ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:10
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, प्रशांत आर्वे, स्तंभलेखक » डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना…

॥भारत भाग्य विधाता : प्रशांत आर्वे |

वर्तमानात मात्र त्यांच्या कालातीत असलेल्या विचारांचे विसर्जन करून; हिंदू आणि दलित असा द्वेषाधारित सामना आम्ही उभा करू पाहतोय. बाबासाहेब कुठल्या गटातटाचे नसून ते संपूर्ण भारताचे आहेत हे आम्ही विसरतो. दलित समाजाचा त्यांच्याप्रति असलेल्या आत्यंतिक आदरातून जो एक पजेसिव दृष्टिकोन निर्माण झालाय; तो स्वाभाविक आहे. तो हेटाळणीचा विषय न करता त्यामागील भूमिका समजून घेतली पाहिजे. विचारांच्या दोन टोकांवर असलेल्या मंडळींनी देखील पुन्हा एकदा आपल्या वागण्यातून समाज सांधण्याचे कार्य करावे लागेल. ते सभा आणि भाषणे यातून घडणारे नसून प्रत्यक्ष व्यवहारातून घडणार आहे. जे संविधान बाबासाहेबांनी आम्हाला दिले त्यात प्रत्येकाच्या धर्म श्रद्धा अबाधित ठेवण्याचे अभिवचन आहे.

Ambedkar Jayanti

Ambedkar Jayanti

नुकताच आपण सगळ्यांनी नागपुरात धम्म चक्र प्रवर्तन दिन आणि चंद्रपुरात अनुवर्तन दिन साजरा केला. वर्षानुवर्षे मानवी अधिकार नाकारल्या गेलेल्या समाजाला पुन्हा एकदा प्रकाशाच्या वाटेवर आणण्याचे कार्य महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून झाले. खरे तर अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीन या देशात घडून आलेल्या राज्यक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर भारतात घडून आलेली सामाजिक क्रांती रक्तविहीन तर होतीच, पण जगाच्या दृष्टीने ती अपूर्व अशी ठरली. आधुनिक भारताच्या निर्मितीत त्यांचे योगदान अनन्य साधारण असेच आहे. बाबासाहेब जाऊन आज बासष्ट वर्षे झालीत. त्यांनी विवध विषयांवर मांडलेली मते आणि विचार हा त्याही आधीचा; मात्र वर्तमान परिप्रेक्ष्यात तो समजून घेताना बाबासाहेबांच्या कर्तृत्वाने आणि विचार समृद्धीने उर पुन्हा भरून येतो. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील संपूर्ण दलित समाजाचे एकमात्र श्रद्धास्थान म्हणजे बाबासाहेब. सुरुवातीला जे बाबासाहेब भारतीय समाजात उपेक्षिल्या गेले तेच बाबासाहेब आज राजकारण आणि समाजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले आपण बघू शकतो. काळाच्या ओघात समाजाला प्रगल्भ व्हावेच लागते, इतकाच काय तो त्याचा अर्थ.
डॉ. बाबासाहेबांनी आपली संपूर्ण हयात देशातील एका मोठ्या वर्गाला समानतेच्या पातळीवर सामाजिक आणि राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी घालवली. त्यामुळे अविवेकी लोकांना ते एका विशिष्ट जातीचे नेते वाटू शकतात. परंतु जेव्हा त्यांच्या राष्ट्रीय विचारांकडे आपण वळतो; तेव्हा त्यांच्यातील प्रगल्भ, द्रष्टा आणि कोणत्याही परिस्थितीत देशाच्या अखंडत्वाशी तडजोड न करणारा महामानव आपल्या दृष्टीस पडतो. त्या काळात त्यांनी मांडलेली धर्म आणि राष्ट्रीय अखंडता यावरील मते पूर्वसुरी नसताना मांडलेली आहेत. आज ज्या मुस्लिम ब्रदरहूडच्या नावाखाली इस्लामी राष्ट्रात थैमान सुरू आहे. त्याची भविष्यवाणी बाबासाहेब आधीच करून ठेवतात हे विशेष. नेहरू कमिटीच्या रिपोर्टवर सडकून टीका करताना १८ जानेवारी १९२९ ला बहिष्कृत भारत च्या अंकात नेहरू कमिटीची योजना आणि भारताचे भवितव्य या लेखात ते लिहितात, मागासलेल्या हिंदूंची व अस्पृश्यांची पायमल्ली करून कमिटीने हिंदूंचे हित साधले असते तरी आनंद मानण्यास जागा होती. परंतु कमिटीला तेही साधता आले नाही. सिंध बलुचिस्तान आणि वायव्य सरहद्दीवरील प्रांत वेगळे व स्वतंत्र करण्यात आले म्हणजे हिंदुस्थानात जे एकंदर ९-१० प्रांत आहेत. त्यापैकी पाच प्रांतात मुसलमानांचे प्राबल्य होईल. अशी प्रांतरचना झाली असताना ज्या प्रांतात मुसलमान अल्पसंख्य आहेत त्या प्रांतातील हिंदूंनी जर मुसलमानांचा छळ केला तर ज्या प्रांतात हिंदूंची कमी संख्या आहे त्या प्रांतातील मुसलमान लोक त्यांना (हिंदूंना) छळावयास लागतील. ज्या योजनेत हिंदूंना धोका पोहोचतो ती योजना काय कामाची? असा अत्यंत परखड आक्षेप बाबासाहेब नेहरू रिपोर्टच्या बाबतीत घेताना दिसतात. एवढेच मांडून बाबासाहेब थांबत नाहीत, तर हिंदूंच्या बाबतीत जातवार प्रांतरचना देशासाठी घातक ठरणार असेल तर मग त्याच न्यायाने मुस्लिमांसाठी मान्य केलेली जातवार प्रांत रचना नेहरू कमिटीला कशी काय मान्य होऊ शकते, असा प्रश्‍न ते उपस्थित करतात. भारताच्या फाळणीची बीजे मुस्लिमांसाठी असलेल्या जातवार प्रांतरचनेत आहेत हे बाबासाहेबांनी खूप आधी ओळखले होते. याही पुढे भारतीय सीमांच्या संरक्षणाच्या बाबतीत ते आपली चिंता याच लेखात व्यक्त करतात, हा देश (भारत) एका बाजूने चीन-जपानसारख्या भिन्न संस्कृती तर दुसर्‍या बाजूला तर्की, पर्शिया, अफगाणिस्तान सारख्या मुसलमानी राष्ट्राच्या वेष्टनात अडकलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताने खूप सावधपणे वागले पाहिजे. समजा चीन-जपानकडून भारतावर हल्ला झाला तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी संपूर्ण भारत एकत्र उभा राहील याची खात्री देता येते. परंतु स्वतंत्र झालेल्या हिंदुस्थानवर जर तर्की, पर्शिया किंवा अफगाणिस्तान या तीन मुसलमान राष्ट्रांपैकी कोणी एकाने जरी मारा केला तर त्या प्रसंगी सर्व लोक एकजुटीने तोंड देतील याची खात्री कोणी देईल का? आम्हास तरी देता येत नाही. या देशात हिंदू आणि मुसलमान हे दोन समाज नव्हे, तर दोन राष्ट्रे नांदत आहेत. हिंदी मुसलमान लोकांचा ओढा मुसलमान संस्कृतीच्या राष्ट्रांकडे असणे अगदी स्वाभाविक आहे. हा ओढा इतका बेसुमार बळावला आहे की मुसलमानी संस्कृतीचा प्रसार करून मुसलमानी राष्ट्रांचा संघ तयार करणे व होतील तितके काफिर देश त्याच्या अमलाखाली आणणे हे त्याचे ध्येय होऊन बसले आहे. या विचारांनी पछाडल्यामुळे पाय हिंदुस्थानात असले तरी डोळे तुर्कस्तानकडे अगर अफगाणिस्तानकडे लागलेले आहेत. हिंदुस्थान देश आपला आहे याबद्दल ज्यांना अभिमान नाही व ज्यातील निकटवर्तीय हिंदूबांधवांविषयी ज्यांना बिलकुल आपलेपणा नाही असे मुसलमान लोक मुसलमानी परचक्रापासून हिंदुस्थानचे संरक्षण करण्यास सिद्ध होतील असे धरून चालणे धोक्याचे आहे असे आम्हास वाटते. सगळे मुसलमानी प्रांत हिंदुस्थानच्या सरहद्दीवर आहेत. विंध्य पर्वतापर्यंत सारी धरित्री मुसलमानमय आहे. यामुळे मुसलमान लोक स्वतंत्र भारताचे द्वारपाल आहेत. त्यांनी शत्रूला अडवून धरले तर ठीक, पण त्यांनी जर शत्रूला सहाय्य केले, नव्हे तटस्थ राहिले तरी अर्धे मकान गाठेपर्यंत त्यांना कोणीही शह देऊ शकणार नाही. घरच्यांच्याच सहाय्याने आत आलेला शत्रू घर करून राहणार, त्याला बाहेर घालवणे अशक्य आहे
ज्या मुस्लिम राष्ट्रांच्या संघाचा उल्लेख बाबासाहेब करतात तो आजचा मुस्लिम ब्रदरहूड किंवा इस्लामिक स्टेटपेक्षा काय वेगळा आहे? आश्‍चर्य म्हणजे त्या काळी असला दूरदर्शी विचार त्यांच्या समकालिनांनी देखील बोलून दाखविलेला दिसत नाही.
भारताच्या राष्ट्रीयत्वाची चर्चा करताना बाबासाहेब म्हणतात, भारतीय मुस्लिम हे राष्ट्र आहे हा त्यांचा दावा कोणतीही कुरकुर न करता मान्य केला पाहिजे. हिंदू व मुसलमानांना असा एखादा पूर्वेतिहास आहे का की ज्याच्या अभिमानात किंवा दुःखात ते एकत्रितपणे सहभागी होऊ शकतील? याचे उत्तर हिंदूंनी दिले पाहिजे. बाबासाहेब स्पष्ट सांगतात की, हिंदू आणि मुस्लिम या एकमेकांविरुद्ध लढणार्‍या दोन सशस्त्र पलटणी आहेत. समान उद्दिष्टांसाठी सहभागी होण्यासाठी एक समान धागा तेथे नाही. परस्परांचा द्वेष, तिरस्कार, परस्परांचा संहार हा त्यांचा भूतकाळ आहे. जर दोन्ही समाज भूतकाळावर पांघरूण घालू शकले, तर भविष्यकाळ वेगळा असू शकतो. समान पूर्वेतिहास नसतानाही हिंदू व मुसलमान एक राष्ट्र उभारू शकतात असा हिंदूंचा दृष्टिकोन आहे, असा दृष्टिकोन बाळगणे भ्रम आहे.
या ठिकाणी एक लक्षात घेतले पाहिजे की बाबासाहेबांच्या या विचारांकडे आम्ही राष्ट्रीय परिप्रेक्ष्यात बघितले पाहिजे. उगाच त्यांना हिंदुत्ववादाच्या वेष्टनात गुंडाळणे हा त्यांच्यावरील अन्याय ठरेल.
१३ ऑक्टोबर १९३५ ला बाबासाहेबांनी येवल्याच्या परिषदेत धर्मांतराची घोषणा केल्यानंतर संपूर्ण भारतात कल्लोळ माजला. या संदर्भात बाबासाहेबांची मते आणि कृती दोन्ही बघितल्यानंतर बाबासाहेबांबद्दलचा आदर अजूनच वाढतो. २३ ऑक्टोबरला दैनिक त्रिकाळमध्ये एक बातमी छापून आली. आपण इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्म स्वीकारणार नाही, त्या नंतर लगेच बौद्ध धर्माचे प्रकांड पंडित धर्मानंद कोसंबी यांनी बाबासाहेबांची मुंबई येथे त्यांच्या राजगृही भेट घेऊन बौद्ध धर्मावर प्रदीर्घ चर्चा केली. त्या नंतर वर्धेला असलेल्या गांधीजींना कोसंबी भेटले आणि बाबासाहेबांचा बौद्ध धर्म स्वीकारण्याकडे कल असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदू महासभेचे काही प्रतिनिधी बाबासाहेबांना भेटायला गेल्यावर जे शब्द बाबासाहेब वापरतात त्याला इतिहासात तोड नाही. जेणेकरून भारत देशाच्या हिताला धोका येईल अशा प्रकारचे धर्मांतर मी करणार नाही. याबद्दल तुम्ही निश्‍चिंत असा. एवढेच काय, पण देशहितासाठी माझ्या समाजाच्या प्रगतीवर मला जळजळीत कोळसे ठेवण्याची वेळ आली तर मी तसे करण्यास का कुं करणार नाही!
समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल कुणीही प्राशन करायला तयार होईना तेव्हा ते भगवान शंकराने प्राशन करून पृथ्वीला नष्ट होण्यापासून वाचविले असे म्हणतात. बाबासाहेबांनी सबंध आयुष्यात अपमान, मानभंग, अन्याय या सगळ्या दुष्ट प्रवृत्तीचे हलाहल प्राशन करून देखील देशाच्या अस्मितेचा आणि अखंडतेचा प्रश्‍न निर्माण झाला तेव्हा मात्र स्थितप्रज्ञासारखे वागले, कुठलाही आततायी निर्णय त्यांनी कधीच घेतला नाही. जे केले ते पूर्ण विचारांती. हा देश अराजकाच्या मार्गाने जाणे त्यांना कदापि मान्य झाले नसते.
स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी चिंतन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टींची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टींची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब म्हणतात, भारताचे स्वातंत्र्य आपल्याच लोकांच्या विश्‍वासघाताने गेले आहे. आपल्याच लोकांनी देशद्रोह केला आणि भारत देश दुसर्‍यांच्या हाती दिला. महंमद बिन कासीमने जेव्हा सिंधवर स्वारी केली तेव्हा राजा दाहीरच्या सेनापतीने लाच घेतली आणि तो आपल्या राजाच्या मदतीला धावला नाही. यामुळे राजा दाहीरचा पराभव झाला. महंमद घोरीला भारतावर स्वारी करण्याचे आमंत्रण राजा जयचंदने दिले. शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढत होते, तेव्हा इतर मराठे सरदार शिवाजी महाराजांविरुद्ध लढत राहिले. आता पुन्हा तसेच होणार नाही ना, अशी मला चिंता वाटते. जर नेत्यांनी आपल्या पक्षाचे मत हे राष्ट्र हितापेक्षा श्रेष्ठ मानले तर भारताचे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल. असे झाले तर पुन्हा स्वातंत्र्य मिळविणे अशक्यच होऊन बसेल. यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे. मी हिंदू, मी मुसलमान, मी ख्रिश्‍चन, मी शिख, मी जैन-बौद्ध यांना दुय्यमत्व देऊन, मी प्रथम भारतीय व अंतिमत:ही भारतीयच आहे असे आपण मानलेच पाहिजे.
वर्तमानात मात्र त्यांच्या कालातीत असलेल्या विचारांचे विसर्जन करून; हिंदू आणि दलित असा द्वेषाधारित सामना आम्ही उभा करू पाहतोय. बाबासाहेब कुठल्या गटातटाचे नसून ते संपूर्ण भारताचे आहेत हे आम्ही विसरतो. दलित समाजाचा त्यांच्याप्रति असलेल्या आत्यंतिक आदरातून जो एक पजेसिव दृष्टिकोन निर्माण झालाय; तो स्वाभाविक आहे. तो हेटाळणीचा विषय न करता त्यामागील भूमिका समजून घेतली पाहिजे. विचारांच्या दोन टोकांवर असलेल्या मंडळींनी देखील पुन्हा एकदा आपल्या वागण्यातून समाज सांधण्याचे कार्य करावे लागेल. ते सभा आणि भाषणे यातून घडणारे नसून प्रत्यक्ष व्यवहारातून घडणार आहे. जे संविधान बाबासाहेबांनी आम्हाला दिले त्यात प्रत्येकाच्या धर्म श्रद्धा अबाधित ठेवण्याचे अभिवचन आहे. मग ज्याच्या त्याच्या ज्या काही श्रद्धा असतील त्याचा आदर करणे. अर्वाच्च वा समाज हिताला बाधा पोचेल अशा शब्दांचा एकमेकाप्रति प्रयोग न करणे हाच बाबासाहेबांच्या विचारांचा सार आहे. ज्या वळणाने आमचा समाज आज जाऊ बघतोय ते वळण म्हणजे आमचा आत्मघात आहे. म्हणून बाबासाहेबांकडे माफी मागण्याशिवाय पर्याय उरत नाही.

Posted by : | on : 28 Oct 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, प्रशांत आर्वे, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, प्रशांत आर्वे, स्तंभलेखक (222 of 1136 articles)

Metoo
मानसरंग : मयुरेश डंके | आपल्याला हवी असलेली गोष्ट किंवा संधी देताना एखाद्या व्यक्तीनं आपल्याकडून काही अपेक्षा केली तर कुणाला ...

×