राष्ट्रपतींचे भाषण पक्षपाती; कॉंग्रेसचा आरोप

राष्ट्रपतींचे भाषण पक्षपाती; कॉंग्रेसचा आरोप

नवी दिल्ली, २६ जुलै – देशाचे १४ वे राष्ट्रपती…

‘त्या’ पाच जवानांची जन्मठेप रद्द

‘त्या’ पाच जवानांची जन्मठेप रद्द

►माछिल चकमक प्रकरण ►सशस्त्र दल लवादाचा निर्णय, नवी दिल्ली,…

सैन्याला पूर्ण मोकळीक द्या

सैन्याला पूर्ण मोकळीक द्या

►वीरमाता तृप्ता थापर यांचे आवाहन, नवी दिल्ली, २६ जुलै…

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

►डोकलामवर चर्चेची दर्शवली तयारी, बीजिंग, २५ जुलै – सिक्कीम…

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

►भारताने चूक सुधारावी, चीनची दर्पोक्ती, बीजिंग, २४ जुलै –…

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

झुकोव्हास्की, २३ जुलै – मिग-३५ या जातीची अत्याधुनिक लढाऊ…

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

►शेतकर्‍यांना सुखी ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील ►आमदार डॉ. बोंडेंनी मांडला…

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

►२ आठवड्याची न्यायालयीन कोठडी, सातारा, दि. २५ जुलै –…

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

►३३ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, मुंबई, २४ जुलै…

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

डॉ. प्रमोद पाठक | एक काळ असा होता की…

बशिरहाटचे गौडबंगाल

बशिरहाटचे गौडबंगाल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | एव्हाना ममतांनी मागचे…

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

जयंत कुलकर्णी | स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे आपण ज्या संघ…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:05 | सूर्यास्त: 19:01
अयनांश:
Home » आसमंत, उदयन ब्रह्म » गावी प्रकाशाची गाणी

गावी प्रकाशाची गाणी

•विनोद पर्व : उदयन ब्रह्म

diwali-panati-rangoliदिवाळीचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहतो आहे. खरंतर, मलाही दिवाळी हा सण फारच आवडतो. फारशी धार्मिक बंधनं नाहीत. उपास तापास नाही. पूजापाठ नाही. भरपूर खायचं-प्यायचं, हिंडायचं, खरेदी करायचं, गप्पा मारायच्या आणि अंगावर रजई पांघरून मस्त झोपायचं. दिवाळी हा सण मौजेचाच आहे. थोडी सैलसर दिनचर्या असलेला हा बिनधास्त सण आहे. चिंता बाजूला ठेवायच्या आणि तीन-चार दिवस बिनधास्त जगायचं, मला वाटतं हे या सणाचं सूत्र आहे.
दिवाळी म्हणजे काय? असा प्रश्‍न आम्हाला शाळेच्या परीक्षेत विचारला होता. त्याचं उत्तर, दिव्यांच्या ओळी न लिहिता आमच्या मित्रांनी फराळाच्या डब्यांच्या ओळी असं लिहून मास्तरांच्या हातानी फराळ नाही, पण मार खाल्ला  होता. खरं म्हणजे अजूनही त्याचं उत्तर मला बरोबर वाटतं. दिवाळी म्हणजे फराळ. आजकाल दिवाळीत बनणारे पदार्थ बाराही महिने मिळतात. पण तेव्हा चकल्या, शेव, करंज्या, अनारसे, लाडू, सांजोर्‍या, साटोर्‍या असले पदार्थ दिवाळीसाठी रिझर्व असत, ते तेव्हाच बनत आणि सकाळपासून खाल्ले जात.
‘अभ्यंगस्नान’ हा सुद्धा दिवाळीतील स्पेशल आयटम. तसे कार्तिक स्नान आणि सूर्योदयापूर्वी स्नान करण्याचा नेम करणारे अनेक असतात, पण सगळ्यांसाठी वन कोड ऑफ कंडक्ट हा  दिवाळीतील अभ्यंग स्नानासाठी. पूर्वी घरातील झाडून सगळ्यांना दिवाळीच्या पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी अंघोळ करावीच लागे. कोणी उठायला खळखळ केली की ‘अंथ्रुण टु अंघोळ’ असा डायरेक्ट त्याचा प्रवास होत असे. पण त्या सकाळच्या अंघोळीत मौज  होती. बाहेर अंधार, मी म्हणणारी थंडी आणि बंबातल्या पाण्याचा तो गरम गरम स्पर्श. शिवाय अंघोळ अर्धी झाली की स्नानगृहातून पुकारा करावा लागे, ‘अंघोळ अर्धी झालीए’ मग आई किंवा बहीण येऊन अंगाला उटणे लावी. पाच दिव्यांनी ओवाळले जाई आणि उरलेली अंघोळ पूर्ण होई. एकदा आमच्याकडे दिवाळीत पाहुणे आले. खरं म्हणजे ते कोर्टाच्या कामानी आले होते. वडिलांचे पक्षकार होते. गाडी चुकल्यामुळे वडिलांनी त्यांना ठेवून घेतले. सकाळी अभ्यंगस्नानासाठी वडिलांनी त्यांना उठवले. अर्ध्या अंघोळीनंतर आवाज द्या, असे वडिलांनी त्यांना सांगितल्यामुळे, अर्धी म्हणजे काय हा अंघोळीला बसल्यावर त्यांना प्रश्‍न पडला. त्यांनी बिचार्‍यांनी घंघाळातील पाणी लोट्याने मोजले आणि वीस लोटे अंगावर घेतल्यावर ओल्या अंगाने थंडीत कुडकुडत ते बाहेर आले. वडिलांना नम्रपणे हात जोडून म्हणाले, ‘‘वकीलसाहेब, चाळीस पैकी वीस लोटे अंगावर घेऊन अर्धी अंघोळ केली. आता पुढची अर्धी आत्ताच करायची की पुढची तारीख घ्यायची?’’
आमच्या एका मित्राकडे प्रत्येक दिवाळीत संपूर्ण फॅमेलीचा फोटो काढलाच जात असे. फोटोमध्ये नोकर चाकर, पाळीव पशुपक्षी, जे जे म्हणून त्यांच्या घरात असत ते सगळे हजेरी लावीत. एका फोटोत तर म्हैस आणि वगारही होती. मी जेव्हा त्यासंबंधी मित्राला विचारले तेव्हा तो म्हणाला, ‘त्या वर्षीपासून आमच्याकडे म्हशी पाळणं सुरू झालं.’
‘म्हणजे प्रत्येक फोटो हा वर्षभराचा इतिहासच सांगतो म्हणायचं’, मी कुतूहलाने विचारले-
‘‘हो, आता हा फोटो पहा. या मागल्या फोटोत अप्पा होते. इथे या फोटोत नाही. म्हणजे अप्पा गेलेत. ज्या वर्षी माणूस जातो त्याच्या पुढल्या दिवाळीत आम्ही एक खुर्ची रिकामी ठेवतो. फोटोत रिकामी खुर्ची दिसली की समजायचं, त्यांची स्वर्गातल्या दिवाळीत वर्णी लागली.’’
‘पण का रे या फोटोत खुर्चीवर बाजूच्याचा पाय आहे. बाकी कोणी नाही. म्हणजे बसमध्ये जागा अडवून बसावं तसं वाटतं.’ एक फोटो पहात मी म्हटले.
‘‘हो, त्या दिवाळीत नानूकाकाचा पाय फ्रॅक्चर होता, त्यामुळे तो होता पण फोटोत नव्हता? आता फोटोत कशामुळे नव्हता? तर पायामुळे नव्हता. म्हणून बाजूच्याने खुर्चीत स्वत:चा पाय ठेवला. बाकी खुर्ची रिकामी.’’ वर्षभराचे हिशोब, वहीखाते आणि नवीन येणार्‍या वर्षाच्या वह्या लोकदेवासमोर ठेवून लक्ष्मीपूजनाचे दिवशी त्याची पूजा करतात. इथे फोटो काढून माणसांचे हिशोब, घटनांचे जमाखर्च सगळे फोटोत बंदिस्त असतं.
पूर्वी फराळाची बोलवणी भरपूर असत. घरी सकाळी फराळ व्हायचा, दुपारी गोडाचं जेवण शिवाय संध्याकाळी फराळाला पण जायचं. पोटावर अत्याचारच असत. तो आग्रह, ते प्रेम काही औरच असे. आमच्या शेजारच्या मावशीकडे फराळाला जाण्यासाठी मात्र सगळे खळखळ करीत. याला प्रमुख कारण म्हणजे त्यांचे सासरे फराळ करताना त्यांचे बारीक लक्ष असे. तो काय खातो, कसा खातो याच त्यांचं निरीक्षण चाले आणि सोबत सूचना पण देत, ‘ती चकली नाही खाल्ली. लोणी लावा चकलीला आणि मग खा. अरे आणि तू करंजी नुस्ती गिळतो. चावून खा अस्स! थांब एवढ्यात गिळू नको. चाव अजून मी मोजतो आहे. पूर्ण बत्तीस व्हायला हवेत.’ आपण कितीदा चावतो हे सुद्धा ते मोजायचे. पाण्याच्या ग्लासला तर हात लावू देत नसत. कोणी पाणी प्यायला ग्लास उचलला की ते किंचाळत, ‘अरे अरे काय करतो. पाणी  नाही प्यायचं, राजासोबत हवी राणी तर खाण्यासोबत नको पाणी…’ अशी ते एकदम कविता ऐकवीत. एकदा मी त्यांना त्या कवितेचा अर्थ विचारला तर त्यांनी गोष्ट सांगितली की, ‘एका राजाने खाताना पाणी प्यायले आणि त्यामुळे त्याला अपचन झाले. गॅसेस झाले आणि शेवटी पार्श्‍वसंगीताला कंटाळून सोबत बसलेली राणी उठून गेली. म्हणून सोबत राणी हवी असेल तर खाण्याबरोबर पाणी पिऊ नका.’ त्यांच्याकडे फराळाला जायचं म्हणजे खाण्यापेक्षा नियमांचंच पालन जास्त करावं लागे.
आता सगळं बदललं. दिवाळी साजरी करण्याचे प्रकार पण बदललेत. टी.व्ही.आला, मोबाईल आले. शुभेच्छा देण्याचे प्रकार बदललेत. साधनं बदललीत. फराळाचे पदार्थ घरी करण्यापेक्षा विकत आणले जाऊ लागलेत. काही जुने पदार्थ पूर्ण बाद झाले आणि नवीन पदार्थ फराळाच्या डिशमध्ये आलेत. फटाक्यांचे आवाज दबलेत. फटाक्यांनाही घड्याळाचे काटे चिकटलेत. दिवाळी अंकांची संख्या रोडावली. इतकंच काय पण पाच दिवसांची बाळसेदार दिवाळी अनेकदा तीन दिवसातच आटोपायला लागली. पूर्वीची दणदणीत थंडी कमी झाली. पण त्यांची संख्या कमी झाली. तेलाची जागा मेणानी घेतली. कालपरत्वे हे होणार. परिस्थिती बदलणार. पण मनातला उत्साह कमी व्हायला नको. मागच्या पाडव्याला मित्राकडे गेलो होतो. त्या वहिनींनी मित्राला ओवाळले आणि निरांजनातील तेल सगळ्यांच्या मनगटी लावलं. मी वास घेतला तर ते अत्तर होतं. ‘वहिनी, अत्तर!’ मी आश्‍चर्याने त्यांच्याकडे पहात म्हणालो. ‘हो भाऊजी! दिवाळी हा वैभवाचा, सुख-समृद्धीचा सण. पूर्वीसारखी रोशणाई करता येत नाही, पण एक दिवस सगळ्यांना तेलाऐवजी अत्तराच्या दिव्यांनी ओवाळते आणि गतवैभवाच्या आठवणी ताज्या ठेवते.’ त्यांचं म्हणणं पटलं मला. जेवढं करता येईल तेवढं करावं, पण पूर्वीच्या आठवणी ताज्या ठेवाव्यात आणि अंधाराला गिळत प्रकाशाची गाणी या दिवाळीपासून त्या दिवाळीपर्यंत गात राहावी.

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under आसमंत, उदयन ब्रह्म. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसमंत, उदयन ब्रह्म (584 of 601 articles)


श्रीराम पत्रे मागील महिन्यात पाकिस्तान सीमेवर स्थापित दहशतवाद्यांच्या सात प्रशिक्षण तळांवर हल्ला करून, भारतीय सैनिकांनी ४० दहशतवाद्यांचा खात्मा केला. या ...