ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:

जमात ए पुरोगामी

॥ टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे |

Jamate Purogami1

Jamate Purogami1

आपण एकविसाव्या शतकात आहोत. जग पुढे-पुढेच चाललंय. प्रगती ही कोणालाही हवीशी वाटणारी गोष्ट. मग तुम्ही पुढारलेपणा किंवा पुरोगामी या शब्दाला एखादी शिवी असल्याप्रमाणे का बरं वापरता? एका पत्रकार मित्राने विचारलेला प्रश्‍न.
अगदी खरं आहे. पुढारलेपणाचं वावडं असण्याचं काहीच कारण नाही. मात्र; पुरोगामी या शब्दाची अवनती करण्याचं काम हे खरं तर स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या पण प्रत्यक्षात अत्यंत दांभिक असणार्‍या छद्म-पुरोगाम्यांनीच केलंय. त्यांनी आपली जबाबदारी निष्पक्षपणे पार पाडली असती तर आज या शब्दाचा असा वापर करावाच लागला नसता! आमचे उत्तर
खरेच पुरोगामित्वाला नावे ठेवण्याचे काहीच कारण नाही. प्रगत काळानुसार वैज्ञानिकतेची कास धरायला हवी हेही खरे. मात्र आम्ही सांगतो तेच वैज्ञानिक आणि भारतीय शास्त्रे म्हणून जे-जे आहे ते सारे अवैज्ञानिक वा अंधश्रद्धा हा अट्टाहास छद्म-पुरोगामी कायमच करताना आढळतात आणि इथेच नेमका त्यांचा दांभिकपणा उघड होवू लागतो. आपली बाजू सिद्ध करण्यासाठी हे लोक बेधडक खोटे बोलतात; बुद्धिभेद करणारे भलतेच आकडे लोकांसमोर फेकतात; आपल्या सोयीची संशोधने उगाळत बसतात आणि गैरसोयीची मात्र दडवून ठेवतात. हिंदूंचे सण, परंपरा इत्यादींवर यथेच्छ तोंडसुख आणि गलिच्छ पातळीवर जाऊन निंदा करणारे छद्म पुरोगामी अन्य पंथीयांबाबत मात्र अवाक्षर काढत नाहीत; इथेच त्यांचा सत्याचा कळवळा उघड होतो! आपल्या देशात अशा पुरोगाम्यांची अवस्था ‘उरलो टिकेपुरता’ अशी झालेली आहे. भारतीय संस्कृतीबाबत आदर असलेली, धार्मिक प्रवृत्तीची व्यक्ती ही वैज्ञानिक जगतात आपला ठसा उमटवू शकतच नाही अशी ह्यांची पक्की धारणा असते. मागे एकदा एका छद्म-पुरोगाम्याशी याबाबत चर्चा सुरु असताना त्याने मला सांगितले; देवासारखी अवैज्ञानिक गोष्ट जो मानतो त्याच्याकडून विज्ञानात काही भर पडणे हे सर्वथा अशक्य आहे. यावर मी त्याला अशा कित्येक वैज्ञानिकांची नावे सांगितली ज्यांचा देव या संकल्पनेवर विश्‍वास होता. तरीही त्याला फारसे पटले नाही. मग मी त्याला आपल्या मातीतलेच एक उदाहरण दिले. हे उदाहरण होते श्रीनिवास रामानुजन अय्यंगार यांचे. गरीब तमिळ ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतलेले रामानुजन अय्यंगार हे गणितातील अग्रगण्य नाव समजले जाते. Landau-Ramanujan constant, Ramanujan prime, Ramanujan conjecture, Ramanujan-Soldner constant, Ramanujan theta function, Ramanujan’s sum, Rogers-Ramanujan identities, Ramanujan-Sato series आणि Ramanujan’s master theorem इत्यादि आधुनिक गणितातल्या संकल्पना जगाला देण्याचे कार्य करणारा हा गणिती अवघ्या ३२व्या वर्षी निधन पावला. या माणसाने गणिताचे कोणतेही तंत्रशुद्ध शिक्षण घेतलेले नव्हते. फार कशाला; त्यांचे पदवीपर्यंतही शिक्षण पूर्ण झाले नव्हते. मात्र असामान्य गणिती प्रतिभा लाभलेल्या अय्यंगार यांनी गणितीविश्‍वाला अचंबित करून सोडले. इतके योगदान दिलेले हे व्यक्तिमत्व अत्यंत धार्मिक स्वभावाचे होते. इंग्लंडमध्ये असतानाही आपले धार्मिक नित्यकर्म आणि शुद्ध शाकाहारी भोजन यांत त्यांनी खंड पडू दिला नाही. गणिताबद्दल बोलताना ते अनेकदा म्हणत; एखादं समीकरण जोवर त्यातील ईश्‍वराच्या साक्षात्काराची प्रचिती देत नाही; तोवर मला त्याचे काही महत्व वाटत नाही! (संदर्भ: “The Man Who Knew Infinity’ (1991), Kanigel, Robert, page 7 of Prologue) आता ते केवळ धार्मिक प्रवृत्तीचे होते म्हणून त्यांचे संशोधन नाकारता येईल का? यावर आमचे पुरोगामी मित्र उद्गारले; रामानुजन यांचे बरेच शोध वादग्रस्त आहेत! या युक्तिवादाचा आधार मात्र त्यांना आजवर देता आला नाहीये. ‘ठोकून देतो ऐसा जे’ या कार्यपद्धतीने पुरोगाम्यांचे काम सुरु आहे. आजचे पुरोगामी त्यावेळी अस्तित्वात असते तर त्यांनी रामानुजन अय्यंगार यांच्याशी दुजाभाव करणार्‍या ब्रिटिशांना साथ देत अय्यंगारांना मुळीच पुढे जावू दिले नसते. असे अनुभव आम्ही स्वतः घेतले आहेत. अनेकदा प्रसिद्धीमाध्यमांतील अधिकारपदावरील कित्येक व्यक्तींनी आयुर्वेदाशी संबंधित आमचे लेख वा प्रतिक्रिया अकारणच नाकारल्या आहेत. क्वचित काही ठिकाणी आमच्या व्याख्यानांत व्यत्यय निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जप करत दुसरीकडे त्यालाच असा हरताळ फासणारे, तथ्य आणि संदर्भासह केलेली मांडणी असूनही; केवळ त्यांच्या गैरसोयीची असल्याने ती प्रसिद्ध होवू नये याचा आटापिटा करणारे छद्म पुरोगामी हे आपण सर्वत्र पाहतो आमच्या दृष्टीने हे लोक ‘जमात ए पुरोगामी’मध्ये मोडतात. जमात ए पुरोगामी म्हणजे ‘पोथीप्रामाण्य नाकारा’ असे ओरडून सांगतानाच; स्वतःच्याच असत्य पोथ्या बनवलेले लोक.
एकीकडे खंडीभर समकालीन संदर्भांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत हे पुरोगामी छत्रपती शिवाजी महाराजांना सेक्युलर ठरवण्याचा प्रयत्न करतात तर दुसरीकडे एकही समकालीन संदर्भ नसताना चार्वाक हे पुरोगामी असल्यानेच त्यांची हत्या झाली अशी थाप मारतात. अशांचे पितळ उघडे करणे ही निकोप आणि द्वेषविरहित समाज निर्माण करण्यासाठी अत्यावश्यक बाब आहे. या स्तंभाचा उद्देश नेमका हाच आहे. वाचकांसमोर ठेवण्यास आनंद होत आहे की; गेले सहा महिने तरुण भारत दैनिकात प्रसिद्ध होणार्‍या आणि भरभरून प्रतिसाद लाभत असलेल्या माझ्या या स्तंभातील छद्म पुरोगाम्यांचे पितळ उघडे करणारे निवडक लेख समाविष्ट केलेल्या ‘जमात ए पुरोगामी’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (१४ ऑक्टोबर २०१८) ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्‍लेषक भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते होत आहे. या निमित्ताने पहिल्यांदाच आमच्या तीर्थरुपांच्या जोडीने एका पुस्तकाचे लेखन करण्याचा योग जुळून आला; हा एक वेगळाच आनंद आहे. डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचेही निवडक लेख आपल्याला यापुस्तकात वाचायला मिळतील. सर्वच लेखांत असलेला समान धागा म्हणजे विश्‍वासार्ह संदर्भ, आकडेवारी आणि त्यावर आधारित मांडलेला तर्क. नेमकी हीच गोष्ट ‘जमात-ए-पुरोगामी’ची पोटदुखी ठरणार आहे; हे एव्हाना लक्षात येऊ लागले आहे. प्रकाशनापूर्वीच पुस्तकाची विक्री सुरु झाली असून लोकांचा उदंड प्रतिसाद या लेखनाला लाभल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसत आहे. आपणही पुस्तक वाचा; इतरांना वाचायला द्या. सत्य जाणून घ्या आणि सत्याचा प्रचार करा. काही मुठभर स्वार्थी लोकांमुळे पुरोगामित्व हा अपशब्द होऊ नये हे तथ्य पटत असलेल्या खर्‍याखुर्‍या पुरोगामी मंडळींना हा सत्य समोर आणणारा प्रयोग नक्की आवडेल ही अपेक्षा. ही केवळ सुरुवात मात्र आहे; अजून बराच पल्ला गाठायचाय!

Posted by : | on : 14 Oct 2018
Filed under : आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक (347 of 1224 articles)

Army Border
राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन | मागच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी देशातील पहिल्या ‘स्मार्ट फेन्सिंग’ प्रणालीचे उद्घाटन केले. पाच ...

×