ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक » तेव्हा वय किती होते?

तेव्हा वय किती होते?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर |

परदेशात अनेक लोकांशी जाहीर संवाद करताना वा मुलाखती देताना राहुलनी आपल्या ज्ञानाची कवाडे इतकी सताड उघडून टाकली, की नंतर चिदंबरम यांच्यापासून थेट सुरजेवाला यांच्यापर्यंत अनेकांना राहुल चौदा वर्षाचा तर होता, असले खुलासे करावे लागले. ब्रिटन येथील संवादात राहुलने अकारण मधमाशांचे मोहळ उठवून दिले. तिथे कोणी त्याला १९८४ च्या शीख हत्याकांडाचा प्रश्‍न विचारला, तर त्याविषयी गप्प रहाणे शहाणपणाचे होते. पण मुळातच शहाणा असलेल्या राहुलने गप्प कशाला रहावे?

Rahul Gandhi1

Rahul Gandhi1

आजी आमच्या लहानपणीच्या उचापतींवर तक्रार करताना मालवणी भाषेत म्हणायची, माजो बाबा काय करी, तर असलेला नाय करी. म्हणजे कुठल्याही गोष्टीची नासाडी केली, मग हे विश्‍लेषण असायचे. अर्थात लहान मुलांविषयी यापेक्षा अधिक तक्रार कोणी करू शकत नाही. कारण समज कमी असलेल्या मुलांकडून आणखी काय अपेक्षा केली जाऊ शकते? सहाजिकच अशा मुलांपासून किंमती वस्तु वा अपायकारक गोष्टी आठवणीने दुर राखल्या जातात. राहुल गांधी पक्षाध्यक्ष झाल्यापासून खुपच आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्या आक्रमकतेमुळे आजीचे ते शब्द हल्ली नेहमीच आठवू लागलेले आहेत. जितके म्हणून राहुल गांधींच्या प्रतिमा संवर्धनाचे काम पक्षाने हाती घ्यावे, तितका हा मुलगा त्यांचे प्रयत्न मातीमोल करून टाकतो. अर्थात त्यात काहीच नवे नाही. दीडदोन वर्षापुर्वी त्याने प्रशांत किशोर या देशातील सर्वोत्तम निवडणूक चाणक्यालाही धुळीस मिळवून दाखवले होते. किंबहूना उत्तरप्रदेश काँग्रेसला एकहाती जिंकून देण्यासाठी रणनिती बनवण्याचे कंत्राट प्रशांतने घेतले, तेव्हाच त्याने आपली अब्रु धुळीस मिळवण्याचा धोका पत्करला आहे, असे भाकित मी केलेले होते. उत्तरप्रदेश विधानसभेसाठी प्रत्यक्ष मतदान होण्यापुर्वीच राहुलने प्रशांतची पुर्ण वाट लावून टाकलेली होती. तेवढ्यावरच भागलेले नव्हते. अखेरचा प्रयास म्हणून प्रशांतने समाजवादी पक्षाशी आघाडी करून बघितली, तर राहुलने आपल्या सोबतच अखिलेश यादवलाही जमिनदोस्त करून टाकले. म्हणूनच आता कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसशी हातमिळवणी करायला अखिलेश राजी होत नाही. तर अशा सर्वज्ञानी पक्षाध्यक्षाला परदेशी नेवून अनिवासी भारतीयांसमोर पेश करण्याचे पाप मुळातच इतर ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचे होते. त्यात राहुलचा काय गुन्हा होता? त्याने आपल्या परीने तिथेही यथेच्छ गोंधळ घातला. त्याच्या वयाला पेलवणारे काम नसेल तर राहुलचा दोष काय?
परदेशात अनेक लोकांशी जाहीर संवाद करताना वा मुलाखती देताना राहुलनी आपल्या ज्ञानाची कवाडे इतकी सताड उघडून टाकली, की नंतर चिदंबरम यांच्यापासून थेट सुरजेवाला यांच्यापर्यंत अनेकांना राहुल चौदा वर्षाचा तर होता, असले खुलासे करावे लागले. ब्रिटन येथील संवादात राहुलने अकारण मधमाशांचे मोहळ उठवून दिले. तिथे कोणी त्याला १९८४ च्या शीख हत्याकांडाचा प्रश्‍न विचारला, तर त्याविषयी गप्प रहाणे शहाणपणाचे होते. पण मुळातच शहाणा असलेल्या राहुलने गप्प कशाला रहावे? गप्प रहायचे नसेल, तर त्याने तिथल्या तिथे तेव्हा आपण अवघे चौदा वर्षाचे होतो आणि बाहेर काय घटना घडतात आपल्याला ठाऊकही नव्हते; असे प्रतिपादन करायला काही अडचण नव्हती. पण आज आपले वय किती आणि शिखांची कत्तल झाली, तेव्हा आपले वय किती होते, त्याचा हिशोब कोणी मांडायचा? सहाजिकच हा प्रयत्न राहुलने यशस्वीरित्या मातीमोल करून दाखवला. ज्यामुळे पक्षाची व राहुलची प्रतिमा उजळ व्हावी म्हणून प्रयत्न केलेला होता, त्यातच त्याने पक्षाला अडचणीत आणुन दाखवले. आता चिदंबरम वा अन्य काँग्रेसी जाणते नेते राहुल दंगलीच्या वेळी अवघा चौदा वर्षाचा असल्याचा खुलासा करीत आहेत. म्हणूनच शिख दंगलीविषयी राहुलला जबाबदार धरणे योग्य नसल्याचीही सारवासारव करीत आहेत. पण हे राहुलला कधी कळायचे? शिवाय आणखी प्रश्‍न असा येतो, की गांधी हत्येच्या वेळी राहुल गांधींचे वय किती होते? कारण शिख हत्याकांडाविषयी राहुल जितकी ठामपणे विधाने करतात, तितक्याच खात्रीपुर्वक ते गांधीहत्येविषयी देखील बोलत असतात. मग गांधीहत्येच्या वेळी राहुलचे वय किती होते? त्याचाही खुलासा चिदंबरम यांच्यासारख्यांनी करायला नको काय? शंभर वर्षापुर्वी कधीतरी अमेरिकेत कोकाकोला बनवणारा माणूस लिंबू सरबत विकत असल्याची इत्थंभूत माहिती राहुलपाशी असते, तर शीख हत्याकांड वा गांधी हत्येचे काय घेऊन बसलात?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रत्येक परदेश दौर्‍यात तिथे कामानिमित्त वा कायमस्वरूपी स्थायिक झालेल्या भारतीयांशी संवाद साधण्याचे तंत्र सुरू केले. म्हणून त्यांना तितकेच समर्थ उत्तर देण्यासाठी काँग्रेसने आपले पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधींनाही तशाच पद्धतीत पेश करण्याचा केलेला प्रयास योग्यच होता. परंतु आपला उमेदवार म्हणजे विनोदाचा बादशहा असल्याचे लपवावे कसे, याचा काँग्रेसच्या चाणक्यांना न सुटलेला प्रश्‍न आहे. सहाजिकच ते जितका म्हणून राहुलची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करतात, तितक्याच वेगाने राहुल आपल्यासह पक्षाची प्रतिमा धुळीस मिळवण्यासाठी राबत असतात. त्यातून मग अशा केविलवाण्या स्थितीत पक्षाला जावे लागत असते. परदेशात राहुलनी अतिशय आत्मविश्‍वासाने बालिशपणा करून दाखवला, त्यासाठी त्यांचे कौतुक करावेच लागेल. तुम्ही पंतप्रधान असता, तर डोकलामचा प्रश्‍न कसा सोडवला असता, असा प्रश्‍न कोणी विचारला. तर राहुलनी अतिशय प्रामाणिकपणे आपल्याला डोकलामविषयी कसलीही माहिती नसल्याचे सांगून टाकले. म्हणजे कुठलाही तपशील वा माहिती नसताना आपण बेछूट आरोप करीत असल्याचे कबुल केले. हा प्रामाणिकपणा कौतुकाचा नाही काय? बाकी पक्ष उघडा पडला हा वेगळा विषय आहे. जर्मनीच्या पंतप्रधान अंजेला मर्केल वा आणखी कुणा राष्ट्रप्रमुखाने राहुलनी मागितलेली भेट नाकारली. कारण असल्या माणसाशी काही खाजगीत बोलले, तर तो बाहेर जाऊन वाटेल तशी मुक्ताफळे उधळण्याची भिती त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. अर्थात त्याची काँग्रेसने पर्वा करण्याचे काही कारण नाही. सवाल देश वा पक्षाचा नसून नेहरू-गांधी खानदानाची भलावण करण्याचा आहे. त्यासाठी काँग्रेस रसातळाला गेली तरी बेहत्तर. समस्या बिचार्‍या पुरोगामी व समविचारी पक्षांसाठी आहे. कारण त्यांना झळ सोसून राहुलचे समर्थन करावे लागते आहे.
कधीकाळी काँग्रेस पक्ष नुसता देशव्यापी संघटनाच नव्हती, तर तिची एक कार्यकारिणीही होती. त्या कार्यकारिणीमध्ये दिग्गज नेते असायचे आणि ते देशासमोरच्या अनेक प्रश्‍न समस्यांवर उहापोह करायचे. पक्षाचीच नव्हेतर देशाची ध्येयधोरणे ठरवण्यासाठी या नेत्यांच्या नियमित बैठका व्हायच्या. त्यात काय चर्चा झाली वा कोणते निर्णय झाले, त्याची माहिती घेण्यासाठी पत्रकारांची झुंबड उडत असे. पण दोन दशकापुर्वी सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या आणि काँग्रेस कार्यकारिणीला फक्त आपल्या अध्यक्ष वा नेत्यांच्या चुका कशा देशहिताच्या आहेत, त्याचे खुलासे देण्यापुरतेच काम शिल्लक राहिले. त्याहीपेक्षा महत्वाचे काम म्हणजे नेत्याच्या नाकर्तेपणाचे गुणगान करून त्यालाच कर्तबगारी ठरवण्याच्या कुशाग्र बुद्धीला कार्यकारिणीत स्थान मिळू लागले. आता तर राहुल गांधी पक्षाध्यक्ष झालेले आहेत. त्यानंतर पक्षाच्या पराभवातला नैतिक विजय समजावून सांगू शकतील, त्यांनाच कार्यकारिणी व संघटनेत महत्वाचे स्थान मिळत असते. सहाजिकच एकूण काँग्रेस कार्यकारिणी व नेतृत्व आता चौदा वर्षाचे होऊन गेलेले आहे. त्या वयातला गोंधळ व धरसोडवृत्तीचा आपल्याला नित्यनेमाने अनुभव येत असतो. या परदेश दौर्‍यात राहुलनी कोणता मुर्खपणा केला, त्याचे खुलासे विचारायला पत्रकारांची झुंबड उडाली आणि सगळी काँग्रेस राहुलच्या चुकांना समजूतदारपणा ठरवण्याच्या कामाला जुंपली गेली. हेच आता पक्षकार्य बनुन गेले आहे. रोजच्या रोज राहुलनी काहीतरी नवा मुर्खपणा करायचा वा मुक्ताफळे उधळायची आणि पक्षाने सारवासारव करण्याचे काम हाती घ्यायचे, हा परिपाठ झाला आहे. चिदंबरम वा तत्सम लोकांची विधाने व खुलासे ऐकले असते, तर इंदिराजी, यशवंतराव, चंद्रभानु गुप्ता किंवा त्या काळातले दिग्गज किती केविलवाणे होऊन गेले असते, त्याची कल्पनाच आंगावर शहारे आणते.

Posted by : | on : 2 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक (530 of 1287 articles)

Maratha Reservation Protest Got Violent
अर्थपूर्ण : यमाजी मालकर | एक दिवस ही वेळ येणारच होती, तशी ती आली आहे. संपत्ती आणि रोजगाराच्या वितरणाची व्यवस्था ...

×