ads
ads
हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

►संघाचा कुणीही शत्रू नाही • : सरसंघचालक मोहनजी भागवत…

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

►सीबीआयने घुसविल्याचा सोहराबुद्दिनच्या भावाचा दावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८…

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

रुपयातील घसरण किमान सात टक्के

रुपयातील घसरण किमान सात टक्के

►नाणेनिधीचा अंदाज ►नोटबंदी, जीएसटीमुळे विकासाला वेग, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १८…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

►सहकारी बँका अडचणीत ►नेत्यांना बजावली नोटिस, वृत्तसंस्था मुंबई, १८…

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

►अर्थमंत्री मुनगंटीवार यांना विश्‍वास, तभा वृत्तसेवा मुंबई, १८ सप्टेंबर…

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

►राष्ट्रवादी काँग्रेसची वित्त आयोगाकडे कैफीयत, तभा वृत्तसेवा मुंबई, १८…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:23
अयनांश:

जाग उठी घर घर तरुणाई!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने |

सोनिया काँग्रेसने मोदी सरकारचा प्रयत्न हाणून पाडला. मुस्लिम महिला विधेयकाला एक महिलाच आडवी आली! एकीकडे काँग्रेस ही मुसलमानांची पार्टी आहे, असे म्हणायचे आणि दुसरीकडे मुस्लिम महिलांना इतर महिलांप्रमाणे माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा हक्क देऊ करणार्‍या तीन तलाक बंदी विधेयकाला विरोध करायचा? एवढा वैचारिक व्यभिचार फक्त काँग्रेसच करु शकते! काँग्रेसला हिंदुंविषयी यत्किंचतही सहानुभूती नसताना, केवळ त्यांच्या मतांसाठी मठमंदीरांचे उंबरठे झिजवायचे? हिंदू धर्मात फूट पाडून लिंगायतांना आपल्याकडे ओढण्याचे कुटील कारस्थान रचायचे? परिणाम काय झाला? तेलही गेले, तूपही गेले आणि हाती कुमारस्वामी नावाचे धुपाटणे आले! निदान मुसलमान पुरुषांची तरी मतं मिळतील, म्हणून तीन तलाक विधेयकाला विरोध करायचा?

Talaq Husain Dalwai Sonia Gandhi

Talaq Husain Dalwai Sonia Gandhi

मुस्लिम महिलांनाही मोकळा श्‍वास घेता यावा म्हणून मोदी सरकार तीन तलाक विधेयक दुरुस्त्यांसह राज्यसभेत मांडणार होते, पण सोनिया काँग्रेसने मोदी सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडला. मुस्लिम महिला विधेयकाला एक महिलाच आडवी आली! काँग्रेसने या विधेयकाला लोकसभेत संमती दिली असूनही, राज्यसभेत मात्र ती विरोध करत आहे, कारण राज्यसभेत मोदी सरकारकडे बहुमत नाही! एकीकडे काँग्रेस ही मुसलमानांची पार्टी आहे, असे म्हणायचे आणि दुसरीकडे मुस्लिम महिलांना इतर महिलांप्रमाणे माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा हक्क देऊ करणार्‍या तीन तलाक बंदी विधेयकाला विरोध करायचा? एवढा वैचारिक व्यभिचार फक्त काँग्रेसच करु शकते! काँग्रेसला हिंदुंविषयी यत्किंचतही सहानुभूती नसताना, केवळ त्यांच्या मतांसाठी मठमंदीरांचे उंबरठे झिजवायचे? हिंदू धर्मात फूट पाडून लिंगायतांना आपल्याकडे ओढण्याचे कुटील कारस्थान रचायचे? परिणाम काय झाला? तेलही गेले, तूपही गेले आणि हाती कुमारस्वामी नावाचे धुपाटणे आले! निदान मुसलमान पुरुषांची तरी मतं मिळतील, म्हणून तीन तलाक विधेयकाला विरोध करायचा? सोनियाजी, काँग्रेसच्या हाती काहीच लागणार नाही, कारण
माँ भारतीने ली अंगडाई,
जाग उठी घर घर तरुणाई।
मेरा देश बदल रहा है,
आगे बढ रहा है॥
तीन तलाक विधेयकावर हुसेन दलवाईसारख्या काँग्रेसी दरबारीची प्रतिक्रिया वगळता मुस्लिम तरुणाईकडून येणार्‍या प्रतिक्रिया याचीच साक्ष देत आहेत. दलवाई यांच्या प्रतिक्रियेचेही आम्ही स्वागतच करतो. त्यांच्या प्रतिक्रियेमुळे काँग्रेसने निदान प्रभु रामचंद्रांचे अस्तित्व तरी मान्य केले, हेही नसे थोडके! बाबरी ढाँचा पाडला गेला तेव्हा भारतातील मुसलमानांपेक्षा काँग्रेस आणि तथाकथित सेक्युलॅरिस्टांनाच अधिक दुःख झाले होते. परकीय बाबर आपला कुणी लागत नसून इथल्या कणाकणांत, मनामनांत राम वास करतोय, हे आता इथल्या मुसलमानांना उमजू लागले आहे. आज आमची उपासना पध्दती कुठलीही असली, तरी आम्हा सार्‍यांचे पूर्वज हिंदुच होते! दलवाईंची प्रतिक्रिया हेच सांगते, की त्यांच्या शरीरातही त्यांच्या हिंदू पूर्वजांचेच रक्त सळसळते आहे. विदेशी मूळच्या सोनिया गांधींना यातला भावार्थ कधीच कळणार नाही. याच सोनिया गांधींनी श्रीरामाचे अस्तित्व नाकारणारे शपथपत्र न्यायालयात सादर केले होते. करुणानिधींशी संगनमत करुन सोनिया गांधींना रामसेतू तोडायचा होता. कशासाठी? हिंदुंनी तुमची बाबरी पाडली, आम्ही त्यांचा रामसेतू तोडला, हे मुसलमानांना सांगण्यासाठी! रामसेतू तोडायची मागणी कुठल्याही मुसलमानाने केलेली नव्हती. ज्या करुणानिधींनी रावण दहनाऐवजी राम दहनाचे कार्यक्रम घेतले, लाखो लोकांची कत्तल करणार्‍या क्रूरकर्मा स्टॅलिनचे नाव चिरंजीवाला दिले, ते करुणानिधी शेवटच्या घटका मोजत असताना त्यांची कन्या बापाच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून मंदीरांमधून पुचाअर्चा करत होती. त्यावेळी करुणानिधीही मनातल्या मनात रामाचाच धावा करत असणार! बाबरी ढाँच्याच्याच ठिकाणी राम मंदीर बांधायचा हट्ट कशासाठी धरता? मंदीर कुठेही बांधले, तर काय फरक पडतो? असं विचारणार्‍या करुणानिधींचा अंत्यविधी मरिना बीचवरच झाला पाहिजे, म्हणून करुणापुत्राने न्यायालयात धाव घेतली! का? कारण, सार्वजनिक आयुष्यात यांनी कुठलीही सोयीची भूमिका घेतली असली, तरी रक्तात असलेलं हिंदुत्व कधीच मरत नाही. शिया वक्फ बोर्डाच्या जेवढ्या मालमत्ता आहेत, त्या सर्व ठिकाणी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहन, राष्ट्रगीत गायन झाल्यावर भारत माता की जयच्या गगनभेदी घोषणा द्यायचे सक्त आदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी दिले आहेत! भारतीय मुसलमान तीन तलाक प्रथेला मूठमाती देतील, एकपत्नीत्व स्वीकारतील, अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य मंदीर बांधायला पुढाकार घेतील, पण त्यासाठी काँग्रेससारख्या छद्मी सेक्युलॅरिस्टांचा, भंपक वामपंथीयांचा राजकीय क्षेत्रातून सफाया करावा लागेल, कारण ही मंडळी मुस्लिमादी अहिंदुंना त्यांच्या हिंदू मूळांपर्यंत जाऊच देत नाहीत! काही पिढ्यांआधी आपलेही पूर्वज हिंदुच होते, हे भारतीय मुसलमान, ख्रिश्‍चन जेवढ्या आत्मियतेने समजून घेतील, त्याच्या दुप्पट आत्मियतेने हिंदू त्यांना प्रेमालिंगन देतील! धर्मांतर करुन, घुसखोरांना प्रोत्साहन देऊन, आतंकवादी हल्ले करुन, हिंदुंना संपवून आपण आपलं राज्य परत आणू, अशी दिवास्वप्नं कुणी बघत असेल, तर ते आता शक्य नाही, कारण मोदीजींनी जागृत केलेला हिंदू आता नेभळट राहिलेला नाही. म्हणून तर तमाम हिंदुद्वेष्ट्यांना जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी फक्त मोदीजीच दिसत आहेत. अरे, पण मोदीजींनी अजून त्यांचा रुद्रावतार दाखवलाय कुठे?
काँग्रेसने तीन तलाक विधेयक राज्यसभेत अडवून धरल्याच्या घटनेवर दोन मुस्लिम तरुणींनी फार बोलक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि एका सुविद्य मुस्लिम तरुणाने हुसेन दलवाईंना खुले पत्र लिहिले आहे. एक मुस्लिम तरुणी म्हणते, काँग्रेस आता मुस्लिम महिलांकडे मतं मागायला कुठल्या तोंडाने जाणार? दुसरी मुस्लिम तरुणी म्हणते, बस्स हो गया। हमे अब दंगाई काँग्रेस नही चाहिये। इस से तो भाजपा कही गुना अच्छी है। मुस्लिम तरुण लिहितो, आज संसदेत तीन तलाक विधेयक पारित होणार, माझ्या मुस्लिम भगिणींची त्यांच्या नवर्‍यांच्या, मुल्ला-मौलवींच्या जाचातून सुटका होणार, म्हणून मी बातम्यांवर लक्ष ठेऊन होतो. दुर्दैवाने काँग्रेस आणि तिच्या सहयोगी दलांनी तीन तलाक विधेयक राज्यसभेत मांडूच दिले नाही! विधेयक पारित झाले नाही, यापेक्षाही त्या घटनेवरील दलवाईंच्या मखलासीने मी फार दुःखी झालो. मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांसाठी माझ्याच एका मुस्लिम बांधवाने, ज्याला बंधु म्हणायचीही मला लाज वाटते, शंभर कोटी हिंदू बांधवांच्या आराध्य दैवतांचा अपमान केला आहे. मुस्लिम महिलांचा न्याय्य हक्क डावलण्याच्या दुष्ट हेतूने काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई म्हणाले, महिलांना सर्वच धर्मांमध्ये दुय्यम वागणूक दिली जाते. फक्त मुस्लिमच नाही, तर हिंदू, ख्रिश्‍चन वगैरे समाजात पुरुषी वर्चस्व आहे. श्री रामचंद्रांनीही एकदा संशयावरुन सीताजींचा त्याग केला होता… दलवाईजी, आपण प्रभु रामांबद्दल अभद्र भाषेत बोललात. प्रभु रामचंद्र फक्त हिंदुंचेच दैवत आहे असं नाही, तर ते समस्त मानव जातीचे प्रेरणास्त्रोत आहे. आपल्या हीनकस शेरेबाजीबद्दल हिंदुंची माफी मागायची सोडून आपण मुस्लिम महिलांसाठी मोदींनी काहीच केले नाही, अशी मखलाशी करत आहात? मुस्लिमांविरुध्द आगडोंब उसळला असता, पण तसे झाले नाही, कारण माझे हिंदू बांधव, खरोखरच सहिष्णू आहेत. हुसेन साहेब, तुमच्यासारख्या राजकीय नेत्यांच्या आक्षेपार्ह विधानांमुळे आम्हा राष्ट्रभक्त मुसलमानांना शरमेने माना खाली घालाव्या लागतात. भारतातील हिंदुंनी मुसलमानांना कधीच दूर ढकलले नाही. मुसलमानांसाठी पाकिस्तान आणि हिंदुंसाठी हिंदुस्थान, याच अटीवर देशाची फाळणी झाली होती. तरीही हिंदुंनी उदार अंतःकरणाने मुसलमानांना आपल्यात सामावून घेतले. पाकिस्तानातील हिंदुंची संख्या दिवसेदिवस कमी होत असून आज ती हाताच्या बोटावर मोजता येईल एवढी नगण्य झाली आहे, तरीही भारतातील मुसलमानांना इथल्या हिंदुंनी कायम बरोबरीच्या नात्यानेच वागवले. दलवाईजी, तुमच्या क्षूद्र राजकीय स्वार्थासाठी हिंदू-मुसलमानात वितुष्ट निर्माण करु नका. मुसलमानांसाठी हिंदुंनी फार मोठा त्याग केला आहे. आता हिंदुंसाठी काहीतरी करायची पाळी मुसलमानांची असताना, तुम्ही हिंदू-मुस्लिम दंगल पेटवायला निघालात? कशासाठी? सब का साथ, सब का विकास हा ध्यास घेतलेल्या मोदींना बदनाम करण्यासाठी? दलवाईजी, राम आणि सीता यांच्या पवित्र नात्यावर संशय घेऊन आपण जो अपराध केला आहे, त्याबद्दल आपण हिंदू बांधवांची बिनशर्त माफी मागितली ताहिजे.
या बहाद्दर मुस्लिम तरुणाईचं कौतुक करताना मनात एक अनामिक भीतीही वाटत आहे. न जाणो उद्या कर्मठ मुल्ला-मौलवींनी त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला तर?
२०१४ साली हातातून निसटलेली सत्ता परत ताब्यात घेण्यासाठी नेहरुंचे वारसदार काय काय खटपटी, लटपटी करत आहेत, मोदीजी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत म्हणून काय काय षडयंत्रं रचत आहेत, ते सारा देश अनुभवतो आहे. राहुल गांधींना अध्यक्ष म्हणून स्वीकारणे ही कणाहीन काँग्रेसवाल्यांची मजबुरी असू शकते. पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांची उमेदवारी स्वीकारणे ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची, देवेगौडांच्या जदसेची, लालुपुत्रांच्या राजदची, भारताचे कधीही होऊ न शकलेल्या डाव्यांची अगतिकता समजू शकते, पण एका महाभ्रष्टाचारी महागठबंधनचे नेतृत्व करु पाहणार्या खुशालचेंडूकडे देशाची सत्तासूत्रं सोपवायला भारतीय जनता आता दुधखुळी राहिलेली नाही. काश्मिरसाठी काँग्रेसने केलेल्या तरतुदींमुळे उर्वरित भारतातील कुण्याही नागरिकाला तिथे घर, जमीनजुमला वगैरे खरेदी करता येत नाही. त्याच काश्मिरच्या गुलाम नबी आझाद यांना काँग्रेस महाराष्ट्रावर लादायची आणि आम्ही त्यांना निवडूनही द्यायचो. काँग्रेस आमच्या एखाद्या मराठी माणसाला काश्मिरमध्ये का उभा करत नाही, असा भाबडा प्रश्‍न आम्हाला पडायचा! ती ३५-अ, ३७० कलम तरतूद आम्हाला समाप्त करावयाची आहे आणि हे काम फक्त मोदीजीच करु शकतात! बाबरी ढाँचा पाडला म्हणून विलाप करणारी काँग्रेस, आम्हाला अयोध्येत राम मंदीर कधीच बांधू देणार नाही. तीन तलाक विधेयकाला विरोध करणारी काँग्रेस, समान नागरी कायदा कधीच लागू करणार नाही. रोहिंग्या, बांग्लादेशी घुसखोरांसाठी पायघड्या घालणारी काँग्रेस, एनआरसी मसुदा सार्या देशभर कधीच लागू करणार नाही. ही कामं करण्याची हिंमत फक्त मोदीजीच दाखऊ शकतात! म्हणून तर सोनियाजींना, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हायला नको आहेत! मोदीजींनी देशाला महत्प्रयासाने मिळवून दिलेली आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा आम्हाला धुळीला मिळवावयाची नाही, तर मोदीजींच्याच नेतृत्वाखाली आम्हाला ती अधिकाधिक वृध्दींगत करावयाची आहे. भारतीय जनतेचे तर सोडाच हो, पण राहुल गांधींचे नेतृत्व स्वीकारायला अनेक मोदीविरोधकही तयार नाहीत! म्हणून तर मोठा गाजावाजा करुन राहुल गांधींसाठी सकाळी जाहीर केलेली पंतप्रधानपदाची उमेदवारी संध्याकाळी परत घ्यायची नामुष्की काँग्रेसवर ओढवली! पंतप्रधानपदाचा निर्णय निवडणूक निकालानंतर घेतला जाईल, असं शरद पवार म्हणाले, तरीही विरोधक त्यावर विश्‍वास ठेवायला तयार नाहीत! त्यामुळे पंतप्रधान म्हणून आम्हाला कुणीही चालेल, पण तो संघवाला असता कामा नये, अशी कोलांटउडी काँग्रेसला मारावी लागली! कुणीही चालेल, पण नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होता कामा नये! रोहिंग्या, बांग्लादेशी घुसखोर यांना चालतात, पण संघवाला मात्र चालत नाही! केवढा हा पराकोटीचा मोदीद्वेष? या द्वेशाचे प्रेरणास्थान आहे सोनिया गांधी! याचा अर्थ, नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यामुळे सोनिया गांधींच्या वैयक्तिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय हितसंबंधांना जबरदस्त फटका बसलेला दिसतोय? सोनिया गांधी, मोदीजींचा जितका अधिक तिरस्कार करतील, मोदीजी तितके अधिक सशक्त होत जातील. मोदीजी सशक्त होण्यातच व्यापक राष्ट्रहित सामावलेले आहे. काँग्रेसने संघावर अनेक वेळा बंदी घातली. संघाचा प्रभाव कमी करण्यासाठी काँग्रेसने छद्मी हिंदू संघटना जन्माला घातल्या. तरीही संघ फोफावतोच आहे, कारण संघ परिवार राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देतो. नरेंद्र मोदी हे त्या मूसीतून तावून सूलाखून निघालेलं रत्न आहे! एका घराण्याच्या दावणीला बाधलेल्या काँग्रेसला ते कधीच जमणार नाही.
मोहम्मद अली जिन्नांनी अखंड भारताचे पंतप्रधान व्हावे, अशी गांधीजींची इच्छा होती. जवाहरलाल नेहरुंनी जिन्नांना पंतप्रधान होऊ दिले असते, तर भारताची फाळणी झाली नसती, अशी खंत तिबेटी धर्मगुरु आदरणीय दलाई लामा यांनी नुकतीच व्यक्त केली आहे. फाळणी झाली तरी हरकत नाही, पण मीच पंतप्रधान होणार म्हणून नेहरु हट्टाला पेटले आणि फाळणी झाली! आपल्याला अखंड भारताचे पंतप्रधान करावे म्हणून दबाव टाकण्यासाठी जिन्ना यांनी फाळणीची मागणी पुढे केली होती, पण ती इतक्या सहजासहजी स्वीकारली जाईल, असं जिन्ना यांनाही वाटलं नव्हतं, असं जिन्ना म्हणाल्याचे सांगतात. आपण देश वाटुन घेऊ आणि दोघंही पंतप्रधान होऊ, अशी गुप्त तडजोड झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खंडित भारतातल्या काँग्रेस समित्यांची पहिली पसंती सरदार वल्लभभाई पटेलांना होती, तरीही नेहरु पंतप्रधान झाले! सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असते, किंवा जिन्ना भारताचे आणि नेहरु पाकिस्तानचे पंतप्रधान झाले असते, तर हिंदू-मुसलमानांमध्ये एवढे अंतर पडले नसते!
नेहरु खानदानाने स्वतःपलिकडे कधी कशाचा विचारच केला नाही. ब्रिटिशांनी केलेल्या करारानुसार तिबेटचा जो प्रदेश भारताच्या अधिपत्याखाली राहिला होता, त्याचा चीनकडून लचका तोडला जात असताना नेहरुजी शांततेची कबुतरं उडवत राहिले. जो बलुचीस्तान आजही स्वतःला पाकिस्तानचा हिस्सा मानत नाही, तो बलुचीस्तान, हिंदुराष्ट्र नेपाळ हे भारतात सामील व्हायला उत्सूक असताना नेहरुंनी त्यांना कुठलाही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. अब्दुला घराण्याशी असलेल्या आंतरिक जिव्हाळ्यामुळे राजा हरीसिंगांना प्रतिसाद देण्यात अक्षम्य दिरंगाई केली आणि सेनाधिकार्‍यांचे न ऐकता काश्मिर प्रश्‍न संयुक्त राष्ट्रसंघात नेवून भारताच्या मस्तकावर आजतागायत भळभळत असलेली जखम नेहरुनीॅच दिली आहे. काँग्रेसने भळभळणार्‍या अशा अनेक जखमा हिंदू राष्ट्रपुरुषाच्या देहावर केल्या आहेत. त्या जखमांवर फुंकर घालुन, चीन आणि पाकिस्तानला तशा जखमा देण्याची हिंमत नरेंद्र मोदी यांच्यातच आहे. तिबेट, बलुचीस्तानसह पाकव्याप्त काश्मिरची जनता नरेंद्र मोंदींच्या वाटेवर डोळे लाऊन बसली असताना, आपण भारतीयांनी काय करायला पाहिजे?

Posted by : | on : Aug 19 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक (88 of 1369 articles)

Elvis Presley
॥ विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले | प्रिस्ले रंगमंचावर नुसता दिसला, तरी लोक बेभान होत होते. संपत्ती इतकी अमाप मिळत ...

×