ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, मल्हार कृष्ण गोखले, स्तंभलेखक » देव तारी त्याला कोण मारी!

देव तारी त्याला कोण मारी!

॥ विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले |

हिटलर हा स्वतः कट्टर रोमन कॅथलिकपंथीय होता. अमेरिकेतल्या प्रिस्टन विद्यापीठातला इतिहासतज्ज्ञ जान थॉमस ग्रास हा स्वतः मूळ पोल्स नागरिक आहे. ’फिअर ः अँटि सेमेटिझम इन पोलंड’ या आपल्या पुस्तकात तो म्हणतो, ‘‘हिटलरच्या ज्यू विरोधी वरवंट्याविरुद्ध पोलिश लोकांनी ज्यूंना मदत करून वाचवलं. अशा जशा घटना आहेत, तशाच मदत न केल्याच्याही घटना आहेत. ‘‘

Micheslav

Micheslav

साधारणत: आपल्याला इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी हे युरोपीय देश आणि मग एकदम अमेरिका, यापलीकडे पश्‍चिमेत इतरही देश अस्तित्वात आहेत, याचा पत्ता नसतो. म्हणजे शाळेतल्या भूगोलात इतरही देशांबद्दल माहिती असते. पण, ती परीक्षार्थी माहिती आपण परीक्षेच्या कक्षातून बाहेर पडता-पडताच विसरून जातो. पोलंड नावाचा देश अस्तित्वात असला किंवा नसला, आपला काय संबंध? राजकारण्यांच्या भानगडी, नट्यांची लग्नं, शेअर बाजार, दोन उद्योगपती भावांची आपसातली मारामारी वगैरे चविष्ट, खमंग विषय असताना बाकी फालतू गोष्टीत लक्ष घालायला वेळ आहे कुणाला? नाही का?
सोविएत साम्राज्याला सुरूंग लावणार्‍या काही महत्त्वाच्या घटनांमधली एक म्हणजे, पोलंडचे कामगार नेते लेक वालेसा यांनी पोलंडच्या गडान्स्क बंदरात घडवून आणलेला गोदी कामगारांचा अभूतपूर्व संप. यासाठी लेक वालेसांना नंतर नोबेल पारितोषिक देण्यात आलं.
सध्या पश्‍चिमेतल्या साहित्य वर्तुळात पोलंडवरून जरा खळबळ माजली आहे, ती एका पुस्तकामुळे. खुद्द पोलंडमध्ये तर त्या पुस्तकावर बंदी घालून, लेखकावर बदनामीचा खटला दाखल करता येईल का, याबद्दल सरकारी वर्तुळात खल चालू आहे. हिटलरच्या ज्यू हत्याकांडात पोलिस नागरिकांनी होता होईल तितक्या ज्यूंना लपवून ठेवलं, वाचवलं. कित्येकदा हिटलरच्या गेस्टापो या अत्यंत क्रूर गुप्त पोलिस दलाच्या हस्तकांकडून जबर अत्याचार सहन करूनही पोलिश नागरिकांनी असंख्य ज्यूंना वाचवलं, असा इतिहास आहे. पण, आपल्या पुस्तकात जान थॉमस ग्रॉस हा इतिहासकार म्हणतो की, हे असं नाही.
पाश्‍चिमात्य समाजात ख्रिश्‍चन आणि ज्यू यांचे परस्पर संबंध हा नेहमीच तणावाचा आणि गुंतागुंतीचा विषय राहिलेला आहे. तो नीट समजून घेण्यासाठी आपण पोलंडची थोडी पार्श्‍वभूमी पाहू.
आधुनिक मानववंशशास्त्राने जगभरच्या मानवांचे विशिष्ट वांशिक गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. त्यापैकी स्लाव्ह या वांशिक गटात रशियनांप्रमाणेच पोलिश किंवा पोल्स हेही येतात. प्राचीन काळी त्यांना पोलानी असं म्हटलं जातं असे आणि मध्य युरोपातल्या विश्‍चुला व ओडर या नद्यांच्या दुआबाच्या प्रदेशात त्यांची भूमी होती. त्यांच्या पूर्वेला त्यांच्याचसारखे स्लाव्ह वंशाचे रशियन लोक होते, तर पश्‍चिमेला जर्मेनिक वंशाचे प्रशियन लोक होते. रशियन आणि प्रशियन हे दोघेही पोलांनीपेक्षा दांडगे लोक असल्यामुळे त्यांची मोठीमोठी बलिष्ठ राज्य होती. पोलानी मात्र छोट्या छोट्या टोळ्यांमध्ये विभागलेले होते.
त्यांच्यातला पहिला नाव घेण्यासारखा कर्तबगार इसम म्हणजे मायकेस्लाव पहिला या नावाने ओळखला जाणारा राजा. हा मुळात शेजारच्या प्रशियन राजाचा जहागीरदार होता. त्याने बर्‍याच पोलानी टोळ्यांचं एकत्रीकरण केलं. त्यानेच पहिल्यांदा ख्रिश्‍चन धर्म स्वीकारला. इ. स. १६२ ते ९९२ हा त्याचा काळ आहे.
हा इतिहास वाचताना आपण हेही लक्षात ठेवायला हवं की, ही सगळी माहिती ख्रिश्‍चन इतिहासकारांनी लिहून ठेवलेली आहे. मायकेस्लाव पहिला हा नाव घेण्यासारखा पहिला पोलानी इसम, असं ते म्हणतात. कारण, त्याने ख्रिश्‍चन धर्म स्वीकारला म्हणून. त्याच्या अगोदरचे सगळे लोक म्हणजे यांच्या मते ‘हीदन्स’ किंवा पेगन्स.’ या दोन शब्दांचा गोळाबेरीज अर्थ रानटी, जंगली, नीच देवदेवतांची, मूर्तीची पूजा, उपासना करणारे मागास लोक.
आपल्याकडच्या काही अभ्यासकांच्या मते, भारतातून अनेक लोक नव्या भूमीच्या शोधात बाहेर पडले. आज ज्याप्रमाणे नवीन संधींच्या पाठी आपले लोक जगभरच्या देशांमध्ये जात आहेत, स्थायिक होत आहेत, त्याचप्रमाणे हजारो वर्षांपूर्वीही घडलं आणि हे एकदाच घडलं असं नव्हे, तर स्थलांतराची ही प्रक्रिया सतत चालूच होती. भारतातून बाहेर पडलेल्या लोकांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर नवनवीन प्रदेश वसते केले. जिथे मुळात स्थानिक लोक होते, त्यांच्या कत्तली न करता त्यांना आपल्या उदार संस्कृतीत सामावून घेतलं. पण, महाभारतीय युद्धातल्या प्रचंड संहारामुळे ही सगळी प्रक्रिया एकदम थांबली. भारताचा बाह्य भूमीशी असणारा सतत संपर्क तुटत गेला. परिणामी बाह्य जगतातले लोक संस्कृतीच्या मुळ प्रवाहापासून लांब होत गेले. त्यामुळेच आक्रमक ख्रिश्‍चन धर्मोपदेशकांना त्यांच्या उपासनापद्धती हीन वाटल्या. किंबहुना त्या पद्धती हीन ठरल्या. कारण ख्रिश्‍चनांचं बलवान आक्रमण थोपवून धरण्याचं आध्यात्मिक सामर्थ्य त्यांच्यात उरलं नव्हतं.
ते कसंही असो. मायकेस्लाव पहिला याने पोलानींच्या राष्ट्रीय अस्मितेचा पाया घातला. त्याचा वारसदार बोलेस्लाव द ब्रेव्ह (इ.स. ९९२ ते १०२५) याने पोलंड हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर आणलं. यामुळे अर्थातच रशियन आणि प्रशियन दोघेही चिडले. त्यांनी सतत पोलंडवर आक्रमण सुरू ठेवली. पण, पोल्स लोकांनीही त्यांना धैर्याने तोंड दिलं.
परंतु, १२४०-४१ मध्ये चंगेझखान हा मंगोल माथेफिरू एखाद्या धूमकेतूसारखा पोलंडवर येऊन आदळला. त्याच्या सैतानी झंझावातासमोर पोलंड कोलमडला. जीत राष्ट्राला कसं वागवायचं, याची चंगेझची पद्धत ठरलेली होती. तरुण स्त्रियांना आपल्या सैनिकांमध्ये वाटून टाकायचं आणि उरलेल्या सर्व आबाल-वृद्ध स्त्री-पुरुषांची सरळ कत्तल करायची. गाव असो अगर शहर, त्यातली प्रत्येक वास्तू लुटून, पाडून, जाळून टाकायची. चंगेझच्या या अनर्थामुळे पोलंड जवळपास स्मशान बनला. पण साफ मेला मात्र नाही.
पुढे १३०६ साली लॅडिस्लास पहिला या कर्तबगार राजाने पोलंडचं पुनरूज्जीवन केलं. रशिया आणि प्रशिया या दोघांशीही त्याच्या कटकटी मात्र सतत चालूच राहिल्या. अखेर १७७२ साली त्या दोघांनीही पोलंडचा पूर्ण पराभव करून त्याची भूमी आपसात वाटून घेतली. पोलंड हे नाव जगाच्या नकाशावारून पुसलं गेलं.
आणखी एक शतक उलटून गेलं. जगावर स्वामित्व कोण गाजवणार, या प्रश्‍नावरून युरोपात महायुद्ध पेटलं. त्यात प्रथम प्रशियामधून निर्माण झालेल्या जर्मनीने रशियाला चीत केले आणि मूळचा पोलंडचा प्रदेश आपल्याकडे खेचला. पण, अखेर जर्मनीचा पराभव झाला. ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका या जेत्या राष्ट्रांनी पोलंडचं पुनरुज्जीवन करायचं ठरवलं. १९१९ साली पोलंड पुहा अस्तित्वात आला.
पण हे जर्मनी आणि रशिया दोघांनाही आवडलं नाही. जर्मनीत हिटलर आणि रशियात स्टॅलिन प्रबळ होताच दोघांनीही पोलंडचे लचके तोडले. यातूनच पुढे दुसरं महायुद्ध उद्भवलं. जर्मनीचा पराभव झाल्यामुळे पोलंड त्याच्या तडाख्यातून सुटला. पण, रशियाने त्याला आपल्या प्रभावळीत खेचला. पोलंड प्रत्यक्ष नव्हे, पण अप्रत्यक्षरित्या रशियाचा मांडलिकच होता. लेक वालेसांच्या बंडामागे एवढी प्रदीर्घ पार्श्‍वभूमी आहे. शिवाय रशियन्स आणि पोल्स हे एकाच वंशाचे म्हणजे स्लाव्ह असले तरी दोघांचे पंथ निराळे आहेत. रशियन हे आर्थोडॉक्स ख्रिश्‍चन आहेत, तर पोल्स हे रोमन कॅथलिक ख्रिश्‍चन आहेत. हो दोन्ही पंथ एकमेकाला पाण्यात पाहतात. पण ज्यूंबद्दल जास्त वैर रोमन कॅथलिकांना वाटतं. येशू ख्रिश्ताला क्रुसावर खिळून मारण्यात जेरूसलेमच्या ज्यू धर्मगुरूंचा मोठा हात होता. ज्यू धर्मगुरूंच्या अत्याग्रहामुळे जेरूसलेमचा रोमन सत्ताधीश पाँटियस पिलात याने येशूला वधाची शिक्षा फर्मावली.
पुढे रोमन लोकांनी सर्वच ज्यू धर्मीयांना पॅलेस्टाईनमधून हद्दपार केलं. हे ज्यू लोक जगभर, पण मुख्यतः युरोपात वेगवेगळ्या देशात पसरले. नंतर खुद्द रोमन लोकांनीच ख्रिश्‍चन धर्म स्वीकारल्यामुळे तो युरोपात सर्वत्र पसरला. येशूच्या मृत्यूला ज्यू कारण झाले म्हणून या नवीन ख्रिश्‍चनांनी ज्यूंना वाईट वागवण्यास सुरूवात केली. हिटलर हा स्वतः कट्टर रोमन कॅथलिक पथीय होता. अमेरिकेतल्या प्रिस्टन विद्यापीठातला इतिहासतज्ज्ञ जान थॉमस ग्रास हा स्वतः मूळ पोल्स नागरिक आहे. ’फिअर ः अँटि सेमेटिझम इन पोलंड’ या आपल्या पुस्तकात तो म्हणतो, हिटलरच्या ज्यू विरोधी वरवंट्याविरुद्ध पोलिश लोकांनी ज्यूंना मदत करून वाचवलं. अशा जशा घटना आहेत, तशाच मदत न केल्याच्याही घटना आहेत. उदा. एका गावात पोलिश नागरिकांनी ४० ज्यूंना लपवून ठेवलं आणि मग स्वतःच त्या गुदामाला आग लावून त्याचं बिल जर्मन गेस्टापोच्या नावावर फाडलं. किंवा जर्मनांच्या छळ छावणीतून सुखरूप परतलेल्या काही ज्यूंना गावकर्‍यांनी गुपचूप ठार मारलं. का? तर त्यांच्या जमिनी यांनी लाटल्या होत्या, त्या त्यांना परत करायला लागतील म्हणून.
पोलंड सरकार पुस्तकावर बंदी घालण्याचा विचार करतंय्. पण शहाण्या लोकाचं म्हणणं असं आहे की, बंदी घालण्यापेक्षा उलट यावर जंगी परिसंवाद घडवून आणावा. त्यातून असं उघडकीला येईल की, वरील घटनांसारख्या तुरळक घटना असतीलही, पण जास्त घटना अशाच आहेत की, ज्यात रोमन कॅथलिक पोलिश नागरिकांनी ज्यूंना वाचवण्याचाच जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे.

Posted by : | on : 23 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, मल्हार कृष्ण गोखले, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, मल्हार कृष्ण गोखले, स्तंभलेखक (412 of 1224 articles)

School Drawing
मानसरंग : मयुरेश डंके | आयुष्यात वरवर सोपा वाटणारा एक निर्णय पुढच्या आयुष्यात किती महत्वाचा ठरतो, हे शालेय वयात फारसं ...

×