ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » ‘तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?’

‘तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?’

॥ प्रासंगिक : शोभा फडणवीस |

गेल्या ३० वर्षांत नक्षलवाद्यांनी घातलेला धुमाकूळ, चालविलेले हत्यासत्र, त्यांनी सुरू केलेला नरसंहार, पोलिसांवर केलेले अत्याचार, क्रूरतेने घेतलेले त्यांचे बळी, बॉम्बस्फोट, सुरुंगस्फोट याकडे मात्र कुणाचे लक्ष नाही. अशा प्रसंगात साधी भेट आम्हाला कुणी दिली नाही! ‘‘राधासुता! तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?’’ असे म्हणण्याची वेळ आमच्यावर आली. खरेतर सध्या अटकेत असलेले वरवरा राव असेल, गौतम नवलखा असेल, सुधा भारद्वाज, वेर्नन गोन्साल्विस, अरुण परेश यांचा पूर्वइतिहास तपासून जर यांनी मदतीचा हात पुढे केला असता, विचार केला असता तर? परंतु, इथेतर ‘एकाच माळेचे मणी, मोजायला नाही कुणी!’ असे म्हणण्याची वेळ आमच्यावर आली नसती.

Naxal1

Naxal1

शहरी नक्षलवाद्यांविरुद्ध पुणे पोलिसांनी कारवाईपुसुरू केल्याबरोबर सर्व विरोधी पक्ष, वकील, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, स्वयंघोषित समाजसेवक, मानवाधिकाराचे पदाधिकारी… सगळे एकावेळी त्यांच्या मदतीला धावून आले! हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट इथे केसेस टाकायला वकिलांची टीम तयार झाली. एवढे कशास, पोलिसांना त्यांच्याजवळ असलेले पुरावे कोर्टात पेश केल्यानंतर जर हे सर्व त्यांच्या पाठीशी उभे राहिले असते, तर ते सयुक्तिक होते. परंतु इथे तर सगळी घाईच! कशासाठी? कुणाच्या मदतीकरिता?
हे सर्व बघितल्यानंतर मला अतिशय वाईट वाटले. कारण गेल्या ३० वर्षांत नक्षलवाद्यांनी घातलेला धुमाकूळ, चालविलेले हत्यासत्र, त्यांनी सुरू केलेला नरसंहार, पोलिसांवर केलेले अत्याचार, क्रूरतेने घेतलेले त्यांचे बळी, बॉम्बस्फोट, सुरुंगस्फोट याकडे मात्र कुणाचे लक्ष नाही. अशा प्रसंगात साधी भेट आम्हाला कुणी दिली नाही! ‘‘राधासुता! तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?’’ असे म्हणण्याची वेळ आमच्यावर आली.
खरेतर सध्या अटकेत असलेले वरवरा राव असेल, गौतम नवलखा असेल, सुधा भारद्वाज, वेर्नन गोन्साल्विस, अरुण परेश यांचा पूर्वइतिहास तपासून जर यांनी मदतीचा हात पुढे केला असता, विचार केला असता तर? परंतु, इथेतर ‘एकाच माळेचे मणी, मोजायला नाही कुणी!’ असे म्हणण्याची वेळ आमच्यावर आली नसती.
हीच तत्परता यांनी आमच्या आदिवासींच्या मुलांबद्दल दाखविली असती, तर आम्हाला आनंदच झाला असता. काय दोष होता त्या मुलांचा, की वर्षोंन्वर्ष ते जेलमध्ये आहेत. कुठे नागपूर जेल, कुठे सिरोंचा, कुठे भामरागड, कुठे एटापल्ली. या गरीब आदिवासींनी कधी नागपूर पाहिलेले नाही, अशा गरीब आदिवासींची तरुण मुले जेलमध्ये टाकण्याचे पाप कुणी केले, तर काँग्रेसच्या राज्यात घडले! काय होता त्यांचा गुन्हा? तर त्यांनी नक्षलवाद्यांना जेवायला घातले, पाणी पाजले, बसायला खाट दिली. त्यामुळे त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध, बस्स! करा अटक, टाका जेलमध्ये, थोपटून घ्या स्वत:ची पाठ! आम्ही इतके नक्षलवादी पकडले! कायपण शौर्य!
मी एकदा विधानसभेत, या मुलांना सोडण्याकरिता भाषण करीत असताना, तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांना विचारले की, समजा १० नक्षलवादी बंदूक घेऊन तुमच्या घरात घुसले व त्यांनी जेवण मागितले तर तुम्ही काय कराल? जिवाच्या भीतीने जेवण वाढाल ना! मग त्या आदिवासींचे काय चुकले? का त्यांना शिक्षा? सांगा? त्या वेळी जर आजच्यासारखी वकील, प्राध्यापकमंडळी आमच्या आदिवासींच्या पाठीशी उभी राहिली असती, तर आम्ही त्यांचं स्वागतच केलं असतं. परंतु, असे घडले नाही. कारण आमचा आदिवासी या पाच विद्वानांसारखा नाही म्हणून? किंवा तो नक्षलवाद्यांच्या बाजूने उभा राहू शकत नाही म्हणून? हेच खरे!
आदिवासी मुलांना जबरदस्ती नक्षलवादी चळवळीत सामील करून घेण्यासाठी नक्षलवाद्यांनी चळवळ सुरू केली. तेव्हा आदिवासींनी आपली मुले नक्षलवाद्यांपासून वाचविण्याकरिता बाहेर जिल्ह्यात पाठविली. आजही ३५०० मुले गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर आहेत. त्यांना वाचविण्याकरिता जर ही तथाकथित मंडळी पुढे आली असती, तर आज जे गडचिरोली जिल्ह्याचे भयावह चित्र आहे ते नसते! परंतु, तसे घडले नाही. गरिबांच्या पाठीशी कुणी उभे राहात नाही! कारण त्यांचा भूतकाळ साधा आहे. त्यावर नक्षली कृत्याचा डाग नाही. म्हणून त्यांच्या मदतीला कुणी आले नाही, हेच खरे!
गडचिरोली जिल्ह्याचा नक्षल इतिहास हा आजचा नाही, १९८० पासून नक्षल्यांंचे वास्तव्य गडचिरोलीत सुरू झाले. १९८३ ला अमरारी (अमरावती) ता. सिरोंचा येथील सत्यनारायण राजू रुद्र या शिक्षकाने नक्षलवाद्यांना पकडून दिले. पोलिसांनी केस केली, परंतु तत्कालीन खासदार व सिरोंचाचे तत्कालीन आमदार यांनी त्यांना सोडविण्याकरिता पूर्ण प्रयत्न केले व ते सुटले. त्यानंतर त्यांनी सत्यनारायण राजू रुद्र या शिक्षकाचा, त्यांच्या घरात शिरून ३ ऑक्टोबर १९८३ ला त्यांच्या कुटुंबाला खोलीत कोंडून उजवा हात तोडला. काय गुन्हा होता त्याचा? कोण गेले त्याच्या मदतीला? खासदार, आमदार तरी भेटीला गेले काय? नाही! नक्षलवाद्यांच्या मागे त्यांना सोडविण्याकरिता उभे राहणारे लोप्रितिनिधी या शिक्षकाच्या मदतीला येणार तरी कसे? तिथून हे दहशतीचे सत्र सुरू झाले.
पूर्वी सुरुवातीला गावाची सभा बोलवायचे. त्यात पोलिसांचा खबर्‍या म्हणून सरपंच असो, पोलिस पाटील असो, गावातला कोणीही असो, शिक्षक असो, त्याला गुन्हेगार म्हणून उभे करायचे व लोकांना विचारायचे, याला काय शिक्षा द्यायची? गोळ्या घालून मारायचे. जनता घाबरलेली असायची. ती बोलना. मग मूक संमती धरून त्याला भर चौकात मारायचे व दहशत निर्माण करायची! त्या वेळी तथाकथित समाजसेवक का मदतीला आले नाहीत? कोणीच हा प्रश्‍न त्या वेळी उचलला नाही. आदिवासी, गरीब गावकरी हा अन्याय, अत्याचार सहन करायलाच जन्माला आला काय, हेच समजत नाही.
१९८५ पासून सुरू झालेल्या या क्रूर संहारात २०१८ पर्यंत ५१२ आदिवासी, मागासवर्गीय, बंगाली, ओबीसी, इतर, इंजिनीअर, ड्रायव्हर, वनरक्षक, सरपंच, पोलिस पाटील, कोतवाल, कार्यकर्ते मारले गेलेत. हा आकडा छोटा नाही. फक्त तो आदिवासी पाड्यातला आहे. त्यांच्या पाठीशी कुणी गॉडफादर नाही. सर्व नक्षलवाद्यांना पूजणारे होते, असे म्हटले तर वावगे होणार नाही. क्रूर हत्याकांडात लग्नाचे वर्‍हाड सुटले नाही. शाळेचे विद्यार्थी सुटले नाहीत, की सामान्य नागरिक, कंत्राटदार सुटले नाहीत.
पोलिस स्टेशन, धानोरा पोमके मुरुमगाव इथून दि. ५-५-२०११ ला मनोराम अनंतकुमार सरकार, रा. गौरीपूर (छत्तीसगड) हे लग्नाचे वर्‍हाड घेऊन राजनांदगाव, चंद्रपूर, गडचिरोली मार्गे जात असताना धानोरापासून २२ कि. मी.वर अज्ञात नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाद्वारे स्फोट घडवून आणला. त्यात ६ जण ठार व ४ लोक जखमी झाले. काय दोष होता त्यांचा? काय मदत मिळाली त्यांना? कोण त्यांच्या दु:खात सहभागी झाले? शहरी नक्षलवाद्यांच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा, आदिवासींच्या पाठीशी उभे राहिलात तर नक्षलवाद संपू शकतो! अशी भरपूर उदाहरणे मी देऊ शकते, परंतु वेळ जातो. पोलिस आमचे रक्षक! स्वत:चा जीव धोक्यात घालून नक्षलवादी विभागात बंदोबस्ताला कार्यरत असतात. ते खरे नक्षलवाद्यांचे शत्रू. त्यांच्यावर होणारे नक्षल हमले हे क्रूरतेचे प्रतीक आहे. इतक्या क्रूरतेने हे कसे वागू शकतात, हेच कळत नाही? अतिशय क्रूरतेने हिंसाचारात बळी पडलेल्या व क्रूरतेचा नमुना असलेला प्रसंग सांगते :
दि. २१-०५-२००९ रोजी भा. क. पा. माओवादी ग्रुपच्या वतीने निषेधसप्ताह व दंडकारण्य, विदर्भ बंदचे आवाहन केल्याने, पो. स्टे. धानोरा येथील पोलिस निरीक्षक अय्यर, सह १ पो. उपनि. व १४ पोलिसजवान २ शासकीय वाहनांनी नक्षलविरोधी पेट्रोलिंग करीत असताना अंदाजे ४ वाजताच्या सुमारास एक मोबाईल कॉल आला. ते टीम घेऊन जात असताना हत्तीगोटा पहाडीसमोर येरकड ते मुरुमगाव रोडवर टिपागड प्लाटून कंपनी दलमच्या सुमारे १५० ते २०० बंदूकधारी नक्षलवाद्यांनी पोलिस पार्टीवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात २ अधिकारी, १४ कर्मचारी असे पोलिस शहीद झाले. परंतु, नक्षलवाद्यांनी नंतर त्यांच्या शरीराची विटंबना केली. शरीराचे अवयव कापून खिशात व तोंडात कोंबले. त्यातील एक महिला पोलिस प्रेग्नंट होती. तिच्या पोटावर गोळीबार करून तिच्या गर्भाच्या चिंधड्या करून आनंद व्यक्त केला. त्या वेळी मी, काही पत्रकार यांनी निषेध नोंदवून एक मॅसेज आंदोलन सुरू केले. त्यानंतर नक्षलवाद्यांनी, आम्ही असे केले नाही व भविष्यात करणार नाही म्हणून मॅसेज दिले. या भयानक हत्याकांडात व क्रूरतेचा भयावह प्रकार पाहून तेथील जनता घाबरली, परंतु त्याच्या चौकशीसाठी मानवाधिकाराचे पदाधिकारी आले नाहीत, शहरी भागातील तथाकथित समाजसेवक आले नाहीत, त्यांच्या केसेस चालविण्यासाठी वकिलांची फौजच काय, वकीलसुद्धा आले नाहीत! याला माणुसकी म्हणायची काय? ज्यांची पार्श्‍वभूमी नक्षलवाद्यांशी जुळलेली आहे, त्यांच्यासाठी धावाधाव बघून आम्हाला आश्‍चर्य वाटले.
नक्षलवाद्यांच्या तडाख्यातून आश्रमशाळाही सुटली नाही. तेथील ३ विद्यार्थी व इतर २ बॉम्बस्फोटाने मेले व ९ विद्यार्थी जखमी झाले. ही गोष्ट आहे पो. स्टे. धानोरा मुरुमगांव येथील दि. ०८-१०-२०१० ची. महाराष्ट्रAछत्तीसगढ सीमा भागात आय. टी. बी. पी.चे पोलिस गस्त घालत असताना ५० ते ६० बंदूकधारी नक्षलवाद्यांनी आधीच पेरून ठेवलेला भूसुरुंगस्फोट होऊन त्यात आय.टी.बी.पी.चे ३ पोलिस जवान शहीद व १ पो. कर्मचारी जखमी झाला. त्यानंतर पोलिस व नक्षल यांच्यात चकमक झाली. त्यानंतर ते पळून गेले. जाताना गोळीबार व बॉम्ब फेकत ते जात असताना १ बॉम्ब आश्रमशाळेसमोर फेकला. त्यात ३ विद्यार्थी जखमी झाले. त्याही वेळी कुणी मानवाधिकाराचे पदाधिकारी चौकशीला आले नाहीत. मरणारे विद्यार्थी आदिवासी होते व जखमीपण आदिवासीच होते. कुठे गेले शहरी नक्षलवाद्यांचे समर्थन करणारे तथाकथित समाजसुधारक? गरिबांच्या मरणाची काहीच किंमत नाही काय? असा प्रश्‍न पडतो. कुठे गेली यांची समाजाबद्दलची आत्मीयता, कुठे गेले समाजप्रेम, कुठे संपली सहानुभूती, कुठे गेले देशप्रेम…? असे प्रश्‍न निर्माण होतात. मला आठवते, ७ ते ८ वर्षांपूर्वी धानोरा इथे दौर्‍यावर गेले होते. मुक्काम आलापल्लीला होता. रात्री ९ वाजता अहेरीहून जेवण करून निघाले. अहेरी ते आलापल्लीच्या मध्ये भूसुरुंगस्फोट झाला व माझ्या मागची पोलिस गस्तीची गाडी उडवली गेली. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. इथे जिवाची शाश्‍वती नाही, हेच खरे! अशा कितीतरी घटना सांगता येतील, त्याला अंत नाही.
या सगळ्या संहारात केवळ गडचिरोलीच्या, १९८८ ते २०१८ पर्यंत १९४ पोलिसांचा खातमा झाला. शहीद झाले. त्यात जिल्हा पोलिस, एस. आर. पी. एफ., सी. आर. पी. एफ. व इतर पोलिस अधिकारी, हेड कॉन्स्टेबल, पोलिस कर्मचारी, स्वयंपाकी असे मारले गेले. तेव्हा कुणी साधे सहानुभूती दाखवायलाही आले नाही. अन्यायाच्या विरुद्ध लढणार्‍या समाजाला मदत करणार्‍या पोलिसांचे हे हाल बघून वाईट वाटले.
परंतु, ४० नक्षलवादी पोलिसांनी मारले, तर लगेच दुसर्‍या दिवशी मानवाधिकार्‍यांची टीम चौकशीला आली, की नक्षलवादी खरे होते की खोटे? मानवाधिकाराचा वापर कुणासाठी? आदिवासी, मागासवर्गीय, महिला या गरीब व असहाय लोकांना न्याय देण्यासाठी, की मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या पाहणीसाठी, हेच कळत नाही. याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आमच्या आदिवासींनाAगडचिरोलीच्या दुर्गम भागातल्या जनतेला खरंच स्वातंत्र्य मिळालं का? खरंच त्यांच्या आयुष्यात प्रकाशाची किरणं उगवली का? हाच खरा प्रश्‍न आहे. आदिवासींचे गाणे आहेA
थोडा उजेड ठेवा। अंधार फार झाला॥
पणती जपून ठेवा। अंधार फार झाला॥ध्रु.॥
त्यांच्या जीवनात आनंद आणायचा असेल तर ग्रामीण असो की शहरी, नक्षलवाद संपण्याची गरज आहे, एवढेच मला म्हणायचे आहे. याबद्दल पुणे पोलिसांना माझा सलाम! (लेखिका ह्या राज्याच्या माजी मंत्री आहेत)

Posted by : | on : 30 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (261 of 835 articles)

Thali
टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे | दर दोन तासांनी काहीतरी खा, या संकल्पनेला आयुर्वेदाचा कोणताही आधार नाही. आपले पोट म्हणजे ...

×