ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक » गोव्यातील काँग्रेसचे गुडघ्याला बाशिंग?

गोव्यातील काँग्रेसचे गुडघ्याला बाशिंग?

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी |

विरोधी पक्ष सरकारच्या बहुमताबद्दल शंका निर्माण झाली तर विधानसभेत सरकारविरुध्द अविश्‍वासाचा ठराव आणून तो बहुमताच्या आधारावर मंजूर करुन घेऊ शकतो व नंतर सरकार बनविण्याचा दावा करु शकतो. पण यापैकी काहीही घडले नसतांना सरकार बनविण्याचा दावा करणे म्हणजे ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’ ही लोकोक्ती सिध्द करण्यासारखेच आहे.

Goa Vidhansabha

Goa Vidhansabha

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना औषधोपचारासाठी दिल्लीतील एम्समध्ये दाखल केल्यानंतर तेथील सोळा काँग्रेस आमदारांनी राज्यपालांना भेटून सरकार बनविण्याचा दावा करणे म्हणजे उतावळ्या नवरदेवाने गुडघ्याला बाशिंग बांधण्याइतकेच हास्यास्पद आहे. राजकारण, राज्यशास्त्र आणि भारतीय राज्यघटना यातील थोडे थोडे समजणार्‍यालाही याच निष्कर्षाप्रत यावे लागेल. पण जे सामान्य नागरिकाला कळू शकते ते सर्वोच्च न्यायालयातील नाणावलेले वकील उपलब्ध असतांना काँग्रेसला कां कळू नये हे एक आश्‍चर्यच आहे.
सरकार बनविण्याचा दावा करण्याचा विरोधी पक्षाचा अधिकार आहे हे कुणालाही मान्य करावे लागेल. पण केव्हा? एक तर निवडणुकीनंतर लगेच. दुसरे म्हणजे प्रस्थापित सरकार विधानसभेत पडले तर. विरोधी पक्ष सरकारच्या बहुमताबद्दल शंका निर्माण झाली तर विधानसभेत सरकारविरुध्द अविश्‍वासाचा ठराव आणून तो बहुमताच्या आधारावर मंजूर करुन घेऊ शकतो व नंतर सरकार बनविण्याचा दावा करु शकतो. पण यापैकी काहीही घडले नसतांना सरकार बनविण्याचा दावा करणे म्हणजे ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’ ही लोकोक्ती सिध्द करण्यासारखेच आहे.
भारताचे पहिले पंतप्रधान पं. नेहरु ‘गोवा के लोग अजीब है’ असे म्हणायचे व त्याचा गोमंतकियांना अभिमानही आहे. पण पंडितजी आज हयात असते तर त्यांनी तसे म्हटले नसते. ‘गोवा के राजनेता अजीब है’ असेच त्यांनी म्हटले असते. कारण या राज्यातील राजकारणी नेते केव्हा, कोणती भूमिका घेतील, कोणत्या पक्षात किंवा पक्षासोबत जातील याबद्दल कुणीही अंदाज करु शकत नाही. या राज्याने एक दिवसाचे मुख्यमंत्रीही पाहिले आहेत. कारण इथल्या विधानसभेची सदस्यसंख्या केवळ ४०. म्हणजे बहुमतासाठी २१ सदस्य आवश्यक. त्यातील एक सभापतिपद बाजूला काढले तर सरकारकडे २० सदस्य राहतात आणि विरोधात १९ सदस्य राहतात. सत्तारुढ पक्षातील एक सदस्य विरोधी पक्षाकडे गेला की, लगेच समीकरण बदलते. म्हणजे उन्नीस बीसचा हा मामला आहे. त्यामुळे पर्रीकर सरकार गेल्या सात वर्षांपासून तेथे टिकले हा गोव्यासाठी तरी एक विक्रमच ठरतो.
खरे तर विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला ते आज जो दावा करतात, तो करण्याची घटनात्मक संधी होती. कारण निवडणुकीत सत्तारुढ पक्षाचा म्हणजे भाजपाचा कमी जागा मिळाल्यामुळे पराभव झाला होता. कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेले नव्हते. त्यामुळे निवडून आलेला सर्वात मोठा पक्ष या नात्याने काँग्रेसला सरकार बनविण्याचा दावा करता आला असता आणि राज्यपालांनाही तो फेटाळणे कठिण झाले असते. काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित करुन सभागृहात बहुमत सिध्द करण्याची संधी किमान द्यावीच लागली असती. पण दावा करायला नेत्याची निवड होणे आवश्यक होते. ती काँग्रेस करु शकली नाही. दरम्यान भाजपाने बहुमत जुळविले आणि विधानसभेत ते सिध्दही केले. त्या स्थितीत आजच्या क्षणी कोणताही बदल झालेला नाही. मग काँग्रेस कोणत्या आधारावर सरकार बनविण्याचा दावा करते हे राज्यपालांनाही कळणे कठिण आहे.
हे खरे आहे की, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गंभीर आजाराने ग्रस्त आहेत व एम्समध्ये दाखल झाले आहेत. पण त्यांचे होशहवास कायम आहेत. ते आजारी अवस्थेतूनही सहकार्‍यांच्या मदतीने सरकार चालविण्यास सक्षम आहेत. ते जोपर्यंत आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत वा त्यांच्या पाठीशी बहुमत नाही हे सिध्द होत नाही तोपर्यंत काँग्रेसच्या दाव्याला कोणताही अर्थ राहत नाही. हेही खरे आहे की, फ्रान्सिस डीसूजा व पांडूरंग मडकईकर हे दोन मंत्रीही आजारी आहेत. त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही. अशा स्थितीत सरकारला खिंडीत गाठण्यासाठी अविश्‍वास प्रस्ताव आणणे हा काँग्रेससाठी अतिशय सोपा मार्ग आहे. मुख्यमंत्र्यांसहीत तीन मंत्री सभागृहात येऊ शकले नाहीत तर सभागृहाची संख्या ३७ होते व सरकार पाडण्यासाठी केवळ १९ सदस्यांचा पाठिंबा पुरेसा ठरु शकतो. पण असे दिसते की, तेवढे संख्याबळही काँग्रेस जुळवू शकत नाही. अन्यथा त्यांनी सरकार बनविण्याचा दावा करुन तोंड लपविण्याचा प्रयत्न केलाच नसता.
खरे तर मुख्यमंत्र्यासहीत तीन मंत्र्यांच्या आजारपणामुळे गोवा अतिशय कठिण परिस्थितीतून जात आहे. तरी पर्रीकर आपल्या प्रकृतीची तमा न बाळगता गोमंतकियांच्या हितासाठी कार्य करीतच आहेत. आज गोव्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्‍न कोणता असेल तर तो खाण अवलंबितांचा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून तो निर्माण झाला असला तरी त्या न्यायालयाचा मान राखून तो सोडविणे आवश्यक आहे व त्याच भावनेतून पर्रीकर आजारी अवस्थेतही प्रयत्नशील आहेत. त्या दृष्टीने त्यांनी एम्समध्ये उपचार घेणे गोमंतकियांच्याच फायद्याचे आहे. पण त्या प्रश्‍नाची चिंता न करता (कारण काँग्रेस नेत्यांपैकी कुणाचीही तो प्रश्‍न सोडविण्याची कुवतच नाही) काँग्रेस नेत्यांनी राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा चालविलेला प्रयत्न गोमंतकियांना मुळीच आवडणारा नाही. या संदर्भात महाराष्ट्रवादी गोमंक पक्ष, विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील गोवा फॉरवर्ड आणि तीन अपक्ष आमदार अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. कारण त्यांनी काँग्रेसचा कारभार आणि वृत्ती यांचा पुरेपूर अनुभव घेतला आहे. त्यामुळेच पर्रीकरांच्या आजारपणाचा फायदा घेऊन राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न गोमंतकियांच्या हिताचा नाही आणि ते तो सफल होऊ देणार नाहीत याबद्दल खात्री बाळगायला हरकत नाही.
तरीही जर काँग्रेसचा डाव यशस्वी झालाच तर तिथे प्रथम मुख्यमंत्रिपदासाठी, नंतर महत्वाची खाती मिळविण्यासाठी भांडणे होणारच नाहीत याची कुणीही हमी देऊ शकत नाही. पण तो दिवस गोव्यासाठी दुर्दैवी ठरेल हे निश्‍चित. •••

Posted by : | on : 23 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक (335 of 1152 articles)

Raghuram Rajan 2
अर्थपूर्ण : यमाजी मालकर | बँकांचे एनपीए केव्हापासून आणि का वाढत आहेत, याविषयी रघुराम राजन यांनी केलेले भाष्य हे पक्ष ...

×