचा असेल. त्यामुळे आशा ठेवायला हरकत नाही.
दुसरे म्हणजे, रिक्षाचालक, विणकर, शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या परिस्थितीतून जात ज्या खेळाडूंनी जकार्तामध्ये भारताचा झंडा फडकविला, ते आज जीवनाच्या विविध कार्यक्षेत्रात, या देशाच्या सार्‍या लोकांसाठी एक वेगळा आदर्श म्हणून उभे आहेत.
ही विरळीच उदाहरणे आहेत, जी आम्हाला, सर्वप्रकारच्या मानसिक आणि आर्थिक चिंतांना बाजूला सारून यशाकडे, लक्ष्याकडे कसे अग्रेसर व्हायचे, हे सांगतात. अदम्य इच्छाशक्तीच्या बळावर केवळ स्वत:चाच नाही तर, सर्वांचा मान कसा वाढवता येतो, हे सांगणार्‍या या यशाच्या कहाण्या आहेत.
विजय केवळ उत्साहच वाढवत नाही तर, काळजीशी दोन हात करण्याचा मार्गही दाखवितो, समोर आदर्श ठेवतो, हे स्पष्टच आहे.
भालाफेकीत देशाला प्रथमच सुवर्णपदक प्राप्त करून देणारा तेजिंदरसिंग, कॅन्सरशी झुंजणार्‍या आपल्या मरणासन्न पित्याच्या काळजीत बुडाला असतानाही, देशाच्या सन्मानाची लढाई प्राणपणाने लढत होता.
ऑटोरिक्षाचालकाची मुलगी स्वप्ना बर्मन, जबड्याला दुखापत असतानाही तिथे पट्टी बांधून, असह्य वेदना सहन करीत देशासाठी पहिल्यांदाच महिलांच्या हेप्टॅथलॉन स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकत होती…
सामान्य पृष्ठभूमीच्या नव्या प्रतिभावंतांची ही झेप भावूक करणारी आहे आणि अनेकदा तर द्रवितही करणारी आहे. उदाहरणार्थ, अ‍ॅथलेटिक्समध्ये हेमा दासचे शेवटच्या क्षणात विक्रम स्थापित करणे आणि राष्ट्रगीताच्या वेळी भावनांचे अश्रुरूपात वाहणे…
हेप्टॅथलॉनमध्ये मुलीला कमाल करताना बघून, एका निम्न मध्यमवर्गीय कुटुंबाचे गदगदणे, आनंदाच्या अश्रूंनी भावविव्हळ झालेल्या आईचे घरातीलच छोट्याशा मंदिरातील जगत् जननीच्या मूर्तीसमोर मूर्च्छित होऊन पडणे… स्पर्धा तर अनेकदा होतील; पण अशा क्षणांचा साक्षीदार होण्याचे भाग्य वारंवार मिळत नाही.
आशियाई स्पर्धेतील परिणाम उत्साह घेऊन आले आहेत; परंतु, ही कुण्या एका आयोजनाशी जुळलेली गोष्ट अथवा एक घटना केवळ नाही आहे. खेळाच्या आघाडीवर एक फार मोठा सकारात्मक संकेत हाही आहे की, देशांतर्गत ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिटनेस चॅलेंज’सारखी चळवळ इकडे देशात खेळ आणि व्यायामाचे वातावरण तयार करीत आहे तर, तिकडे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय प्रतिभा सतत उच्च स्तराचे प्रदर्शन आणि प्रतिभेचा धाक स्थापन करीत आहे.
परंतु, या सर्व चांगल्या गोष्टींमध्येही कुठेतरी गहन वेदनाही आहे. आधी हॉकी आणि कबड्डीत सारे जग आमचे प्रभुत्व मानत होते. परंतु, या दोन्ही खेळात आमचे प्रदर्शन अपेक्षेनुरूप राहिले नाही. दुसरीकडे, इतक्या जोरदार प्रदर्शनानंतरही पदक तालिकेत वरच्या क्रमांकावर जाण्यासाठी आम्हाला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे.
असो. बळकट तरुण खांदे आणि या पथकाच्या डोळ्यांमधील चमक सांगत आहे की, परिश्रमाची पराकाष्ठा करण्यात आमचे खेळाडू कुठलीच कसर सोडणार नाहीत, असे आम्ही म्हणू शकतो. आज तुम्ही-आम्ही पदकांची चमक बघितली आहे. आता येणार्‍या काळात, नव्या रोपांच्या बळावर पदकांचे भरघोस पीक बघायला मिळणार, हे नक्की! •••

Posted by : | on : 23 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर (480 of 1287 articles)


तोरसेकर | तमाम पुरोगामी म्हणवून घेणारे लोक आपल्यासाठी परिवर्तनवादी, अशी बिरुदावली लावत असतात. परिवर्तन म्हणजे तरी काय असते? तर जी ...

×