ads
ads
प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

►महिला पत्रकार बसू यांची साक्ष, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर…

आलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर

आलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर

►सीबीआय विरुद्ध सीबीआय, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – केंद्रीय…

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – केंद्रात मंत्री असलेले राष्ट्रीय…

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

►अमेरिकेची भूमिका, वॉशिंग्टन, १२ नोव्हेंबर – बांगलादेशातून म्यानमारला रोहिंग्यांचे…

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

लंडन, १० नोव्हेंबर – घोटाळ्याच्या गर्तेत अडकलेल्या पंजाब नॅशनल…

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

►भारत, पाक व तालिबान एकाच मंचावर, मॉस्को, ९ नोव्हेंबर…

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…

पुन्हा भारनियमनाचे चटके नाही

पुन्हा भारनियमनाचे चटके नाही

►ऊर्जामंत्री बावनकुळे यांची ग्वाही, नागपूर, ११ नोव्हेंबर – राज्यात…

सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री

सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री

►हत्तीसारखे डौलाने चाला, टीकेची पर्वा करू नका ►नितीन गडकरी…

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक » तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने |

आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यात मोदीजी कमालीचे यशस्वी ठरले आणि तेही, ना आँख झुका के, ना आँख उठा के, बल्की आँखों मे आँख डाल के! बरोबरीच्या नात्याने! सार्‍या जगभर भारताची दखल घेतली जात आहे, ही भावना तरुणाईला हजार हत्तीचे बळ देत आहे. विरोधकांकडून मोदी सरकारच्या कामाची दखल घेणे तर सोडाच, पण त्यांच्याकडून कुठलेही सहकार्य मिळत नसताना काम करणे सोपे नाही.

Pm Modi Indian Flag

Pm Modi Indian Flag

१५ ऑगस्ट २०१८ रोजी प्रातःकाळी लाल किल्ल्याच्या प्राचीवरुन राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सरकारचं प्रगतीपुस्तक जनतेसमोर सादर करतील आणि १५ ऑगस्ट २०१९ रोजी त्याच ठिकाणी त्यांचा रुद्रावतार सार्‍या देशाला बघायला मिळेल! सारा भारत आणि जगतसुध्दा, त्या दिवसाची आतूरतेने वाट बघत आहे. मोदी सरकारची ही कारकीर्द गेल्या कित्येक वर्षाची घाण साफ करता करता, राष्ट्राला सकारात्मक दिशेने कार्यप्रवण करण्यातच निघून गेली. आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यात मोदीजी कमालीचे यशस्वी ठरले आणि तेही, ना आँख झुका के, ना आँख उठा के, बल्की आँखों मे आँख डाल के! बरोबरीच्या नात्याने! सार्‍या जगभर भारताची दखल घेतली जात आहे, ही भावना तरुणाईला हजार हत्तीचे बळ देत आहे. विरोधकांकडून मोदी सरकारच्या कामाची दखल घेणे तर सोडाच, पण त्यांच्याकडून कुठलेही सहकार्य मिळत नसताना काम करणे सोपे नाही. रात्रीच्या काळोखात काय घडलं, हे सूर्योदयानंतर रवीकिरणं तिथं पोहचल्यानंतर जसं लक्षात येतं, अगदी तसंच, मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर पूर्वसूरींची एक एक कारस्थानं समोर येऊ लागली आणि सारा देश अचंबित होऊन बघत राहिला. एखाद्या अंधार्‍या गुहेत प्रखर प्रकाशझोत टाकल्यानंतर, छताला लटकलेल्या वटवाघळांची जशी सैरभैर अवस्था होते, तशी अवस्था मोदी विरोधकांची झाली आहे. मोदींना विरोध करता करता आपण देशहितविरोधी कधी झालो, याचे भानही मोदी विरोधकांना नाही. त्यांनी कितीही आदळआपट केली, तरी त्यांचा कपाळमोक्ष ठरलेलाच आहे. ही तर सुरुवात आहे. नजिकच्या भविष्यकाळात भल्याभल्यांचे वस्त्रहरण होणार आहे. कित्येकांना तर तोंड लपवायलाही जागा सापडणार नाही, वर तोंड करुन बोलायची तर बातच सोडा. कधीकाळी संपुआ सरकारमध्ये रेल्वेमंत्री असलेले लालुप्रसाद यादव नामांकित व्यवस्थापन संस्थांमधून विद्वत्ताप्रचूर(?) व्याख्यानं देत फिरायचे! इतरांना म्हणजे हिंदुत्ववाद्यांना कस्पटासमान लेखायचे! कोळशाने काळे झालेले हात पाण्याने धुऊन स्वच्छ होतीलही सुशीलकुमारजी, परंतु चारित्र्याला लागलेला डाग आयुष्यभर धुतला जात नाही. शहीद तुकाराम ओंबाळे यांनी प्राणाची बाजी लाऊन कसाबला पकडले नसते, तर हिंदुंना बदनाम करायचे कुटील कारस्थान यशस्वी झाले असते. त्यासाठीच तर कसाबच्या हातात सिध्दी विनायकाच्या भगव्या दोर्‍याचा जुडगा बांधला होता ना? कसाबच्या प्रेताची ओळख पटवताना त्याच्या हातातल्या दोर्‍यावरुन त्याला हिंदू घोषित करणे अवघड नव्हते. सर्व जय्यत तयारी झाली होती. पवित्र शुक्रवारी, नमाजाच्या वेळी, मुसलमान मशिदीत बॉम्बस्फोट कसा काय करतील? असा बिनतोड सेक्युलरी सवाल करत त्यात हिंदुंना गोवण्याचा हिकमती डाव टाकण्यात आला होता. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंग, स्वामी असिमानंद यांच्यावर कुभांड रचून त्यांना आत टाकलेले होते. आयुष्याची बहुमोल नऊ वर्षे त्यांना तुरुंगात नरक यातना दिल्या गेल्या, नसलेला हिंदू आतंकवाद सिध्द करण्यासाठी! परधर्म सहिष्णुतेसाठी युगानूयुगे जगभर प्रसिध्द असलेल्या निष्कलंक हिंदू समाजपुरुषावर हिंदू आतंकवाद, हिंदू अतिरेकी यासारखे लांछनास्पद आरोप करणार्‍यांना, हिंदू समाजपुरुष कधीही क्षमा करु शकणार नाही. ज्या हिंदभूमीने जगातल्या बहुतेक धर्मावलंबीयांना मायेने आपल्या कुशीत घेतले, त्या भरतभूची हिंदू लेकरं असहिष्णू, आतंकवादी, कशी होवू शकतील? आणि त्यांच्यावर तशी वेळ कुणी आणलीच, तर त्यांच्यासमोर जगात कुणाचाही निभाव लागणार नाही!
मोदीद्वेषाने पछाडलेले विरोधक पूर्णपणे नकारात्मक भूमिकेत गेले आहेत. मोदीविरोधात त्यांनी रचलेले प्रत्येक षडयंत्र त्यांच्यावरच बुमरँग होत आहे. रोहित वेमुला प्रकरणापासून ते घुसखोरांपर्यंत! आपण जरा जनावरांच्या गोठ्यात जाऊन झोपा आणि या घुसखोराला तुमच्या पडवीत पलंगावर झोपु द्या, असं तुम्ही घरमालकालाच सांगु लागलात, तर हातात दांडकं घेऊन आधी तो तुमचं तंगडं तोडील आणि नंतर घुसखोराला पिटाळून लावील! भूमीपुत्रांच्या जीवावर उठलेल्या रोहिंग्या, बांग्लादेशी घुसखोरांना पाठीशी घालणार्‍या राजकीय पक्ष, संघटना यांना कायमचा धडा शिकविण्याचा संकल्प या स्वातंत्र्यदिनी करुया! बाह्य आणि अंतर्गत शत्रूंपासून मातृभूमीचे संरक्षण करणे आपले परम कर्तव्य आहे. काश्मिरी पंडीत, आसामी, बंगाली भूमीपुत्रांच्या पाठीशी भारतीयांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. आज ते जात्यात आहेत आणि आपण सुपात आहोत. घुसखोरमुक्त भारत कार्यात जे आडवे येतील, त्यांना आडवे करुन पुढे वाटचाल करावी लागेल. अन्यथा उद्या घुसखोर सत्ताधारी होतील आणि आपले जगणे-मरणे त्यांच्या हातात असेल!
चार दिवसांसाठी आलेला पाहुना आपल्याला पाचव्या दिवशी जड होतो, तिथे हे फुकटे घुसखोर भारतीयांनी आणखी किती दिवस पोसायचे? भारतात थांबलेल्या मुसलमानांना तिकडे जायचे नव्हते, तिकडच्या मुसलमानांना भारतात यायचे होते, तर मग धर्माच्या आधारावर वेगळा मुल्क कशासाठी मागुन घेतला यांनी? संपूर्ण लोकसंख्या अदलाबदलीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रस्ताव काँग्रेसने का स्विकारला नाही? यांना भारताची पुन्हा फाळणी करायची आहे की काय? बांग्लादेशी, रोहिंग्या आणि पाकिस्तानी घुसखोरांची भारतातली संख्या अंदाजे दोन कोटी असावी, असा संशय आहे. याचा अर्थ भारताच्या पोटात एक शत्रूराष्ट्रच आकाराला येत आहे! सीमेपलिकडील शत्रूशी दोन हात करणे एकवेळ सोपे असते, कारण तो समोरुन वार करत असतो. परंतु आपल्यासारख्या लोकशाहीप्रधान देशात अंतर्गत शत्रूशी लढणे फार अवघड असते, कारण तो पाठीमागून वार करत असतो. चीनसारखा साम्यवादी देश आपल्याच विद्यार्थ्यांवर रणगाडे घालु शकतो, पण आपण सैनिकांवर दगडफेक करणार्‍या पोरांना हातही लाऊ शकत नाही! चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी युध्द पेटले आणि ऐन मोक्याच्या, तशा प्रसंगी, देशांतर्गत शत्रूंच्या तिसर्‍या आघाडीने उठाव केला, तर केवढा अनावस्था प्रसंग ओढवेल देशावर? त्यामुळे इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा, अशीच कठोर भूमिका भारताला घ्यावी लागणार आहे. घुसखोर, त्यांचे सहानुभूतीदार आणि त्यांचे आश्रयदाते यांच्यावर बहिष्कार घालुन हल्लाबोल करायची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी भारतीय मतदारांना आपल्या मताधिकाराचा ब्रह्मास्त्रासारखा वापर करावा लागणार आहे. ब्रह्मास्त्र अयोग्य ठिकाणी वापरले, तर ते वापरणार्‍यांचाच सर्वनाश घडवून आणत असते, याचा विसर पडता कामा नये.
जसं पाकिस्तान, बांग्लादेश यांना धार्मिक आधारावर स्वातंत्र्य मिळालं, तसं भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही. आमच्या आधीच्या अनेक पिढ्यांनी त्याचे मूल्य चुकते केले आहे. सिंधुमधून वाहिलेल्या हिंदुंच्या रक्ताने सिंधुसागर आणि गंगेमधून वाहिलेल्या त्यांच्याच रक्ताने गंगासागर, लालेलाल झाले होते. असंख्य क्रांतीकारक हसत हसत बलीवेदीवर चढले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या आयुष्याचा यज्ञकुंड पेटवून त्यात स्वदेहाच्या समिधा टाकत होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या ललकार्यांनी ब्रिटीश साम्राज्य हादरले होते. मोहनदास करमचंद गांधी या फाटक्या देहयष्टीच्या फकीरासमोर इंग्रज थरथर कापत होते. या सर्वांनी आपल्या सर्वस्वाची आहुती कशासाठी दिली असेल? भावी पिढ्यांना स्वतंत्र भारतात श्‍वास घेता यावा म्हणूनच ना? भारत तेरे टुकडे होंगे, इन्शा अल्ला, इन्शा अल्ला; भारत के बरबादी तक, जंग चलेगी, जंग चलेगी … अशा देशद्रोही घोषणा देणार्‍यांना, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांचे समर्थन करणार्‍यांना आणि हे सारं निमूटपणे सहन करणार्‍या तमाम नेभळटांना शरम वाटली पाहिजे. काश्मिर मांगे आझादी, केरला मांगे आझादी! धर्मांतराच्या, दहशतवादाच्या जीवावरच ना? शरम वाटली पाहिजे यांच्या समर्थकांना. आसाम मांगे आझादी, बंगाल मांगे आझादी! घुसखोरीच्या जोरावरच ना? आसाम आणि बंगाली भूमीपुत्रांच्या घरात घुसलेल्या परकीय घुसखोरांची हिरिरीने बाजू घेणार्‍या देशद्रोह्यांना लाज कशी वाटत नाही? घुसखोरांसाठी संसदेसह सारा देश वेठीला धरता? घुसखोरांसाठी धाय मोकलून रडणार्‍या जयचंदांनो, विस्थापित काश्मिरी पंडीतांसाठी तुमच्या तोंडातून कधी सहानुभूतीचा एक शब्द बाहेर पडत नाही? भारताला घुसखोरांची धर्मशाळा करुन टाकायची आहे की काय तुम्हाला? प्रामाणिकपणे कर भरणार्‍या भारतीयांनी ही विदेशी बांडगुळं का पोसावीत? तुम्हाला मिळणार्‍या त्यांच्या एकगठ्ठा मतांसाठी? अरे, पण घुसखोर शिरजोर झाल्यानंतर, आज त्यांचं जे समर्थन करत आहेत, त्यांनाही ते हुसकावून लावतील! मग जाणार कुठे? अरबी समुद्रात उड्या टाकून जीव द्यावा लागेल! जयचंद राठोडचं काय झालं होतं? आठवतय ना?
साठच्या दशकात बिमला प्रसाद चालिहा आसामचे मुख्यमंत्री होते. १९५१ नंतर आसामात अवैद्दरित्या प्रवेश केलेल्या मुसलमानांना; ज्यातले बहुसंख्य पाकिस्तानी मुसलमान होते; आसामबाहेर काढण्यासाठी त्यांनी एक जबरदस्त अभियान सुरु केले होते. आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्याने सुरु केलेल्या देशहितकारी अभियानावर नेहरुजी मात्र नाराज होते. साहजिकच आहे. पाकिस्तान आणि भारतातल्या मुसलमानांचे पालकत्व नेहरुंजीकडे होते ना! मग हिंदुंची वाट लागली, तरी बेहत्तर! बिमला प्रसाद यांनी आसाम विधान परिषदेत एक प्रस्ताव सादर केला. पाकिस्तानी घुसपैठ रोकथाम अधिनियम १९६४! आसाम विधानसभेतील २० मुस्लिम आमदारांनी बिमला प्रसाद सरकार पाडायची धमकी दिली. दिल्लीवरुन त्यांना तशी फूस दिली गेली असावी! मुख्यमंत्री बिमला प्रसाद यांचा प्रस्ताव पुढे सरकू शकला नाही. घुसखोरांची हिंमत मात्र वाढली. त्यानंतर जवळजवळ ३० वर्षांनी हितेश्‍वर सायकिया आसामचे मुख्यमंत्री झाले. हे ही काँग्रेसचे वजनदार नेते होते. आसाममध्ये २० ते ३० लाख बांग्लादेशी घुसखोर असल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. त्यावर चिडलेल्या अब्दुल मुहीब मुजुमदार यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम फोरमने पाच मिनिटात हितेश्‍वर सायकिया सरकार पाडायची धमकी दिली. खुर्ची जाईल म्हणून घाबरलेल्या सायकियांना, आसाममध्ये एकही बांग्लादेशी घुसखोर नाही, अशी अधिकारिक घोषणा करावी लागली. दिल्लीवरुन त्यांना तसा आदेशही आला असावा, कारण काँग्रेसचा कुठलाही मुख्यमंत्री कधीही स्वयंभू नसतो! त्यानंतर आसाम विधानसभेत बांग्लादेशी घुसखोरांविरुध्द बरेच दिवस कुणी आवाजच उठवला नाही. बांग्लादेशी घुसखोरांविरुध्द बोललं तर दिल्लीश्‍वर काँग्रेस श्रेष्ठींची खप्पा मर्जी होते, त्यापेक्षा घुसखोरांना सर्व सोयीसुविधा पुरवून श्रेष्ठींना खूष करायचा आत्मघातकी मार्ग आसामी काँग्रेस नेत्यांनी स्विकारला. २०१२ साली आसामात भयंकर दंगल उसळली. राजाश्रय लाभलेल्या बांग्लादेशी घुसखोर मुसलमानांनी भूमीपुत्र असलेल्या जनजातीय बोडोंचे शिरकाण सुरु केले. तत्कालिन मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी बोडोंवरील अत्याचाराचा निषेध केला, पण त्यांनाही त्यांच्या पूर्वसूरींच्या मार्गानेच जावे लागले. विकीलिक्सने केलेल्या गौप्यस्फोटावरुन हे उघड आहे की सोनिया गांधी यांच्याही मनात घुसखोरांविषयी एक जिव्हाळ्याचा हळवा कोपरा आहे. घुसखोरी प्रकरण काँग्रेसचे अनौरस अपत्य आहे आणि मोदी सरकारने त्यालाच बेदखल करायचा विडा उचलला आहे! सोनिया काँग्रेसची तगमग तर होणारच ना!
सीमा पार करुन दक्षिण कोरियात घुसलेल्या अवैध घुसखोराला १२ वर्षाचा सश्रम कारावास दिला जातो. इराणमध्ये अनिश्‍चित कालावधीसाठी कोठडीत डांबले जाते. अफगानिस्तानात सरळ गोळी घातली जाते. चीनमध्ये घुसखोराला एकदा ताब्यात घेतले, की पुढे कधीच त्याचा ठावठिकाणा लागत नाही. क्युबामध्ये राजकीय षडयंत्र, हेरगिरीसारखे आरोप ठेऊन काळकोठडीत रवानगी केली जाते. भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने याच आरोपांखाली फाशीची शिक्षा ठोठावली आहे. जगातल्या बहुतेक देशात घुसखोरांसाठी कठोर शिक्षा करणारे कायदे आहेत. तिथे घुसखोरांना शिक्षा करु नका म्हणून भारतातल्यासारखं कुणी रडत नाही, कारण त्यांच्यासाठी देशहित सर्वप्रथम असते! आपल्या भारतात मात्र घुसखोरांसाठी, त्यातही पाकिस्तानी, बांग्लादेशी, रोहिंग्या मुसलमानांसाठी पायघड्या घालणार्‍या राजकीय जमाती कार्यरत आहेत. आसाममध्ये काँग्रेस आणि बंगालममध्ये आधी कम्युनिस्ट आणि आता ममता बॅनर्जी! स्थानिक आसामी, बंगाली किंवा इतर प्रांतातून तिकडे गेलेल्या भारतीयांना तिथे शिधापत्रिका लवकर मिळणार नाही, पण घुसखोर मात्र मतदार यादीत जाऊन बसतात आणि निवडूनही येतात.
आसाम प्रांतातील अवैद्द घुसखोरांना हुडकून त्यांची हकालपट्टी करण्यासाठी १९८५ साली राजीव गांधी यांच्या सरकारने आसाम करार केला होता, पण काँग्रेसी सरकारांनी त्याची अंमलबजावणी मात्र केली नाही. कारण काँग्रेसच घुसखोरांची आश्रयदाती आहे! सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली केंद्रातले मोदी सरकार आणि आसामातले भाजपा सरकार या राजीव कराराची काटेकोर अंमलबजावणी करत आहेत, तर त्यातही काँग्रेसी मंडळी अडथळे आणत आहेत. ३१ जुलै २०१८ रोजी जाहीर झालेल्या राष्ट्रीय नागरिकता नोंद पुस्तिकेनुसार आसामातले ४० लाख घुसखोर आपण आसामस्थित भारतीय नागरिक असल्याचे पुरावे सादर करु शकले नाहीत! त्यांना आणखी काही महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यानंतर घुसखोरांना निष्काशित करायची कारवाई रीतसर सुरु होईल. आसामातले आपले हक्काचे ४० लाख मतदार कमी होणार म्हणून काँग्रेस आजच हादरुन गेली आहे! राष्ट्रीय नागरिकता नोंद पुस्तिकेचे लोण बंगालपर्यंत पोहचले, तर स्थानिक बंगाली माणूस आपल्याला फेकून देईल, म्हणून ममता बॅनर्जी भेदरल्या आहेत. त्यांचा ताळतंत्र सुटल्यामुळेच त्या गृहयुध्दाची धमकी देत आहेत. आपल्या राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रहिताला तिलांजली देणार्‍या राजकीय पक्षांना भारतीय मतदारांनी वेचून बाजुला सारले पाहिजे. केंद्रात मोदी सरकार आणि आसामात सोनोवाल सरकार नसते, तर आसामात अवैध घुसखोर किती आहेत, हे देशाला कळलेच नसते! राष्ट्रीय नागरिकता नोंदणी उपक्रम सार्‍या देशासाठी लागु केला पाहिजे आणि त्यासाठी घुसखोर समर्थक राजकीय पक्षांना मतदारांनी सत्तेपासून चार कोस दूरच ठेवले पाहिजे. लुटारुंसाठी भारताची धर्मशाळा होऊ द्यायची नसेल, आपण स्वकष्टाने बांधलेल्या घरात आपल्या पुढच्या पिढ्या सुखाने नांदाव्यात असे वाटत असेल, तर भारताची सत्तासूत्रं घुसखोर समर्थकांच्या, परराष्ट्र धार्जिन्या शक्तींच्या हातात जाणार नाहीत, याची काळजी घेतलीच पाहिजे.
हे माँ भारती, तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहे ना रहे!

Posted by : | on : 12 Aug 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक (254 of 1134 articles)

Mamata Banerjee2
जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या गैरकारभारानेच त्यांना आसाममध्ये उपरे ठरवलेले आहे आणि आता ममता त्यांच्या न्यायासाठी गळा ...

×