ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » तो राजहंस एक…

तो राजहंस एक…

॥ आदरांजली : दिलीप धारूरकर |

राजहंसाकडे दूध आणि पाणी वेगळे करण्याचा नीरक्षीर विवेक असतो असे म्हणतात, पण अटलजींची झेप त्याच्या पुढची होती. जनतेला त्यांनी, राजकारणातील आणि समाजकारणातील काय स्वीकारायचे आणि काय नाही? हे ओळखण्याचा विवेक शिकवला. भारतीय इतिहासात जनतेच्या मतनिश्‍चितीच्या प्रक्रियेला कलाटणी दिली, हे या राजहंसाचे वेगळेपण आहे. एक अमोघ वक्ता, एक संवेदनशील कवी, एक धीरोदात्त नेता, एक सुहृदयशील राजकारणी, एक कुशल प्रशासक, एक विश्‍वसनीय मुत्सद्दी, शब्दांचे तांडव घडविणारा एक साहित्यिक, ‘हृदय जीतने का निश्‍चय’ मनात घेऊन वागणारा एक कुशल संघटक, देशहित सर्वोपरी ठेवणारा एक जाज्वल्य देशभक्त… अशा अनेक रूपांनी अटलजी जनतेच्या मनात ठसले आहेत. त्यांच्या वक्तृत्वात एक ताकद होती. भाषणाच्या सुरुवातीपासून ते श्रोत्यांच्या मनाची पकड घेत. त्यांचं संस्कृतप्रचुर हिंदी, नर्म विनोदाची शैली अविस्मरणीय होती.

Atalji1

Atalji1

‘सुखाचे सोबती’ या चित्रपटातील ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले व आशाताईंनी गायिलेले-
‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिलू तयांत एक…’
या गाण्याचे सुरेल स्वर कुठेही कानी पडले की, मला प्रत्येक वेळी अटलजी आणि त्यांच्या १३ दिवसांच्या सरकारवरील विश्‍वासदर्शक ठरावावरच्या चर्चेची आठवण येते. त्यावेळचे चित्र अगदी या गीतातील प्रतीकात्मक वर्णनासारखे होते. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एक गैरकाँग्रेसी पंतप्रधान सत्तारूढ झालेले आणि संसदेतील सर्व अन्य राजकीय पक्ष या सरकारवरील विश्‍वासदर्शक ठरावाच्या चर्चेत सरकावर तुटून पडलेले. जातीयवादी, धर्माधिष्ठित राज्य आणू पाहणारे, फॅसिस्ट अशा शेलक्या शब्दांत विरोधक अटलजींच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका करत असलेले. टीकेमध्ये काही तथ्यांश असता, तर लोकांनी मान्यही केले असते. मात्र, टीका करणार्‍यांपैकी अनेक जण यापूर्वी केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षासोबत अगदी मांडीला मांडी लावून अनेकदा बसलेले होते. आज मात्र ते तीव्रपणे विरोधी बोलत होते. सर्वाधिक जागा देऊन जनतेने आपला कल स्पष्ट केला असताना, जनादेशाच्या विरोधात चर्चा चालली होती. भारतीय जनता पक्ष आणि अटलजी यांनी काहीतरी भयंकर पाप केलेेेेेे आहे, अशा थाटात निर्भर्त्सना केली जात होती. या चर्चेत आपल्या भाषणात अटलजी म्हणाले होते की, ‘‘ज्या पक्षाचा केवळ एक खासदार निवडून आला आहे असे पक्षही आमचा विरोध करत आहेत. आम्हाला आरोपीच्या कठड्यात उभे केले जात आहे.’’
त्या वेळी अटलजींनी ‘‘मैं महामहीम राष्ट्रपती महोदय को त्यागपत्र देने जा रहा हूँ,’’ असं सांगून आपलं भाषण संपवलं तेव्हा ही चर्चा पाहणार्‍या प्रत्येकाच्या डोळ्यांत अगदी अश्रू उभे राहण्यासारखी स्थिती होती.
पुढे १३ महिने व नंतर पूर्ण टर्म पंतप्रधान म्हणून यशस्वीपणे अविस्मरणीय कामातून सर्वमान्यता मिळवत अटलजी हे ‘राजहंस’च होते, हे सिद्ध झाले. राजहंसाकडे दूध आणि पाणी वेगळे करण्याचा नीरक्षीर विवेक असतो असे म्हणतात, पण अटलजींची झेप त्याच्या पुढची होती. जनतेला त्यांनी, राजकारणातील आणि समाजकारणातील काय स्वीकारायचे आणि काय नाही? दूध कोणते आणि पाणी कोणते, हे ओळखण्याचा विवेक शिकवला. भारतीय इतिहासात जनतेच्या मतनिश्‍चितीच्या प्रक्रियेला कलाटणी दिली, हे या राजहंसाचे वेगळेपण आहे.
एक अमोघ वक्ता, एक संवेदनशील कवी, एक धीरोदात्त नेता, एक सुहृदयशील राजकारणी, एक कुशल प्रशासक, एक विश्‍वसनीय मुत्सद्दी, शब्दांचे तांडव घडविणारा एक साहित्यिक, ‘हृदय जीतने का निश्‍चय’ मनात घेऊन वागणारा एक कुशल संघटक, देशहित सर्वोपरी ठेवणारा एक जाज्वल्य देशभक्त… अशा अनेक रूपांनी अटलजी जनतेच्या मनात ठसले आहेत. त्यांच्या वक्तृत्वात एक ताकद होती. भाषणाच्या सुरुवातीपासून ते श्रोत्यांच्या मनाची पकड घेत. त्यांचं संस्कृतप्रचुर हिंदी, नर्म विनोदाची शैली अविस्मरणीय होती.
मी महाविद्यालयीन विद्यार्थी होतो. लातूरला दिवसा अभियांत्रिकी कॉलेज आणि रात्री दै. राजधर्ममध्ये पहिल्या पानाचा उपसंपादक, असं चालू होतं. स्वामी विवेकानंद रुग्णालयाच्या संशोधन केंद्राच्या इमारतीचं भूमिपूजन अटलजींच्या हस्ते होतं. राजस्थान विद्यालयाच्या मैदानावर पत्रकार कक्षात मी पहिल्या रांगेतील जागा धरून अटलजींचं भाषण टिपून घेण्यासाठी कानात प्राण आणून ऐकायला बसलो होतो. अटलजी उभे राहिले व पहिलंच वाक्य अत्यंत गंभीरपणे म्हणाले,
‘‘अस्पताल से मेरा बहुत गहरा तालुक हैं.’’ या वाक्यानंतर त्यांनी एक मोठा पॉज घेतला. आमच्या मनात प्रश्‍न उभे राहिले की, यांचा रुग्णालयाशी काय बुवा संबंध असेल? ना हे डॉक्टर आहेत, ना वैद्यकीयक्षेत्राशी संबंधित? मनात हे प्रश्‍न उभे राहतानाच अटलजी अगदी मिस्कील सुरात जोरात म्हणाले की, ‘‘क्योंकि मेरा जनम ही अस्पताल में हुआ हैं.’’
आणि संपूर्ण सभेत हास्याचा गडगडाट झाला. श्रोता आणि वक्ता यांचं एक नातं या विनोदानं निर्माण झालं. पुढचं संपूर्ण भाषण मग वैद्यकीय सुविधा सामान्यातील सामान्य माणसाला कशा मिळाल्या पाहिजेत यावर होतं. राजकारणाचा भाषणात लवलेशही नव्हता.
अटलजी लोकसभेची निवडणूक पराभूत झालेले आणि देशात भाजपाचे अवघे दोन खासदार निवडून आलेले. त्यानंतर १९८६ साली नगर येथे त्यांची वाडिया पार्क मैदानात मोठी सभा झाली. सभेत अटलजींच्या भाषणानंतर कुणी काही ऐकायला थांबणार नाही, या कल्पनेत सभेचे अध्यक्ष ना. स. फरांदे यांचे अध्यक्षीय भाषण, आभारप्रदर्शन आधीच उरकण्यात आले. निधी जमा करून काही लाख रुपयांची थैली अटलजींना देण्यात आली. ‘समाजपुरुषा होई जागृत’ हे वैयक्तिक गीत अरुणराव धर्माधिकारी यांनी अतिशय पहाडी आवाजात गायलं आणि त्या भारलेल्या वातावरणात अटलजी बोलायला उभे राहिले व मिस्कील सुरात त्यांनी भाषण सुरू केलं, ‘‘अध्यक्ष का भाषण हो चुका हैं, धन्यवाद प्रस्ताव भी हो चुका हैं, थैली भी दी जा चुकी हैं.’’ इतकं झाल्यावर हलका पॉज घेऊन जोर देत म्हणाले, ‘‘अब तो बस्स घर जाने के अलावा कुछ नही बचा हैं… !’’ (सभेत प्रचंड हंशा) मग पुढे बंदुकीतून गोळ्या सुटाव्यात तसा वाक्यांचा मारा सुरू झाला, ‘‘मुझे ये समझ में नही आ रहा हैं कि मेरा यह सत्कार क्यों किया जा रहा है? न तो मैं किसी पद पर नियुक्त किया गया हूँ, ना तो मैं पार्टी का अध्यक्ष रह चुका हूँ, ना तो मैं लोकसभा का सदस्य हूँ.’’ असं म्हणून एक हलका पॉज घेत जोर देऊन म्हणाले की, ‘‘हां, संसद का सदस्य न रहने के लिए जरूर ग्वाल्हेर के मतदाता अभिनंंदन के अधिकारी हैं।’’ आपल्याला निवडून न देणार्‍या मतदारांचाही इतका चांगला उल्लेख अन्य कुणी कधी केला नसेल!
सोलापूरला गड्डा मैदानात सभा होती. मी नुकताच नोकरीला सोलापूरमध्ये इंजिनीअर म्हणून लागलो होतो. अटलजींना ऐकायला गेलो. सभा सुरू झाल्यानंतर अटलजी बोलतील, असे सूत्रसंचालकाने घोषित केले. अटलजी उभे राहात असताना सभेतील श्रोत्यांमधून तरुणांनी घोषणा देण्यास सुरुवात केली, ‘‘प्रधानमंत्री की अगली बारी, अटलबिहारी, अटलबिहारी…’’
अटलजी माईकसमोर उभे राहिले तरी घोषणा चालूच होत्या. त्या संपेपर्यंत ते स्तब्ध उभे राहिले. घोषणा संपताच त्यांनी सुरुवात केली ती जरा घुश्शातच. ते म्हणाले, ‘‘माफ करना, मैं उस शर्यत में नही हूँ।’’ पॉज घेऊन पुढे म्हणाले की, ‘‘मैं कार्यकर्ताओं को नाराज करने के लिए यह नही कह रहा हूँ, लेकिन प्रधानमंत्री की कुर्सी पर कौन बैठेगा इस से क्या फर्क पडनेवाला हैं? अगर देश के लोगों को खाने के लिए रोटी नही मिलती, पिने का पानी नही मिलता, गरीबी और अमीरी के बीच के खाई को कम करने की कोशिश नही होती तो प्रधानमंत्री की कुर्सी पर कौन बैठेगा इससे क्या फर्क पडनेवाला हैं? यह कुर्सी की लडाई नही हैं, यह सिद्धांतों की लडाई हैं।’’ राजकारणात प्रवेश करताक्षणी खुर्चीची स्वप्ने पाहण्याच्या काळात ही निरलसता अनोखी होती.
पोखरणचा अणुस्फोट होताच जगभरातून भारतावर आर्थिक निर्बंध टाकले जात होेते. कम्युनिस्ट व अन्य डावे सरकारवर टीकेचा भडिमार करत होते. त्या वेळी ‘अणुचाचणीची अपरिहार्यता’ या विषयावर दिवाळी अंकासाठी मुलाखती घेण्यासाठी मी दिल्लीत गेलो होतो. प्रमोद महाजन यांची मुलाखत घेऊन मी त्यांना ‘‘याच विषयावर अटलजींची मुलाखत मला हवी आहे,’’ असे सांगितले. त्यांनी मला म्हटले की, ‘‘अटलजींच्या कवितेवर गायन केल्याची सीडी निघाली आहे. त्याच्या प्रकाशनाचा फिक्की हॉलमध्ये कार्यक्रम आहे. तू त्या कार्यक्रमाला ये. अटलजी याच विषयावर बोलणार आहेत. कार्यक्रमानंतर तुझे काही प्रश्‍न असतील तर मी त्यांना सांगतो, मग तू विचार.’’
मला कार्यक्रमाचे निमंत्रण मिळेल अशी व्यवस्था प्रमोदजींनी केली. माझ्या मनात प्र्रश्‍न होता की, अणुचाचणीचा विषय, कवितांचे गायन हे अटलजींच्या भाषणात कसे काय जुळणार? पण, प्रमोदजींच्या समयसूचकता आणि आकलन, नियोजनावर माझा विश्‍वास होता. मी कार्यक्रमाला गेलो. पहिल्या रांगेत मला जागा होती. कविता गायनात पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी ‘हम जंग न होने देंगे’ ही कविता गायिली. नंतर अटलजी भाषणास उभे राहिले. त्यांनी संपूर्ण भाषण अणुचाचणीमागची भूमिका, अणुशक्ती आणि ‘जंग न होने देंगे’ यावरच केले.
‘‘अण्वस्त्रों के अंबार पर खडे हो कर विश्‍वशांती की बात करनेवालों को शांती का महत्त्व समझ मे आए इसलिए हमने एक धमाका कर डाला.’’ अशा स्वरूपाचे ते स्पष्टीकरण होते. कार्यक्रम संपल्यानंतर मी चहापानाच्या तिथे गेलो तर मला पाहताच प्रमोदजींनी अटलजींना काहीतरी सांगितले. अटलजी माझ्याकडे पाहात मराठीतच म्हणाले, ‘‘काय? काही प्रश्‍न शिल्लक आहे काय?’’ त्यांच्या या माझ्याशी बोलण्याने मी इतका भारावून गेलो होतो की, माझी मान आपोआप नकारात्मक हलली. ‘‘नाही. सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे मिळाली,’’ असे मी पुटपटलो. मी तरुण भारतचा संपादक आहे, या माहितीने त्यांच्या मनात निर्माण झालेली आपुलकी त्यांच्या चेहर्‍यावर, आवाजात अनुभवाला येत होती. तो धागा, ती संवेदना मी अजून कितीतरी वर्षे झाली तरी विसरू शकत नाही.
पुण्यात एकदा पं. भीमसेन जोशी यांच्या अमृतमहोत्सवी सत्काराला अटलजी आले होते. संपूर्ण भाषणात अटलजींनी राजकारणाचा एक शब्दही न उच्चारता संगीत या विषयावरच भाषण केले होते. ‘‘धरती को कान लगाओ ये धरती गाती रहती हैं. छलछल बहते झरने, मंडराते हुए भंवरे धरती के गाने का एहसास दिलातें हैं.’’
‘‘मैं ब्रह्मचारी होने के कारण ससुर नही बन सका और गायक न होने से असूर जरूर बन गया हूँ,’’ अशी कोटी करून त्यांनी हंशा वसूल केला. यवनांच्या आक्रमणाच्या मध्ययुगीन काळात भारतीय समाजमनातील आस्था भारतीय भक्तिसंगीताने जतन केली, हे सांगायला ते विसरले नाहीत.
भारतीय समाजकारणात स्वातंत्र्यानंतर समाजाला दिशा देणार्‍या नेतृत्वाने सोयीने बदलणारे सिद्धांत आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा यांना महत्त्व, असे संज्ञापन केल्यामुळे मंडळी सोयीने मते बदलतात. सोयीने आपल्या भूमिकेचे समर्थन करणारे शब्द शोधतात. इतरांना लेबल लावतात. प्रसारमाध्यमांवरही तो प्रभाव आहेच. अटलजींची पहिल्या १३ दिवसांच्या सरकारच्या वेळी टीका करणारे, निर्भर्त्सना करणारे पुढे सोयीने अटलजींच्या मंत्रिमंडळात सामील झाले. एनडीएचे पदाधिकारीही झाले. त्यांनी मग अटलजी उदारमतवादी असल्याने आम्हाला अटलजी हवे आहेत, अशी भूमिका मांडण्यास सुरुवात केली. आपल्या सोयीने अटलजींचे मूल्यमापन करत अटलजी उदार, मात्र त्यांच्या सोबतचे इतर नेते किंवा ते ज्या संघसंस्कारातून आले तो संघ आम्हाला नको, अशा प्रकारची अजब मांडणी करण्याला सुरुवात केली.
दिल्लीत अटलजींची अंत्ययात्रा चालू असताना एका टीव्ही चॅनेलवर निवेदकाने एक वाक्य म्हटले, ‘‘अटलजी आरएसएस से जुडे रहने के बावजूद वे राष्ट्रहित सर्वोपरी रखते थे और इसलिए वे सर्वमान्य नेता बन गए.’’ या वाक्याइतकं विसंगत वाक्य असूच शकत नाही, हे माझ्यासारख्या स्वयंसेवकाला अत्यंत तीव्रपणाने जाणवून गेलं. मला समजू लागल्याच्या आधीपासून मी संघ समजून घेतो आहे. ‘राष्ट्रहित सर्वोपरी’ ही संघाचीच भूमिका आणि शिकवण आहे. राष्ट्र परमवैभवाला न्यायचे, हेच संघाचे ध्येय आणि रोज प्रार्थनेत तो संकल्प असतो. या ‘संघ के होने के बावजूद’ नव्हे, तर ‘संघाचे स्वयंसेेवक असल्यामुळेच’ अटलजी आणि त्यांच्यासारखे लाखो कार्यकर्ते ‘राष्ट्रहित सर्वोपरी’ मानून काम करतात. स्वयंसेवक असल्यामुळे प्रार्थनापद्धतीचा द्वेष न करता समन्वयाने, नम्रपणाने सर्वांना आपलेसे करतात, ‘भूभाग नही शत शत हृदय जीतने का निश्‍चय’ हा संघाचाच संस्कार आहे. अटलजींसारखे हे तत्त्वज्ञान जगणारे स्वयंसेवक, हीच संघाची खरी ओळख आहे. संघ आणि स्वयंसेवक यांच्यात असे अद्वैत करताच येणार नाही. ज्यांना संघ समजून घ्यायचा आहे त्यांनी अटलजींचे व्यक्तिमत्त्व नजरेसमोर आणावे. अटलजी नावाच्या त्या राजहंसाचाच विवेक, त्या राजहंसाचाच व्यवहार संघसंस्कारात दिसून येईल! अटलजींच्या बाबतीत घडले तसे आज कुरूप वेडे म्हणून संघ स्वयंसेवकांना आणि संघाला हिणवणार्‍यांना भविष्यात ‘तो राजहंस एक’ असा अनुभव येत राहील. अटलबिहारी वाजपेयी हे या अस्सल, प्रामाणिक, निरलस, विश्‍वासार्ह परंपरेचे अग्रणी आहेत…

Posted by : | on : 2 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (368 of 885 articles)

Titanic
विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले | मॉर्गन रॉबर्टसन हा लेखक होता. १८९८ साली त्याने कल्पनेने रचलेल्या कथानकातील घटना १९१२ साली ...

×