ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:

गांधी नावाचे गारूड!

॥ भारत भाग्य विधाता : प्रशांत आर्वे |

गांधींचे बळ कशात आहे? तर ते आहे, माणसावर निरपेक्ष प्रेम करण्याच्या त्यांच्या स्थायीभावात! त्यांनी असंख्य माणसे जोडली, विविध संस्थांना पाठबळ दिले, अनेकांना विधायक कार्यात ओढले आणि ध्येयनिष्ठ माणसांचे असे काही संघटन निर्माण केले, ज्यामुळे या नि:शस्त्र माणसालादेखील ब्रिटिश घाबरले! सतत धडपडणार्‍या या माणसाकडे बघितल्यावर असे वाटते, त्यांच्या आत सतत धगधगणारा जो सक्रिय ज्वालामुखी होता; तो फुटताना मात्र सृजनाचे झरे पाझरत बाहेर पडायचा. असंख्य हताश आणि निराश माणसांच्या चेहर्‍यावर चैतन्य फुलवीत जायचा.

Mahatma Gandhi

Mahatma Gandhi

महात्मा गांधींबद्दल लहानपणापासूनच काहीबाही कानावर येत राहिले आणि तेच मनात साठून राहिले. पुढे पुढे गांधींविषयी असलेला तिरस्कार, द्वेष आणखी पक्का झाला. कारण काय, तर ‘‘त्यांच्यामुळे देशाचे तुकडे झाले, त्यांनीच पाकिस्तानला पंचावन्न कोटी द्यायला भाग पाडले. याच पंचावन्न कोटींच्या आधारे पाकने भारतावर आक्रमण केले…’’ अशी सरसकट विधाने आम्ही समोर बसलेल्या श्रोत्यांच्या तोंडावर फेकून मारू लागलो आणि तेही गांधींविषयी एक अक्षरसुद्धा न वाचता. आहे ना गंमत! गांधी नावाचे सामर्थ्य उमजायचे असेल तर एक कसोटी आहे. बापूंना तुम्ही काहीही म्हणा, तुमच्या अंगावर जातीय आणि धार्मिक उन्मादाने भारलेले कुणीही धावून येणार नाही, कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, कुणाच्याही अस्मितेला बाधा पोचणार नाही आणि तुम्हाला कुणी कोर्टातदेखील खेचणार नाही. हेच बापूंच्या व्यक्तित्वाचे सामर्थ्य आहे!
मात्र, पुढे गांधी जसजसा समजून घेतला, तसे गांधी नावाचे गारूड मनात कायमचे घर करून बसले. गांधी न वाचताच त्यांच्याबद्दल असंख्य गैरसमज त्या पिढीत होते आणि आजही आहेत. पण, गांधी या सगळ्यांच्या पलीकडे आहेत. एक निश्‍चित, तुम्ही गांधींवर प्रेम करा अथवा द्वेष, पण गांधींना डावलून तुम्हाला पुढे जाता येणार नाहीए. भारतीय राजकारण आणि समाजकारणाच्या मुळाशी एखाद्या स्थितप्रज्ञासारखे ते बसले आहेत. जिथून त्यांना हलविणे अशक्य आहे.
गांधींचे बळ कशात आहे? तर ते आहे, माणसावर निरपेक्ष प्रेम करण्याच्या त्यांच्या स्थायीभावात! त्यांनी असंख्य माणसे जोडली, विविध संस्थांना पाठबळ दिले, अनेकांना विधायक कार्यात ओढले आणि ध्येयनिष्ठ माणसांचे असे काही संघटन निर्माण केले, ज्यामुळे या नि:शस्त्र माणसालादेखील ब्रिटिश घाबरले! सतत धडपडणार्‍या या माणसाकडे बघितल्यावर असे वाटते, त्यांच्या आत सतत धगधगणारा जो सक्रिय ज्वालामुखी होता; तो फुटताना मात्र सृजनाचे झरे पाझरत बाहेर पडायचा. असंख्य हताश आणि निराश माणसांच्या चेहर्‍यावर चैतन्य फुलवीत जायचा. गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यातील नातंदेखील असंच काहीसं होतं. शांतिनिकेतनमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढत होती. खर्च वाढत होता आणि गुरुदेवांना तो खर्च भागविणे अशक्य होत चालले होते. त्या वेळी निधी गोळा करावा म्हणून गुरुदेवांनी देशातील विविध शहरांत त्यांच्या चित्रांची प्रदर्शनी लावायचे ठरले. प्रदर्शनी बघायला येणार्‍या लोकांकडून जमा होणारी रक्कम तुटपुंजी होती, म्हणून स्वतः गुरुदेव झोळी घेऊन त्या शहरात निधी गोळा करीत फिरायचे. हा कालखंड १९३७ च्या आसपासचा. गांधींना ही गोष्ट कळली. त्यांनी गुरुदेवांना खरमरीत पत्र लिहिले आणि पुन्हा असे न करण्यास बजावले. पण, यातून शांतिनिकेतनचा प्रश्‍न सुटणार नव्हता. गुरुदेव पुन्हा विविध ठिकाणी प्रदर्शनी भरवू लागले. शेवटी बापूंनी त्यांना ६५ हजार रु. किमतीचा डीमांड ड्राफ्ट पाठविला आणि शांतिनिकेतनला आर्थिक अडचणीतून बाहेर काढले. बापूंनी इतके पैसे कुठून आणले, हा भाग अलहिदा. मात्र, जो काही व्यवहार झाला तो मात्र दोन अत्यंत उन्नत आणि उदात्त आत्म्यांमधील होता. बापूंनी अशा अनेक संस्थांना आपले नैतिक बळ दिले.
बापूंचे आणखी एक शक्तिस्थळ म्हणजे त्यांचे संघटनकौशल्य! आफ्रिकेत गेल्यागेल्याच त्यांना मोरीसबर्ग स्टेशनवर जो काही अनुभव आला, त्याने त्यांचे आयुष्य बदलून टाकले. ती रात्र त्यांनी बोचर्‍या थंडीत काढली. या प्रसंगाने गांधींच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. खरेतर दक्षिण आफ्रिकेतील दादा अब्दुल्ला शेठ आणि कंपनीच्या आग्रहाखातर गांधी केवळ एक वर्षाकरिता तेथे जाण्यास तयार झाले होते. तिथे गुजराती आणि इंग्रजी येणार्‍या एका वकिलाची गरज होती आणि गांधींनी भारतात या व्यवसायात फार काही दिवे लावले नव्हते. प्रत्यक्षात आफ्रिकेत गेल्यावर मात्र त्यांना जो भेदभाव दिसला त्याने ते व्यथित झाले. ब्रिटिश लोकांसाठी प्रत्येक भारतीय हा बास्टर्ड होता. मोरीसबर्ग घटनेनंतर केवळ एक वर्षात भारतीय लोकांचे त्यांनी जे संघटन केले ते बघितले की थक्क व्हायला होतं. भारतीयांचे प्रश्‍न घेऊन ते चक्क वीस, बावीस वर्षे आफ्रिकेत लढत होते. या संघटनकौशल्याचा परिपाक म्हणजे केवळ सुशिक्षित आणि अभिजनवर्गापुरते असलेल्या काँग्रेसच्या पटलावर त्यांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार, स्त्रिया आणि सर्व जाती, पंथाची माणसे अक्षरशः खेचून आणली. वास्तविक, अर्ज, विनंत्या करणारी काँग्रेस लोकमान्य टिळकांनी विसर्जित केली होतीच. भारतीय स्वातंत्र्याच्या त्याच यज्ञकुंडात गांधींनी आपल्या आयुष्याची समिधा टाकली आणि ते यज्ञकुंड प्रज्वलित ठेवले. ज्यामुळे ब्रिटिशविरोधी चळवळ घराघरांत पोचली. आम्ही कधीतरी हे मान्य करणार आहोत का? सामान्य कार्यकर्त्याची बापू काळजी कशी घेत, याची असंख्य उदाहरणे त्यांच्या आयुष्यात आहेत. एखाद्या पक्षाच्या वा संघटनेच्या केंद्रस्थानी इतका प्रदीर्घ काळ असणे गंमत नसते. मात्र, हे बापूंना लीलया साधले. याचे कारण, त्यांनी त्यांच्या आयुष्यात जपलेली माणसे आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पराकोटीचा त्याग आणि नि:स्पृहता होय. महादेवभाई देसाई, गांधींच्या आयुष्यातील अशीच सामान्य व्यक्ती. पण, बापूंच्या सहवासाचा परीसस्पर्श त्यांना झाला. एकदा बरेच उशिरापर्यंत काम करून महादेवभाई झोपी गेले. त्या वेळी बापू आणि महादेवभाई भारताच्या प्रवासात होते. सकाळी कुठल्यातरी स्टेशनला गाडी थांबली. गोंगाटाने महादेवभाई जागे झाले, तर स्वतः बापू चहाची केटली आणि सकाळची न्याहारी घेऊन महादेवभाईसमोर उभे होते. आपल्या माणसांची बापू अशी काळजी घेत. मोठ्या माणसांचे मोठेपण हे त्यांच्या सामान्यत्वात दडले असते, हेच खरे!
या वर्षी आम्ही महात्मा गांधींची १५० वी जयंती साजरी केली. वर्तमान परिप्रेक्ष्यात बापूंच्या विचारांचा पुन्हा खल करण्यात आपण गुंतलोय् खरे; पण आम्ही त्या मार्गावर चालण्यात किती यशस्वी झालोय्? बापूंनी आखून दिलेला मार्ग खडतर आहे. वर्तमानात मात्र बापूंच्या मार्गावर चालणे आपल्याला शक्य राहिलेले नाही. या गांधी जयंतीला एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी सेवाग्रामला होती. नागपुरात मोठमोठे फलक लागले होते आणि ते स्वाभाविक होते. माझे लक्ष गेले ते त्या फलकावरील शेवटच्या ओळीवर. ‘महात्मा के मार्गपर…’ ही ती ओळ. आम्ही स्वतःलाच प्रश्‍न विचारला पाहिजे. आम्ही खरेच महात्म्याच्या मार्गावर चालण्यास लायक आहोत? राजकारणातील चलनी नाणं म्हणून आम्ही गांधींना आजतागायत वापरत आलोय्. विरोधक असो की सत्ताधारी, गांधीजप चालायचाच. पण, असे गांधींकडे जाता येत नाही. त्यासाठी आम्ही काहीतरी विशेष आहोत, ही भावना आणि विशेषत्वाची कवचकुंडले आधी उतरवून ठेवावी लागतात. आजच्या नवमध्यमवर्गालादेखील ते शक्य होणारे नाही. १९२९ मध्ये बापू म्हणाले होते, ‘‘सुशिक्षित भारतीयांची मने दगडासारखी झाली आहेत. ही माझी फार मोठी चिंता आहे.’’ गांधींचे हे वाक्य आजही तंतोतंत लागू आहे. नव्वदच्या दशकात देशात जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. बघता बघता सगळा व्यवहार बाजारशरण झाला. आपल्या गरजा सीमित ठेवा, असे सांगणार्‍या गांधींच्या देशात उपभोक्तावाद उफाळून आला. प्रत्येक जण आपल्या पोळीवर तूप कसे पडेल, यात गर्क झाला आणि म्हणून आमच्याच देशात बापू परका झाला. पाणी, जंगल, जमीन, नैसर्गिक संसाधने यांचा सांभाळून वापर करा, हे त्यांनी आम्हाला १९२० मधेच सांगितले, मात्र आम्ही त्यांचा विचार गुंडाळून ठेवला. म्हणून आम्हाला गांधी आज परग्रहावरील एलियन वाटतात! आर्थिक, सामाजिक आणि राजकीय, सांस्कृतिक अशा सर्व स्तरात चाललेले सपाटीकरण हे गांधीविचारांचे थडगे आहे. माणूस, माणुसकी विसरण्याच्या काळात ‘महात्म्याच्या मार्गावर’ हा केवळ शब्दच्छल ठरतो. गांधींकडे जायचे असेल, तर आम्हाला आमच्या गरजांवर आधी नियंत्रण आणावे लागेल. महागड्या गाड्या, त्यातून उतू जाणारी श्रीमंती, त्याचे प्रदर्शन, बीभत्स आणि ओंगळवाणा स्वैराचार थांबवावा लागेल. तेव्हा कुठे बापूंच्या गावी जाता येते. ज्या लोकशाहीसाठी गांधी लढले ती लोकशाही आम्हीच आमच्या देशात कपाटबंद केली आहे. राज्याराज्यात मंत्री, संत्री आणि आमदारांच्या रूपात नवराजेशाहीची मुहूर्तमेढ आम्ही रोवली आहे. हुजरेगिरी करणारे चेले आणि त्यांच्या झुंडी आम्ही तयार केल्या आहेत. म्हणूनच सेवाग्रामात स्वतःचे ताट धुणारे राहुल गांधी आणि झाडू मारणारे मोदी कौतुकाचे धनी ठरतात. जेव्हा की त्यांची ही कृती अत्यंत सामान्य असते.
बापूंच्या १५० व्या जयंतीलादेखील आम्हाला बापू कळले नाहीत. आम्ही हे विसरतो, गांधी असो की डॉ. आंबेडकर, तीसुद्धा तुमच्या-माझ्यासारखी हाडामांसाची माणसे होती. त्यांच्याही हातून चुका होणे अपेक्षित होते. त्या झाल्याही. म्हणून गांधींच्या नावाने शंख करण्यापेक्षा त्यांनी भारताला दिलेले योगदान तपासले पाहिजे. गांधींच्या जयंतीलाच- ‘‘नथुराम गोडसे अमर रहे’’, ‘‘गांधी कि आत्मा भटकती रहें…’’ असे लिहिणार्‍यांना बापू कधीच कळणार नाहीत! त्यांना हेही कळत नसते की, असल्या शेलक्या वाक्यांतून हिंदुत्वदेखील बदनाम होत असते. हिंदुधर्म असली शिकवण आम्हाला कधीच देत नाही. बापूंच्या चुकांचा त्यांच्या जयंतीलाच पाढा वाचला जातो. मला, सावरकर जयंतीला त्यांना झोडणारी आणि गांधी जयंतीला शेलक्या भाषेत टीका करणारी माणसे सारख्याच विकृतीची वाटतात. दुर्दैवाने आज तुम्ही गांधी आणि सावरकर यांच्यावर एकाच वेळी प्रेम करू शकत नाही. मोदी आणि नेहरू हे एकाच वेळी आवडणे म्हणजे किती मोठे पाप! स्वतःला सुशिक्षित म्हणविणारर्‍या माणसांनी निर्माण केलेल्या या झुंडी आणि छावण्या आहेत. गांधी असल्या सगळ्या झुंडीच्या पलीकडे आहेत. विचारांच्या मर्यादेत त्याना बांधता येत नाही आणि संकुचित चौकटीत बसवतादेखील येत नाहीत. गांधींचा विचार या देशातील ग्रामीण आणि खेडूत माणसाने जपला आणि सुशिक्षित आणि स्वतःला बुद्धिजीवी समजणार्‍या वर्गाने तो संपवला.
गांधींची, स्वामी श्रद्धानंदांच्या हत्येनंतरची मते असोत, की पाकिस्तानातील हिंदूंना दिलेला सल्ला असो, पुन्हा एकदा त्या ऐतिहासिक सत्याचा उलगडा निरपेक्ष बुद्धीने आपण केला पाहिजे. कारण असल्या एखाद्या वाक्यातून सर्वव्यापी असलेलं व्यक्तिमत्त्व शोधणे म्हणजे समुद्रातून सुई शोधण्यासारखे आहे! जगातील श्रेष्ठ अशा १००० लोकांना, तुमचे आदर्श कोण? हे विचारल्यावर, त्यांपैकी ८८६ माणसे एकमुखाने गांधींचे नाव घेत असतील तर गांधी नावाचे गारूड, सर्व अभिनिवेश बाजूला ठेवून एकदा समजून घेतले पाहिजे… •••

Posted by : | on : 14 Oct 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, प्रशांत आर्वे, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, प्रशांत आर्वे, स्तंभलेखक (353 of 1224 articles)

Flood 1
अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव | गेल्या शंभर वर्षांत पडला नव्हता एवढा पाऊस पडल्याने, अर्थात आभाळ फाटल्याने केरळात जलप्रलयच झाला होता. ...

×