ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर » नेताजींचे स्वप्न…

नेताजींचे स्वप्न…

॥ रोखठोक : हितेश शंकर |

आझाद हिंद सरकारने असा देश घडविण्याचे वचन दिले होते, ज्यात सर्वांपाशी समान अधिकार असतील, सर्वांपाशी समान संधी असेल. आझाद हिंद सरकारने एक असा देश घडविण्याचे आश्‍वासन दिले होते, जो आपल्या प्राचीन परंपरांपासून प्रेरणा घेईल आणि नागरिकांना गौरव वाटेल अशा सुखी आणि समृद्ध भारताचे निर्माण करील. आझाद हिंद सरकारने एक असा भारत घडविण्याचा निश्‍चय केला होता, ज्यात देशाचा संतुलित विकास होईल, प्रत्येक क्षेत्राचा विकास होईल.

Subhash Babu

Subhash Babu

काही व्यक्ती इतक्या महान असतात की मृत्यूनंतर त्या, देशाच्या स्मरणशक्तीला सुगंधित करीत असतात. अशा व्यक्तींमध्ये एक अग्रणी नाव म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस! २१ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून तिरंगा झेंडा फडकविला, तेव्हा मला याच वर्षीच्या जून महिन्यात, मणिपूर राज्यातील इम्फाल येथे प्रो. राजेंद्र छेत्री यांची त्यांच्या घरी झालेली भेट, मोईरांग दौरा आणि नेताजींशी संबंधित अनेक ऐकलेल्या-न ऐकलेल्या गोष्टींचे स्मरण झाले. खरेतर, मणिपूर राज्यातील मोईरांग येथे इंग्रजांशी संघर्ष करत असताना नेताजींनी आपल्या देशाचा पहिला तिरंगा झेंडा तिथे फडकविला होता.
हा सर्व संघर्ष आणि मोईरांगशी जुळलेल्या मनोहर घटना सविस्तर सांगताना प्रो. छेत्री यांनी, एक घटना ऐकविली. त्यानुसार, ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान क्लीमेंट अ‍ॅटली यांनी म्हटले होते की, भारताचा जर कुणी एक राष्ट्रपिता असेल, तर मग सुभाषचंद्र बोस यांना या देशाचे आजोबाच म्हटले पाहिजे! अ‍ॅटली यांना विचारण्यात आले की, स्वातंत्र्यासाठी झालेले अहिंसा आंदोलन आणि इतर सर्व आंदोलनांबाबत तुमचे काय मत आहे? त्यावर अ‍ॅटली म्हणाले होते की, आझाद हिंद फौजेच्या समोर इतरांचे योगदान तुच्छ आहे.
वर्षानुवर्षांच्या निष्काळजीपणामुळे, देखभाल नसल्यामुळे मोईरांग येथील नेताजींच्या सैन्याची काडतुसे, लष्करी हेल्मेट आणि गणवेशांची वाईट अवस्था बघून मन विचलित झाले होते. मनात सतत प्रश्‍न फिरत होता- भारतमातेचे महान सुपुत्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतींना या देशात जपण्यात का आले नाही? त्यांना लोकांनी विसरावे म्हणून एका सुनियोजित षडयंत्राचा तो एक भाग होता का? अहंकाराच्या खुज्या लटपटींसाठी, या देशाच्या महापुरुषांंच्या गर्वोन्नत स्वप्नांची आहुती तर दिली जात नव्हती ना! कदाचित, होय!
नेताजींचे स्वप्न महान होते… जे स्वप्न सहजासहजी पूर्ण होऊ शकले नाही, ते स्वप्न निश्‍चितच फार मोठे राहिले असेल, हे उघडच आहे. आझाद हिंद सरकारचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेते वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी घोषणा केली होती की, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर एक दिवस अत्यंत सन्मानाने तिरंगा झेंडा फडकविला जाईल. देशाच्या राजधानीत विशाल, लाल, प्राचीन तटावर फडकत असलेला राष्ट्रध्वज, हे नेताजींचे स्वप्न होते. या स्वप्नाला साकार करण्याचे प्रतीक म्हणून, हा राष्ट्रध्वज नेताजी पंतप्रधान झाल्याच्या ७५ वर्षांनंतर फडकविण्यात आला. लाल किल्ल्यावर तिरंगा दरवर्षी फडकविला जातो. मग यावेळी त्यात असे काय विशेष आहे? आणि हे कशाचे प्रतीक आहे?
विशेष आहे. कारण हा ऑगस्टचा दुसरा पंधरवडा नाही. प्रतीक आहे. कारण, या आयोजनातून देशातील ‘खास घराण्याच्या’ किंवा वसाहतवादी मानसिकतेच्या वर उठून विचार करण्याची जिद्द झळकत आहे. खरेतर, आझाद हिंद सरकार अखंड भारताचे सरकार होते. अशात, लाल किल्ल्यावर तिरंगा फडकताना बघून जर आज नेताजी सुभाषचंद्र यांचे वंशज चंद्र बोस म्हणत असतील की, अखंड भारताचे पहिले पंतप्रधान सुभाष बाबू होते आणि जवाहरलाल नेहरू खंडित देशाचे पहिले पंतप्रधान, तर तथ्याच्या आणि तर्काच्या कसोटीवर त्यांचे प्रतिपादन खरेच म्हणायला हवे. आपण म्हणू शकतो की, भारताच्या फाळणीसोबतच या स्वप्नाचेही तुकडे झाले.
खरेतर, आझाद हिंद सरकारची स्वत:ची बँक होती, स्वत:चे चलन होते, स्वत:चे टपाल तिकीट होते. एवढेच नाही, तर स्वत:चा गुप्तचर विभागही होता. यातील एकही बाब इंग्रजांकडून घेण्यात आलेली किंवा हस्तांतरित नव्हती. जे होते ते आमचे स्वत:चे, देशभक्तांच्या रक्ताने, घामाने, पुरुषार्थाने अर्जित केलेले होते. इथे पंडित दीनदयाल उपाध्याय स्मरतात. त्यांनी प्रश्‍न विचारला होता की, या (हस्तांतरित) ‘स्वातंत्र्यात’ आमचा ‘स्व’ कुठे आहे? या ‘स्व’चा शोध म्हणजे, नेताजींसारख्या राष्ट्रपुरुषांच्या प्रयत्नांना सांभाळण्याचा एक प्रयत्न होता, जो आतापर्यंत अपुरा सोडण्यात आला होता.
इंग्रजाळलेली मानसिकता आणि सुभाषबाबूंशी संबंधित दस्तावेजांना वर्षानुवर्षे दडपून ठेवणार्‍या ‘संदिग्ध राजकारणा’नंतरही, नेताजींच्या वारशाला जाणण्याचे आणि जतन करण्याचे प्रयत्न या देशाने आजपावेतो केले आहेत. ‘स्व’ला जाणून घेण्याची धडपड सुरूच राहिली. ‘हस्तांतरित सत्ता’ आणि ‘स्वातंत्र्य’ यात सूक्ष्म फरक आहे. सूक्ष्म यासाठी की, तो कुणाच्याही दृष्टीस पडू दिला नाही. अन्यथा हा वंशाचा फरक आहे, व्याख्येचा फरक आहे, चारित्र्याचा फरक आहे.
आझाद हिंद सरकारने असा देश घडविण्याचे वचन दिले होते, ज्यात सर्वांपाशी समान अधिकार असतील, सर्वांपाशी समान संधी असेल. आझाद हिंद सरकारने एक असा देश घडविण्याचे आश्‍वासन दिले होते, जो आपल्या प्राचीन परंपरांपासून प्रेरणा घेईल आणि नागरिकांना गौरव वाटेल अशा सुखी आणि समृद्ध भारताचे निर्माण करील. आझाद हिंद सरकारने एक असा भारत घडविण्याचा निश्‍चय केला होता, ज्यात देशाचा संतुलित विकास होईल, प्रत्येक क्षेत्राचा विकास होईल.
इथे पुन्हा एकदा पंडित दीनदयालजी उपाध्याय यांचे स्मरण होते. त्यांनी पंचवार्षिक योजनेवर प्रश्‍न उपस्थित केले होते. सोव्हिएत संघाच्या या संकल्पनेनुसार भारतातील गरिबांचे, खेड्यात राहणार्‍या गरीब भारतीयांचे भले कसे होणार? आझाद हिंद सरकारने वचन दिले होते, ज्या ‘फोडा आणि राज्य करा’ धोरणामुळे भारत शतकानुशतके गुलाम राहिला, त्या धोरणाला मुळासकट फेकून देण्याचे. आता बघा, देशाच्या बाहेरून आणि आतून विध्वंसक शक्ती आमच्या स्वातंत्र्य, एकता आणि संविधानावर कशा प्रकारे आघात करत आहेत! नेताजींचे स्वप्न अपूर्ण का मानू नये? केवळ तीन शब्दांमध्ये हे स्वप्न आहे- राष्ट्रीयतेची भावना.
लाल किल्ल्यावर खटल्याच्या सुनावणीदरम्यान, आझाद हिंद सेनेच्या सेनापती शाहनवाज खान यांनी म्हटले होते की, सुभाषचंद्र बोस हे पहिले व्यक्ती होते, ज्यांनी त्यांच्या मनात भारतीय असण्याची भावना जागृत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्दांत- भारताला भारतीय दृष्टीने बघणे आणि समजणे आवश्यक का होते, ते आज जेव्हा आम्ही देशाची स्थिती बघतो तेव्हा स्पष्टपणे लक्षात येते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बरीच वर्षे देशाला सुभाषबाबू, सरदार पटेल यांच्यासारख्या व्यक्तींचे मार्गदर्शन मिळाले असते, भारताला बघण्यासाठी विदेशी चष्मा नसता, तर आज स्थिती खूप वेगळी असती.
आज पुन्हा एकदा बघायला हवे, गांधींनी लिहिलेल्या हिंद स्वराज पुस्तकाला, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानवदर्शनाला, पहिल्या संविधानसभेतील आणि नंतर संसदेतील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या भाषणांना, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कर्मयोगाला. याशिवायही असंख्य व्यक्ती आहेत… श्रेय ना सीमित आहे, ना बंधित आहे…
हे एक युद्ध आहे, एक संघर्ष आहे… आझाद हिंद सरकारच्या स्थापनेच्या समयी बघितल्या गेलेल्या स्वप्नांना, आपल्या आणि या देशाच्या अंतर्मनात अनुभूत करण्याचा संघर्ष… वसाहतवादी मानसिकतेचा अंगरखा काढून फेकण्याचा संघर्ष. घराणेधार्जिणेपणाच्या ऐवजी देशधार्जिणेपणाचा संघर्ष. एक स्वप्न आहे, खूप मोठे आहे. इतके मोठे की, ७५ वर्षांनंतर ते प्रतीकाच्या रूपात पुन्हा जीवित होत आहे. देशाने नेताजी बेपत्ता झाल्याचा आघात सोसला. भरल्या डोळ्यांनी ते दृश्य बघितले, जेव्हा नेताजींचा ‘घात’ करणारे लोक अश्रुपात करीत जनतेत फिरत होते. नेताजींचे सखे-सोबती, या देशातच जीवित असतानाही, विस्मृतीत ढकलले गेले.
या सर्व झंझावातातही ते स्वप्न श्‍वास घेत होते. त्याला जिवंत राहणे भाग होते. कारण, त्या स्वप्नात नेताजींसारख्या अगणित राष्ट्रपुरुषांचा जीव वसलेला आहे. ते स्वप्न भारतीयतेचे आहे. ते स्वप्न जिवंत राहील. संघर्ष सुरूच राहील…

Posted by : | on : 11 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर (334 of 1287 articles)

Terrorist Attack Form Sea
राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन | आपली सागरी सुरक्षा सुधारली आहे. पण दहशतवादी आपले कमजोर मुद्दे शोधून हल्ला करण्याचा प्रयत्न ...

×