ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:10
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » तीर्थरूप आणि तीर्थस्वरूप

तीर्थरूप आणि तीर्थस्वरूप

॥ प्रासंगिक : डॉ.अ‍ॅड. विलास सावजी |

Atal Bihari Vajpayee1

Atal Bihari Vajpayee1

वरील शब्दांचा अर्थ सर्वांनाच माहिती असणार. येथील संदर्भ वेगळा असल्यामुळे थोडा विस्तार करतो. तीर्थरूप म्हणजे माझे वडील माधव गोपाळ सावजी खामगावचे त्यावेळचे जिल्हा संघचालक. संघ शाखा सार्वजनिक मैदानावर लावण्यास बंदी असलेल्या त्या काळात तीर्थस्वरूप अटलबिहारी वाजपेयी यांचा विदर्भ दौरा ठरला. या दौर्‍यात खामगावचाही समावेश होता.
हिंदुत्वनिष्ठ खामगाव
खामगाव तसे पहिल्यापासूनच हिंदुत्वनिष्ठ म्हणून प्रसिद्ध होतेच. त्या काळात भारतीय जनसंघाच्या ‘दिवा’ या चिन्हावर बरेच वेळा विधानसभेची निवडणूक लढविण्यात आली होती. त्या काळातील विशिष्ट परिस्थितीमुळे जनसंघाला फारशे यश कधी आलेच नाही.
अटलजींचा दौरा ठरला होता. सर्व कार्यकर्त्यांमध्ये विद्युत संचार व्हावा, अशी ही तरुणांची टोळी मोठ्या उत्साहाने कामाला लागली होती. सभेचे आयोजन करणे, सभेसाठी प्रचार करणे, अशा अनेक जबाबदार्‍या माझ्या वडिलांकडे होत्या.
एक लाखाची थैली
सभेचे आयोजन करणे, जाहिरात करणे, या बाबी तर नित्याच्याच होत्या. यासाठी फार मोठा निधी लागणार होता. सर्व कार्यकर्ते खेड्यापाड्यातून, तर शहरातील सर्वच भागात संचार करीत होते.
त्या वेळचा विशेष नारा होता की, ‘‘नोट भी दो और व्होट भी दो!’’ अगदी १० रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत, काही अपवादात्मक ठिकाणी हजारापेक्षाही जास्त अशा रकमा जमा केल्या जात होत्या. मदन मोहन मालवियांना एक विश्‍वस्त म्हणून भारतभर ओळख होती. तशीच काही अंशी वडील वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेले असल्यामुळे, वडिलांचाही आमच्या जिल्ह्यात विश्‍वस्त म्हणून परिचय होता.
कार्यकर्ते घरोघरी जात. प्रतिष्ठानात जात व जमा झालेली रक्कम कोषाध्यक्षाजवळ जमा करीत होते.
आला तो सुवर्णक्षण झाला!
निधी कमी पडणार नाही, असे वडिलांनी आश्‍वासन दिले होते. त्यानुसार निधी जमा झाला, काही कमतरतेची कार्यकर्त्यांनी पूर्तता केली व अटलजींना थैली देण्याचा समारंभ झाला. अटलजींचा दौरा ठरल्याप्रमाणे तीन ते चार तासांचा असल्याने ते खामगावात फारच कमी होते. अल्पोपहार, अटलजींना आणि सर्व कार्यकर्त्यांना आमच्या घरी ठरला होता.
दिलखुलास गप्पा सुरू असताना एका कार्यकर्त्यांने अटलजींना, प.पू. डॉक्टर हेडगेवार हे सावजींच्या घरी येऊन गेल्याचे सहज सांगितले. अटलजींना इतका आनंद झाला की, त्यांनी वडिलांना मिठीच मारली व वडिलांचा चरणस्पर्श केला. वडिलांच्या डोळ्यांतही अश्रू आले व सर्वच कार्यकर्ते स्तिमित झाले.
स्मृतिमंदिराची स्थापना
नागपूरच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती समितीतर्फे स्मृतिमंदिराच्या उद्घाटनाचा समारंभ ठरला होता. आम्ही बरेच कार्यकर्ते त्यासाठी नागपूरला गेलो होतो. त्या काळात प्रा. बलराज मधोक हे दिल्लीतून फार मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. तेसुद्धा अटलजींच्या सोबत होते.
अटलजी व मधोक यांना एकत्र बघण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करीत होतो, पण गर्दीमुळे आम्हाला तेथे पोहोचता येईना.
बहुधा कृष्णराव मोहरील (या नावाबद्दल साशंक आहे) यांनी आम्हाला पाहिले व आमची लगबग पाहून त्यांनी आवाज दिला व आम्हाला, हवी असलेली वस्तू मिळाल्यानंतर जसा बालसुलभ आनंद होतो तसा आनंद झाला! आमची तेथे थोडक्यात ओळख करून देण्यात आली. सर्वांनाच स्मृतिमंदिराच्या उद्घाटनाच्या स्मृती चिरस्मरणात राहतील, याचे फार मोठे समाधान वाटून, आठवण जणूकाही अगदी ताजी आहे, असे आजही वाटते.
खामगाव दौरा दुसर्‍यांदा
यानंतर अटलजी पुन्हा एकदा पक्षाच्या प्रचारासाठी खामगावला आले होते. अर्थात, भाऊसाहेब फुंडकरही त्यांच्याबरोबरच होते. प्रचारादरम्यान भाऊसाहेब हे कसे सच्चे कार्यकर्ते आहेत, याबद्दल आपल्या भाषणात अटलजी म्हणालेत- ‘‘सर्व कार्यकर्त्यांना मोठ्या पदावर जाता येईल असे नाही, पण भाऊसाहेब हे तर पत्थर पायातील असून मंदिराचे कळसही तेच आहेत.’’
सर्व कार्यकर्त्यांना हे ‘अटलवाक्य’ अद्यापही जसेच्या तसेच आठवते आणि ही अटलवाणी भाऊसाहेबांनी खरी करून दाखविली आहे.
विनोदी स्वभाव व कविमनाचे अटलजी यांचा तर सर्वांनाच परिचय आहे. याशिवाय विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे व त्या पदार्थाचे गुणगान गात असताना तो पदार्थ करणार्‍यालाही अटलजी विसरत नसत. एका कार्यक्रमात अकोला येथे सर्व कार्यकर्ते नाश्ता करीत होते. तेवढ्यात कार्यक्रम संपवून अटलजीही त्या सभागृहात आले. त्यांनी नास्त्यामध्ये काय आहे असे विचारले, कुणीतरी त्यांना सांगितले, दहिवडा व जिलेबी आहे. त्यांच्या आवडीचेच हे पदार्थ असल्यामुळे त्यांनी लगेच खुर्ची घेऊन फराळाला सुरुवात केली. एवढा मोठा माणूस आपल्यासारख्या कार्यकर्त्यांबरोबर बसून फराळ करतो, ही बाब संस्मरणीय अशीच ठरली.

Posted by : | on : 2 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (257 of 780 articles)

Fergusson College
टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे | अधूनमधून अशी काही कलमे आपल्या कानावर पडत असतात खरी. निमित्त होते ते फर्ग्युसन महाविद्यालयात ...

×