ads
ads
जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – स्वयंपाकाच्या (एलपीजी) गॅसच्या देशातील…

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक…

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

•एकाच वेळी १२ कोटी खात्यात होणार जमा, नवी दिल्ली,…

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

•जैश-ए-मोहम्मदचा स्पष्ट उल्लेख •भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय, संयुक्त राष्ट्रसंघ, २२…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

•रक्कम ‘नमामि गंगे’ला समर्पित, सेऊल, २२ फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

मुंबई, २२ फेब्रुवारी – महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक » चोर मचाये शोर षडयंत्र!

चोर मचाये शोर षडयंत्र!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने |

आपण पुन्हा सत्तेवर आल्यानंतर देशहितासाठी काय करणार आहोत, याविषयी मोदीविरोधक एक शब्द बोलायला तयार नाहीत. कडबोळ्या सरकारचा सरदार कोण असेल? माहीत नाही! मोदी हटाव यावर मात्र सर्व विरोधकांचे एकमत आहे! आधी मोदींना तर हटवू, मलिदा कसा वाटप करायचा ते नंतर ठरवू! भारताची विकास प्रक्रिया, समाजस्वास्थ्य, कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्थ करुन त्याआधारे मोदी सरकार उलथवून टाकण्यासाठी कार्यरत असलेल्या षडयंत्रकारी गटांचे धागेदोरे गुप्तचर संस्थांच्या हाती लागले आहेत. त्यांना देशातून आणि देशाबाहेरुन अर्थपुरवठा होत आहे. काँग्रेससह अनेक विरोधकांसाठी २०१९ ची लोकसभा निवडणूक करो या मरो ठरणार आहे.

(पूर्वार्ध)

Sonia Rahul

Sonia Rahul

पेट्रोल-डीझलचे दर शंभरी पार करतील! एका अमेरिकी डॉलरसाठी शंभरहून अधिक रुपये मोजावे लागतील! भारतीय शेअर बाजार न भूतो, न भविष्यति गडगडेल! ही कुण्या ज्योतिषाने केलेली भविष्यवाणी नाही किंवा कुण्या ख्यातकीर्त आंतरराष्ट्रीय अर्थतज्ञाने वर्तविलेला अंदाज नाही, तर मोदी सरकारविरुध्द गेल्या चार वर्षात जी वेगवेगळी षडयंत्रं कार्यान्वित करण्यात आली आहेत, त्यातल्याच एका हळुहळु पुढे सरकत असलेल्या बीग बजेट षडयंत्राचे अंतीम लक्ष्य आहे! काँग्रेस आणि षडयंत्र यांचं नातं फार जुनं आहे. जवाहरलालपासून सोनियालालपर्यंत! काँग्रेसी षडयंत्रांचे फटके नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापासून नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत बहुतेक राष्ट्रभक्तांना सहन करावे लागले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना बारा वर्षात किमान बारा षडयंत्रांना नरेंद्र मोदी सामोरे गेले आणि प्रत्येकातून तावून सुलाखून निघाले! काँग्रेसकडून नरेंद्र मोदी यांच्यावर अपशब्दांची जेवढी लाखोली वाहिली गेली, त्याच्या किती तरी पट अधिक कौतुकाच्या शब्दसुमनांचा वर्षाव आज त्यांच्यावर सगळीकडून होत आहे. काँग्रेसला हे पचनी पडणे शक्यच नाही! म्हणून जनतेच्या न्यायालयात, नजिकच्या भविष्यकाळात आपण मोदी सरकारचा पराभव करु शकत नाही, याची खात्री पटलेले देशांतर्गत आणि देशाबाहेरील मोदीविरोधक मतदाररुपी न्यायाधीशाला संभ्रमित करायचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पेट्रोल-डॉलर-शेअर षडयंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यासाठी तगडी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ब्युरोक्रॅट्स, राज्यकारभाराचा दांडगा अनुभव असलेले, अजूनही प्रशासनावर, शेअर मार्केटवर पकड असलेली मंडळी कामाला लागली आहेत. देशाची अर्थव्यवस्था बरबाद करुन, जनक्षोभ उसळवून मोदी सरकारला देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करायचे प्रयत्न सुरु आहेत! या षडयंत्राचे अनेक उपगट वेगवेगळ्या कामगिरींवर तैनात करण्यात आले आहेत. वर्षअखेरपर्यंत जातीय विद्वेषाचा आगडोंब पेटविण्याची तयारी सुरु आहे. राफेल खरेदीत भ्रष्टाचार झाला की नाही, याच्याशी त्यांना काही देणे घेणे नाही, तर राफेल विमानाची उड्डाण क्षमता, क्षेपणास्त्र वाहून न्यायची क्षमता वगैरे गोपनीय माहिती त्यांना कुणासाठी तरी हवी आहे. त्यासाठी चौकशी समिती नेमण्याची मागणी करण्यात येत आहे. अशी गोपनीय माहिती सार्वजनिक केली, तर ती शत्रूराष्ट्रांपर्यत पोचू शकते, याची कल्पना असूनही विरोधक तसा आग्रह धरत आहेत. किंबहुना त्यासाठीच सारी धडपड सुरु असल्याचा वास येतोय! निष्कलंक मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप केला की सरकार चिडून राफेल करारातील संवेदनशील माहिती उघड करील, म्हणून खोटे आरोप केले जात आहेत!
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कुठलेही कामकाज होऊ दिले जाणार नाही. वेगवेगळ्या घटकांना हाताशी धरुन देशभर आंदोलनांचा भडका उडवून दिला जाणार आहे. हल्ली आंदोलन कुठलेही असले, तरी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस, जाळपोळ फार मोठ्या प्रमाणावर केली जात आहे, कारण त्याची जबाबदारी आता जिहादी, नक्षली मंडळींवर, भाडोत्री राजकीय गुंड टोळ्यांवर सोपविली जात आहे. नोटाबदली, रोकड आर्थिक व्यवहारावर निर्बंध आल्यामुळे या मंडळींच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत. महाराष्ट्र पोलिस शहरी नक्षल्यांच्या दारात जाऊन उभे राहिले आहेत. त्यामुळे कुठल्याही आंदोलनासाठी तोडफोड करणार्‍या कार्यकर्त्यांची कुमक कमी पडण्याची अजिबात शक्यता नाही. तात्पुरती थांबवलेली आरक्षण आंदोलनं, आरक्षणविरोधी आंदोलनं, कर्जमाफी-नुकसान भरपाई आंदोलनं, पगारवाढ आंदोलनं, विद्यार्थी आंदोलनं, पेट्रोल-डीझल दरवाढ आंदोलनं पुन्हा जोरकसपणे उचल खाणार आहेत. भीम-मीम प्रयोग सादर केले जातील. वेमुलासारखी बनावट दलित अत्याचार प्रकरणं उभी करुन आंबेडकर अनुयायांना भडकविले जाईल. दादरी-पादरी पुनरावृत्ती शक्य आहे! मुस्लीम महिलांसाठी मोदी सरकारने जो अध्यादेश काढला आहे, त्याविरुध्द मुल्ला-मौलवी प्रायोजित आंदोलनाद्वारे मुसलमानांसाठी शरिया न्यायालयांची मागणी पुढे येणार आहे. मोदी सरकारची कोंडी करण्यासाठी भंपक सेक्युलर हिंदू टपलेलेच आहेत. धर्मोपदेशकांनी जोगिणींवर केलेल्या बलात्काराच्या प्रकरणात अडचणीत आलेली मिशनरीज मंडळी भारतात-मोदींच्या राजवटीत अल्पसंख्यक सुरक्षित नसल्याची हाकाटी सार्‍या जगभर पिटतील. व्हॅटिकन, संयुक्त राष्ट्रसंघ यांच्याकडून तसे निषेध अहवाल लिहून घेऊन ते भारत सरकारला पाठवतील, जागतिक व्यासपीठांवर मांडतील आणि भारतातले मोदी विरोधक आनंदाने टाळ्या पिटतील! भारतातील जिहादी-नक्षली मंडळींनी पुरविलेल्या माहितीच्या आधारावर पाकिस्तान धार्जिन्या अधिकार्‍याने लिहिलेल्या, भारतात होत असलेल्या मानवाधिकाराच्या तथाकथित उल्लंघनाचा अहवाल नुकताच आला होता, तेव्हा कठुआ प्रकरणाचे भांडवल करत मोदीविरोधक सरकारवर कसे लांडग्यांसारखे तुटून पडले होते!
राममंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल कसाही आला किंवा त्यासाठी मोदी सरकारने अध्यादेश काढला, तरी त्याविरुध्द हिंसक आंदोलन करायची तयारी सुरु आहे. कपिल सिब्बल यांच्या मागणीप्रमाणे न्यायालयाचा निकाल लांबणीवर पडला आणि मोदी सरकारने अध्यादेशही नाही काढला, तरी राममंदिराच्या बहाण्याने योगी-मोदी सरकारचा धिक्कार करण्यासाठी असंतुष्ट हिंदू नेत्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागातून विशाल मोर्चा अयोध्येत धडकविण्याची योजना तयार आहे. अशा वेळी कायदा आणि सुव्यवस्था सांभाळताना योगी सरकारकडून काही आगळीक घडलीच, तर हिंदुंसाठी नक्राश्रू ढाळत अखिलेश, केजरीवाल, माया, ममता, राहुल गांधी धावत अयोध्येला पोहचतील! आम्हीच खरे हिंदुहितैषी म्हणत, योगी-मोदी यांच्यावर टिकेची झोड उठवत ठाकरे बंधुही तिकडे धावतील! वामपंथी, शरद यादव, शरद पवार यांच्यासह तमाम सेक्युलर मंडळी गालातल्या गालात हसत एकमेकांना टाळ्या देतील!
सामान्य माणूस त्याच्या दररोजच्या जीवनावश्यक गरजा कशा भागतील, याच्या पलिकडे विचार करत नसतो. मध्यमवर्ग मंडळी खाऊनपिऊन मजेत असतात, पण त्यांच्या अवांतर खर्चाला कात्री लावायची वेळ येते, तेव्हा ते कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाहीत. पेट्रोलवर खर्च वाढल्यामुळे पिझ्झा-कॅडबरी-बर्गर पूर्वीसारखं आणता येत नाही, म्हणून ते चिडतात! खरं म्हणजे पेट्रोल-डीझल महागल्यामुळे आमच्या धंद्यावर विपरित परिणाम होत आहे, अशी पहिली ओरड गॅरेजवाल्यांकडून यायला पाहिजे? ओरड कधी करायची आणि गप्प कधी बसायचे, याचे मीडियाचे सोयीस्कर वेळापत्रक ठरलेले असते. पेट्रोल-डीझल दराबाबत होत असलेली ओरड आपमतलबी आहे आणि ते ही करदात्यांचा प्रत्येक पैसा मोदी सरकारकडून विकास कामावर, देशाच्या संरक्षण सिध्दतेवर खर्च होत असताना!
आपण पुन्हा सत्तेवर आल्यानंतर देशहितासाठी काय करणार आहोत, याविषयी मोदीविरोधक एक शब्द बोलायला तयार नाहीत. कडबोळ्या सरकारचा सरदार कोण असेल? माहीत नाही! मोदी हटाव यावर मात्र सर्व विरोधकांचे एकमत आहे! आधी मोदींना तर हटवू, मलिदा कसा वाटप करायचा ते नंतर ठरवू! भारताची विकास प्रक्रिया, समाजस्वास्थ्य, कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्थ करुन त्याआधारे मोदी सरकार उलथवून टाकण्यासाठी कार्यरत असलेल्या षडयंत्रकारी गटांचे धागेदोरे गुप्तचर संस्थांच्या हाती लागले आहेत. त्यांना देशातून आणि देशाबाहेरुन अर्थपुरवठा होत आहे.
काँग्रेससह अनेक विरोधकांसाठी २०१९ ची लोकसभा निवडणूक करो या मरो ठरणार आहे. आता सत्ता नाही मिळाली, तर पुढील पाच वर्षे कार्यकर्ते, हितचिंतक सांभाळणे अवघड जाईल आणि पक्षाचं अस्तित्वच संपुष्टात येईल, अशी भीती विरोधकांना सतावत आहे. यासाठी ओढूनताणून महाठगबंधन तयार करायचा प्रयत्न सुरु आहे. एवढे करुनही सत्ता मिळेलच याची शाश्‍वती दिसत नाही, म्हणून मोदी सरकारची जेवढी बदनामी करता येईल, तेवढी करायची चढाओढ लागली आहे!
भारतीय षडयंत्रकारींचा एक गट युरोप-अमेरिकेतील खासदार-सिनेटरांच्या संपर्कात आहे. नरेंद्र मोदी यांना अमेरिकेने पारपत्र देऊ नये म्हणून यांनी यापूर्वी पाठवलेला खलिता आठवत असेलच! युरोप-अमेरिकेतील ती मंडळी गैरसरकारी भेटीवर भारतात येतील, मोदीविरोधकांकडून तगडा पाहुनचार झोडतील आणि परत गेल्यावर पुढील कित्येक दिवस आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांमधून भारतविरोधी लेख लिहितील, मीडियाला मुलाखती देतील! भारतात-मोदी राजवटीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, महिलांवर अत्याचार होत आहेत, अल्पसंख्यक म्हणजे मुस्लीम आणि ख्रिश्‍चन भयभीत झाले आहेत, राष्ट्रवादी शक्तींचा, म्हणजे हिंदुंचा धार्मिक उन्माद वाढला आहे वगैरे! याचा संदर्भ देत विरोधक मोदी सरकारला संसदेत आणि संसदेबाहेर बदनाम करायचा प्रयत्न करतील.
रुपयाचा घसरणारा दर आणि तदनुसंगिक बाबी अर्थमंत्रालयाच्या अखत्यारीत येतात, पण गुप्तचर संस्थांकडून प्राप्त झालेल्या अहवालानंतर पंतप्रधान मोदी स्वतः त्यावर बारिक लक्ष ठेऊन आहेत. देशविरोधी षडयंत्र विफल करण्यासाठी लवकरच काही निर्णय घेतले जातील, काही वरिष्ठ संशयास्पद अधिकार्‍यांच्या बदल्या होतील. संपुआ सरकारने उपकृत केलेले विविध मंत्रालयातील काही वजनदार ब्युरोक्रॅट्स आपल्या उपकारकर्त्यांशी संधान बांधून असल्याचा संशय आहे. दुसर्‍या दिवशी न्यायालयात सादर करावयाचे आरोपपत्र आदल्या दिवशी संबंधीतांच्या घरी पोहचल्याचे प्रकार घडले आहेत. आपल्याच कुकर्माने अडचणीत आलेल्या एका अर्थतज्ञाच्या जवळचा अधिकारी गट रुपयाच्या अवमूल्यनावर काम करत असल्याचा संशय आहे. असं म्हणतात की शेअर बाजार कोसळवण्याची सारी जबाबदारी या अर्थतज्ञाने स्वतःकडे घेतली आहे. त्यासाठी काही हजार कोटींची तरतूद त्यांनी स्वतः केल्याचे बोलले जात आहे. यांना पंतप्रधानपदाची हमी दिली गेली आहे म्हणे!
नरेंद्र मोदींनी सत्तासूत्रं हाती घेतली, पण बहुतेक अधिकारी वर्ग तोच ठेवला! त्यातलेच काही संपुआशी जवळीक असणारे अधिकारी आता अडचणीचे ठरत आहेत. संपुआच्या काळात एक्सचेंज ट्रेडेड करन्सी फ्युचरची मजबूत व्यवस्था करण्यात आली होती, जी आजही कार्यरत आहे! या सिक्रेट गँगचे ल्युटियन मीडियाशी मधूर संबंध आहेत! अर्थव्यवस्थेचे नकारात्मक चित्र रंगविणे आणि शेअर बाजारावर, रुपयाच्या विनिमय दरावर विपरित परिणाम होईल अशा अफवा पसरविणे ही कामं एक गट करत आहे. नॉर्थ ब्लॉक दिल्ली आणि मिंट रोड मुंबई या दोन ठिकाणांहून षडयंत्रकारी सूत्रसंचलन होत आहे.
पेट्रोल-डॉलर-शेअर षडयंत्र कसे काम करणार आहे, ते बघा! आधी सोन्याचा पर्याप्त संग्रह केलेला असेल. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरुन एक इशारा मिळताच दररोज धडाधड शेअर्स विक्रीला काढले जातील. मीडियाद्वारा गुंतवणुकदारांमध्ये घबराहट निर्माण केली जाईल आणि इतर गुंतवणुकदारही शेअर विक्रीचा मारा करतील. शेअर बाजार दररोज गडगडत जाईल. शेअर बाजार अस्थिर झाला की सोन्याची मागणी भरमसाठ वाढेल. सोन्याचे भाव चढतील. अशा वेळी शेअर बाजार कोसळवण्यासाठी शेअर्स विक्री करणारे त्यांच्याकडील सोने विक्रीला काढतील. शेअर्समध्ये झालेले त्यांचे नुकसान भरुन निघेल, पण सामान्य गुंतवणुकदार बुडतील. अशा अस्थिर परिस्थितीत विदेशी गुंतवणुकदार शेअर बाजारातले भांडवल काढून घेतील. त्यामुळे डॉलरची मागणी प्रचंड वाढेल. भारतीय विदेशी मुद्रा भांडारावर सर्वाधिक ताण पडतो, तो सोने आणि इंधन तेलाच्या आयातीचा! हा ताण वाढला की साहजिकच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत जाणार आणि इंधन तेलाच्या किमतीही गगनाला भिडणार! विकास प्रकल्प रेंगाळणार आणि त्याचा खर्च वाढत जाणार! जागतिक पातळीवर अर्थविश्‍लेषण करणार्‍या संस्था भारताची अर्थक्रमवारी घटवणार आणि त्याचा परिणाम म्हणून भारताच्या पायाभूत प्रकल्पांकडे येणारी विदेशी गुंतवणूक मंदावणार! भारतीय अर्थव्यवस्था दोलायमान झालेली असेल, सामाजिक सौहार्द बिघडवलेले असेल, जिहादी-नक्षलवादी कारवाया वाढलेल्या असतील, कायदा आणि सुव्यवस्था हाताबाहेर गेलेली असेल, भारताच्या चीन-पाकिस्तान सीमांवर चकमकी वाढलेल्या असतील! या पार्श्‍वभूमीवर २०१९ च्या लोकसभा निवडणुका होतील आणि कांदे-बटाटे महागले म्हणून अटल सरकारचा पराभव करणारे भारतीय मतदार, पेट्रोल महागले म्हणून मोदी सरकारचाही पराभव करतील, अशी दिवास्वप्नं षडयंत्रकारी विरोधक रंगवत आहेत!
पंतप्रधान आणि वित्तमंत्री अर्थतज्ञ असलेल्या संपुआ सरकारच्या काळात आणीबाणीच्या प्रसंगी चार-पाच दिवस पुरेल एवढाच राखीव इंधन साठा उपलब्ध होता! आज मोदी सरकारच्या काळात तो पंचेवीस दिवस पुरेल इतका झाला आहे, महत्प्रयासाने जमवला आहे! सुवर्णभांडार, विदेशी मुद्राभांडारही असेच समृध्द करुन ठेवले आहेत. हे साठे शत्रूराष्ट्रांच्या डोळ्यात खूपत आहेत आणि म्हणून ते भारतातील मोदीविरोधकांमार्फत सामान्य जनतेला भडकावत आहेत. युध्दजन्य परिस्थितीत असे राखीव साठे अनमोल असतात. म्हणून ते चैनीखातर, मतदारांना खूष करण्यासाठी उधळायचे नसतात! उलट सर्वांनी काटकसर करुन त्यात भरच घालायची असते, ही जाणीव मोदी सरकारला आहे. हे साठे मोदी सरकारने खुले केले, तर लोटाभर पेट्रोल मी रोज सकाळी वापरु शकेन!
आपल्या वाहनांमधून निघणारा धूर हा इंधन तेलाचा नसतो, तर तो अमेरिकी डॉलरचा, सोन्याचा धूर असतो. भारतीय रिझर्व्ह बँक जेवढ्या मुल्याचे चलन छापते, तेवढ्या मुल्याचा सुवर्णसाठा करावा लागतो! त्यासाठी डॉलर मोडावे लागतात. मैं धारक को … रुपये अदा करने का वचन देता हूँ। असे नोटांवर छापलेले असते. त्याचा अर्थ तुम्हाला … रुपयाची नोट नको असेल, तर त्याबदल्यात तेवढ्या मुल्याचे सोने रिझर्व्ह बँक तुम्हाला देईल! डॉलर छापताना अमेरिकेला सुवर्णसाठा करावा लागत नाही, कारण त्यांच्या नोटेवर छापलेले असते, … श्रशसरश्र ींशपवशी षेी वशलीीं. तुमच्याकडे असलेली डॉलरची नोट तुम्ही अमेरिकी रिझर्व्ह बँकेला परत करुन सोने मागु शकत नाही! सौंदर्य प्रसाधनं वापरुन काळा रंग सावळा जरी झाला असता, तरी आफ्रिका ही सौंदर्य प्रसाधनांची सर्वात मोठी बाजारपेठ असती! दुर्दैवाने ती भारत आहे! म्हणून मी माझ्या गरजेपुरतेच, अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच पेट्रोल-डीझल वापरीन. हौस म्हणून गरज नसताना सोनं खरेदी करणार नाही. अनावश्यक विदेशी वस्तू खरेदी करुन डॉलरचा धूर काढणार नाही, असा दृढसंकल्प आपण केला, तर कुठलीही षडयंत्रं यशस्वी होणार नाहीत! डॉलरची घसरण होईल, शेअर बाजार चढता राहील, इंधन तेलं स्वस्त होतील, अर्थव्यवस्थेला बळकटी येईल!

Posted by : | on : 7 Oct 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक (363 of 1225 articles)

Dr Mohanji Bhagwat4
प्रासंगिक : राममाधव | भागवतांनी आपल्या या ग्लासनॉस्तने बहुतांशी टीकाकारांना नि:शस्त्र केले आहे, यात शंकाच नाही. परंतु, घरात म्हणजे संघटनेत ...

×