राष्ट्रपतींचे भाषण पक्षपाती; कॉंग्रेसचा आरोप

राष्ट्रपतींचे भाषण पक्षपाती; कॉंग्रेसचा आरोप

नवी दिल्ली, २६ जुलै – देशाचे १४ वे राष्ट्रपती…

‘त्या’ पाच जवानांची जन्मठेप रद्द

‘त्या’ पाच जवानांची जन्मठेप रद्द

►माछिल चकमक प्रकरण ►सशस्त्र दल लवादाचा निर्णय, नवी दिल्ली,…

सैन्याला पूर्ण मोकळीक द्या

सैन्याला पूर्ण मोकळीक द्या

►वीरमाता तृप्ता थापर यांचे आवाहन, नवी दिल्ली, २६ जुलै…

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

►डोकलामवर चर्चेची दर्शवली तयारी, बीजिंग, २५ जुलै – सिक्कीम…

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

►भारताने चूक सुधारावी, चीनची दर्पोक्ती, बीजिंग, २४ जुलै –…

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

झुकोव्हास्की, २३ जुलै – मिग-३५ या जातीची अत्याधुनिक लढाऊ…

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

►शेतकर्‍यांना सुखी ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील ►आमदार डॉ. बोंडेंनी मांडला…

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

►२ आठवड्याची न्यायालयीन कोठडी, सातारा, दि. २५ जुलै –…

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

►३३ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, मुंबई, २४ जुलै…

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

डॉ. प्रमोद पाठक | एक काळ असा होता की…

बशिरहाटचे गौडबंगाल

बशिरहाटचे गौडबंगाल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | एव्हाना ममतांनी मागचे…

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

जयंत कुलकर्णी | स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे आपण ज्या संघ…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:05 | सूर्यास्त: 19:01
अयनांश:
Home » आसमंत » नेत्यांची नैतिक दिवाळखोरी!

नेत्यांची नैतिक दिवाळखोरी!

श्रीराम पत्रे

rahul-kejriमागील महिन्यात पाकिस्तान सीमेवर स्थापित दहशतवाद्यांच्या सात प्रशिक्षण तळांवर हल्ला करून, भारतीय सैनिकांनी ४० दहशतवाद्यांचा खात्मा केला. या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे उरी व पठाणकोट येथे शहीद झालेल्या जवानांचा प्रतिशोध घेतल्याचे भारतीय जनतेला आत्मसमाधान प्राप्त झाले व या कारवाईचे संपूर्ण देशाने उत्स्फूर्त स्वागत केले. विरोधी पक्षांनीसुद्धा सैन्य व पंतप्रधानांचे कौतुक करून, या कारवाईस आपला पाठिंबा दर्शविला. परंतु, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’ झाल्याचा पुरावा मागून भारतीय सैन्याच्या क्षमतेवर अप्रत्यक्षपणे प्रहार करून त्यांचे मनोबल तोडण्याचे घोर कृत्य केले. हेच विधान, कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनीही केले व अप्रत्यक्षपणे सैन्य प्रशासनालाच आरोपीच्या कठड्यात उभे केले. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तर याही पुढे जाऊन, ‘‘मोदी सरकार जवानोके खून की दलाली कर रही है,’’ असे वक्तव्य करून राजधर्माच्या सार्‍या मर्यादांनाच दूषित केले.
राहुल गांधींच्या या बेजबाबदार विधानाचा निषेध करण्यापेक्षा, कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या बचावाकरिता सारवासारव करण्याचे केविलवाणे प्रयत्न करणे सुरू केले. यावरून असे दिसते की, राष्ट्रीय अस्मितेपेक्षा राहुल गांधींची व्यक्तिपूजा कॉंग्रेस नेत्यांना जास्त महत्त्वपूर्ण वाटली. राष्ट्रप्रेमापेक्षा व्यक्तिमहिमाच श्रेष्ठ, हे पुन्हा एकदा कॉंग्रेससंस्कृतीत दिसून आले. दुसरीकडे, अरविंद केजरीवाल यांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’ झाल्याचा पुरावा मागून आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या योग्यतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. दिल्लीमध्ये त्यांची प्रतिमा, एक थोर सामाजिक कार्यकर्ता अशीच होती. त्या बळावरच त्यांनी राजकीय उत्कर्ष साधला. परंतु, आज याच राजकीय स्वार्थापायी त्यांनी राष्ट्रीय अस्मितेवर ओरखडे काढण्यास सुरुवात केली आहे.
सर्जिकल स्ट्राईकमुळे खरे तर सैन्याविषयी भारतीय जनमानसात राष्ट्रीय अभिमान निर्माण झालेला आहे; तसेच ज्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली ही गौरवपूर्ण कारवाई करण्यात आली त्यांना याचे श्रेय मिळणे क्रमप्राप्तच ठरते. यामुळे सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रियतेत वाढ होऊन येणार्‍या प्रादेशिक निवडणुकीत याचा लाभ करून घेण्याचा मुत्सद्दीपणा ते करतीलच, याबाबत कुणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही. परंतु, या कारवाईचे श्रेय सैन्य व जनतेलाच आहे व याच विरोधी पक्षाची संमतीही कारणीभूत आहे, असा प्रचार करूनही सत्तापक्षाला ‘सर्जिकल स्ट्राईक’चा लाभ घेण्यास विरोधी पक्षांना अटकाव करता आला असता. याकरिता ‘सर्जिकल स्ट्राईक’ झाल्याचा पुरावा मागणे किंवा ‘खून की दलाली’सारख्या राष्ट्रघातकी वक्तव्यासारखी बेजबाबदार विधाने करणे राष्ट्रीय नेत्यांकरिता लांच्छनास्पदच समजावे लागेल. कारण, या नेत्यांचे बेताल विधान, शत्रुराष्ट्राच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ झालाच नाही, या विधानाला अप्रत्यक्षपणे बळ प्राप्त करून देत आहे. पाक सीमेवर सर्जिकल स्ट्राईक झाला नसता, तर पाकिस्तानमध्ये एवढी गोंधळ उडालेली परिस्थिती निर्माण झाली नसती, पाकिस्तानी प्रसारमाध्यमे व विरोधी पक्षाने नवाझ शरीफवर एवढी टीकेची झोडही उठविली नसती; तसेच जगातील कित्येक देशांनी भारताने केलेल्या कारवाईला आपला पाठिंबाही दर्शविला नसता! खरे तर या देशांनी सर्जिकल स्ट्राईकची शहानिशा करूनच भारताला आपला पाठिंबा दर्शविला असेल ना! जगातील सार्‍या देशांवर गुप्त पाळत ठेवणार्‍या अमेरिकेने या कारवाईचे स्वागत करून, पाकिस्तानला दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची तंबी दिली, यातच भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्याचे पुरावे दडलेले आहेत. परंतु, काही विरोधी पक्षनेत्यांना या कारवाईमुळे पंतप्रधान मोदींची प्रतिमा वाढणे राजकीयदृष्ट्या धोकादायक वाटत असल्याने त्यांनी कोल्हेकुई सुरू केली आहे. खरे तर पाकिस्तानला एकटे पाडण्यात मोदींचा सततचा विदेश दौरा कारणीभूत आहे. पाकिस्तान दहशतवादाचे प्रशिक्षण स्थळ आहे, हे पुराव्यासहित सिद्ध करण्यात मोदी सफल झाल्यानेच पाकिस्तान जगात एकाकी पडला आहे. पंतप्रधानांच्या या मुत्सद्दीपणाचा जसा जगावर प्रभाव पडला, त्याचप्रमाणे देशातही त्यांची लोकप्रियता वाढली असल्याने केजरीवाल व राहुल गांधींसारख्या नेत्यांच्या चिंतेत वाढ होणे  स्वाभाविक आहे. याच वैफल्यग्रस्ततेतून ते बेताल वक्तव्य करीत सुटले आहेत.
आज देशातील काही प्रांतात मोदींच्या कट्‌टर विरोधकांची सत्ता आहे, परंतु त्यांनी यासारखी बेताल विधाने करण्यापेक्षा सैन्याची व पंतप्रधानांची प्रशंसा करणारेच उद्गार काढले आहेत व शासनाला आपला पूर्ण पाठिंबा घोषित केला आहे. प्रत्यक्ष कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधींनी या कारवाईला आपला पाठिंबा दर्शविला, मात्र त्यांचेच वारसदार या प्रकारच्या बेताल वक्तव्याचा नतद्रष्टपणा करतात, तेव्हा त्यांच्या अपरिपक्वतेची कीव करावीशी वाटते. अरविंद केजरीवाल यांना तर जणू राष्ट्रीय नेतृत्वाचे डोहाळे लागले आहेत, असे त्यांच्या राजकीय तोर्‍यावरून वाटते. आपणही पंतप्रधान मोदींसारखा चमत्कार करू शकतो, या थाटात ते पंतप्रधानांची सतत नालस्ती करून स्वत:ला त्यांच्या समकक्ष नेता असल्याचा आविर्भाव आणत असतात. परंतु, मोदींना एवढी उंची प्राप्त करण्याकरिता स्वत:ची पूूर्ण हयात घालवावी लागली. शिवाय, त्यांना पंतप्रधानपदावर स्थापित होण्यासाठी त्यांची चमत्कारी छबीच कामी पडली नाही, तर मागील नऊ दशकांपासून आपल्या राष्ट्रवादी विचारांची सार्‍या देशात ज्योत पेटवणारी राष्ट्रीय संघटना व मागील साठ वर्षांपासून जनसंघ ते भाजपा असा राजकीय प्रवास करणार्‍या राष्ट्रीय पक्षांच्या संघटित सामर्थ्याच्या सहकार्यानेच मोदी आपले उद्दिष्ट पूर्ण करू शकले, हेही विसरता येणार नाही. केजरीवालांना बहुतेक याची जाण नसावी. थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या लोकपाल बिलाच्या राष्ट्रीय आंदोलनामुळे केजरीवालांना दिल्लीची सत्ताही मिळाली व राष्ट्रीय ओळखही! याचा अर्थ, त्यांचा पक्ष राष्ट्रीय झाला असा नव्हे! असे असते तर मागील लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे घोर पानिपत झाले नसते. राष्ट्रीय पक्ष निर्माण करताना कित्येकदा हयात निघून जाते. सर्वप्रथम चारित्र्यवान अनुयायांची संघटित बांधणी करावी लागते. अन्यथा आज दिल्लीत आम आदमी पक्षाचे जे बाजारबुणगे बसले आहेत, त्यांच्या भ्रष्टतेमुळे केजरीवालांची जी फजिती होत आहे, ती झाली नसती. दुसरीकडे, राहुल गांधींची राजकीय बाल्यावस्था अजूनही संपलेली दिसत नाही. ‘खून की दलाली’ या त्यांच्या वक्तव्याने इंदिराजींच्या निर्घृण हत्येची आठवण करून दिली. यानंतर झालेल्या १९८४ च्या निवडणुकीत इंदिराजींच्या आवाजाची ‘मेरे खून का हर एक बुंद देश के काम आएगा’ ही कॅसेट ठिकठिकाणच्या सभेत वाजवून त्यांच्या बलिदानाच्या रक्तातील प्रत्येक बुंद सत्ताप्राप्तीकरिता वापरला गेला होता, यालाच म्हणतात ‘खून की दलाली!’ हे बहुतेक राहुल गांधी विसरलेले दिसतात. तसे तर इंदिराजींच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची वसुली कॉंग्रेसने शीख समुदायाच्या रक्तातून अगोदरच  केली होती, हेही विसरता येणार नाही. परंतु, कॉंग्रेसने आता अशा नकारात्मक विचारसरणीतून बाहेर पडणे आवश्यक आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात कॉंग्रेसचा सिंहाचा वाटा आहे. आजही जनता कॉंग्रेस पक्षाला सक्षम विरोधी पक्षाच्या दृष्टीने पाहत आहे. या देशात सत्ताधारी पक्षासारखाच विरोधी पक्षही मजबूत असणे लोकतांत्रिकदृष्टीने गरजेचे आहे. यावर सकारात्मक विचार करून कॉंग्रेस पक्षाने आपली राजकीय वाटचाल करावी, असे वाटते.

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under आसमंत. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसमंत (585 of 601 articles)


दिलीप करंबेळकर अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या चर्चेची तिसरी व अखेरची फेरी संपली आहे. पहिल्या दोन र्फेयांच्या तुलनेत ही फेरी एका ...