ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, धनश्री बेडेकर, पुरवणी, स्तंभलेखक » दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर |

हिंदू धर्मात निसर्गचक्राला अनुरुप अशीच जीवनशैली रचली गेली आहे. सण-उत्सवांची रचनाही त्याला अपवाद नाही. किंबहूना सणांची रचना ही निसर्गचक्राबरोबरच समाज चक्र, अर्थचक्र आणि राष्ट्रचक्राशी अनुकूल आणि सुसंगत अशी आहे. यात सण-उत्सवाच्या आनंदासोबतच मानवाच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीचा विचार खूप खोलवर केल्याचे दिसून येईल. देशातील, समाजातील प्रत्येक माणसाप्रमाणेच निसर्गाशीही संवाद साधला जावा अशीच परस्परपूरक देवाण-घेवाण ठरवलेली आहे. यातून समाजातील प्रत्येक घटकांच्या सुखाचा आणि उत्कर्षाचा ज्योतीने ज्योत लावत निरंतन प्रवास सुरु आहे.

Diwali 2018

Diwali 2018

एव्हाना सगळीकडे दिवाळीची लगबग संपत आली आहे, कारण दिवाळी आपल्या घरी येऊन आनंद देऊन गेली आहे. दिवाळी म्हणजे फटाके, दिवाळी म्हणजे आतषबाजी, दिवाळी म्हणजे फराळ, दिवाळी म्हणजे धमाल, दिवाळी म्हणजे आनंद… टीवी चॅनेल्स आणि वर्तमानपत्रातील या वाक्याना आता आपण सरावले आहोत. २ वर्षांपूर्वी दिवाळी म्हणजे मोती साबण हेही ऐकून झालं. खरोखरच दिवाळी हा मोठा सण… कुठल्या आनंदाला कसलाही बांध नसलेला सण… आता दिवाळीचे पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ सांगणे हा ह्या लेखाचा अजिबात विषय नाही. किंवा गरिबांना कशी दिवाळी साजरी करता येत नाही त्यामुळे त्यांची जाणीव ठेवा हे प्रबोधन सुद्धा नाही. उलट या दिवाळीच्या सणाचा एक खूप मोठा पैलू आहे, आनंदाच्या भरात तो बघायचा राहून जायला नको म्हणून हा लेखनप्रपंच.
दिवाळी म्हणजे आनंद! बरोबर पण या आनंदाचे मूळ काय? आपल्यात असलेला अपरिमित उत्साह… दिवाळीत उत्साहाने किती किती काय काय गोष्टी केल्या जातात. फराळ, किल्ला ह्या तर नेहमीच्याच गोष्टी पण, यंदा दिवाळीला घराचं रंगकाम करणार, यंदा दिवाळीच्या आधी मुलीचं लग्न करणार, यंदा दिवाळीला नवं वाहन घेणार… किती किती गोष्टी असतात. हा एवढा उत्साह येतो कुठून आपल्यात? दिवाळीची कामे असं म्हटलं की यादी मोठी असते आपली. हा तुडुंब भरलेला उत्साह कुठून येतो?
उत्साह ही या जगातील एकमेव गोष्ट आहे, जी विकत घेता येत नाही. दान मागून मिळवता येते नाही. आणला दिवाळीला उत्साह पोतंभर शेजारच्याकडून उसना, असं होतं नाही. उत्साह ही आतून असण्याची गोष्ट आहे. उत्साह असतो किंवा नसतो. आपल्या भारतीय संस्कृतीत दसरा, दिवाळी, पाडवा, अक्षयतृतीया असे कितीतरी उत्साहाने ठासून भरलेले सण असतात. हे सण आपण ’साजरे’ करतो! आपल्याकडे कुणी वारलं, तर त्या घरात दिवाळीचा उत्साह नसतो. गेलेल्या माणसाची आठवण किमान वर्षभर आपल्याला दु:खात ठेवते. ’यंदा दिवाळी नाही’ अशा घरात फराळाचे डबे, गोडधोडाचे पदार्थ पोचवले जातात कारण त्यांच्यातील गळून गेलेला उत्साह थोडा तरी परत यावा, अशी त्यामागची भावना आहे. तेवढ्यापुरता उत्साह उसना पाठवला जातो. अर्थात, त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यातील स्थान लक्षात घेऊन उत्साहच ठरवतो, की त्या घरात कितपत शिरायचं!
तर दिवाळी म्हणजे आनंद आणि दिवाळी म्हणजे उत्साह! पण या उत्साहाचं नेमकं मूळ काय? वर्षभर सगळ्या गोष्टी सुरळीत असणं, नोकरीत बढती मिळणं, व्यवसायात नफा मिळणं, पीक पाणी भरपूर येणं अशी लांबलचक यादी करता येते. पण या सगळ्यांच्या मुळाशी जाऊन विचार केला की जाणवतं, याचं मूळ पावसात आहे!
पाऊस आपल्याला जीवन देतो… सर्वार्थाने! यंदा जेवढा पाऊस पडला तेवढा उत्साह आपल्याला दिवाळीत मिळतो. या पावसामुळे आलेल्या उत्साहाचे मूळ ग्रामीण भागात आणि शहरी भागात वेगळं असतं. आपला देश शेतीप्रधान आहे, अजूनही! शाळेत आपण शिकलोय की खरीप म्हणजे पावसाच्या पाण्यावर केलेली पिके. आणि रब्बी म्हणजे हिवाळ्यातील म्हणजे पाऊस होऊन गेल्यानंतर होणारी पिके! ह्या दोन्ही पिकांवर आपलं अर्थकारण अवलंबून असत. खरीप पिके जूनचा पाऊस होऊन गेला की जमिनीत ओल आली की लावली जातात. ते पीक साधारणपणे कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस कापतात. कोजागिरीला नव्याची पुनव म्हणतात, कारण त्या वेळेस नवं धान्य घरात आलेलं असतं! अर्थात ते कसं येणार किती येणार हे त्या वर्षी पडलेल्या पावसावर अवलंबून असतं! आणि अर्थातच ह्याचा आनंद लुटायचे सण म्हणजे दसरा आणि दिवाळी! ’दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ म्हणण्याचे हेच कारण! कारण एव्हाना आपल्याला यंदा किती पीक आलं याचा अंदाज आलेला असतो! मग असं असताना दिवाळीचं महत्व का? त्याचं एक अतिशय व्यवहारिक म्हणजे प्रॅक्टिकल कारण आहे! खरीप पीक घेणारे शेतकरी साधारण दिवाळीच्या वेळेपर्यंत शेतीच्या कामातून थोडे मोकळे झालेले असतात. शाळेचा एक तास संपून दुसरा तास सुरू होण्यापूर्वीचा शेतकर्‍यांचा काळ म्हणजे दिवाळी! त्या वर्षीच्या पिकाच्या प्रगतीवर दिवाळीचा उत्साह असतो!
हे झालं खरीप पिकांवर अवलंबून असलेल्या कोकण सारख्या प्रदेशातील जीवन. कोकण सोडून इतर महाराष्ट्रात काय चित्र असतं? तर सप्टेंबरचा पाऊस हा ह्या प्रदेशासाठी महत्वाचा! कारण सप्टेंबरच्या पावसावर कोरडवाहू पिके लावली जातात. त्यामुळे स्वाभाविकपणे त्या त्या वर्षी सप्टेंबरच्या पावसाच्या पडण्यावर दिवाळीचा आनंद दडलेला असतो. त्यामुळे हा पाऊस उत्साहाच्या मुळाशी असतो! किंबहुना तोच असतो, कारण तो जीवन आहे!
थोडक्यात ग्रामीण भागात किंवा शेती प्रदेशात पाऊस सर्वार्थाने मोठा घटक! तो दिवाळीचा उत्साह वाढवतो. इतर ठिकाणी काय चित्र असते? शेती सोडून अन्य क्षेत्रात काय काय घडतं? दिवाळी हा केंद्रबिंदू असतोच जगण्याचा! आपल्याकडे नाताळच्या नंतर नवीन वर्ष सुरू करण्याची परंपरा सुरू झालीय. म्हणजे नवीन वर्ष म्हणजे प्लँनिंग! नवे संकल्प नवे प्रकल्प, नव्या आकांक्षा ‘वग्रे’, ‘वग्रे’!!!
पण दिवाळी आपल्यासाठी खूपच खास असते! यंदा दिवाळीत काही झालं तरी मी अमुकतमुक करणार असे ठरवले जाते! त्याची तयारी कधी केली जाते तर जानेवारी मध्ये, नवीन वर्ष सुरू झाल्यावर! या सगळ्याचा उत्साह जून मध्ये वाढतो! पाऊस पडला की एकुणातच उत्साह वाढतो! न्यू इयरला प्लँनिंग कितीही केलं, तरी त्याचा रिझल्ट आपल्याला दिवाळीत हवा असतो! या वर्षीच्या दिवाळीत अपेक्षित यश मिळवू न शकणारा माणूस पुढच्या दिवाळीसाठी सज्ज होतो! साधं उदाहरण घेऊया, एखाद्या कंपनीत काम करणारा माणूस वर्षभरात नाना प्रकारचे हातपाय मारतो, पैसे जमवतो आणि एखादी वस्तू घ्यायचं टार्गेट ठरवतो ‘दिवाळी!’ म्हणजे दिवाळी हा त्याच्यासाठी भोज्जा असतो. दिवाळीचा मुहूर्त हा प्रत्येक वेळी पंचांगातल्या मुहूर्तावर अवलंबून असतो असं नाही.
दुसरं उदाहरण! दिवाळीत गोड खाता यावं म्हणून शहरात अनेक लोक जून पासून डाएट, व्यायाम यावर लक्ष केंद्रित करतात. काही करून दिवाळीत मस्त कपडे घालता यावेत ह्या वेड्या ध्येयावर हे ४ महिने झुरतात.
कवी अनिल यांची एक कविता आठवते आहे.
उद्या उद्या तुझ्यामध्येच फाकणार ना उषा,
तुझ्यामध्येच संपणार ना कधीतरी निशा!
उद्या तुझी धरून कास आज कार्य आखले
तुझ्यावरी विसंबून कितीक काम टाकले..
उद्या उद्या तुझ्याचसाठी आज आजचे न पाहतो
उद्याकडेच लावूनी सदैव दृष्टी राहतो
उद्या तुझ्यामुळे आजचा निवांत मी
उद्या तुझ्यामुळेच आजचा अशांत मी
या कवितेत सांगितलेला उद्या म्हणजे एक भोज्जा आहे. माणसाला जगण्यासाठी एक उमेद लागते, डोळ्यात स्वप्न लागतं… विचार करून बघितलं तर लक्षात येतं की, उमेद हा घटक नसता तर आपलं आयुष्य फोडणी नसलेल्या उकडलेल्या भाजीसारखं झालं असतं… कसलीही चव नसलेलं. या उद्याच्या आशेवर, उमेदीच्या लाटेवर स्वार झालेला आपल्या भारतीयांचा सण म्हणजे दिवाळी! दिवाळीच्या भोज्जावर कित्येक गोष्टी ठरवल्या जातात… मुळात आपल्याकडचे सण हे साजरे होताना आपल्या क्षमता उंचावायला लावणारे असतात. मध्यमवर्गीय कित्येक घरातील माणसे दिवाळीच्या वेळेस हंगामी व्यवसाय करतात… त्यातील अनेकांना ह्या हंगामाने मोठा हात दिलेला असतो.
माझ्या एका मित्राचा अनुभव खूप बोलका आहे. तो एका कंपनीत छोटीशी नोकरी करत होता. दिवाळीच्या हंगामात तो काही ना काही करून, छोटा मोठा व्यवसाय करून लहानपणापासून पैसे कमवायचा. आकाश कंदील विक, कुठे फराळ करून विक! तेव्हा बेताच्या परिस्थितीत असलेलं त्याचं कुटुंब दिवाळीच्या वेळेस आनंदून जायचं. दिवाळीच्या वेळेस मिळणारे ते इवलेसे पैसे सुद्धा त्यांच्यातील उमेद शाबूत ठेवायचे. ज्यादाचे पैसे मिळालेल्या एवढ्याश्या पैशात ते पुढच्या दिवाळीची स्वप्न बघायचे. पुढे याच मित्राने कॉर्पोरेट क्षेत्रात, जिथे भेटवस्तूंसाठी अनेकदा दिवाळी येते, तिथे कायमस्वरूपी कॉर्पोरेट गिफ्ट्सचा व्यवसाय सुरू केला. कारण दिवाळीने त्याला प्रचंड दांडगा अनुभव दिला. सण हा माणसाला अशी उमेद देतो… आजकाल सणाचं स्वरूप बदलत जातंय पण सणाच्या वेळेस असणारा हा उत्साह नाही बदलत. कारण या उत्साहाच्या बळावरच उत्तम जगण्याला नकळत कारण मिळतं.
झेंडूची फुलं ऑक्टोबरच्या हंगामात वारेमाप पिकतात… पण तेव्हा फक्त शेतकर्‍यालाच नाही पैसे मिळत. तर झेंडूच्या छोट्या मोठ्या व्यापार्‍यांची, घरोघरी विक्री करणार्‍या विक्रेत्यांची हंगामातील उलाढाल कोट्यवधींच्या घरात जाते. दिवाळीच्या काळात आकाशदिवे, पणत्या, छोट्या मोठ्या भेटवस्तू तयार करणारे उद्योजक, फराळाचे पदार्थ तयार करून विकणार्‍या गृहिणी, शाळा कॉलेज सांभाळून फटाक्यांची, उटण्याची, सुगंधी तेल विक्री करणारे माझ्या मित्रासारखे अनेक लोक ही बाजारपेठ दिवाळीत कित्येक पट उंचावर नेऊन ठेवतात.
महाराष्ट्रात गेल्या १०० वर्षात दिवाळी अंकाने खूप महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. दिवाळी अंक तयार करणारे लोक, प्रकाशक, लेखक, चित्रकार, व्यंगचित्रकार, विक्रेते अशा सगळ्यांच्या डोळ्यात दिवाळी आनंदाचे रंग भरते.
या सगळ्यात नकळतपणे आपल्या मनातील उमेद आणि डोळ्यातील जिद्द क्षणोक्षणी उंचावत असते. आपल्यातील क्षमता उंचावण्याचा हाच तो काळ असतो. जेव्हा हातात पैसे येतात, तेव्हा माणसाचा जगण्याचा उत्साह द्विगुणित होतो. आपल्याकडचे सण हे अशीच अर्थकारणाची बाजू स्पष्ट करतात. सण आपल्याला आनंद देतात, दिवाळी सारखा सण तर एखाद्याला जगण्याचा आत्मविश्‍वास सुद्धा देतो.
हिंदू धर्मात निसर्गचक्राला अनुरुप अशीच जीवनशैली रचली गेली आहे. सण?उत्सवांची रचनाही त्याला अपवाद नाही. किंबहूना सणांची रचना ही निसर्गचक्राबरोबरच समाजचक्र, अर्थचक्र आणि राष्ट्रचक्राशी अनुकूल आणि सुसंगत अशी आहे. यात सण?उत्सवाच्या आनंदासोबतच मानवाच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीचा विचार खूप खोलवर केल्याचे दिसून येईल. देशातील, समाजातील प्रत्येक माणसाप्रमाणेच निसर्गाशीही संवाद साधला जावा अशीच परस्परपूरक देवाण?घेवाण ठरवलेली आहे. यातून समाजातील प्रत्येक घटकांच्या सुखाचा आणि उत्कर्षाचा ज्योतीने ज्योत लावत निरंतन प्रवास सुरु आहे.
जेव्हा माणसाला एखादं छोटं ध्येय पूर्ण होतं, तेव्हा होणारा आनंद खूप अवर्णनीय असतो. या दिवाळीत मी ही गोष्ट करू शकले, मला ती जमली आणि आता मी कायम असं करू शकते हे जाणवण्याचा हा सुवर्णकाळ! दिवाळीत अंधार नाहीसे करण्याची ताकद असते. खर्‍या अर्थाने आपल्या मनात दिवे लागतात… आणि प्रकाशाचं साम्राज्य सुरू होतं! दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, फराळ, किल्ला, फटाके, दिवाळी अंक या बरोबरच दिवाळी म्हणजे आत्मविश्‍वासाची एक ज्योत… ती जागी करणारी दिवाळी प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यात दरवर्षी येवो.
कोठे तरी वाचनात आलेल्या कवितेच्या समर्पक ओळी माणसाला ही जाणीव करून देतात…
दिवे लागले रे दिवे लागले
तमाच्या तळाशी दिवे लागले
दिठीच्या दिशा खोल तेजाळताना
कुणी जागले रे कुणी जागले .

Posted by : | on : 11 Nov 2018
Filed under : आसमंत, धनश्री बेडेकर, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, धनश्री बेडेकर, पुरवणी, स्तंभलेखक (330 of 1288 articles)

Pm Modi Rashtradhwaj
संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते असतात. मोदी सरकारमुळे त्यांना पळता भूई थोडी झाली आहे. त्यामुळे ते पिसाळल्यासारखे ...

×