ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » जैवघातक प्लॅस्टिक!

जैवघातक प्लॅस्टिक!

॥ विशेष : प्रा. मधुकर बाचुळकर, पर्यावरणतज्ज्ञ |

जगभरात दरवर्षी प्लॅस्टिकचा जवळपास नऊ दशलक्ष टन कचरा समुद्रात पडतोय्. याचं सर्वात जास्त प्रमाण आशियाई देशात आहे. त्यात भारत आणि चीनचा समावेश होतो. २०२५ पर्यंत समुद्रात साठणार्‍या प्लॅस्टिकचं प्रमाणही वाढत जाणार असून एका आकडेवारीनुसार, समुद्रात ७० दशलक्ष टन कचरा जमा होईल. यामध्ये चीन, इंडोनेशिया, फिलिपिन्स, व्हिएतनाम, श्रीलंका, भारत हे पहिले सहा देश आहेत. गंभीर बाब म्हणजे जगभरात समुद्रात जे प्लॅस्टिक टाकलं जातं, त्याचे हे निम्मे भागीदार आहेत. उदाहरण द्यायचं, तर चीनकडून दरवर्षी २.४ दशलक्ष टन एवढा प्लॅस्टिकचा कचरा समुद्रात फेकला जातो. या देशांकडून टाकला जाणारा प्लॅस्टिकचा कचरा प्रशांत महासागराच्या तळाशी साठला आहे. इटली आणि फ्रान्स या देशांच्या क्षेत्रफळापेक्षा तो मोठा आहे. यावरून समुद्राच्या तळाशी किती मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक साचत आहे, याची कल्पना येते…

Plastic Polution

Plastic Polution

राज्यात संपूर्ण प्लॅस्टिकबंदी करण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला आहे. या निमित्तानं प्लॅस्टिकचा वाढता वापर आणि त्यातून पर्यावरणाला निर्माण होत असलेला धोका, या संदर्भातील चर्चेला पुन्हा गती मिळाली. जगात प्लॅस्टिकचा व्यावसायिक वापर १९६०-१९६५ पासून सुरू झाला असला, तरी त्यापूर्वी म्हणजे १९५० नंतर व्यवहारात प्लॅस्टिकचा वापर सुरू झाला. तेव्हापासून आजवर पृथ्वीवर एकूण ८३० कोटी टन प्लॅस्टिक निर्माण करण्यात आलं आहे. यावरून प्रत्येक माणसामागे दीड टन प्लॅस्टिक, असं प्रमाण असल्याचं निदर्शनास येतं. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, जगात एकूण तयार केलेल्या प्लॅस्टिकपैकी जवळपास ७० टक्के म्हणजे ५८० टन प्लॅस्टिक कचरा म्हणून साठलं आहे. विशेष म्हणजे पृथ्वीवरील एकूण प्लॅस्टिकपैकी ६० टक्के प्लॅस्टिक हे अलीकडच्या फक्त १२ वर्षांमध्ये निर्माण केलं आहे. याचा अर्थ, याच काळात प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आजवर तयार करण्यात आलेल्या एकूण प्लॅस्टिकचं वजन १०० कोटी हत्तींच्या वजनाएवढं आहे! याची व्याप्ती लक्षात घ्यायची, तर अमेरिकेतील एम्पायर स्टेट या सर्वात मोठ्या इमारतीसारख्या २५ हजार इमारतींच्या क्षेत्रफळात साठवता येईल एवढं प्लॅस्टिक आज साठून आहे. खरंतर आपण प्लॅस्टिकच्या वस्तू एक ते दोन वर्षांपर्यंत वापरतो. प्लॅस्टिकच्या काही वस्तूंचा वापर तर काही क्षणांसाठीच होतो. यातील काही प्लॅस्टिकचा पुनर्वापर केला जातो. आकडेवारीत सांगायचं, तर २० टक्के प्लॅस्टिकचा पुनर्वापर केला जातो आणि ८० टक्के कचरा म्हणून वर्षानुवर्षं पडून राहतो. अमेरिकेत नऊ टक्के प्लॅस्टिकचा पुनर्वापर होतो आणि १२ टक्के प्लॅस्टिक जाळून नष्ट केलं जातं.
प्लॅस्टिकचा वाढता वापर लक्षात घेता, २०५० पर्यंत जागतिक स्तरावर एकूण १२०० कोटी टन प्लॅस्टिकची निर्मिती झालेली असेल आणि त्यातील ७२० कोटी टन प्लॅस्टिकचा कचरा तयार होईल, असं तज्ज्ञांचं मत आहे. यावरून प्लॅस्टिकची समस्या किती गंभीर रूप धारण करू लागली आहे, याची कल्पना येते. प्लॅस्टिकचं विघटन सहजासहजी न होणं, ही खरी समस्या आहे. कारण प्लॅस्टिकचं विघटन व्हायला कमीतकमी ५०० वर्षे लागतात! शिवाय प्लॅस्टिकचं लगेच कचर्‍यात रूपांतर होत नसल्यानं किंवा ठेवायला जागा नसल्यानं इतरत्र फेकून दिलं जातं. त्यासाठी नदीपात्राचा तसंच समुद्राचा आवर्जून वापर केला जातो. अशा रीतीनं नदीपात्रात तसंच समुद्रात साठलेल्या प्लॅस्टिकची आकडेवारी भयानक आहे. जगभरात दरवर्षी प्लॅस्टिकचा जवळपास नऊ दशलक्ष टन कचरा समुद्रात पडतोय्. याचं सर्वात जास्त प्रमाण आशियाई देशात आहे. त्यात भारत आणि चीनचा समावेश होतो. येत्या २०२५ पर्यंत समुद्रात साठणार्‍या प्लॅस्टिकचं प्रमाणही वाढत जाणार असून एका आकडेवारीनुसार, समुद्रात ७० दशलक्ष टन कचरा जमा होईल. यामध्ये चीन, इंडोनेशिया, फिलिपिन्स, व्हिएतनाम, श्रीलंका, भारत हे पहिले सहा देश आहेत. गंभीर बाब म्हणजे जगभरात समुद्रात जे प्लॅस्टिक टाकलं जातं, त्याचे हे निम्मे भागीदार आहेत. उदाहरण द्यायचं, तर चीनकडून दरवर्षी २.४ दशलक्ष टन एवढा प्लॅस्टिकचा कचरा समुद्रात फेकला जातो. या देशांकडून टाकला जाणारा प्लॅस्टिकचा कचरा प्रशांत महासागराच्या तळाशी साठला आहे. इटली आणि फ्रान्स या देशांच्या क्षेत्रफळापेक्षा तो मोठा आहे. यावरून समुद्राच्या तळाशी किती मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक साचत आहे, याची कल्पना येते.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, पाण्यात प्लॅस्टिकचं विघटन होत नाही. त्यामुळे हा प्लॅस्टिकचा कचरा समुद्राच्या तळाशी तसाच साचून राहिला आहे. हा कचरा गेल्या १० ते १२ वर्षांमध्ये निर्माण झाला आहे. याशिवाय जमिनीवर टाकलं जाणारं प्लॅस्टिक जनावरांकडून अनवधानानं खाल्लं जातं. शस्त्रक्रिया करून जनावरांच्या पोटातून प्लॅस्टिक बाहेर काढल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. अलीकडे पक्षीही घरटी तयार करण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर करू लागले आहेत. आणखी गंभीर बाब म्हणजे, समुद्राच्या तळाशी साठलेलं प्लॅस्टिक जलचर खात असून, मानवाकडून अन्न म्हणून या जलचरांचा वापर केला जात आहे. साहजिक, येत्या काळात या जलचरांबरोबरच मानवी आरोग्यावरही प्लॅस्टिकचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. एकंदरीत, प्लॅस्टिकच्या कचर्‍याची समस्या जगभर तीव्रतेने जाणवत आहे. त्यातच प्लॅस्टिक कुजत नसल्यामुळे काही गंभीर प्रश्‍न निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्याचा विचार पुढे येत असला किंवा तशी मागणी केली जात असली, तरी ती पूर्ण केली जाणं अशक्यप्राय आहे.याचं कारण, प्लॅस्टिक हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.
या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या घोषणेचा विचार करायला हवा. ‘‘आज देशातील १७ राज्यांत प्लॅस्टिकला बंदी असली, तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही,’’ असं पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मध्यंतरी सांगितलं. ते म्हणाले, ‘‘प्लॅस्टिकवरील बंदीच्या संदर्भात अन्य राज्ये कशी कारवाई करतात, याचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करून त्या राज्यात पाठवण्याचा विचार आहे. मात्र, प्लॅस्टिकबंदीचा निर्णय अंमलात आणण्यासाठी लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सरकारचा मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचा विचार आहे.’’ त्याचबरोबर निर्यातीसाठी तयार केलेल्या प्लॅस्टिकच्या बॅगा, उत्पादक कारखान्यांना पॅकिंगसाठी लागणार्‍या प्लॅस्टिकच्या बॅगा तसंच दूध उत्पादनासाठी लागणार्‍या प्लॅस्टिकच्या बॅगा यांना प्लॅस्टिकबंदीतून वगळण्यात येणार असल्याचंही कदम यांनी स्पष्ट केलं. यातून संपूर्ण प्लॅस्टिकबंदी अंमलात येणं अवघड असल्याचं आढळतं.
असं असलं तरी प्लॅस्टिकच्या वापराबाबत घरगुती स्तरावर मोठ्या प्रमाणात, तर औद्योगिक स्तरावर काही प्रमाणात निर्बंध आणता येतील. घरगुती वापरात प्रामुख्याने कॅरीबॅगचा समावेश असतो, तर जाड प्लॅस्टिक पुनर्वापरासाठी विकलं जातं. घरगुती प्लॅस्टिकच्या कचर्‍याचं प्रमाण लक्षात घ्यायचं, तर दर माणसामागे दररोज २५० ग्रॅम इतक्या प्रमाणात हा कचरा तयार होतो. त्यादृष्टीने अलीकडे कचर्‍याच्या वर्गीकरणावर भर दिला जात आहे. आपल्याकडे अजूनही बर्‍याच प्रमाणात सर्व कचरा एकत्र साठवल्याचं दिसून येतं. अशा कचर्‍यातून प्लॅस्टिक वेगळं काढून विघटनासाठी वापरणं आव्हानात्मक ठरतं. त्यामुळे जनतेनं कचर्‍याच्या वर्गीकरणाकडे स्वयंस्फूर्तीनं लक्ष द्यायला हवं. अर्थात, त्यासाठी जनतेचं प्रबोधन करावं लागणार आहे. बरेचदा उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेल्या भागात कचर्‍याच्या वर्गीकरणाचं आवाहन करूनही फारसा फायदा होत नसल्याचं दिसून येतं. उलट, ‘‘हे नगरपालिकेचं काम आहे, आम्ही नगरपालिकेकडे कर भरत आहोत.’’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. अशी मानसिकता असेल, तर प्लॅस्टिकबंदीसाठी कितीही कायदे केले तरी उपयोग होणार नाही.
काही नगरपालिकांनी यासंदर्भात प्रभावी काम करून दाखवलं आहे. वानगीदाखल वेंगुर्ला नगरपालिकेचं उदाहरण घेता येईल. या नगरपालिकेतील कोकरे नावाच्या अधिकार्‍याने एक संकल्पना राबवली. त्यांनी जनतेला कचर्‍यातील प्लॅस्टिक वेगळं करून देण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी एका मशीनच्या साहाय्याने प्लॅस्टिकचे बारीक तुकडे तसंच पूड तयार करून घेतली. ही पूड डांबरात मिसळून रस्ते तयार करण्यासाठी वापर केला. यामुळे ते रस्ते अधिक काळ चांगले राहिल्याचं दिसून आलं. ही संकल्पना इतर ठिकाणच्या अधिकार्‍यांकडून राबवली जाणं तसंच या संकल्पनेला स्थानिक राजकीय नेते व जनतेचा योग्य प्रतिसाद मिळणंही गरजेचं आहे. प्लॅस्टिकप्रमाणे थर्माकोलवरही बंदी घालण्याची गरज आहे. हे पाऊलही महत्त्वाचं ठरणार आहे. मध्यंतरी मी गुजरातमधील वापीला गेलो होते. हा सर्व औद्योेगिक भाग आहे. याच भागातील संपूर्ण समुद्रकिनारा प्लॅस्टिक आणि थर्माकोलनं व्यापलेला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी मोठी दुगर्र्ंधीही येत होती. खरंतर थर्माकोलचं विघटन करता येतं, हे एका संशोधनाद्वारे सिद्ध झालं आहे. संशोधकांनी तयार केलेल्या एका रसायनात थर्माकोल विरघळतं आणि त्यापासून तयार झालेला द्रवपदार्थ पुन्हा वापरता येतो. याच पद्धतीनं थर्माकोलच्या विघटनावर व्यापक प्रमाणात भर देण्याची आवश्यकता आहे. आणखी एक लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, प्लॅस्टिक नष्ट करणारे काही बॅक्टेरिया अस्तित्वात असून ते मातीत आढळून येतात. पृथ्वीवर प्लॅस्टिकच्या कचर्‍याची समस्या निर्माण होणार असल्याची पूर्वकल्पना आल्यानं, निसर्गानंच ही व्यवस्था केली असावी! निसर्ग आपली व्यवस्था आपणच तयार करतो आणि त्याच्याएवढा हुशार कुणीही नाही, हे लक्षात घ्यायला हवं. या बॅक्टेरियांचाही वापर करता येण्यासारखा आहे. अनेक ठिकाणी प्लॅस्टिकपासून पेट्रोलियम पदार्थ तयार करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत, पण ही प्रक्रिया जास्त खर्चीक आहे.
चीन आणि जपानमधील संशोधनातून तर वॅक्सवर्म हे कीटक प्लॅस्टिक खाऊन टाकतात, असं दिसून आलं आहे. बंद खोलीत हा प्रयोग केल्यास प्लॅस्टिक नष्ट होतं, हे सिद्ध झालं आहे. परंतु, हा प्रयोग करताना काही काळजी घ्यायला हवी. खरंतर मधमाश्यांंची पोळी नष्ट करण्याचं नैसर्गिक काम या वॅक्सवर्म कीटकांकडे असतं. विशेष म्हणजे मधमाश्यांच्या पोळ्यांमधून मध गोळा करणार्‍या स्त्रीनं हा शोध लावला. मधमाश्यांची पोळी पक्व होण्यापूर्वी तुटून पडत असल्याचं तिच्या निदर्शनास आलं. त्यामागील कारण शोधण्यासाठी पोळ्यांच्या आत पाहिलं असता हे कीटक आढळले. तिनं ते कीटक बाहेर काढून प्लॅस्टिकच्या एका पिशवीत घालून ठेवले. दुसर्‍या दिवशी पाहिलं असता, त्या कीटकांनी ती प्लॅस्टिकची पिशवी खाऊन पूर्णपणे नष्ट केल्याचं आढळलं. अलीकडे काही ठिकाणी स्टार्चपासून नष्ट होणार्‍या प्लॅस्टिकच्या निर्मितीचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. याशिवाय समुद्राच्या तळाशी असणार्‍या सी विड्स या वनस्पतींपासून काही देशांमध्ये प्लॅस्टिकची निर्मिती करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व प्लॅस्टिक विघटित होणारं आहे. अलीकडेच एका शाळेतील विज्ञान प्रदर्शनात नववीतल्या एका विद्यार्थ्यानं एक प्रयोग मांडला होता. त्यात त्याने माशांच्या खवल्यापासून प्लॅस्टिकची यशस्वी निर्मिती कशी करता येते, हे दाखवलं होतं.
अशा प्रकारच्या संशोधनाकडे लक्ष देणं आणि त्यातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार प्लॅस्टिकची निर्मिती करून वापरावर भर देणं, ही काळाची गरज आहे. अर्थात, यात लोकांची मानसिकता बदलण्याचा भागही महत्त्वाचा आहे.
प्लॅस्टिकचा वाढता वापर आणि त्यामुळे प्रदूषणात होणारी वाढ, ही जागतिक पातळीवरील गंभीर समस्या आहे. त्यामुळे विविध देशांनी प्लॅस्टिकच्या वापरासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ते जाणून घेतल्यास भारतातही प्लॅस्टिकच्या वापराला आळा घालणं किती महत्त्वाचं आहे, हे लक्षात येईल. अमेरिकेत प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर पूर्णपणे बंदी आहे. चीनमध्ये २००८ पासून प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. बांगलादेशमध्ये तर २००२ पासूनच प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी आहे. इटलीनंही २०११ पासून प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदीचा निर्णय घेऊन अंमलात आणला आहे. ऑस्ट्रेलियात मात्र काही ठिकाणी अतिपातळ पिशव्यांवर बंदी लागू करण्यात आली आहे. मेक्सिकोमध्ये २०१० पासून प्लॅस्टिक पिशव्या वापरणार्‍या दुकानदारांसाठी दंंडाची तरतूद करण्यात आली आहे. वेल्समध्ये मात्र प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर शुल्क आकारलं जात आहे. जर्मनीमध्येही दुकानदारांसाठी प्लॅस्टिक पिशव्यांवर पुनर्निर्माणासाठी शुल्काची तरतूद आहे. इंग्लंडमध्येही प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर शुल्क आकारलं जात आहे. बेल्जियममध्ये तर प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर कर आकारला जात आहे. डेन्मार्कमध्ये किरकोळ विक्रेत्यांसाठी प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर कर लावण्यात आला आहे.
हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोरणात्मक नेतृत्वाच्या भूमिकेतून केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एकदाच वापरल्या जाणार्‍या प्लॅस्टिकचे भारतातून उच्चाटन करण्यासाठी भारत सरकार राबवत असलेल्या उपक्रमांचे संयुक्त राष्ट्रांनी कौतुक केले आहे.

Posted by : | on : 14 Oct 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (234 of 835 articles)

Mahatma Gandhi
भारत भाग्य विधाता : प्रशांत आर्वे | गांधींचे बळ कशात आहे? तर ते आहे, माणसावर निरपेक्ष प्रेम करण्याच्या त्यांच्या स्थायीभावात! ...

×