ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर » नकारात्मकतेमध्येच सत्तेची किल्ली शोधणार्‍यांकडे दुर्लक्ष करा

नकारात्मकतेमध्येच सत्तेची किल्ली शोधणार्‍यांकडे दुर्लक्ष करा

॥ रोखठोक : हितेश शंकर |

जातीय विद्वेष पसरवून, सांप्रदायिकतेची आग भडकवित भारताला खाली बघायला लावणार्‍या मुद्यांचे ढोल वाजवत पुढे जाणे, या तथाकथित सेक्युलर घोळक्याला खूपच आवडेल, हे लक्षात ठेवले पाहिजे. याचे संकेत आधीही होतेच आणि दिवसांगणिक ते अधिक स्पष्ट होत आहेत. या घोळक्याच्या काही द्वेषपूर्ण क्लृप्त्या, काम करणार्‍या लोकांना भ्रमित करणारे प्रकार आणि या दरम्यान परस्परांशी ताळमेळ ठेवणे, लक्षात घेण्यालायक आहे.

Sonia Gandhi Protest Pti1

Sonia Gandhi Protest Pti1

आपल्या कार्यसमितीच्या बैठकीत काँग्रेस पक्ष ज्या गोष्टींना उकरत, शोधत बसलेला दिसून आला, त्यावरून तो पक्ष अतिशय निराशेच्या तसेच नकारात्मकतेच्या भोवर्‍यात सापडलेला असल्याचे उघड झाले आहे.
काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पार्टीची ओळख ‘मोदींचा पक्ष’ अशी स्वत:पुरती करून घेतली आहे. काँग्रेसवर घराणेशाहीचा ठप्पा बसल्यावर त्या पक्षाचा जो तडफडाट झाला, तो त्यांनी अशा पक्षावर काढला, ज्या पक्षात काही प्राप्त करण्यासाठी परिवार हा कधीच आधार राहिलेला नाही. काँग्रेस पक्षाने आपला सर्व राग, द्वेष अशा व्यक्तीवर काढणे सुरू केले आहे, जो आज भारतीय लोकशाहीचा सर्वात बोलका, प्रभावी आणि लोकप्रिय नेता आहे.
खरे तर, भाजपावर आरोप करण्याच्या प्रयत्नांत, काँग्रेस स्वत:वर लागलेल्या आरोपांचेच उत्तर देत होता. परंतु, त्यांच्या तडफडाटाचे आणखी एक आणि मोठे कारण आहे. काँग्रेस पक्षाला आता हे मान्य करावे लागत आहे की, ज्या चेहर्‍यावर त्यांनी भविष्याचा डाव लावला होता, तो चेहरा लोकप्रियता आणि राजकीय समजदारीच्या कसोटीवर अनुत्तीर्ण झाला आहे. काँग्रेससाठी ही वस्तुस्थिती स्वीकारणे त्यांच्या हृदयाला विदीर्ण करणारे आहे. याची त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल.
वास्तवात, भाजपासमोर एक आव्हान उभे करण्यासाठी हा वयोवृद्ध पक्ष, विरोधी पक्षांची एक दमदार आघाडी तयार करण्याचे स्वप्न बघत होता. यात चूक काहीच नाही. परंतु, यात त्रुटी ही राहिली की, अनेक वर्षांपासून घराणेशाहीचा गुलाम राहिलेला हा पक्ष, सुरवातीपासूनच हे मानून चालत होता की, या आघाडीचे नेतृत्व त्यांच्या ‘युवराजां’च्याच हातात राहील. हे मानणे चूक होते आणि अशी चर्चा करताच, काँग्रेसच्या दूतांना इतर राजकीय पक्षांनी झिडकारून टाकले. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याखेरीज कुणाही राजकीय पक्षाने या सूचनेला जराही किंमत दिली नाही. बरोबरच आहे. कर्नाटकात काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार चालवत असताना, अपमानाचे अश्रू गिळणार्‍या देवेगौडांची काही अपरिहार्यता असू शकते. परंतु, इतर पक्षांची अशी काही अपरिहार्यता थोडीच आहे?
आता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात जर भविष्यात कुठली आघाडी तयार झाली, तर तिचे नेतृत्व काँग्रेसकडे नसणार. परंतु, खरा प्रश्‍न या विळ्या-भोपळ्याच्या एकीचा आहे. आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी एकत्र आलेल्या या पक्षांची एकता होणे सोपे नसणार, हेही स्पष्ट आहे. याची काही स्पष्ट कारणे आहेत.
पहिले, ही आघाडी तमाम व्यक्ति-केंद्रित पक्षांचा असा घोळका आहे, ज्यात प्रत्येकजण आपापला स्वार्थ उराशी घेऊन आहे. दुसरे, या घोळक्यातील क्षत्रप स्वत: वेगवेगळ्या आरोपांचे दंश झेलत आहेत आणि त्यांच्याकडे उपलब्धीच्या नावावर एक भले मोठे शून्य आहे. तिसरे, या घोळक्यातील प्रत्येक पक्ष त्याचा सामाजिक आधार सरकल्यामुळे स्वत:च्या स्वार्थी अस्तित्वासाठी झगडत आहे. अशा आघाडीला पुढे नेण्यासाठी खूप शक्ती आणि एकत्र राहण्यासाठी खास ‘डिंका’ची आवश्यकता असेल. तो डिंक नकारात्मक मुद्यांना समोर आणून आणि समाजात खोटेनाटे पसरवून प्राप्त करण्यात येईल.
जातीय विद्वेष पसरवून, सांप्रदायिकतेची आग भडकवित आणि भारताला खाली बघायला लावणार्‍या मुद्यांचे ढोल वाजवत पुढे जाणे, या तथाकथित प्रगतिशील, सेक्युलर घोळक्याला खूपच आवडेल, हे लक्षात ठेवले पाहिजे. याचे संकेत आधीही होतेच आणि दिवसांगणिक ते अधिक स्पष्ट होत आहेत.
या घोळक्याच्या काही द्वेषपूर्ण क्लृप्त्या, काम करणार्‍या लोकांना भ्रमित करणारे प्रकार आणि या दरम्यान परस्परांशी ताळमेळ ठेवणे, लक्षात घेण्यालायक आहे. उदाहरणार्थ, वेगवेगळ्या गुन्हेगारी प्रकरणांना एकमेकांत जोडण्यासाठी ‘मॉब लिंचिंग’ (म्हणजे जमावाद्वारे हत्या) शब्द प्रचलित करायचा असेल तर हे सर्व एक होतात. या शब्दाच्या चौकटीत घटनांना निवडून फिट बसवायचे, पत्रकबाजी करायची आणि नंतर मीडियाकडून याला हवा द्यायची, असे समन्वयाचे राजकारण सुरू होते. मतांच्या गणितासोबत निवडक संवेदनशीलतेचा, ‘मॉब लिंचिंग’च्या मुद्यावरील ताळमेळ बघा… अल्वरच्या अकबरचा उल्लेख जोरदार आरडाओरडीने होतो. (त्याची गुन्हेगारी पृष्ठभूमी मात्र दृष्टिआड करण्यात येते) परंतु, बाडमेरच्या ‘दलित’ खेताराम भीलची हत्या करणारा मुस्लिम जमाव आणि त्याचा नेता अकबर खान याच्या संदर्भात मात्र ओठ शिवून घेतले जातात.
हिंदू समाजातील भांडणाला दंगलीत रूपांतर करायला, एखादी ठिणगी जरी दिसली तरी, ‘दलित’रूपी पेट्रोल शिंपडण्यासाठी सोशल मीडियावर युद्ध सुरू करण्यात येते. नकारात्मकतेमध्येच सत्तेची किल्ली शोधणार्‍यांकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे. कारण, राजकीय डावपेच तर मोसमी असतात; परंतु, त्याची धग समाजाची वीण नष्ट करते. या जखमा लवकर बर्‍याही होत नाही. त्याचा दंश सतत अवस्थ करीत राहतो.

Posted by : | on : 5 Aug 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर (546 of 1222 articles)


कुहीकर | एव्हाना पहिल्या वर्गात नाव दाखल करण्याचं वय झालं होतं. पण उपाय नव्हता. गावात शाळाच नव्हती. करणार काय? मग ...

×