कर्नल प्रसाद पुरोहित यांना सशर्त जामीन

कर्नल प्रसाद पुरोहित यांना सशर्त जामीन

►मालेगाव बॉम्बस्फोट, नवी दिल्ली, २१ ऑगस्ट – २००८ च्या…

उडीद, मुगाच्या आयातीवर निर्बंध!

उडीद, मुगाच्या आयातीवर निर्बंध!

►मोदी सरकारचा शेतकर्‍यांना दिलासा, नवी दिल्ली, २१ ऑगस्ट –…

भाजपाच्या ३५०+ रणनीतीला बळकटी

भाजपाच्या ३५०+ रणनीतीला बळकटी

नवी दिल्ली, २१ ऑगस्ट – २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभा…

हसिनांच्या हत्येचा प्रयत्न; १० दहशतवाद्यांना मृत्युदंड

हसिनांच्या हत्येचा प्रयत्न; १० दहशतवाद्यांना मृत्युदंड

ढाका, २० ऑगस्ट – बांगलादेशच्या पंतप्रधान बेगम शेख हसिना…

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

►•वैज्ञानिकांच्या अभ्यासातील निष्कर्ष, मेलबर्न, १७ ऑगस्ट – आपल्या भूतलावर…

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

►स्वातंत्र्यदिनी पाकच्या उलट्या बोंबा, इस्लामाबाद, १४ ऑगस्ट – काश्मीरसह…

मीरा भाईंदर मनपा भाजपाच्या ताब्यात

मीरा भाईंदर मनपा भाजपाच्या ताब्यात

मुंबई, २१ ऑगस्ट – काट्याची टक्कर आणि वर्चस्वाची लढाई…

राज्यात पावसाची पुन्हा हजेरी

राज्यात पावसाची पुन्हा हजेरी

►•खरीप पिकांच्या वाढीस फायदा ►धरणक्षेत्रातही संततधार, पुणे, २० ऑगस्ट…

२७ ऑगस्टला राणेंचा भाजपात प्रवेश

२७ ऑगस्टला राणेंचा भाजपात प्रवेश

मुंबई, १९ ऑगस्ट – गेल्या काही काळापासून दुर्लक्षित असलेले…

भारत – चीन खडाजंगी

भारत – चीन खडाजंगी

डॉ. प्रमोद पाठक | आर्थिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक स्तरावर…

आक्रमक चीन आणि धीरोदात्त भारत

आक्रमक चीन आणि धीरोदात्त भारत

संजय वैद्य | चीन वारंवार भारताला युद्धाच्या धमक्या देत…

स्वातंत्र्याचा अर्थ

स्वातंत्र्याचा अर्थ

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | ही मानसिकताच रोगट…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:46
अयनांश:
Home » आसमंत, रमेश पतंगे, स्तंभलेखक » घटनाकार आणि समान नागरी कायदा

घटनाकार आणि समान नागरी कायदा

रमेश पतंगे |

uniform-civil-codeलॉ कमिशनने ७ ऑक्टोबर रोजी १६ बिंदूंची एक प्रश्‍नावली आपल्या वेबसाईटवर टाकली आणि मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक या विषयावर लोकांची मते मागितली. सर्वोच्च न्यायालयात तीनदा तलाक या विषयावर केसेस चालू आहेत. या केसेसमध्ये राज्यघटनेने स्त्रियांना दिलेल्या समानतेचा अधिकार, मुस्लिम व्यक्तिगत कायदा, स्त्री स्वातंत्र्य असे काही मूलभूत विषय गुंतलेले आहेत, यावर देशात वेगवेगळ्या माध्यमातून भरपूर चर्चा चालू आहेत. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने, मुस्लिम पर्सनल लॉमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका घेतली आहे. या संस्थेचे जनरल सेक्रेटरी वही रेहमानी आणि जमात-ए-उलेमा-हिंदचे मौलाना अर्शद मदानी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. लॉ बोर्डाच्या माध्यमातून केंद्र शासन आमच्या व्यक्तिगत कायद्यात हस्तक्षेप करू पाहत आहे आणि ते सहन केले जाणार नाही, अशी त्यांनी भूमिका मांडली आहे.
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या भूमिका नाकारताना भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या प्रमुख झाकिया सोमन म्हणतात, ‘मुख्य प्रश्‍न लिंगभेदविरहित न्यायाचा आहे. आम्ही भारतीय राज्यघटनेने दिलेल्या समान अधिकारासंबंधी बोलत आहोत. हे अधिकार आम्हाला (मुस्लिम महिलांना) स्वातंत्र्यानंतर नाकारण्यात आले आहेत. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड पुरुषकेंद्री आहे. त्यामुळे त्यांचा विरोध स्वाभाविक समजला पाहिजे. नेहमीप्रमाणे या प्रश्‍नावर राजकीय चर्चादेखील चालू आहेत. राजकीय चर्चा मतपेटीच्या राजकारणाशी निगडित असते. त्यामुळे त्यांची गंभीर दखल घेण्याचे काही कारण दिसत नाही. मूलभूत प्रश्‍न वेगळे असतात. स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांचे हक्क, न्यायाधारित समाजरचना, धर्म आणि व्यक्तिगत कायदे, कायद्याच्या संदर्भात धर्माचे क्षेत्र आणि राज्याचे क्षेत्र, असे मूलभूत विषय या प्रश्‍नाच्या संदर्भात येतात आणि त्यावर अतिशय गंभीर चर्चा अपेक्षित असते. गंभीर चर्चा झाली, तरच समान नागरी कायद्याचा विषय योग्य रीतीने पुढे जाईल. सुदैवाने अशी गंभीर चर्चा संविधान सभेत झालेली आहे. २३ नोव्हेंबर, १९४८ रोजी मसुदा घटनेचे ३५ वे कलम (जे आज कलम ४४ आहे) चर्चेसाठी घेण्यात आले. त्यावर प्रदीर्घ चर्चा झालेली आहे. ती वाचली असता काही गोष्टी लक्षात येतात. घटना समितीतील मुस्लिम सदस्यांनी समान नागरी कायद्याला कठोर विरोध केला, तर घटना समितीतील हिंदू सभासदांनी समान नागरी कायद्याचे जोरदार समर्थन केले. या चर्चेच्या दरम्यान घटना समितीत सांप्रदायिक विभाजन झाल्याचे लक्षात आले. घटना समितीतील चर्चा सांप्रदायिक अंगाने झाली नाही, तर कायदा, रूढी, परंपरा, व्यक्तीच्या कायद्यामागे असलेले धर्माचे अधिष्ठान, समान नागरी कायदा आणि एक राष्ट्रीयत्व सार्वभौमत्वाच्या मर्यादा अशा गंभीर विषयांना धरून झालेली आहे. मोहम्मद इस्माईल, नाशिद अहमद, महबूब अली बेग, पोकरसाहेब, हुसेन इमाम या मुस्लिम सदस्यांनी घटनेच्या ३५व्या कलमाला (आताचे कलम ४४) विरोध केला आणि काही दुरुस्त्या सुचविल्या. एखाद्या समुदायाला आपल्या व्यक्तिगत कायद्यात बदल आणि हस्तक्षेप नको असेल, तर तसे त्याला स्वातंत्र्य दिले पाहिजे. समुदायाच्या पूर्व अनुमतीशिवाय त्यांच्या व्यक्तिगत कायद्यात बदल केला जाऊ नये, अशा अर्थाच्या या दुरुस्त्या होत्या. सदस्यांनी त्यासाठी वेगवेगळ्या देशांची उदाहरणे दिली. इंग्रजांनी मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात ढवळाढवळ केली नाही. ५०० वर्षे मुसलमानांनी केली नाही, असे दाखले देण्यात आले. मुस्लिम कायदा ईश्‍वरीय आहे म्हणून तो अपरिवर्तनीय आहे, अशी भूमिका मांडण्यात आली. या भूमिकेचा प्रतिवाद एस. सी. मुजुमदार, एम. ए. अय्यंगार, के. एम. मुन्सी, ए. के. अय्यर या सदस्यांनी केला. त्याचा सारांश असा होता की, व्यक्तिगत कायद्यापासून धर्माला वेगळे केले पाहिजे, लिंगभेदावर आधारित कायदे राज्यघटनेच्या विरुद्ध जातात, मुस्लिमांनी वेगळेपणाची भावना सोडली पाहिजे. धर्माचे क्षेत्र धार्मिक विषयापुरते मर्यादित असावे आणि ऐहिक जीवनाचे क्षेत्र राज्यांनी निर्धारित केले पाहिजे, एक राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होण्यासाठी सर्वांची नागरी संहिता एकत्र असली पाहिजे. ए. के. अय्यर यांनी कायद्याच्या मूलभूत तत्त्वात नागरी संहिता किती व्यापक आहे, याचे फार थोडक्यात वर्णन केले.
या चर्चेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वात शेवटी उत्तर दिले. या उत्तरात त्यांचे कायद्याचे सखोल ज्ञान, दूरदृष्टी, राष्ट्रबांधणी आणि राज्यशक्तीचे आकलन यांचे फार सुंदर दर्शन होते. ते जे म्हणाले, त्याचा सारांश असा, राज्यांचे सार्वभौमत्व अमर्याद असू शकत नाही. मुस्लिम समुदायाला बंड करण्यास प्रवृत्त करावे, अशा प्रकारे राज्य सार्वभौमत्वाचा वापर करता येणार नाही. जे शासन असे करण्याचा प्रयत्न करील त्याला वेडपट शासन म्हटले पाहिजे. ते पुढे असे म्हणाले की, मुस्लिम सभासदांनी कलम ३५चे नको ते अर्थ काढू नयेत. जर समान नागरी कायदा झाला, तर तो त्यांनाच लागू होईल, जे तो लागू करून घेण्यास स्वखुशीने तयार होतील.
डॉ. बाबासाहेबांनी असे प्रतिपादन केले की, बहुतांश क्षेत्रात समान नागरी कायदा आहेच. आपले क्रिमिनल कोड, पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड, लॉ ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, निगोशिएबल इन्स्ट्रूमेण्ट ऍक्ट देशात सर्वत्र सारखेपणाने लागू होतात. या क्षेत्रात शरियत कायद्याचे पालन होत नाही. तो कायदा फक्त विवाह आणि वारसा हक्क या क्षेत्रापुरता मर्यादित राहिला आहे. हा अतिशय लहानसा भाग आहे आणि घटनेचे ३५ वे कलम या क्षेत्रात राज्याने हस्तक्षेप करावा, असे सुचवते. बाबासाहेबांनी आणखी एक गोष्ट सांगितली की, १९३७ पर्यंत देशातील अनेक भागांत वारसा हक्क आणि इतर अनेक बाबतींत मुसलमानांना हिंदू कायदा लागू होत होता. हे कलम फक्त एवढंच सांगते की, राज्याने समान नागरी कायदा करावा. तो नागरिकांवर लादावा असे कलम सांगत नाही. डॉ. आंबेडकरांच्या या खुलाशानंतर कलम ३५वर सुचविलेल्या सर्व दुरुस्त्या फेटाळण्यात आल्या आणि कलम ३५ नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र एकरूप नागरी संहिता लाभावी, यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. हे समाविष्ट करण्यात आले. जे आज राज्यघटनेचे ४४वेे कलम आहे. हे कलम घटनेच्या निदेशक तत्त्वाच्या भागात आहे, त्यामुळे त्याची अंमलबजावणी करणे राज्यावर बंधनकारक नाही. एका अर्थाने हे कलम मृत कलम म्हणूनच संबोधले पाहिजे.

शेअर करा

Posted by on Nov 13 2016. Filed under आसमंत, रमेश पतंगे, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसमंत, रमेश पतंगे, स्तंभलेखक (875 of 943 articles)


टेहळणी : - डॉ.सच्चिदानंद शेवडे | काही दिवसांपूर्वी, पुणे येथील लेखक आणि प्रकाशक असलेले आमचे मित्र राजेंद्र खेर यांच्यासोबत वार्तालाप ...