ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक » दोन तासांनी की दोनदा? मधुमेही यक्षप्रश्‍न!

दोन तासांनी की दोनदा? मधुमेही यक्षप्रश्‍न!

॥ टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे |

दर दोन तासांनी काहीतरी खा, या संकल्पनेला आयुर्वेदाचा कोणताही आधार नाही. आपले पोट म्हणजे उकिरडा नव्हे! आधीचे अन्न पचण्यापूर्वीच त्यात पुन्हा नव्याने भर घालणे आयुर्वेदाला मुळीच अपेक्षित नाही. त्यामुळे प्रसिद्ध आहारतज्ज्ञांचा दावा हा काही खरा नव्हे. आयुर्वेदीय ग्रंथांत दोन वेळाच जेवण्याचा पुरस्कार आढळतो. त्याचा पुरस्कार करणार्‍या तज्ज्ञांनी स्वतःदेखील तसे संदर्भ आयुर्वेदात असल्याचे त्यांच्या व्याख्यानात सांगितले आहे.

Thali

Thali

आपल्या देशाची वाटचाल मधुमेहाची राजधानी होण्याकडे सुरू झाली आहे. रोगापेक्षा इलाज भयानक, अशी गत असलेला हा विकार. शिवाय अनेक जण अनेक उपाय सुचवत असल्याने मधुमेही रुग्णांच्या शरीराची अगदी प्रयोगशाळा झालेली असते. त्यातच काय खावे आणि कसे खावे? या प्रश्‍नांवर तज्ज्ञ मंडळीदेखील परस्परविरोधी मते नोंदवत असतात; यातून रुग्णांच्या गोंधळात अधिक भर पडते. महाराष्ट्रातही सध्या एक प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आणि आधुनिक वैद्यकातील डॉक्टर यांनी सांगितलेले डायट प्लान फारच गाजत आहेत. यांतील एक जण सांगतात, दर दोन तासांनी खा, तर दुसरे म्हणतात; दिवसातून दोनच वेळा ५५ मिनिटांत जेवण आटपा. मजा म्हणजे, दोन्ही तज्ज्ञांनी आपले मत मांडताना आयुर्वेदाचे काही ना काही दाखले दिले आहेत. यामुळेच बहुसंख्यांच्या जिव्हाळ्याच्या या विषयावर आयुर्वेद नेमके काय सांगतो, हे एक आयुर्वेदतज्ज्ञ म्हणून समोर ठेवत आहे.
दर दोन तासांनी काहीतरी खा, या संकल्पनेला आयुर्वेदाचा कोणताही आधार नाही. आपले पोट म्हणजे उकिरडा नव्हे! आधीचे अन्न पचण्यापूर्वीच त्यात पुन्हा नव्याने भर घालणे आयुर्वेदाला मुळीच अपेक्षित नाही. त्यामुळे प्रसिद्ध आहारतज्ज्ञांचा दावा हा काही खरा नव्हे. आयुर्वेदीय ग्रंथांत दोन वेळाच जेवण्याचा पुरस्कार आढळतो. त्याचा पुरस्कार करणार्‍या तज्ज्ञांनी स्वतःदेखील तसे संदर्भ आयुर्वेदात असल्याचे त्यांच्या व्याख्यानात सांगितले आहे. मात्र, हे पूर्णसत्य नव्हे. आयुर्वेदानुसार विचार करता खालील मुद्दे लक्षात घ्यावे लागतील :
१. ५५ मिनिटांत जेवणे याचा अर्थ ५५ मिनिटे जेवणे नव्हे, हे आतापर्यंत बहुतेक जणांच्या लक्षात आलं असेलच. त्यामुळे त्यावर चर्चा करत नाही. मात्र, एकदा जेवून झाल्यावर मग एखादा आवडीचा पदार्थ दिसला तर तो त्या ५५ मिनिटांतच खायला हरकत नाही, असेही मत या तज्ज्ञांनी मांडले आहे. आयुर्वेदानुसार मात्र तसे करणे योग्य नाही. एकदा जेवलेले पचायच्या आतच पुन्हा काही खाणे याला अध्यशन असं म्हणतात. असं केल्याने पचनशक्तीला अपाय होतो, असं आयुर्वेद सांगतो. यासाठीच हातावर पाणी पडलं की पुन्हा खायचं नाही, ही पद्धत रूढ झाली. त्यामुळे दिलेल्या ५५ मिनिटांत एकदा बसून जेवलात की त्यावर पुन्हा काही न खाणे हेच आयुर्वेदाला अपेक्षित आहे.
२. दिलेल्या ५५ मिनिटांत तुम्हाला आवडेल ते खा. हा संदेशही योग्य नाही. प्रत्येक आहारीय पदार्थाचे गुणधर्म वेगळे असतात. आरोग्याला वाईट असलेले पदार्थ जरी नेमून दिलेल्या ५५ मिनिटांत घेतले, तरी त्याचे दुष्परिणाम होणारच आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. शिवाय, पचायला जड आणि हलके असेही वर्गीकरण आयुर्वेदाने केले आहे. जड पदार्थ आपल्या क्षमतेच्या निम्मेच खावे, तर हलके पदार्थ जेमतेम क्षमतेपर्यंतच खावे, असेही आयुर्वेद सांगतो.
३. अग्नी ही अत्यंत महत्त्वपूर्ण संकल्पना आयुर्वेदाने आपल्याला दिली आहे. आहाराची मात्रा ही अग्नीनुसार असावी, असं आयुर्वेद सांगतो. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचा अग्नी हा साधारणपणे तीक्ष्ण असतो. म्हणजेच त्या अन्न लवकर पचवू शकतात. यासाठीच त्यांना केवळ दोन वेळा आहार घेऊन चालत नाही. आचार्य सुश्रुतांनी त्यांना ‘दन्दशूक’ म्हणजे सतत खादाडी करणारे, असा शब्द योजला आहे. सध्याच्या काळात पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी किमान तीन वेळा खाणे सयुक्तिक आहे. अन्यथा आयुर्वेदीय सिद्धांतांचा विचार करता, त्यांचा तीक्ष्ण असलेला अग्नी हा त्यांच्या शरीरातील धातूंना पचवायला सुरुवात करेल! कित्येक अनुभवी मधुमेहतज्ज्ञ याच पद्धतीचा वापर यशस्वीपणे करीत आहेत.
४. एरव्ही आयुर्वेदानुसार, केवळ हेमंत ऋतूत नाश्ता करावा, असे सांगितले आहे. या ऋतूतल्या थंडीमुळे आपली भूक आणि पचनशक्ती एकंदरच वाढलेली असते, हे आपण अनुभवतो. हाच नियम जिथे सतत थंड वातावरण असेल अशा प्रदेशातही लावणे गरजेचे असते. यासाठीच बर्‍याच पाश्‍चात्त्य देशांत ब्रेकफास्टचे अनन्यसाधारण महत्त्व आढळते. आपल्याकडेही उत्तरांचलादी प्रदेशात या नियमाचा विचार करावा लागेल.
५. मेदस्वी वा स्थूल किंवा कफ प्रकृतीच्या व्यक्ती, काही ठरावीक विकार यांमध्ये दोन वेळाच जेवण्याचा आग्रह (तेही आहाराचे गुणधर्म लक्षात घेऊन आणि अध्यशन न करता) करणं योग्य ठरेल. मात्र, केवळ इन्शुलीनचं माप इतक्याच एका घटकाकडे लक्ष देत हा डोलारा उभारणे, हे शरीरातील एकंदर धातूव्युहनाला घातक ठरू शकतं. धातूंचा क्षय झाला की वात वाढीला लागतो आणि प्रमेही व्यक्तींत वातप्रकोप झाल्याने प्रमेहाचे रूपांतर मधुमेहात (इथे मधुमेह म्हणजे डायबेटीस नव्हे) होऊन तो असाध्य होतो, असे आयुर्वेद सांगतो. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे.
हत्ती कसा असतो? तर शेपूट धरलेल्या व्यक्तीसाठी दोरखंडासारखा, पाय पकडलेल्यासाठी खांबासारखा; असा प्रकार होणे हे विषयाच्या समग्र ज्ञानापासून दूर नेणारे असते. जसा हत्ती समजावून घेण्यासाठी तो उघड्या डोळ्यांनी पूर्ण पाहायला हवा; तसेच केवळ इन्शुलीनच्या मागे न लागता प्रकृती, बल, देश, काल, दोष-दुष्य अशा अनेक मुद्यांचा सखोल विचार त्यामागे हवा. आहारासारखा विषय हा ‘सब घोडे बारा टके’ या न्यायाने न नेता ‘पुरुषं पुरुषं वीक्ष्य’ असा टेलरमेड असला पाहिजे. तो रेडिमेड असून उपयोगाचा नाही. प्रत्येक नियमाला अपवाद असतात, हे जगन्मान्य तत्त्व ध्यानी ठेवायला हवे. विशेष म्हणजे आमच्या थेअरीचा आयुर्वेदाशी संबंध नाही, असे सांगणारा आधुनिक डॉक्टरांचा लेखही नुकताच वाचायला मिळाला. हे खरे असल्यास, ते आयुर्वेदाचे अर्धवट संदर्भ तरी का देत आहेत? या प्रश्‍नाचे उत्तरही त्यांनी द्यायला हवे, असे वाटते. एखाद्या नवीन गोष्टीने बर्‍याच लोकांना फरक पडला, तरी फरक न पडणारेही बर्‍याच प्रमाणात असतात. मात्र एकंदर अभियानाची लाट पाहून ते त्याबाबत वाच्यता करीत नाहीत, असे अनुभवावरून लक्षात आले आहे. यातील बहुतेक लोक हे आयुर्वेदाचे संदर्भ ऐकून अभियानाला जोडले जातात. याकरताच त्यांचा गैरसमज दूर व्हावा म्हणून आयुर्वेदाचे मत सविस्तरपणे मांडले, इतकेच. कोणी काय करावे/ करू नये, हा वैयक्तिक प्रश्‍न आहे. मात्र, आयुर्वेदच पाळायचा आहे, तर तो सगळ्या पैलूंतून नीट समजावून घेऊन आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने पाळणे अधिक सयुक्तिक ठरेल, नाही का? एकदा जरूर विचार करून पाहा!

Posted by : | on : 30 Sep 2018
Filed under : आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक (321 of 1153 articles)

India Flag
राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन | इतर विकसित देशांची तुलना करता- त्यांचे लष्करी सामर्थ्य, पैसा, पायाभूत सुविधा याचा आपण विचार ...

×