ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक » चौदा विद्या आणि चौसष्ट कला…

चौदा विद्या आणि चौसष्ट कला…

॥ टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे |

Sri Ganesh 14 Vidya 64 Kala

Sri Ganesh 14 Vidya 64 Kala

भारतीय संस्कृतीत काम हा विषय वर्ज्य मानला आहे, अशी ओरड काही जण करताना आढळतात. खरेतर ज्या भूमीत कामशास्त्राचा जन्म झाला; जिथे खजुराहो-हळेबीडसारखी कामशास्त्रीय विषयाशी संबंधित शिल्पकाम केलेली मंदिरे आहेत, तिथे हा विषय वर्ज्य का बरे मानला असेल? यावनी आक्रमणानंतर मात्र या विषयाशी संबंधित मानसिकता बदलत गेली. याला या वासनांध शासकांचे लैंगिक अत्याचार कारणीभूत होते. आजही अनेक मंदिरांतील शिल्पांचे तलवारीने घाव घालून तोडलेले विशिष्ट अवयव या विकृतीची साक्ष देण्यास पुरेसे आहेत. या वासनांधतेचा सामना करण्यासाठी भारतीय समाजमनातही बरेच बदल होत गेले आणि हळूहळू काम हा विषयच जणू चर्चाच न करण्याचा विषय झाला. चार पुरुषार्थांत काम गणला गेला आहे. इतकेच नव्हे, तर या पुरुषार्थाचा शास्त्रोक्त अभ्यास हादेखील आपल्या संस्कृतीचे अंग राहिला आहे. एक महत्त्वाचे उदाहरण पाहू या- आपल्या लाडक्या गणपतीला चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांचा अधिपती, असे म्हटले जाते. साहजिकच या चौदा विद्या आणि चौसष्ठ कला कोणत्या? असा प्रश्‍न अनेकांच्या मनात उपस्थित होतो. यांतील १४ विद्या या भारतीय तत्त्वज्ञानात सर्वत्र आढळतात, तर ६४ कला या कामशास्त्रोक्त आहेत! चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांची ही धावती ओळख…
चौदा विद्या
चार वेद : १. ऋग्वेद २. यजुर्वेद ३. सामवेद ४. अथर्ववेद
सहा वेदांगे
१. व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र; पाणिनीय व्याकरण. २. ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक विद्याज्ञान. ३. निरुक्त- परिभाषांचे अर्थ सांगणारे शास्त्र. ४. कल्प- धार्मिक विधी- व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र. ५. छंद- काव्यछंद-वृत्ताचे ज्ञान. ६. शिक्षा- शिक्षण, अध्यापन व अध्ययन.
अधिक पुढील चार
१. न्याय. २. मीमांसा. ३. पुराणे. ४. धर्मशास्त्र.
चौसष्ट कला (संदर्भ : वात्स्यायनकृत ‘कामसूत्रम्’)
१. पानक रस तथा रागषाडव योजना- सरबत व इतर पेय तयार करणे. २. धातुवाद- कमी प्रतीच्या धातूचे उच्च धातूत रूपांतरण. ३. दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे. ४. आकर ज्ञान खाणींविषयी वा जमिनीखालील धातूंविषयी ज्ञान असणे. ५. वृक्षायुर्वेद योग- उद्यान तयार करणे. ६. पट्टिकावेत्रवाणकल्प- सुंभ, वेत इत्यादींनी खाट विणणे. ७. वैनायिकी विद्याज्ञान- शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे. (समोरच्याचे मन ताडण्याची कला.) ८. व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे. ९. वैज्ञापिकी विद्याज्ञान- दुसर्‍याच्या मनावर विजय मिळविणे. (प्रभाव टाकणे.) १०. शुकसारिका प्रलापन- पोपट व मैना यांना मानवी बोली शिकविणे. ११. अभिधान कोश छंदोज्ञान- शब्द व छंद यांचे ज्ञान असणे. १२. वास्तुविद्या- महाल, भवन, राजवाडे, सदन बांधणे. १३. बालक्रीडाकर्म- लहान मुलांचे मनोरंजन करणे वा त्यांच्याशी खेळणे. १४. चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया- उत्तम स्वयंपाक करणे. १५. पुस्तकवाचन- काव्य वा गद्य, नाटक इत्यादी पुस्तके व ग्रंथ वाचणे. १६. आकर्षण क्रीडा- दुसर्‍याला आकर्षित करणे. १७. कौचुमार योग- सौंदर्यप्रसाधने. १८. हस्तलाघव- हस्तकौशल्य. १९. प्रहेलिका – कोटी, उखाणे वा काव्यातून प्रश्‍न विचारणे. २०. प्रतिमाला- अंताक्षरी. २१. काव्यसमस्यापूर्ती- अर्धे काव्य पूर्ण करणे. २२. भाषाज्ञान- देशी-विदेशी अशा विविध बोलींचे ज्ञान असणे. २३. चित्रयोग- चित्रे काढून रंगविणे. २४. कायाकल्प- वृद्ध व्यक्तीला आयुर्वेदोक्त रसायनचिकित्सा देऊन तरुण करणे. २५. माल्यग्रंथविकल्प- वस्त्रप्रावरणांची योग्य निवड करणे. २६. गंधयुक्ती- सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे. २७. यंत्रमातृका- विविध यंत्रांची निर्मिती करणे. २८. अत्तरविकल्प- अत्तर बनविणे. २९. संपाठ्य- दुसर्‍याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे. ३०. धारण मातृका- स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे. ३१. छलीकयोग- हातचलाखी करून फसविणे. ३२. वस्त्रगोपन- फाटकी वस्त्र शिवणे. ३३. मणिभूमिका- भूमीवर मण्यांची रचना करणे. ३४. द्यूतक्रीडा- द्यूत खेळणे. ३५. पुष्पशकटिकानिमित्त ज्ञान- प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे. ३६. माल्यग्रथन- वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनविणे. ३७. मणिरागज्ञान- रत्नांची पारख करणे वा ओळखणे. ३८. मेषकुक्कुटलावक युद्धविधी- बोकड, कोंबडा इ.च्या झुंजी लावणे. ३९. विशेषकच्छेदज्ञान- कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे करणे. ४०. क्रियाविकल्प- वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे. ४१. मानसी काव्यक्रिया- शीघ्र कवित्व. ४२. आभूषण योजन- सोन्या-चांदी वा रत्नामोत्यांनी शरीर सजवणे. ४३. केशशेखरकापीड ज्ञान- मुकुट बनविणे व केसांत फुले माळणे. ४४. नृत्यज्ञान- नृत्याविषयीचे शास्त्रोक्त सखोल ज्ञान असणे. ४५. गीतज्ञान- शास्त्रीय गायनाचे सखोल ज्ञान असणे. ४६. तंडुलकुसुमावलीविकार- तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे. ४७. केशमार्जन कौशल्य- मस्तकाला तेलाने मालिश करणे. ४८. उत्सादन क्रिया- अंगाला उटणे लावणे. ४९. कर्णपत्रभंग- पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे. ५०. नेपथ्ययोग- ऋतुकालानुसार वस्त्रालंकाराची निवड करणे. ५१. उदकघात जलविहार/ जलक्रीडा करणे. ५२. उदकवाद्य- जलतरंग वाजविणे. ५३. शयनरचना- मंचक, शय्या व मंदिर सजविणे. ५४. चित्रकला- नक्षी वेलवुट्टी व चित्रे काढणे. ५५. पुष्पास्तरण- फुलांची कलात्मक शय्या करणे. ५६. नाट्य आख्यायिकादर्शन- नाटकांत अभिनय करणे. ५७. दशनवसनांगराग- दात, वस्त्रे, काया रंगविणे वा सजविणे. ५८. तुर्ककर्म- चरखा व टकळीने सूत काढणे. ५९. इंद्रजाल- गारुडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे. ६०. तक्षणकर्म- लाकडावर कोरीव काम करणे. ६१. अक्षरमुष्टिका कथन- करपल्लवीद्वारे संभाषण. ६२. सूत्रसूचिकर्म- वस्त्राला रफू करणे. ६३. म्लेंछीतकला विकल्प- परकीय भाषा ठाऊक असणे. ६४. रत्नरौप्यपरीक्षा- अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे.
या सर्व विद्या आणि कलांमध्ये गणेश ही देवता पारंगत असल्यानेच तिला ‘गुणेश’ अशीही सार्थ संज्ञा आहे. भारतीय संस्कृतीला कोणताही विषय वर्ज्य नव्हता, हे दाखवून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांचा अधिपती असलेल्या गणेशाला साष्टांग नमस्कार!

Posted by : | on : 16 Sep 2018
Filed under : आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक (505 of 1299 articles)


राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन | अ‍ॅस्फ्पामध्ये जर कार्यरत सैनिकावर चार्जशीट दाखल करण्यात आली, तर ते देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि ...

×