ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक » ठरवून खोटं, पण रेटून बोल!

ठरवून खोटं, पण रेटून बोल!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने |

पाकिस्तानला कट्टर शिवभक्त मोदी नको आहेत, पण बेगडी शिवभक्त राहुल गांधी हवे आहेत, यातलं गुपित उघड करुन सांगायची गरज नाही! कैलास मानससरोवर तीर्थयात्रेला जायचा विचार जरी कुण्या हिंदुच्या मनात आला, तरी हर हर महादेव ही उत्स्फूर्त गर्जना त्याच्या तोंडून बाहेर पडते. कैलास मानससरोवर यात्रेला जाऊन आलेल्या राहुल गांधी यांच्या तोंडून तशी ललकारी जुलमाचा रामराम म्हणूनही बाहेर पडल्याचे ऐकिवात नाही! गणपती बाप्पा मोरया म्हटल्यामुळे वारीस पठाणचे काय हाल झाले, ते राहुल गांधींच्या कानावर गेले असावे! राहुल गांधी यांची तीर्थयात्रा, मंदीर परिक्रमा, पूजाअर्चा बघून काही भोळेभाबडे हिंदू हुरळून गेले आहेत, पण किरिस्ताव लोकांमध्ये चलबिचल झाल्याचे मात्र जाणवले नाही! केवढा दांडगा विश्‍वास आहे त्यांचा राहुल गांधींवर! परफेक्ट अंडरस्टँडींग! हिंदुंनी तेवढा विश्‍वास मोदींवर दाखवायला काय हरकत आहे?

Rahul Gandhi4

Rahul Gandhi4

चोर मचाये शोर षडयंत्र! (उत्तरार्ध)
मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशभर एक सिनेमा जोरदार गर्दी खेचत आहे, ‘चोर मचाये शोर!’ या चित्रपटाचा हिरो वाटतो तितका बावळट नक्कीच नाही! ठरवून खोटं, पण रेटून बोलून लक्ष विचलित करायचे आणि त्याच वेळी गुप्त षडयंत्र रचायची! चीनी अधिकार्‍यांना गुपचुप भेटायचे, पाक अधिकार्‍यांसाठी गुप्त मेजवान्या आयोजित करायच्या! विदेशात जाऊन देशाची बदनामी करायची! खमक्या चौकीदारामुळे यांचा चौर्यकर्म व्यवसाय आधीच डबघाईला आलेला असताना, हा चौकीदार गतकाळातली त्यांची चौर्यकर्म उघडकीस आणत आहे! चोरों की गली में शोर तो मचेगा ना? खरं म्हणजे, या चोर मचाये शोर चित्रपटातील सर्व छोट्यामोठ्या कलाकारांचा भव्य जाहीर सत्कार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते झाला पाहिजे! एकामागोमाग एक चोर्‍या उघड होत असताना चोरांनी चौकीदारालाच चोर म्हणायचे? हा केवढा निर्लज्ज कोडगेपणा झाला? पक्षाध्यक्षांच्या बेताल वागण्याची शरम त्यांच्या अनुयायांनाही वाटत असेलच ना? राफेल प्रकरणी काँग्रेस अशी तोंडावर आपटणार आहे की तिला कुणी दारातही उभं करणार नाही! ‘महान’ काँग्रेसचं अधःपतन बघवत नाही हो! पर्यावरण क्षेत्रात राबविलेल्या दमदार धोरणांबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चॅम्पियन ऑफ दी अर्थ’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केला आहे! सार्‍या भारतवर्षाला अभिमान वाटावा असा हा गौरवास्पद प्रसंग! पण काँग्रेससह मोदीविरोधकांच्या चेहर्‍यांवर मात्र बारा वाजले आहेत! मोदींविषयी चांगलं कधी बोलायचं नाही. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या गौरवास्पद राष्ट्रीय कामगिरीचे कौतुक करायचे नाही. विरोधी पक्ष कसे नसावेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे मोदीविरोधक! ठरवून खोटं, पण रेटून बोलण्यासाठी असाच एखादा जागतिक पुरस्कार असता, तर तो काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना मिळाला असता आणि काँग्रेस परिवाराने तो आनंदही जल्लोषात साजरा केला असता! गल्ली-बोळात राहुल गांधी याचे सत्कार समारंभ आयोजित केले असते. राहुल स्तुतीने भाट मीडिया ओसंडून वाहिला असता! या काँग्रेस परिवाराच्या सहनशीलतेची म्हणा किंवा लाचारीची म्हणा, मला कमाल वाटते! राहुल गांधी खोटं बोलण्यातले नवनवे विक्रम दररोज स्थापित करत आहेत, तरीही झिलकर्‍यांच्या चेहर्‍यांवर जराही खंत, चिंता जाणवत नाही! आपला नेता धडधडीत खोटं बोलतोय हेच झिलकर्‍यांना समजत नसावे किंवा काँग्रेस श्रेष्ठींनी छू म्हटलं की भूंकण्याशिवाय, टाळ्या पिटण्याशिवाय त्यांच्यासमोर कुठला पर्यायच नसावा! मोदीजींवर चिखलफेक करुन पळून जायचे, खोट्या बातम्या पसरवायच्या. पुन्हा पुन्हा ठरवून खोटे, पण रेटून बोलायचे आणि जनतेची दिशाभूल करायची, हे चोर मचाये शोर षडयंत्र, राहुल गांधी यांच्याकडून कुठलाही विधीनिषेध न बाळगता राबविले जात आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानविरुध्द केलेल्या लक्ष्यभेदी कारवाईचा मोदी सरकारने नुसता उल्लेख जरी केला, तरी काँग्रेसला प्रचंड वेदना होतात! सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तानचे वस्त्रहरण केले की नागड्या पाकिस्तानला हिरवे वस्त्र पुरविण्यासाठी काँग्रेस धावाधाव करते. उद्या भारताचे पाकिस्तानशी युध्द पेटले, तर हे पाकिस्तानला आतून मदत करणार नाही कशावरुन? त्यासाठीच पाकिस्तानला राहुल गांधी भारताचे पंतप्रधान हवे आहेत का? असली काँग्रेस आम्हाला सत्ताधारी म्हणूनच नव्हे, तर विरोधी पक्ष म्हणूनही नको आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ४४ वरुन ४ वर घसरली पाहिजे आणि त्यात सोनिया-राहुल नसले पाहिजेत.
राफेल प्रकरणी राहुल गांधी यांनी फ्रान्सच्या आजी अध्यक्षांची साक्ष काढली, तिथे ते तोंडावर पडले आणि सार्‍या जगभर काँग्रेसचे हसे झाले. संसदेबाहेर फ्रान्सच्याच माजी अध्यक्षांची साक्ष काढली, तिथेही ते तोंडावर आपटले. अनिल अंबानींचे वस्त्रहरण करायला गेले, तिथे सोनिया गांधींच्या अवघड जागेचे दुखणे-रॉबर्ट वॉड्रा उघडे पडले! शरद काकांनी तर राफेलच्या ढगातली सारी हवाच काढून टाकली! अर्थात, संपुआचे आधारस्तंभ असलेले पवार साहेब असं का बोलले असावेत, याचा उलगडा होण्यासाठी काही दिवस जाऊ द्यावे लागतील! कदाचित कोलांटउडीही मारतील! राहुल गांधी मी शिवभक्त, मी शिवभक्त ही एकांकिका सादर करायला गेले, पण पाकिस्तानने भारताच्या पंतप्रधानपदासाठी त्यांच्या उमेदवारीचे नामांकन केल्यामुळे तिथेही उताने पडले. एखादा शिवभक्त भारताचा पंतप्रधान होणार, ही कल्पनाच पाकिस्तानला सहन होणार नाही! त्याची शिफारस करणे, ही तर फार दूरची गोष्ट झाली! पाकिस्तानला कट्टर शिवभक्त मोदी नको आहेत, पण बेगडी शिवभक्त राहुल गांधी हवे आहेत, यातलं गुपित उघड करुन सांगायची गरज नाही! कैलास मानससरोवर तीर्थयात्रेला जायचा विचार जरी कुण्या हिंदुच्या मनात आला, तरी हर हर महादेव ही उत्स्फूर्त गर्जना त्याच्या तोंडून बाहेर पडते. कैलास मानससरोवर यात्रेला जाऊन आलेल्या राहुल गांधी यांच्या तोंडून तशी ललकारी जुलमाचा रामराम म्हणूनही बाहेर पडल्याचे ऐकिवात नाही! गणपती बाप्पा मोरया म्हटल्यामुळे वारीस पठाणचे काय हाल झाले, ते राहुल गांधींच्या कानावर गेले असावे! राहुल गांधी यांची तीर्थयात्रा, मंदीर परिक्रमा, पूजाअर्चा बघून काही भोळेभाबडे हिंदू हुरळून गेले आहेत, पण किरिस्ताव लोकांमध्ये चलबिचल झाल्याचे मात्र जाणवले नाही! केवढा दांडगा विश्‍वास आहे त्यांचा राहुल गांधींवर! हिंदुंनी तेवढा विश्‍वास मोदींवर दाखवायला काय हरकत आहे? गुजरात विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी मठमंदीरांचे उंबरठे झिजवत होते आणि मंदीर अनुयायांना पराभूत करा म्हणून चर्च फतवा काढत होते! परफेक्ट अंडरस्टँडींग! हिंदू असलेल्या मोदींनी मुसलमानांची जाळीदार धार्मिक टोपी घालायला नम्र नकार दिला म्हणून भारतीय भंपक सेक्युलॅरिस्टांनी केवढा गहजब केला होता, पण तीच मंडळी कॅथॉलिक राहुल गांधींनी जानवे परिधान केले, मानससरोवर तीर्थयात्रेला जाऊन आले, तरी एक शब्द बोलले नाहीत! परफेक्ट अंडरस्टँडींग! या सार्‍या गदारोळात सोनिया मॉम मात्र कुठे दिसल्या नाहीत? युरोप-रशियाच्या खासगी दौर्‍यावर गेल्या असाव्यात कदाचित!
राहुल गांधी यांना समज कमी आहे, कुठलीही पूर्वतयारी, गृहपाठ न करता बोलतात, असं सर्वसामान्यांना वाटणे साहजिक आहे, पण ते तसे नसावेत. कुठल्याही यंत्रात इकडून बटाटे घातले की तिकडून सोन्याच्या चिपा बाहेर येणार नाहीत, हे न कळण्याइतके ते दुधखुळे नाहीत. पप्पू तर नक्कीच नाहीत! काल खोटं बोलल्याची खंत निदान दुसरया दिवशी तरी त्यांच्या चेहर्‍यावर दिसली असती. राहुल गांधी पूर्ण विचाराअंती ठरवून खोटं बोलतात. तसे नसते, तर आपण वारंवार परदेशी कशासाठी जातो, कुणाला भेटतो हे ही बोलण्याच्या ओघात त्यांनी सांगून टाकले असते. आपल्या शालेय जीवनाविषयी, बालपणी काढलेल्या खोड्यांविषयी काहीतरी बोलले असते. मोदींची नक्कल करता करता जय श्रीराम, वंदे मातरम्! म्हणाले असते. या बाबतीत त्यांचं प्रसंगावधान कधीही सुटलेलं नाही. त्यांनी धारण केलेलं बावळट ध्यान हे आपमतलबी आहे. महाबिलंदर लालु प्रसाद यादव यांनी असंच आपमतलबी ध्यान धारण करुन प्रदीर्घकाळ राज्य केले. राहुल गांधींच्या सल्लागारांना मानले पाहीजे! मेरे प्यारे देशवासीयों, चोर मचाये शोर या करमणूक प्रधान चित्रपटाचा मनमुराद आनंद लुटा, पण त्यात गुंतून पडू नका! कारण, मग पुढील कित्येक वर्षे त्यातून बाहेर पडणे कठीण होईल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी बेटी पढाओ, बेटी बचाओ कार्यक्रमाची खिल्ली उडविण्यासाठी राहुल गांधी भाजप शासित राज्यांत झालेल्या बलात्कारांचा उल्लेख करत असतात. भाजप आणि मोदीजी बलात्कार्‍यांना शिक्षा करत नसल्याचा आरोप करत बेटी पढाओ, बेटी को बीजेपीवालों से बचाओ अशी हीनकस कोटी करतात. राहुल गांधी यांनी महिला सुरक्षेवर बोलणे म्हणजे हाफिझ सईदने शांततेवर व्याख्यान देण्यासारखे आहे! अमेठी विश्रामगृहात युवक काँग्रेस कार्यकर्त्यांकडून झालेल्या बलात्कार प्रकरणी पीडित मुलीने राहुल गांधी यांच्यावरही आरोप केला होता. अमेठीच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवून घेतली नाही म्हणून ती मुलगी आपल्या आईसह काँग्रेसश्रेष्ठींकडे गेली होती. तिथे त्या मायलेकींवरच घाणेरडे आरोप करुन त्यांना हाकलून देण्यात आले. राहुल गांधी कुठल्या तोंडाने स्त्रीदाक्षिण्याचा आव आणत मोदी-योगींवर आरोप करत असतात?
उत्तर प्रदेश काँग्रेस कार्यसमितीतील एक सदस्य आपल्याच बायकोवर कसा लैंगिक अत्याचार करत असत, याविषयी या सदस्याच्या बायकोनेच पोलिसात तक्रार दाखल केली आहे. काँग्रेस कार्यसमिती सदस्य शान मोहम्मद यांच्याविरुध्द त्यांच्या बायकोने गाझीयाबाद येथे दाखल केलेल्या तक्रारीनुसार राजकीय स्वार्थासाठी शान मोहम्मद आपल्या धर्मपत्नीला वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत शय्यासंगत करायला भाग पाडत असत. बढतीसाठी, काँग्रेस यंत्रणेत अधिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी शान मोहम्मद आपल्या बायकोकडून असले नीच कर्म करुन घेत असत. बायकोने कधी नकार दिला, तर शान मोहम्मद तिला मारझोड करत असत, इलेक्ट्रिक शॉक देत असत. गेली चार वर्षे शान मोहम्मद काँग्रेस नेत्यांना आपल्या घरी घेऊन येत असत आणि बायकोला त्यांच्या हवाली करत असत. जीव वाचविण्यासाठी तिने पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. राहुल गांधी, हीच का तुमची काँग्रेस संस्कृती?
राहुल गांधी यांच्या समाजमाध्यम समुहात काम करणार्‍या एका महिला कार्यकर्तीने तिथे तिचे लैंगिक शोषण होत असल्याची जाहीर तक्रार काही दिवसांपूर्वी केली होती. आयटी सेल मॅनेजर चिराग पटनाईक यांचे नाव घेऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोशल मीडिया सेल प्रमुख दिव्या स्पंदना यांच्याकडे तक्रार केली होती, पण तिची कुठलीही दखल घेतली गेली नाही. काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयुआयच्या छत्तीसगड विभागाचे अध्यक्ष फिरोज खान यांच्याविरुध्द संघटनेतील एका तरुणीने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. फिरोज खानच्या अत्याचाराला अनेक तरुणी बळी पडल्याचे तिने उघड केले आहे. एका महिला काँग्रेस कार्यकर्तीने तर काँग्रेसमध्ये महिलांना कुठले पद हवे असेल, तर तिला तिच्या वरिष्ठांकडे त्याचे मूल्य चुकते करावे लागते, असा खळबळजनक आरोप केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अपेक्षित असलेला महिला सन्मान यालाच म्हणायचे का? जो काँग्रेस अध्यक्ष आपल्या पक्षातल्या महिला कार्यकर्तींच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींची साधी दखल घेऊ शकत नाही, त्याने इतरांवर खोटेनाटे आरोप करत महिलांविषयी पुळका असल्याचा आव आणू नये.
महागठबंधन होणार आणि ते मोदी सरकारचा पराभव करणार म्हणून काही महिन्यांपूर्वी उल्हसित झालेला मीडिया, ल्युटियन्स गँग महागठबंधनची शक्यता दिवसेदिवस धूसर होत चालली असतानाही शांत कशी काय आहे? महागठबंधनचे नेतृत्व करु इच्छिणारे राहुल गांधी यांचा जोश तसूभरही कमी कसा काय झाला नाही? महागठबंधनच्या रथात स्वार होण्यासाठी उतावीळ झालेले माया, ममता, अखिलेश, केजरीवालच्या घरी पायधुळ झाडणारे शरद यादव, पाकिस्तानऐवजी भाजपला शत्रू क्रमांक एक मानणारे उध्दव ठाकरे एकाएकी गप्प कसे काय झाले असतील? सांप्रदायिक ताकतों को हराने के लिये महागठबंधन जरुरी है, म्हणून सतत गर्जना करणारे लालु प्रसाद यादव गप्प कसे आहेत? चंद्रशेखर राव, चंद्राबाबु नायडू, स्टॅलिन, कमल हसन, वामपंथी, जिहादी, मिशनरी या सार्‍यांनाच महागठबंधनद्वारे मोदीजींचा पराभव हवा आहे. तरीही महागठबंधन कुठे दिसत नाही आणि या मंडळींची चलबिचलही कुठे दिसत नाही! अदृश्य महाठगबंधन आकाराला आले आहे की काय? निवडणुकीपूर्वी महागठबंधन करायला सुरुवातीपासून विरोध करणारे शरद पवार यांनी एक योजना मांडली होती. प्रत्येक प्रादेशिक शिलेदाराने आपापल्या प्रांतात भाजपाचा पूर्ण शक्तीनिशी मुकाबला करावा, शक्य असेल तिथे काँग्रेससह आपापसात तडजोडी कराव्यात आणि निवडणूक निकालानंतर महागठबंधन निर्माण करुन सत्ता हस्तगत करावी! विरोधकांना आणि स्वपक्षीयांनाही नेहमी कात्रजचा घाट दाखवणार्‍या शरद पवार साहेबांच्या या योजनेलाच मी अदृश्य महाठगबंधन म्हटले आहे. कुठलीही किंमत मोजू, पण नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होऊ देणार नाही म्हणून इरेला पेटलेले मोदीविरोधक महागठबंधन होत नाही म्हणून हताश झाले असतील, याची सूतराम शक्यता नाही. २०१९ साली नरेंद्र मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधान झाले, तर विजय मल्या, नीरव मोदी वगैरे पळून कसे काय गेले म्हणून मोदीजींना प्रश्‍न विचारणार्‍यांवरच पळून जायची पाळी येणार आहे! म्हणून उघड महागठबंधन ऐवजी अदृश्य महाठगबंधन, एवढाच काय तो फरक झाला आहे. शरद पवारांसह बहुतेक मोदीविरोधक काँग्रेसविषयी दुरावा निर्माण झाल्याचे दाखवत आहेत, याचा अर्थ त्यांनी मोदींना पराभूत करायचा विचार सोडून दिला आहे, असे मुळीच नाही. किंबहुना त्यासाठीच दुरावा दाखवला जात आहे! राहुल गांधी यांच्या बाष्कळ बडबडीचा आपल्यावर परिणाम होऊ नये, हा हेतू तर आहेच, शिवाय भाजपावर नाराज झालेला, पण काँग्रेसकडे जाण्याची शक्यता नसलेला मतदार नाईलाजाने भाजपकडे न जाता आपल्याकडे यावा, हा हेतू आहेच! उत्तर प्रदेशात आम्ही काँग्रेसला दोन जागा देऊ अशी अपमानास्पद ऑफर अखिलेश-मायावतींनी दिली, तरी काँग्रेस गप्प आहे! छत्तीसगडमध्ये मायावतींनी अजित जोगी यांच्या बंडखोर काँग्रेसशी युती केली आहे, राजस्थानात अशीच स्थानिक पातळीवर युती केली आहे, मध्यप्रदेशात २२ जागी उमेदवार घोषित केले आहेत! राहुल अजून बच्चा आहे, त्याला शिकण्यासाठी काही अवधी लागेल, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. राहुल हे देशातील सर्वात मोठे विदूषक आहे, असं तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्यावर तुटून पडणारे राहुल गांधी किंवा काँग्रेस यांच्यापैकी कुणीही वरीलपैकी एकालाही प्रत्यूत्तर दिले नाही! याचाच अर्थ असा की महाठगबंधनचे परफेक्ट अंडरस्टँडींग झालेले आहे! याची पुरेपूर जाणीव शहा-मोदी जोडगोळीला आहे, कारण महागठबंधन दृश्य स्वरुपात दिसत नसले, तरी ते त्यापलिकडे कितीतरी योजनं दूरचं बघू शकतात! दृश्य-अदृश्य षडयंत्रांचा अचूक वेध घेऊ शकतात! २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ४२३ खासदार निवडून येतील आणि नरेंद्र मोदी दुसर्‍यांदा भारताचे पंतप्रधान होतील! भारत विश्‍वनायक व्हावा, ही तर श्रींची इच्छा आहे! वंदे मातरम्! •••

Posted by : | on : 14 Oct 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक (345 of 1224 articles)

Solih Yamin
प्रासंगिक : श्याम परांडे | देशाच्या अंतर्गत व बाह्य कारणांमुळे मालदीवच्या या बहुपक्षीय लोकशाहीला संकटांचा सामना करावा लागला. अंतर्गत घटकांमध्ये, ...

×