ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:10
अयनांश:

गर्जा, हर हर महादेव…!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने |

जगात कुठेही मुसलमानांची बदनामी झाल्याची कुणकुण लागली, तर भारतातील मुसलमान सार्‍या व्यवस्थेला वेठीस धरतात. बंगालमधील हिंदुंच्या आर्त किंकाळ्या निदान भारतातील इतर हिंदुंपर्यंत तरी पोहचतील का? जात-पंथ-प्रांत-भाषा यांच्या भिंती छेदून, अलिकडच्या हिंदुंच्या व्यथा पलिकडच्या हिंदुंपर्यंत पोहचतील का? हिंदुंसाठी एकमेव आश्रयस्थान असलेली भरतभूमी घुसखोरी, धर्मांतरण आणि भंपक सेक्युलॅरिझमकडून सतत पोखरली जात आहे. भंपक सेक्युलॅरिझममुळे हिंदू आपल्या परंपरा, सभ्यता, संस्कृतीपासून दूरावत गेले! सुदर्शनचक्रधारी श्रीकृष्ण, कोदंडधारी श्रीरामचंद्र, त्रिशूलधारी श्रीमहेश आमचे आदर्श असताना, हाती दंडध्वज धरायला घाबरण्याइतपत हिंदू नेभळट कसे झाले? कुठे गेली ती वीरश्रीयुक्त, ‘हर हर महादेव’, ललकारी? कारण, राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा क्षीण होत गेली आणि क्षात्रतेज हरवले! आम्हाला ते परत मिळवावे लागेल, अन्यथा ‘न बचेगा हिंदू, न बचेगा हिंदुस्थान!’

Har Har Mahadev

Har Har Mahadev

माझे आजोबा मराठवाड्यातील रझाकारीचे जे वर्णन करायचे, अगदी तशाच बातम्या ममता दिदीच्या बंगालमधून येत आहेत. या ममता बंडोपाध्याय आहेत, की ममता बेगम? निजामशाहीत मोहर्रमसाठी आठवडाभराची सुट्टी असायची आणि जर चुकून दसरा वगैरे मोहर्रमच्या दरम्यान आलेच, तर हिंदुंनी आपले सणोत्सव मोहर्रमनंतर साजरे करावेत, असा वटहुकूम निघत असे! निजाम राजवटीत हिंदुंच्या जगण्यामरण्याची सारी सूत्रं मुस्लिमांच्या हातात होती. ममता राजवटीत ती तृणमूल कार्यकर्त्यांच्या हातात आहेत. तृणमूल काँग्रेसच्या तथाकथित कार्यकर्त्यांमध्ये सर्वाधिक भरणा कुणाचा आहे, ते वेगळे सांगायची गरज नाही! रोहिंग्या, बांग्लादेशी घुसखोरांकडे गमावण्यासारखं काहीच नसल्यामुळे, ते जीवावर उदार व्हायला तयारच असतात! कासिम रझवीने उभ्या केलेल्या खाजगी संघटनेला रझाकारांची संघटना म्हणत असत. प्रत्येक रझाकाराला निजामाकडून दरमहा वेतन मिळत असे. रझाकार संघटना जन्माला घातली, मजलिसे इत्तेहादूल मुसलमीन संघटनेने! निजामाचा वरदहस्त लाभलेले कासिम रझवीचे रझाकार आणि ममता बॅनर्जींकडून अभय मिळालेले तृणमूल काँग्रेसचे तथाकथित कार्यकर्ते!
गावागावात रझाकारांचे अड्डे असायचे. प्रचंड दहशत असायची. रझाकारांविरुध्द ब्र काढायची कुणाची हिंमत होत नसे, कारण त्यांना लाभलेला निजामाश्रय! बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनीही अशीच दहशत निर्माण केली आहे, कारण त्यांना लाभलेला ममताश्रय! ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करायला जायची बर्‍याच विरोधकांची हिंमतच झाली नाही आणि जे काही गेले, त्यातले बरेच परत आलेच नाहीत!
रझाकारांची टोळधाड वेशीवर येऊन धडकली, की गोठ्यातली गायीवासरं, पडवीतली मायलेकरं हादरुन जायची. भारताला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे लोटली, पण गोठ्यातल्या गायी आणि घरातल्या पोरीबाळी अजूनही सुरक्षित नाहीत. रझाकारी औलादी नवनव्या रुपात आजही हैदोस घालत आहेत. लव्हजिहादच्या तावडीतून चुकूनमाकून सुटलेल्या पोरींच्या व्यथा हृदय पिळवटून टाकतात. निजामशाहीत डोळ्यादेखत गायी, पोरीबाळी ओढून नेल्या जायच्या. लिंगपिसाट लांडग्यांची हवस फिटेपर्यंत गायी कापून शिजायला टाकल्या जायच्या. उध्वस्थ झालेल्या काही पोरीबाळी तोंड लपवत घरी परतायच्या, तर काही विहिरी, बारवा जवळ करायच्या. रझाकारांची गिधाडं शिवारात शिरली, की उभी पिकं आडवी केली जायची, कडब्याच्या गंजींना आगी लावल्या जायच्या. बकरी ईद जवळ आली, की बोकडांवर संक्रांत यायची. विरोध केला, तर ती बोकडांसकट मालकांवर कोसळायची!
श्रीनिवास वैद्य यांचा एक लेख वाचण्यात आला. रेल्वेस्टेशनवर त्यांना भेटलेल्या बंगाली तरुणांनी, ममता राजवटीबद्दल त्यांना जे काही सांगितलं, ते वाचुन, माझा आजोबा रझाकारांबद्दल मला जे काही सांगायचा, त्याच्या कटू आठवणी जाग्या झाल्या. नेहरुजी नाखूष असतानाही सरदार पटेलांनी केलेली धाडसी लष्करी कारवाई आणि चिवट मराठवाडी जनतेने दिलेली प्रदीर्घ झुंज, यामुळे जुलमी निजामशाही कोसळली. रझाकारीशी बरेच साम्य असलेली ममता राजवट संपविण्यासाठी मोदी सरकारला हस्तक्षेप करणे अशक्य नसले, तरी बंगाली जनताच लोकशाही मार्गाने ममता दीदीचा गाशा गुंडाळील, असं त्या बंगाली तरुणांचा आशावाद सांगत होता. डाव्यांच्या आगीतून निघून बंगाली जनता आता ममताच्या फुपाट्यात होरपळत आहे. कुठलीही जुलमी राजवट, त्यातही कमालीचे सहिष्णू असलेल्या हिंदुंवर अत्याचार करणारी राजवट, फार काळ टिकत नाही. तोपर्यंत हिंदुंचं प्रचंड नुकसान मात्र झालेलं असतं. मोगलाई संपली, इंग्रज निघून गेले, पण देशाचे तुकडे झाले. २०१४ साली काँग्रेस राजवट संपली, पण तोपर्यंत काश्मिरी पंडीत विस्थापित झाले! खरं म्हणजे लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार, हिंदू मतदार प्रभावीपणे वापरत नसल्यामुळे अशा राजवटी ठाण मांडून बसतात. म्हणून तर सोनिया मॅडम, ममता दीदी मुसलमानांसाठी, रोहिंग्या-बांग्लादेशी घुसखोरांसाठी काहीही करायला तयार असतात. राष्ट्रीय नागरिकता नोंद पुस्तिकेत समाविष्ट होऊ न शकलेल्या घुसखोरांची कड किती पोटतिडकीने घेताहेत त्या?
ममता सरकारने महाविद्यालयात जाणार्‍या मुलींसाठी कन्याश्री योजना सुरु केली आहे. मुलीने महाविद्यालयात प्रवेश घेतला की तिला २५ हजार रुपये रोख दिले जातात, परंतु ती मुलगी पैसे घेऊन घरी पोहचायच्या आत, तृणमूल काँग्रेसचे गुंड तिला गाठतात आणि जबरदस्तीने ते २५ हजार रुपये खंडणी म्हणून घेऊन जातात. मुलींनी विरोध केला, तर त्यांना महाविद्यालयीन शिक्षणावर पाणी सोडावे लागते आणि मुलींसाठी इतरांनी कुणी विरोध केला, तर पुढे त्यांचं काय होईल, ते कुणीही सांगु शकत नाही. पोलिसांसह सर्व राज्य प्रशासनच तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दहशतीखाली काम करत असेल, तर कुणाची विरोध करायची काय बिशाद? तृणमूल काँग्रेसचे गुंड कार्यकर्ते आणि कासिम रझवीचे रझाकार! पैसा प्रामाणिक करदात्यांचा आणि तो कन्याश्री योजनेच्या नावाखाली जातो तृणमूल कार्यकर्त्यांच्या खिशात! म्हणून तर मोदी सरकारच्या ऑन लाईनला ममता दिदी कडाडून विरोध करतात. अवैध घुसखोर उघडे पडतील, म्हणून आर्थिक व्यवहाराची आधारकार्ड, पॅनकार्डशी सांगड घालायला विरोध, राष्ट्रीय नागरिकता नोंद मसुद्याला विरोध! स्थानिक बंगाली भूमीपूत्र ममता सरकारचा अत्याचार आणखी किती दिवस सहन करतील?
बांग्लादेशी घुसखोरांमुळे स्थानिक बंगाली हिंदुंची शेतीबाडी, व्यापारउदीम उध्वस्थ होण्याच्या मार्गावर आहे. सीमावर्ती भागातील घुसखोरबहुल जिल्ह्यांमधून स्थानिक हिंदू पलायन करत आहेत. ममता राजवटीत चोरांना सरकारी तूपरोटी आणि घरमालक उपाशी! काश्मिरी पंडित जसे आपल्याच मायभूमीत विस्थापितांचं लाजीरवाणं जीवन जगत आहेत, तीच वेळ बंगाली हिंदुंवर येऊ घातली आहे. आसामी भूमीपुत्रांवरही तशीच वेळ आली होती, म्हणून तर त्यांनी घुसखोरांचे मायबाप सरकार उखडून फेकले. बंगाली भूमीपुत्रांनाही त्यांच्या अस्तित्वासाठी ममता सरकारला सोडचिठ्ठी द्यावीच लागणार आहे. लोकशाहीतील रझाकारीचा कायमचा बंदोबस्त करणे, ही समस्त भारतीयांची जबाबदारी आहे. चोर समोरच्याच्या घरात शिरले आहेत ना? मला काय त्याचे? म्हणून ताणून देणार असू, तर एक दिवस चोर आपल्याही घरात घुसतील आणि आपण रस्त्यावर येऊ!
ममता राजवटीत हिंदुंच्या गोठ्यातील गुरंढोरं चोरीला जाणे, नित्याचेच झाले आहे. ही चोरी लपूनछपून होत नाही, तर दिवसाढवळ्या डोळ्यादेखत होते. मुसलमान येतात आणि गोठ्यातील गायीगुरं सोडून घेऊन जातात. प्रतिकार केला, तर जीवच गमवावा लागतो किंवा गोमाता चोरीची असल्याच्या आळ घालून पोलिसांकरवी अटक करवतात. बंगाली तरुण म्हणाला, गेल्या वर्षी मी माडीवर अभ्यास करत असताना, शेजार्‍याच्या घरातील गायी काही मुसलमान चोरुन नेत असल्याचे मी खिडकीतून बघितले. आमच्याकडे दररोज १५ लिटर दुध देणारी गाय होती. दुसर्‍या दिवशी आम्ही ती जमीनदाराला विकून टाकली! चराचराला पोटात घेणारी गोमाता, गोमांस भक्षकाचं पोट फाडून बाहेर कधी येईल? नराला प्रसवणारी नारीमाता, लिंगपिसाटांच्या नरडीचा घोट कधी घेईल? हिंदू जागृत झाला तरच!
बकरी ईद जवळ आली, की गोतस्करांचा कहर वाढत जातो. परिसरातील नागरिकांनी सामुहिक प्रतिकार करायचा प्रयत्न केला, तर लिंचिंंग, लिंचिंग म्हणून मीडिया बोंबाबोंब करतो. अवैध गोतस्करीविरुद्ध पोलीस तक्रार केल्याच्या रागातून उत्तर प्रदेशातील भयानकनाथ मंदिरात चार हिंदू साधूंची हत्या करण्यात आली. एकाची जीभ छाटण्यात आली. मीडियाच्या तोंडाला कुलुप! सलमान, नदीम, शहजाद, मंजू, जब्बार या संशयितांना अटक केली आहे. तिथे योगी सरकार असल्यामुळे ही नावं तरी समोर आली! बंगालमध्ये अटकही झाली नसती!
त्यांच्या धार्मिक प्रतिकांचा अवमान झाल्याची नुसती अफवा पसरली, तरी केवढा उद्रेक होतो त्यांच्या भावनांचा! केरळमध्ये गाय-वासरु रस्त्यावर कापून मटनपार्टी केली गेली, तरी हिंदू शांतच राहिले. तिकडे रोहिंग्या मुसलमानांवर अत्याचार झाल्याची खरी-खोटी वार्ता भारतात येऊन धडकली, तेव्हा मुंबईतील रझा अकादमीच्या रझाकारांनी घातलेला हैदोस, गांधी वधानंतरची बामणजाळी, १९८४ सालचे शिखांचे शिरकाण, विकल्या गेलेल्या लाचार मीडियासाठी मॉब लिंचिंग नसते! गोरक्षकांकडून गोभक्षकांना झालेला प्रतिकार मात्र मॉब लिंचिंग ठरवून हिंदुंची यथेच्छ निंदा नालस्ती केली जाते! हा सेक्युलरी व्यभीचार नाही का?
जगात कुठेही मुसलमानांची बदनामी झाल्याची कुणकुण लागली, तर भारतातील मुसलमान सार्‍या व्यवस्थेला वेठीस धरतात. बंगालमधील हिंदुंच्या आर्त किंकाळ्या निदान भारतातील इतर हिंदुंपर्यंत तरी पोहचतील का? जात-पंथ-प्रांत-भाषा यांच्या भिंती छेदून, अलिकडच्या हिंदुंच्या व्यथा पलिकडच्या हिंदुंपर्यंत पोहचतील का? मुसलमान फक्त त्याच्या धर्मासाठीच जगतो, मारतो आणि मरतो! हिंदुंना आपल्या अस्तित्वासाठी सर्वस्वाचे समर्पन करण्याची वेळ आली आहे. हिंदुंसाठी एकमेव आश्रयस्थान असलेली भरतभूमी घुसखोरी, धर्मांतरण आणि भंपक सेक्युलॅरिझमकडून सतत पोखरली जात आहे. भंपक सेक्युलॅरिझममुळे हिंदू आपल्या परंपरा, सभ्यता, संस्कृतीपासून दूरावत गेले! जमीन छोड़ दी, तो पैर कहा रखेंगे? कौरवांनी अनितीने बळकावलेले पांडवांचे राज्य त्यांनी परत करावे, म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला हस्तिनापुरी उपोषणाला नाही बसवले, तर युध्द करायला लावले! रावणाने सीतेला परत करावे, म्हणून श्रीरामचंद्र श्रीलंकेत जाऊन उपोषणाला नाही बसले, तर सर्वंकष युध्द करुन रावणासह राक्षसांचा नायनाट केला! काशी विश्‍वनाथ, द्वारकाधीश श्रीकृष्ण, अयोध्याधीश श्रीप्रभुरामचंद्र यांची परकीय आक्रमक म्लेंछांनी उध्वस्थ केलेली मंदिरं, आम्ही आजतागायत पुन्हा उभी करु शकलो नाही? सुदर्शनचक्रधारी श्रीकृष्ण, कोदंडधारी श्रीरामचंद्र, त्रिशूलधारी श्रीमहेश आमचे आदर्श असताना, हाती दंडध्वज धरायला घाबरण्याइतपत हिंदू नेभळट कसे झाले? कुठे गेली ती वीरश्रीयुक्त, ‘हर हर महादेव’, ललकारी? कारण, राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा क्षीण होत गेली आणि क्षात्रतेज हरवले! आम्हाला ते परत मिळवावे लागेल, अन्यथा ‘न बचेगा हिंदू, न बचेगा हिंदुस्थान!’
हिंदू आणि हिंदुस्थान तोडण्यासाठी अनेक विकृती सर्वच क्षेत्रात कामाला लागल्या आहेत. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून दिल्लीतली दरबारी ल्युटीयन्स गँग एवढी बिथरली आहे, की तिचे रिंगमास्टर शेखर गुप्ता यांनी अलिकडेच एक भयानक ट्विट केले आहे: संपन्न दक्षिण भारताने दरिद्री उत्तर भारत किती दिवस पोसायचा? दक्षिणेतील राज्यांनी एकत्र येऊन स्वतंत्र फेडरेशन स्थापन करावे! ही दक्षिण भारताला भारतातून फुटून निघण्याची उघडउघड चिथावणी आहे! केंद्र सरकारची संकटमोचक यंत्रणा, संघस्वयंसेवक जीवाची पर्वा न करता पूरग्रस्तांसाठी अहोरात्र झटत असताना, काँग्रेसचे घोडकुमार विदेशात भारताची निंदानालस्ती करत फिरत आहेत! गायबछड्यांच्या मांसाच्या जाहीर मेजवान्या आयोजित करणारे-झोडणारे लाल-हिरवे बावटे, पवित्र कार्य करणारे निर्मल हृदयी पायघोळ झगे पुराच्या पाण्यात उतरलेले दिसले नाहीत, पण अरबांकडून न मिळालेल्या मदतीची लोणकडी थाप मारुन मोदी सरकार केरळवर अन्याय करत असल्याच्या बोंबा मारत होते, अरबांना धन्यवाद देणारे लाल-हिरवे फलक झळकवत होते! सरसंघचालकांच्या हस्ते ध्वजारोहनाला विरोध आणि अरबांसाठी पायघड्या? हा त्या उत्तर-दक्षिण षडयंत्राचाच भाग असावा! काश्मिर मांगे, आझादी। बंगाल मांगे, आझादी। मोदीद्वेषातून राष्ट्रहिताला तिलांजली? राष्ट्रभक्तांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष एवढा बुलंद केला पाहिजे, ज्यात फुटीरतावादी पालापाचोळ्यासारखे उडून गेले पाहिजेत! ‘जोर से बोलो, हर हर महादेव!’
पश्‍चिम आफ्रिकेत गांबिया नावाचा एक देश आहे. ब्रिटीशांचे पाय त्या भूमीला लागेपर्यंत गांबिया नैसर्गिक संसाधनाने सुखी, संपन्न देश होता. प्रदीर्घ काळ शोषण केल्यानंतर १९६५ साली इंग्रज गांबिया सोडून निघून गेले, पण जाता जाता भारताप्रमाणे गांबियातही सेक्युलॅरिझमचा किडा सोडून गेले. सेक्युलॅरिझम हे स्थानिक लोकांचे खच्चीकरण करण्यासाठी वापरले जाणारे प्रभावी हत्यार आहे. सेक्युलॅरिझम म्हणजे भूमीपुत्रांच्या धार्मिक भावभावनांची वाट लागली तरी चालेल, किंबहुना तशी ती लागलीच पाहिजे, पण घुसखोरांच्या, धर्मांतरितांच्या धार्मिक भावना मात्र दुखावल्या जाता कामा नयेत, कारण त्या फार हळव्या असतात! धर्मांतराला प्रोत्साहन, संरक्षण देण्यात ह्या भंपक सेक्युलॅरिझमचा फार मोठा हातभार असतो. बेगडी सेक्युलॅरिझममुळे समाज भ्रष्टाचारी आणि अनैतिक बनतो. सेक्युलॅरिझम तुमची मूळ ओळख विसरायला लावतो.
धर्मनिरपेक्ष गांबियात धर्मांतरीत मुस्लिमांची संख्या झपाट्याने वाढत गेली. त्यांच्या धार्मिक भावना टोकदार होत गेल्या. शरियाची मागणी जोर धरु लागली आणि १९९४ साली याह्या अब्दुल अजिज जामेह या सेनाधिकार्‍याने बंड करुन सत्ता काबीज केली. १९९६ साली जामेह राष्ट्रपतीपदी निवडून आले. तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकशाहीवाद्यांचा दारुण पराभव झाला. सेक्युलॅरिझमचे भूत डोक्यातून खाडकन उतरले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मुसलमान बहुसंख्यक झाले होते! म्हणूनच चीन, जपान, इस्रायलसारख्या देशांमध्ये सेक्युलॅरिझमला थारा नाही. प्रखर राष्ट्रवाद! राष्ट्रहित सर्वोपरी! राष्ट्रहिताच्या अलिकडे आणि पलिकडे काहीही नाही! कुठल्याही इस्लामिक देशात सेक्युलॅरिझम हा शब्दही उच्चारला जात नाही. त्यांच्यासाठी इस्लाम सर्वोच्चस्थानी असतो. ख्रिश्‍चन देशांचा राज्य कारभार ‘इन द नेम ऑफ गॉड’ चालतो. मग भारतातच हिंदू धर्माशी फारकत घेऊन सेक्युलॅरिझम आमच्या माथी का मारला जातोय? सेक्युलॅरिझमचा आग्रह धरणार्‍यांमध्ये धर्म लपविणार्‍या हिंदुंचीच संख्या अधिक आहे. नाव हिंदू असलेली व्यक्ती हिंदू असेलच असे नाही! या घरभेद्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल! ज्या लोकशाही, धर्मनिरपेक्ष व्यवस्थेतून मुसलमानांनी गांबिया ताब्यात घेतला, त्या व्यवस्थेला तिलांजली देत राष्ट्रपती जामेहने २०१५ साली गांबियाला इस्लामिक मुल्क जाहीर करुन टाकला. अल्लाहची मर्जी असेल, तर हजारो वर्षे मीच राष्ट्रपती राहणार, असं जाहीर केले, कारण एकदा बहुसंख्यक झालेले मुसलमान कधीच अल्पसंख्यक होत नाहीत, निदान आजपर्यंत तरी कुठे झाले नाहीत! ज्या वर्षी गांबिया स्वतंत्र झाला, त्याच वर्षी याह्या जन्मले! धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा कंठशोष करणारा, जगातला एकही देश गांबियाचे इस्लामीकरण थांबवू शकला नाही! छद्मी धर्मनिरपेक्षतावाद्यांमुळे तशी वेळ भारतावर येऊ नये, म्हणून हिंदुंनीच आता अखंड सावधान राहिले पाहिजे. ‘‘हर हर महादेव!’’

Posted by : | on : 2 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक (373 of 1136 articles)


सारांश : ल.त्र्यं. जोशी | ‘एक देश एक निवडणूक’ ही मोदी सरकारची संकल्पना दिसायला आकर्षक दिसत असली तरी ती प्रत्यक्षात ...

×