ads
ads
देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

►प्रधानमंत्री मोदी यांचा दावा, मुंबई, १८ डिसेंबर – साडेचार…

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

►राजनाथसिंह यांचे आवाहन, नवी दिल्ली, १८ डिसेंबर अयोध्येत राममंदिर…

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

नवी दिल्ली, १८ डिसेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी…

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

►जिगपिंग यांचा इशारा ►सुधारणा व उदार धोरणाला ४० वर्षे…

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

►सुटकेनंतर भोगावी लागली शिक्षा, नवी दिल्ली, १७ डिसेंबर –…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, ५२ संघटनांचा पाठिंबा, मुंबई, १८…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 17:55
अयनांश:
Home » आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक » तरुणाईबद्दल नुसते गैरसमजच नकोत!

तरुणाईबद्दल नुसते गैरसमजच नकोत!

॥ अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव |

तरुणाईवर नुसते आरोप करूनही चालायचे नाही. त्यांना एका सूत्रात बांधून दिशा देण्याची जबाबदारी समाजातील सर्व नागरिकांची आहे. एक दक्ष नागरिक म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला तरुणांचे मार्गदर्शन केले पाहिजे. कुठेही असे जाणवले की तरुणाई दिशाहीन होते आहे, तर लगेच ती बाब हेरून सुधारणेचे अस्त्र उगारणे आवश्यक आहे. तरुण हा या समाजाचाच एक घटक आहे, महत्त्वाचा घटक आहे. या घटकाची मोठी संख्या लक्षात घेता, तरुणाईला आकार देणे हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे, एवढे लक्षात ठेवले म्हणजे झाले!

College Students Dance In Flash Mob

College Students Dance In Flash Mob

आजची तरुण पिढी भरकटली आहे, वाया गेली आहे, व्यसनाधीन झाली आहे, अश्‍लीलतेच्या मागे लागली आहे, दिशाहीन झाली आहे, नीतिमूल्ये पाळत नाही, वडीलधार्‍यांचा सन्मान करीत नाही, ही पिढी भौतिक सुखाच्या मागे लागली आहे आणि स्वत:चा स्वार्थ साधून घेत आहे… असे अनेक आरोप वारंवार केले जातात. परंतु, सरसकट असे आरोप करणे हा उद्याच्या भारताचे भविष्य असलेल्या तरुणाईच्या प्रामाणिकपणावर संशय घेण्यासारखे आहे. काही तरुण बेशिस्त वागतात, समाजाच्या मर्यादांचे उल्लंघन करतात, म्हणून सगळी तरुणाईच बिघडलेली आहे, असे म्हणता यायचे नाही.
मध्यंतरीच्या काळात देशाच्या काही भागात रेव्ह पार्ट्या झाल्या. काही ठिकाणी रेव्ह पार्ट्यांमध्ये अल्पवयीन मुले-मुलीही आढळून आल्या. राजधानी दिल्लीसह काही प्रमुख शहरांमध्ये बाईकस्वार तरुण स्टंट करताना आढळून आले.
मुंबईतल्या लोकलमध्येही चार तरुणांनी स्टंट केला. एका प्रवाशाचा मोबाईल हिसकून पळ काढला. आता त्या तरुणांना अटक करण्यात आली आहे, हा भाग वेगळा. अशा अनेक घटना घडत असतात, घडल्या आहेत. त्यामुळे तरुण पिढी वाहवत चालली आहे की काय, असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे ती ही की, आपल्या देशात जेवढी तरुणांची संख्या आहे, तेवढी जगातील कोणत्याच देशात नाही. सर्वाधिक तरुण भारतात आहेत आणि ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. तरुणांची एकूण संख्या लक्षात घेतली तर जे तरुण परंपरेला सोडून वागतात, मनमानी करतात, रेव्ह पार्ट्या करतात, त्यांची संख्या नगण्य आहे. अशा नगण्य संख्येतील तरुणांच्या बेताल वर्तनामुळे संपूर्ण तरुण पिढीच वाया गेली आहे, असे म्हणणे अपरिपक्वपणाचे ठरेल. २०१२ मध्ये १६ डिसेंबरच्या रात्री राजधानी दिल्लीत बलात्काराची जी अत्यंत घृणित घटना घडली, त्यानंतर तरुणाईने जो आक्रोश केला होता, तो लक्षात घेतला पाहिजे. मुलींवर आणि महिलांवर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध आवाज उठविणार्‍या आंदोलकांमध्ये तरुणाईचाच पुढाकार होता आणि तरुणांचीच संख्या अधिक होती, हे विसरता येणार नाही.
तरुणाईमधील एक वर्ग बिघडलेला, वाया गेलेला दिसतोच आहे. पण, म्हणून सगळी तरुणाई बिघडली आहे, दिशाहीन झाली आहे आणि त्यामुळे भारताचे भवितव्य कठीण आहे, असे म्हणता यायचे नाही. लोभ, लालसा, क्रोध, हिंसाचार अशा वातावरणात वाढलेला तरुणांचा एक वर्ग जरूर दिशाहीन झालेला असू शकतो. तो आपल्याच मस्तीत जगू इच्छित असू शकतो, त्याला समाजहिताशी काही देणेघेणेही नसू शकते. पण, देशभक्तीने प्रेरित झालेला तरुणांचा दुसरा वर्ग हा उद्याच्या भारताचे आशास्थान आहे आणि त्याच भरवशावर देशाची मजबूत वाटचाल होत आहे, याकडे दुर्लक्ष कसे करता येईल?
तरुणांचा एक वर्ग आपल्याकडे असाही आहे की ज्याला देशात, समाजात व्यापक सकारात्मक बदल घडवून आणण्याची इच्छा आहे. देश सर्व क्षेत्रात आघाडीवर राहिला पाहिजे, यासाठी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात आजची तरुणाईच तर कठोर परिश्रम घेत आहे. आपल्या तरुणांनी माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अटकेपार झेंडे रोवून देशाला जी प्रतिष्ठा मिळवून दिली आहे, देशाचा गौरव वाढविला आहे, हे कशाचे लक्षण मानले पाहिजे? देशाच्या विकासात, समाजाच्या जडणघडणीत आपलीही भागीदारी असली पाहिजे, असे तरुण पिढीला वाटणे ही मोठी गोष्ट आहे. अनेक तरुण देशहितासाठी वाट्टेल तो धोका पत्करायला तयार आहेत. त्यांना स्वत:च्या हितापेक्षा देशहित सर्वोच्च वाटते, हे कशाचे लक्षण मानायचे? भारत एक दिवस जागतिक महासत्ता होईल, या विचाराला बळकटी देणारी ही लक्षणं आहेत. दिल्लीत झालेल्या बलात्काराच्या निंदनीय घटनेनंतर तरुणाईने जे आंदोलन केले होते, ते लक्षणीय होते.
कुणाचेही नेतृत्व नसताना एका चांगल्या कारणासाठी तरुणाई जात-पात-धर्म-पंथ-भाषा असा सगळा भेद विसरून एकत्र येते आणि बलात्कार्‍यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करते, हा एक मोठा सकारात्मक बदल मानला पाहिजे. याला सुरुवात मानली तरी हरकत नाही. कारण, अशी छोटी छोटी आंदोलनंच एक व्यापक अशी क्रांती जन्माला घालत असतात, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ कुणीच कुणाला बोलावले नव्हते. पण, संवेदना अजूनही जाग्या असल्याने, हजारो तरुण जंतरमंतरवर आणि इंडिया गेटवर जमले आणि त्यांनी महिलांवरील अत्याचाराविरुद्ध आवाज उठविला होता. या तरुणाईला आपण दिशाहीन म्हणून दुर्लक्षित करू शकणार आहे? मुळीच नाही. त्यांच्या प्रामाणिकपणावर अविश्‍वास व्यक्त करून चालायचे नाही.
तरुणांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. या तरुणांना अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणे राजकारणातही यायचे नव्हते. त्यांचा स्वत:चा काही स्वार्थही नव्हता. तरुणाईचे ते आंदोलन दीर्घकाळ चालले अन् सरकारला त्याची गांभीर्याने दखल घ्यावीच लागली आणि तरुणाईच्या आक्रोशासमोर झुकून स्वत:चे वर्तन बदलावेही लागले. तरुणाईने ठरविले तर चांगल्या कारणांसाठी सरकारला झुकविणे आणि जनतेच्या हिताचे कायदे करायला लावण्यास भाग पाडणे अशक्य नाही.
उद्याच्या भारताचे भवितव्य उत्तम असावे असे जर आपल्याला वाटत असेल, तर बालमनांवर चांगले संस्कार करण्याची प्रक्रिया अविरत चालली पाहिजे. लहान मूल शाळेत जाण्यापूर्वी घरी आई-वडिलांच्या अंगाखांद्यावर खेळत असते. मुलांना आई-वडिलांचा सहवास लाभत असतो. तो जसा लहानपणी लाभतो तसाच तो मोठेपणीही लाभतो. लहान मुलांवर आई-वडिलांनी उत्तम संस्कार केले आणि त्यांनी चांगली वर्तणूक करावी, अशी अपेक्षा करून स्वत:चे वर्तन चांगले ठेवले, तर मुलांना चांगले वळण लागू शकते. पण, अनेक पालकांना आपल्या मुलांमधील वाईट गुण कधीच दिसत नाहीत, शेजारपाजारच्यांनी ते लक्षात आणून दिले, तर ते मोठ्या मनाने मान्य करण्याऐवजी लक्षात आणून देणार्‍याच्या हेतूवर शंका घेतली जाते. असे करण्याने आपण आपल्या पाल्याला बिघडवत आहोत, याकडेही पालकांचे दुर्लक्ष होते. मग मोठी होऊन हीच मुलं जेव्हा वाईट वर्तन करतात आणि त्यांच्या वाईट वर्तनाचा फटका पालकांना बसतो, तेव्हा यांचे डोळे खाडकन् उघडतात. पालकांनंतर मुलांवर चांगले संस्कार करण्याचे, त्यांना नीतिमूल्ये शिकविण्याचे कर्तव्य असते ते शिक्षकांचे. कारण, मुलं जेवढी आई-वडिलांसोबत राहतात तेवढीच, किंबहुना त्यापेक्षा जास्त वेळ शिक्षकांच्या सहवासात शाळेत असतात. त्यामुळे शाळेतील सहवासात मुलांना नागरिकत्वाचे धडे देण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर येऊन पडते. ही जबाबदारी पालकांनी आणि शिक्षकांनी उत्तमपणे पार पाडली, तर उद्याची तरुण पिढी भरकटलेली दिसण्याची शक्यताच राहणार नाही. अनेक पालक मुलांसमोर खोटे बोलताना, असभ्य वर्तन करताना आपण पाहतो. अनेक पालक मुलांसमोरच घरी मद्यप्राशन करतात, सिगार ओढतात. अनेक पालक तर स्वत:च्या स्वार्थासाठी मुलांनाच खोटे बोलायला सांगतात. पालकच मुलांना खोटे बोलण्याची सवय लावणार असतील, तर मग मोठे होऊन त्यांनी जबाबदार नागरिक व्हावे, अशी अपेक्षा तरी कशी करायची? शिक्षक जर मुलांना खर्रा आणायला पानटपरीवर पाठविणार असेल आणि विद्यार्थ्यांच्या खर्र्‍याच्या पुडीतील तंबाखूयुक्त सुपारी खाणार असेल, तर मग मुलांवर काय संस्कार होतील, याची कल्पनाच केलेली बरी! सगळ्या बाबी लक्षात घेतल्या, तर पालक आणि शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे. समाजाचा पाया रचण्याचे फार मोठे कार्य आई-वडील आणि गुरुजन करीत असतात. त्यांनी ते केल्यानेच आजचा समाज अजूनही नैतिकता टिकवून आहे, हे विसरून चालणार नाही. मुलांचा सर्व दृष्टींनी विकास करण्यात आई-वडील आणि शिक्षकांची भूमिका फार मोठी आहे. दोघांच्याही भूमिका परस्परपूरक आहेत. मुलांच्या मानसिकतेला आकार देण्यात पालकांना शिक्षकांची मदत होते, तर मुलांना नागरिकत्वाचे धडे देण्यात शिक्षकांना पालकांची मदत होते. त्यामुळे या दोन घटकांनी आपापली जबाबदारी आणि कर्तव्य नीट पार पाडले, तर तरुण पिढी कधीच भरकटणार नाही अन् दिशाहीनही होणार नाही.
तरुणाईवर नुसते आरोप करूनही चालायचे नाही. त्यांना एका सूत्रात बांधून दिशा देण्याची जबाबदारी समाजातील सर्व नागरिकांची आहे. एक दक्ष नागरिक म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला तरुणांचे मार्गदर्शन केले पाहिजे. कुठेही असे जाणवले की तरुणाई दिशाहीन होते आहे, तर लगेच ती बाब हेरून सुधारणेचे अस्त्र उगारणे आवश्यक आहे. नेहमी तरुणाईला दोष देऊन किंवा त्यांच्या प्रामाणिकपणावर संशय घेऊन काम भागणार नाही. शेवटी तरुण हा या समाजाचाच एक घटक आहे, महत्त्वाचा घटक आहे. या घटकाची मोठी संख्या लक्षात घेता, तरुणाईला आकार देणे हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे, एवढे लक्षात ठेवले म्हणजे झाले!

Posted by : | on : 19 Aug 2018
Filed under : आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक (342 of 1228 articles)


अर्थपूर्ण : यमाजी मालकर | आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी काय म्हणते, याला नेहमीच महत्त्व दिले जाते ...

×