ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक » निर्मल हृदय, पवित्र कार्य?

निर्मल हृदय, पवित्र कार्य?

॥ संवाद : सोमनाथ देशमाने |

रांचीच्या निर्मल हृदय संस्थेतून होत असलेल्या अर्भकांच्या विक्रीच्या घटनेविषयी तर मीडिया अजिबात तोंड उघडणार नाही. कारण निर्मल हृदय ही संस्था टेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी संस्थेतर्फे चालविली जाते. टेरेसांना ज्यांनी कारुण्याची मूर्ती बनवून डोक्यावर घेतले, त्यांचा उदो उदो केला. त्यांच्या संस्थेत असे घडले असेल, हे ते मान्यच करणार नाहीत आणि वस्तुस्थितीही जनतेला सांगणार नाहीत. अशी घटना जर एखाद्या हिंदू अनाथालयात घडल्याची नुसती कुणकुण जरी लागली असती, तर यांनी संयुक्त राष्ट्र संघापर्यंत कागाळ्या केल्या असत्या. याला म्हणतात खाल्ल्या मिठाला जागणे! हिंदुंचं मीठंच आळणी आहे, त्यात इतरांचा काय दोष?

Nirmal Hriday

Nirmal Hriday

केरळातील चर्चमध्ये कन्फेशन अर्थात कबुलीजबाब द्यायला आलेल्या महिलेचे तिथल्या पाच धर्मगुरुंनी शारीरिक शोषण केल्याचे प्रकरण नुकतेच उजेडात आले आहे. तिकडे सातासमुद्रापलिकडे व्हॅटिकन सिटीत, ख्रिश्‍चनांच्या सर्वोच्च धर्मगुरुंची निवड कशी केली जाते, याचे कित्येक दिवस रसभरीत वार्तांकन करुन तासनतास लाळघोटु चर्चा करणारे भारतीय मीडिया दलाल, त्याच पोपच्या भारतातील या प्रतिनिधींच्या काळ्या कारवायांबद्दल चकार शब्द बोलायला तयार नाहीत! केरळातील चर्चमध्ये पाद्र्यांकडून जे कृत्य घडले, तसे मठमंदीर किंवा आश्रमात घडले असते, किंवा तसा संशय जरी असता, तर मीडियातील दलालांनी तमाम हिंदुंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करुन न्यायालयाच्या आधीच त्यांची चामडी सोलवटली असती. आसाराम बापु प्रकरणात, कठुआ प्रकरणात हेच घडले. कठुआ प्रकरणातले सत्य अजून अधिकृतपणे बाहेर यायचे आहे. त्यापूर्वीच मीडियाने हिंदुंना झोडपण्याचा, त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचा कंडु शमवून घेतला. अरे, कठुआ प्रकरणात जसे निषेध मोर्चे काढले, उपोषणाची नाटकं केली, मध्यरात्री शांतीमार्च काढले, तसं करणं आता अवघड वाटत असेल, तर त्या पाच हैवानांच्या वासनेला बळी पडलेल्या त्या माऊलीची निदान विचारपूस तरी कराल की नाही? हे तुमच्या सेक्युलॅरिझममध्ये बसत नाही का?
माणूस म्हणून शरमेने मान खाली घालायला लावणारी दुसरी एक घटना समोर आली आहे. सात-आठ लिंगपिसाट नराधमांनी गाभण बकरीवर केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे ती बकरी जिवानिशी गेली. तिला आणि तिच्या गर्भातल्या कोकराला किती असह्य वेदना झाल्या असतील? ज्या बकरीचं मांस मिटक्या मारत खाता, तिलाही तुमच्या वासनेची शिकार बनवलंत? नर आणि मादी या पलिकडे, दुसरं कुठलच नातं तुम्हाला दिसलं नाही का? या प्रकरणीही मीडियातल्या सेक्युलर पुरोगाम्यांनी मौन धारण केले आहे. या प्रकरणात जर हिंदू सामील असते, तर मीडियाने त्या बकरीला हुतात्मा ठरवले असते!
तिसरी घटना रांचीच्या निर्मल हृदय या संस्थेतून होत असलेल्या नवजात अर्भकांच्या विक्रीसंबंधातली आहे. या घटनेविषयी तर मीडिया अजिबात तोंड उघडणार नाही. कारण निर्मल हृदय ही संस्था टेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी संस्थेतर्फे चालविली जाते. टेरेसांना ज्यांनी कारुण्याची मूर्ती बनवून डोक्यावर घेतले, त्यांचा उदो उदो केला, पुरस्कार दिले, त्यांच्या तथाकथित सेवाभावी संस्थेत असे काही घडले असेल, हे ते मान्यच करणार नाहीत आणि वस्तुस्थितीही जनतेला सांगणार नाहीत. अशी घटना जर एखाद्या हिंदू अनाथालयाकडून घडली असती किंवा तशी नुसती कुणकुण जरी लागली असती, तर यांनी संयुक्त राष्ट्र संघापर्यंत कागाळ्या केल्या असत्या. याला म्हणतात खाल्ल्या मिठाला जागणे! हिंदुंचं मीठंच आळणी आहे, त्यात इतरांचा काय दोष?
तीनेक वर्षांपूर्वी मराठवाड्यात दुष्काळ पडला होता. माता-भगिणी हंडाभर पाण्यासाठी उन्हातानात पायपीट करत होत्या. त्याचवेळी मीडियातल्या काही मंडळींना, ब्रिटीश राजघराण्यातील शाही सुनेला मुलगा होणार की मुलगी, याचे डोहाळे लागले होते! चर्चा झडत होत्या! अंगातून घामाच्या धारा वहात असतानाही, गुराढोरांच्या मागे फिरणार्‍या आमच्या लेकीबाळी यांना दिसत नव्हत्या, पण तिकडे लंडनच्या रस्त्यावर युवराज्ञी पाय घसरुन पडली, तिचा पाय मुरगळला म्हणून ही मंडळी हळहळत होती. राष्ट्रीय बाण्याची, सत्यकथन करणारी मीडिया आम्हा भारतीयांच्या नशीबातच नाही का?
टेरेसांनी १९५० साली स्थापन केलेली मिशनरी ऑफ चॅरिटी, ही एक रोमन कॅथॉलिक स्वयंसेवी संस्था आहे. गरीब, आजारी, शोषित, वंचित लोकांची सेवा करण्यासाठी स्थापन झालेल्या या संस्थेच्या अंतर्गत शेकडो उपसंस्था कार्यरत आहेत. त्यातलीच एक, रांचीची निर्मल हृदय! या संस्थांनी मुखवटा कुठलाही धारण केलेला असला, तरी धर्मांतरण हा त्यांचा मुख्य अजेंडा कुठेही लपून राहिलेला नाही. चीन, जपानसारख्या बौध्द राष्ट्रात यांची फारशी डाळ शिजली नाही, पण भारत त्यांच्यासाठी सर्वात सुपीक भूमी! स्वतःच्या धर्माविषयी कमालीचा उदासीन असलेला आत्मकेंद्री हिंदू आणि त्यांनीच निवडून दिलेली, पण बाहेरच्यांसाठी पायघड्या घालणारी काँग्रेसी सरकारं! आणखी काय हवं त्यांना? म्हणून तर निर्मल हृदय संस्थेवर कारवाई सुरु होताच ममता बॅनर्जी यांनी थयथयाट करत, केंद्र सरकार मिशनरीजना बदनाम करण्याचा आरोप केला आहे. केवढी ही तत्परता? ममतांच्या सल्तनतीत हिंदुंना रामनवमी साजरी करण्यासाठी परवानगी काढावी लागते, पण बांग्लादेशी, रोहिंग्या घुसखोरांना कुठलीच अडचण येत नाही!
झारखंडची राजधानी रांची येथील निर्मल हृदय ही संस्था तिच्या कुकर्मांमुळे अलिकडेच प्रकाशझोतात आली आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार नसते, तर तिथे काय चाललय, हे आपल्याला कळलंही नसतं. नरेंद्र मोदी यांना आम्ही पुन्हा पंतप्रधान होऊ देणार नाही, अशी जी गर्जना केली जात आहे, त्यातलं इंगित समजून घ्या. आम्ही कुमारी मातांचं संगोपन, बाळांतपण करतो, असं निर्मल हृदय संस्थेकडून सांगितलं जात असलं तरी, नवजात अर्भकांची विक्री, मानव अवयव तस्करीसारखे गंभीर अपराध उघड होत आहेत. नवजात अर्भक विक्री प्रकरणी निर्मल हृदय संस्थेतील एक जोगीण कोंसिलिया आणि एक महिला कर्मचारी अनिमा अंदवार या दोघींना अटक करण्यात आली आहे. आपण चार नवजात अर्भकांची विक्री केल्याची कबुली कोंसिलियाने पोलिसांसमोर दिली आहे. त्या दोघींची कारागृहात रवानगी करण्यात आली असून संस्थेतल्या इतरांची कसून चौकशी केली जात आहे.
पवित्र कार्य करण्यासाठी स्थापन झालेल्या टेरेसांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी अंतर्गत कार्यरत असलेल्या निर्मल हृदय या संस्थेच्या तथाकथित सेवावृती कार्याचं बिंग फुटायला कारणीभूत ठरले, ते उत्तर प्रदेशातील ओबरास्थित आगरवाल दांपत्य! सौरभ आगरवाल आणि प्रीती आगरवाल या दांपत्याने यावर्षी ५ मे रोजी १,२०,००० रुपये मोजून निर्मल हृदय संस्थेतून एक नवजात बालक खरेदी केले, पण नंतर संस्थेने गोड बोलून बालक मागून घेतले आणि आगरवाल दांपत्याला ते परत दिलेच नाही. आगरवाल दांपत्याने बाल कल्याण समितीकडे रीतसर तक्रार दाखल केली आणि तिथून निर्मल हृदय संस्थेची उलट गिणती सुरु झाली!
मिशनरीज ऑफ चॅरिटी संस्थेने एका बलात्कार पीडित मुलीला आश्रय दिला होता. ती गर्भवती होती. प्रसुतीसाठी तिला निर्मल हृदय संस्थेत दाखल करण्यात आलं. तिथे ती १ मे रोजी प्रसूत झाली. चार दिवसांनंतर ५ मे रोजी जोगीण कोंसिलिया आणि तिची सहकारी अनिमा अंदवार यांनी ते बालक आगरवाल दांपत्याला विकून टाकले. दरम्यान बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी निर्मल हृदय संस्थेला भेट दिली आणि संस्थेचे धाबे दणाणले. अर्भक विक्री प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून अनिता अंदवार हिने आगरवाल दांपत्याला फोन केला. बालकाला न्यायालयात हजर करावयाचे असल्यामुळे आपण त्याला घेऊन तात्काळ रांचीला यावे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाळ परत आपल्या ताब्यात देण्यात येईल, अशी थाप मारली. आगरवाल दांपत्य रांचीला आले आणि त्यांनी २ जुलै रोजी बाळाला अनिमा अंदवार यांच्याकडे सोपविले. ३ जुलै रोजी ते आपल्या बाळाला ताब्यात घेण्यासाठी निर्मल हृदय संस्थेत गेले, पण त्यांना बाळाची भेटही घेऊ दिली नाही. आगरवाल दांपत्याने बाल कल्याण समिती आणि पोलिसांकडे तक्रार केली. बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा रुपा कुमारी पोलिसांना घेऊन निर्मल हृदय संस्थेत पोहचल्या. तिथे त्यांना १३ गर्भवती मुली आढळल्या. त्यातल्या आठ मुली अल्पवयीन होत्या! गर्भवती मुलींची तिथून सुटका करुन त्यांची नामकुम महिला वसतीगृहात सोय लावण्यात आली. त्यानंतर घेतलेल्या झाडाझडतीत जोगीण कोंसिलिया आणि अनिमा अंदवार यांनी आढेवेढे घेत घेत सर्व पापांची कबुली दिली. रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी गुन्हा कबुल केला आहे.
२०१५ ते जून २०१८ या कालावधीत ४५० गर्भवती महिला निर्मल हृदय संस्थेत दाखल झाल्या. त्यातल्या केवळ १७० नवजात अर्भकांनाच बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात आले. बाकीच्या २८० अर्भकांचं संस्थेने काय केलं, याची माहिती मिळू शकली नाही. अवांछित गर्भधारणा झालेल्या कुमारी मातांच्या नवजात अर्भकांची बाल कल्याण समितीकडे नोंद करणे बंधनकारक असताना, मिशनरीज ऑफ चॅरिटीकडून त्याचे उल्लंघन घडले आहे. मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या अशा १५ निर्मल हृदय शाखा आहेत. रांचीच्या एसएसपी अनीश गुप्ता यांनी पाञ्चजन्यला सांगितले की आंतरराष्ट्रीय मानव तस्करीसह या प्रकरणाचा सर्व दृष्टीकोनातून कसून तपास करण्यात येत आहे. अशाच इतर संस्थांचीही चौकशी सुरु करण्यात आली आहे.
टेरेसांच्या निर्मल हृदय संस्थेची तथाकथित ‘निर्मलता’ चव्हाट्यावर आणण्यात रांची येथील बैद्यनाथ कुमार यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. कधीकाळी बाल कामगार म्हणून राबलेले बैद्यनाथ कुमार, आज बाल अधिकारासाठी काम करत आहेत. १९९६ साली बैद्यनाथ निर्मल हृदय संस्थेजवळच असलेल्या एका ढाब्यावर काम करत होते. एक दिवस त्यांना एक व्यक्ती भेटली आणि त्यांनी बैद्यनाथला निर्मल हृदयमध्ये स्वयंपाकी म्हणून कामाला लावले. निर्मल हृदयमध्ये मुख्यतः ग्रामीण भागातील, वाट चुकलेल्या, फसवल्या गेलेल्या महिला येत असत. कदाचित लव्ह जिहादप्रमाणे तरुण, अविवाहीत तरुणींना फसी पाडून, त्यांचा उपभोग घेऊन नंतर त्यांना इथे आणून सोडणारी निर्मल टोळीही कार्यरत असू शकते. बैद्यनाथ त्याच भागातला, त्यांची भाषा समजणारा असल्यामुळे त्या महिला त्याच्याकडे आपलं मन मोकळं करायच्या. गर्भवती महिला संस्थेत दाखल करुन घेताना एका इंग्रजी अर्जावर त्यांची सही किंवा अंगठा घेतला जायचा. त्यात खरंच काय लिहिलय, हे त्यांना कुणी सांगत नसे. बैद्यनाथला संशय यायचा आणि महिलांची कणवही वाटायची. तिथं दोन वर्षे काम केल्यावर तो बाहेर पडला. अपूर्ण शिक्षण पूर्ण केलं. बाल अधिकाराचे काम करीत असताना त्याला निर्मल हृदयची गूढता स्वस्थ बसू देईना. संस्थेच्या उंच उंच भिंती! नेहमी बंद असणारा बलदंड दरवाजा! अगदी मोजक्याच लोकांना आत प्रवेश! भेदरलेल्या महिलांचे लुकलुकणारे डोळे! बैद्यनाथ कुमारने चक्रव्यूह भेदायचा निश्‍चय केला. आपल्या एका नातेवाईकाच्या वाढदिवसानिमित्त संस्थेतल्या महिलांना गोडाधोडाचे जेवण द्यायची योजना घेऊन तो १० जानेवारी २०१६ रोजी निर्मल हृदय संस्थेच्या प्रबंधकांना भेटला. त्याच्याकडून १०,००० रुपये उकळल्यानंतर त्याला अनुमती मिळाली. अन्नदानाच्या निमित्ताने दिवसभर आत थांबून बैद्यनाथ कुमारने महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या. काम जोखमीचं होतं. कुणाला सुगावा लागला असता, तर बैद्यनाथचं नखही बाहेर आलं नसतं! दुसर्‍या दिवशी त्याने इत्यंभूत माहिती बाल कल्याण समितीच्या कानावर घातली. बाल कल्याण समितीचे सदस्य चौकशी करायला गेले, पण निर्मल हृदयला आधीच कुणकुण लागल्यामुळे समितीच्या हाती काहीच लागले नाही. ज्या महिलांनी बैद्यनाथकडे मन मोकळं केलं होतं त्या, जोगीणींसमोर समिती सदस्यांना काहीच सांगू शकल्या नाहीत. हताश न होता बैद्यनाथ वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांच्या चकरा मारत राहिला. त्याच्या अथक परिश्रमानंतर आगरवाल दांपत्यामुळे निर्मल हृदय हे किती निर्मळ आहे, ते चव्हाट्यावर आले. प्रत्येक गावात असे एक एक बैद्यनाथ कुमार उठून उभे राहिले, तर मिशनरीज ऑफ चॅरिटीसारख्या संस्था, त्यांचा गाशा गुंडाळून निघून जातील.
लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या केरळातील मलंकारा ऑर्थोडॉक्स चर्चमधील त्या पाच पाद्र्यांविरुध्द केरळ पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अशी अनेक प्रकरणं आहेत. केरळमधील एका जोगीणीने बिशपविरुध्द बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. ४४ वर्षीय बलात्कार पीडिता जोगीणीचा आरोप आहे की बिशप फ्रँको मुलक्कल यांनी तिला ब्लॅकमेल करुन १३ वेळा तिच्यावर बलात्कार केला. तिने चर्चकडे तक्रार करुनही बिशपवर कुठलीही कारवाई झाली नाही, म्हणून ती पोलिसात गेली. तक्रार मागे घ्यावी म्हणून बिशप आता तिच्यावर दबाव टाकत आहेत.
मिशनरीजसारख्या संस्थांकडून देशभर बालगृह, अनाथालये चालविली जातात. तिथल्या पवित्र कार्यशैलीवर प्रकाश टाकणारा शोधनिबंध ‘पाञ्चजन्य’ने डिसेंबर २०१४ मध्ये प्रकाशित केला होता. फादर यह क्या किया? बांगड्या, बिंदी, गंध, शेंडी धारण करायला विरोध करणारे फादर, क्रॉस असलेलं लॉकेट बालकांच्या गळ्यात कधी घालतात, हेही कळत नाही. ज्यावेळी लक्षात येते, त्यावेळी खूप उशीर झालेला असतो. फादरकडे सोडलेली बालकं शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन जेव्हा घरी येतात, तेव्हा ती पूर्ण बदलून गेलेली असतात! प्रमाणपत्रांवरुन त्यांच्या जन्मदात्या बापाचं नाव गायब झालेलं असतं आणि त्याठिकाणी फादर विराजमान झालेला असतो. दामोदर राजुचा डी.राजू होतो, पण त्यातला डी हा दामोदरसाठी नसून तो डॅनियलसाठी असतो. शालांत प्रमाणपत्रावर लागलेलं नाव बदलणे फार कठीण असते. विधीवत धर्मांतरण न करता धर्मांतर! कायद्यातून पळवाट! डॅनीयल नाव अंगवळणी पडलं की मग विधीवत धर्मांतरण! बालगृहात प्रार्थना करता करता काही बालकं स्वतःला ख्रिश्‍चन समजू लागतात, कारण त्यांच्या नावासमोर त्यांच्या जन्मदात्यांऐवजी ख्रिश्‍चन पालकांची नोंद झालेली असते. अनाथ, असहाय पालकांच्या बालकांना ही मंडळी आपलं फक्त नावंच देत नाहीत, तर धर्मही देतात! अशा कार्यासाठी परदेशातून प्रचंड रक्कम येत असते. मोदी सरकार त्या पैशाचा स्त्रोत आणि त्याचा विनियोग याविषयी माहिती मागत आहे. म्हणून त्यांना मोदी सरकार नको आहे! आम्हालाही मोदी सरकार नको आहे, कारण फुकटचे १५ लाख रुपये मोदींनी आमच्या खात्यात टाकलेच नाहीत? धर्मविस्ताराचे पवित्र कार्य करणार्‍या मिशनरीजना भारतासारखी सुपीक भूमी जगात कुठे सापडेल का? म्हणून तर तिकडे युरोपात चर्च धडाधड कोसळत असताना, इकडे भारतात मात्र त्यांची संख्या वाढतेच आहे!
काही ख्रिश्‍चन पाद्री जपानी सम्राटाला भेटून म्हणाले, आपल्या देशातल्या महारोग्यांची सेवा करण्याची आमची इच्छा आहे, आम्हाला भूखंड द्यावा. सेवा हीच इशसेवा. सम्राटांनी आम्हाला संधी द्यावी. सम्राट म्हणाला, मंत्रीमंडळाशी चर्चा करुन आपणास कळवतो. तोपर्यंत आपण आमचा जपानी पाहुणचार घ्यावा. तीन दिवसांनंतर सम्राट म्हणाला, तुमचा उदात्त हेतू ऐकून आम्ही भारावून गेलो आहोत. आमच्या देशात येण्याची बुध्दी आपल्याला झाली, हा परमेश्‍वराचा मोठाच अनुग्रह झाला. मात्र, आम्हाला दुःख होत आहे की, आम्ही तुम्हाला आमच्या देशातला एखादा भूखंड देऊ शकत नाही. आम्ही आमच्या देशातील एक जहाज भरुन महारोगी तुमच्याकडे पाठवतो. आपल्या सुश्रुषेने ते रोगमुक्त होऊन परतले की, दुसरे जहाज पाठवू! मग बोला, केव्हा पाठवू पहिलं जहाज? पाद्री आल्या पावली निघून गेले!

Posted by : | on : 5 Aug 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक (681 of 1367 articles)

Sabarimala Ayyappa Swami Mandir
विशेष : श्रीनिवास वैद्य | हिंदू धर्मातील कुठल्याही रीतिरिवाजाला न मानणारे, या अशा बाबतीत फारच उत्साही दिसत असतात. त्यांचा हा ...

×