ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » आसमंत, कर्नल अभय पटवर्धन, पुरवणी, स्तंभलेखक » पंतप्रधान इम्रान खान आणि पाक सैन्याची अभद्र सांगड

पंतप्रधान इम्रान खान आणि पाक सैन्याची अभद्र सांगड

॥ विशेष : अभय बाळकृष्ण पटवर्धन |

युध्द झाले नाही म्हणजेच शांतता आहे ही भारतातील पाकिस्तान धार्जिण्या विचारवंतांची धारणा आहे. पण ते हे सोयीस्करपणे विसरतात की मागील सात दशक पाकिस्तानी आर्मीने भारताविरुध्द कोणत्या ना कोणत्या कारणाने, कोणत्या ना कोणत्याप्रकारे युध्दच छेडल आहे.त्यांची ही मानसिकता आजतायगत बदललेली नाही आणि या पुढेही बदलणार नाही. पंतप्रधान इम्रान खानमध्ये ती बदलण्याची क्षमता नाही आणि इच्छाही नाही कारण त्याचे भवितव्य पाकिस्तानी सेनेच्या हातात आहे.

Imran Khan2

Imran Khan2

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नवाझ शरीफची पाकिस्तान मुस्लीम लीग (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी) या दोन बलदंड राजकीय पक्षांच्या ऐवजी इम्रान खानची पाकिस्तान तहरिक ए इंसाफ (पीटीआय) आणि इतर मूलत्ववादी जिहादी गटांच्या सांगडीने नवीन सरकार स्थापन करण्याच्या पाकिस्तानी सेनेच्या योजनामुळे पाकिस्तानचे राजकीय आणि दहशतवादी चित्र पार बदलले आहे. या अभद्र सांगडीमुळे देशांतर्गत आणि सीमापार होणार्‍या भविष्यातील हिंसक घटनांमध्ये प्रचंड वाढ होईल यात शंकाच नाही.पाकिस्तानच्या एक्सपोर्टर ऑफ टेररवाल्या छबीमुळे इम्रान खानची पंतप्रधानकी भारतासाठी चिंताजनक ठरणार आहे, कारण तो मूलतत्ववादी विचारांचा कट्टर समर्थक आहे हे त्याच्या पक्षानी खैबर पख्तुनख्वामधील प्रांतीय सरकारमध्ये सामील केलेल्या जिहादी नावांवरून; प्रॉफेट मोहम्मद विरूध्द बोलणार्‍यांना घटनेतील कलम २९५ सी अंतर्गत मृत्यूदंड द्यावा या ७ जुलै १८च्या निवडणूक सभेत केलेल्या मागणीमधून पीटीआय पक्षानी अन्सर उल उम्माह जिहादी संघटना प्रमुख, मौलाना फजलूर रेहमानशी केलल्या राजकीय संधीमुळे आणि पाकिस्तानी सेना व कट्टर मौलवींच्या सांगडीला असलेल्या इम्रानच्या पसंतीमधून उजागर होते.संपूर्ण निवडणूकीमध्ये इम्रान खानने पाकिस्तानमधील अंतर्गत आतंकवाद किंवा भारतामधील जिहादी दहशतवादाविरूध्द ब्र देखील काढला नव्हता हे देखील लक्षणीय आहे.
इस्लामाबाद हायकोर्टाच्या जस्टिस शौकत अझिझ सिद्दीकी यांनी १८ जुलै २०१८ला नवाझ शरीफ यांच्या पीआयएलवर केलेल्या टिप्पणीनुसार पाकिस्तानची सेना आणि इतर इंटलिजन्स एजंसींनी देशातील कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे आणि देशाची सुरक्षा आणि संरक्षण मंत्रालय यांच्याशी काडीमात्र संबंध नसणार्‍या न्यायालय, प्रशासन, प्रसारमाध्यम आणि इतर विभागांच्या अंतर्ग कारभारात ढवळाढवळ करू नये. या पुढे जात आपल्या २१ जुलैच्या टिप्पणीत सिद्दीकी म्हणतात, ‘इंटर सर्व्हिस इंटलिजन्स एजन्सी इज फुलली इन्व्हॉल्व्हड इन मॅनिप्युलेशन ऑफ ज्युडिशियल प्रोसिडिंगज्, मेक्स शुअर दॅट द बेंच इज फॉर्म्ड अ‍ॅझ पर देअर कन्व्हीनियंस अड केसेस आर मार्क्ड. टू डे आयएसआय अ‍ॅप्रोच्ड चीफ जस्टिस अँड इन्स्ट्रक्टेड हिम नॉट टू रिलिझ नवाझ शरीफ अँड हिज डॉटर टिल टाईम ऑफ इलेक्शन’. पण २५ जुलैच्या सार्वत्रिक निवडणूक निकालांनी या दोन्ही सल्ल्यांना केवळ निष्प्रभच केले असे नव्हे तर तेथील न्याय व्यवस्थेवर देखील गंभीर प्रश्‍नचिन्ह ऊभ केल आहे.
पाकिस्तान नॅशनल असेंब्लीमध्ये ३४२ जागा आहेत. २७२ उमेदवार निवडले जातात आणि उर्वरित ७० जागांवर, ६० स्त्रीया व १० गैरइस्लामी धर्मियांची नेमणूक, पाच टक्क्यांपेक्षा जास्त मत मिळालेल्या पक्षांच्या अनुपातानुसार, राष्ट्रपतींद्वारे केल्या जाते. २५ जुलै १८ ला त्यापैकी २७० जागांसाठी मतदान झाले. २ जागा निवडणुकीआधीच बाद ठरवण्यात आल्या. या निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. पाकिस्तान इलेक्शन कमिशननुसार पीटीआयला ११६, पीएमएलएनला ६४, पीपीपीला ४३ आणि दहशतवाद समर्थक मुत्तहिदा मजलिस ए अमलला (एमएमए) १२, मुत्तहिदा कौमी मुव्हमेन्ट ऑफ पाकिस्तानला ६, बलुचीस्तान अवामी पार्टी/बलुचीस्तान नॅशनल पार्टी सारख्या लहान पक्षांना एकूण १६ जागा मिळाल्या. १३ उमेदवार अपक्ष म्हणून निवडुन आलेत. २८ जुलैला पीटीआयच्या नईमुल हकनी, अपक्ष आणि इतर दहशतवाद समर्थक लहान पक्षांशी संधान बांधून, सरकार स्थापनेसाठी त्यांचा पाठिंबा मिळवला. पीएमएलएन आणि पीपीपी मात्र एकत्र सरकार विरोधात बसणार आहेत.
२०१३ मध्ये पीपीपीला मात देऊन पीएमएलएन सत्तारुढ झाली आणि या निवडणुकीचा कार्यक्रम त्यांनी मे १८ मध्ये जाहीर केला. हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत. एमएमए, मोजाहिर (भारतातून आलेले शरणार्थी) पक्ष सिंधमध्ये, पीएमएल पंजाबमध्ये, दोन्ही बलुच पक्ष बलुचीस्तानमध्ये आणि एमक्यूएम सिंधमध्ये आपले बस्तान मांडून आहेत. जरी पाकिस्तान सिनेटच्या निवडणुकीमध्ये जिहादी उमेदवार निवडून आले नसले तरी पाकिस्तानच्या निवडणूक कायद्यांमध्ये बदल मागणारा मूलतत्ववादी तहरिके लब्बीब पाकिस्तान पक्ष मतगणनेत ५ व्या आणि हाफिझ सईदचा अल्ला हो अकबर तेहरिक पक्ष १२ व्या स्थानी होता.जुलैच्या निवडणुका रक्तरंजीत झाल्या. २६ मे ते २५ जुलै दरम्यान २२१ लोक जिहादी हल्ल्यांत अल्ला प्यारे आणि १३४१ गंभीर जखमी झालेत. २९ जुलैला पीपीपीएनच्या ख्वाजा आसिफनी जिहादी हल्ले आणि इलेक्शन रिगिंगची चौकशी करण्यासाठी ज्युडिशियल कमिशन बसवण्याची मागनी केली. इतर पक्षांनी या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.
स्वातंत्र्यापासून पाकिस्तान आर्मीने देशाला त्यांच्या आर्थिक व राजकीय स्वार्थासाठी गॅरिसन स्टेट बनवले आहे. त्या करता आर्मी एकतर स्वत:ला धार्जिणा पंतप्रधान सत्तेवर आणते किंवा सैनिकी बंडाद्वारे नको असलेल्या पंतप्रधानांचे सरकार ऊलथवून टाकते. मात्र २०१८ च्या निवडणूकीमध्ये सेनेने इम्रान खानच्या रुपात सिलेक्टेड प्राईम मिनिस्टर सत्तेवर आणल्याचे दिसून येते. नवाझ शरीफ यांनी आपल्या या कारकिर्दीत पाकिस्तानी आर्मीला सिव्हिल पोलिटिकल कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते सेनेला डोईजड झाले. त्यामुळे शरीफ सरकारची मुदत मे २०१८ पर्यंत असूनही पाकिस्तान आर्मीने तेथील सर्वोच्च न्यायालयाशी सांगड करून त्यांना २०१७ च्या मध्यातच पदच्युत केले. त्यामुळे २०१८ च्या निवडणूकीत सैनिकी बंडाऐवजी न्यायीक बंडाचा आधार घेण्यात आला असे म्हटले तर ते वावग होणार नाही.
पाकिस्तान आर्मी आणि इम्रान खानच्या हाती यानंतर पाकिस्तानी आण्विक अस्त्रांची किल्ली राहील हे लक्षात घेता ही अभद्र सांगड अधिकच चिंताजनक ठरेल यात शंका नाही. भारतात जिहादी घुसखोरांद्वारे रक्तरंजीत आतंकाचा हैदोस घालून त्याला खिळखीळ करण्याच्या पाकिस्तान आर्मीच्या प्रछन्न युध्दाला इम्रान खानचा संपूर्ण पाठिंबा राहील हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. वारंवार केल्या गेलेल्या मत मोजणीनंतर देखील इम्रान खानला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. त्यामुळे पंतप्रधानी खुर्ची वाचवण्यासाठी पाकिस्तान आर्मीवर विसंबून राहाण्याखेरीज त्याला दुसरा पर्यायच नाही.
इलेक्शन रॅलीमध्ये पाकिस्तानमधील अनागोंदीला भारतच संपूर्णत: जबाबदार आहे; मोदींची आर्मी पाकिस्तानी सेनेला ध्वस्त करू इच्छिते, काश्मिर हा दोन्ही देशांमधील कोअर इश्यू आहे, काश्मिरच्या लोकांवर भारत अन्विनत अत्याचार करतो आहे म्हणून त्यांच्यासाठी माझ्या मनात संवेदना आहेत, काश्मिरी स्वातंत्र्य लढ्याला माझा सदैव पाठिंबा राहील, असे तारे तोडणार्‍या इम्रान खानने मला भारताशी संबंध सुधरवायला आवडेल असे म्हणताच; पाकिस्तानी आयएसआय जिहादी घुसखोरांच्या माध्यमातून काश्मिरमध्ये हैदोस घालते आहे हे दुर्दैवाने विसरलेल्या; भारतातील पाकिस्तान धार्जिण्या विचारवंतांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. इम्रान खानने काश्मिर हा भारत पाकिस्तानमधील कोअर इश्यू व फोर्स मल्टिप्लायर आहे असे म्हणताच, काश्मिरमधील अलगाववादी राजनेते, फुटीरतावादी राजकीय पक्षांनी आनंदानी नाचू लागलेत. २०१९ च्या भारतातील सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर; हिंदू पाकिस्तान/हिंदू तालीबानचा जप करणारे अपरिपक्व भारतीय नेते, मोदी सरकार पाडण्यासाठी आम्ही पाकिस्तानची सुध्दा मदत घ्यायला कचरणार नाही अशा वल्गना करणारे राष्ट्रस्तरावरील प्रमुख विरोधी पक्ष, भारताच्या आंतरराष्ट्रीय व आर्थिक यशाला हिणावणारे बौध्दिक दिवाळखोर या सर्वांच्या हाती सरकारला झोडपण्यासाठी इम्रान खानची पंतप्रधानकी आणि त्यानी केलेल्या मैत्रीच्या वल्गना हे एक जळतं कोलीत मिळाले आहे. स्वत:च्या संकुचीत स्वार्थासाठी पाकिस्तान आर्मी सदैवच ग्लोबल इस्लामिक जिहादची पाठराखण करत होती आजही करते आहे आणि या पुढे देखील करेलच हे वरील सर्व मंडळी सोयीस्करपणे नजरे आड करतात.
पाकिस्तान आर्मीचा भारतद्वेष आणि भारतीयांबद्दलचा तिरस्कार, चार भारत पाक युध्दांमध्ये उघड झाला आहे.काश्मिरमध्ये मागील तीस वर्ष चाललेले प्रछन्न युध्द संपण्याच्या काहीच शक्यता नजरेस पडत नाहीत. नवाझ शरीफचे भारत प्रेम फारसे उतू जात नव्हते. मोठया बहुमता शिवाय पाकिस्तानी आर्मीच्या कुटील कारवायांवर ते अंकुश लावण्यात यशस्वि होऊ शकले नाहीत. मात्र, तेथील जनरल्सच्या डोळ्यास डोळा घालून बोलण्याची धमक त्यांच्यात होती हे त्यांनी नरेन्द्र मोदींच्या शपथविधीला लावलेल्या हजेरीवरून लक्षात येते. पाकिस्तान आर्मीने सुप्रीम कोर्टाच्या प्रमुख न्यायाधिशांना हाताशी धरून इम्रान खानला पंतप्रधान बनवण्याची खेळी खेळली. इम्रान खानची दीर्घकालीन इच्छा मात्र पाकिस्तान आर्मीच्या या खेळीमुळे पूर्ण झाली आहे. इम्रान खाननी आपल्या क्रिकेटच्या प्रदीर्घ कारकिर्दीत बॅटस्मन्सना अनेक स्विंगर्स/बाऊंसर्स टाकले असले तरी तो असा एकतरी स्विंगर्स/बाऊंसर त्याचे आका असलेल्या पाकिस्तानी जनरल्सना टाकू शकेल का याचे उत्तर पाकिस्तानमधील शेंबड पोर देखील देईल.
आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरवातीला इम्रान खान अँटि आर्मी होता. मात्र २०१४ मध्ये तत्कालीन आर्मी चीफ, जनरल राहील शरीफनी त्याला नवाझ शरीफ विरोधात इस्लामाबादला २० दिवसांचा वेढा घालण्यासाठी उद्युक्त केल्यानंतर इम्रान खान आर्मीच्या गळ्यातील ताईत बनला. क्रिकेट कॅप्टन असतांना देखील इम्रान खान, भारता विरुध्दच्या सामन्याला एखाद्या युध्दाचे रूप देत असे. भारताविरुध्द तो आता याहून फारसे काही वेगळ करेल अशी आशा बाळगणे व्यर्थ आहे. या पार्श्‍वभूमीवर इम्रान खानचे सरकार भारतीय सेनेला देऊ शकणार्‍या काश्मिर खोर्‍यातील असंतोष, चीन पाकिस्तान सांगडीची वृध्दिंगत होणारी दृढता आणि भारतावरील दहशतवादी आघातांमध्ये लक्षणीय वाढ या संभाव्य आव्हानांचा आढावा घेणे क्रमप्राप्त आहे.
कुठल्याही कोअर इश्युच्या उत्तरासाठी युध्द अनिवार्य असते ही चीनी राज्यकर्ते व पीएलएची धारणा आहे. इम्रान खाननी देखील चीनचे अनुकरण करत काश्मिर प्रश्‍नाला कोअर इश्यू संबोधून त्यासाठी पाकिस्तान युध्ददेखील करू शकतो याची नांदी केली आहे. जरी युध्द झाले नाही तरी भविष्यात पाकिस्तान आर्मी आंतरराष्ट्रीय सीमा आणि लाइन ऑफ कंट्रोलवरील फायरिंग आणि घुसखोरीमधे प्रचंड प्रमाणात वाढ करेल, काश्मिरी अलगाववाद्यांना सर्वंकष आर्थिक व सामरिक मदत करेल आणि जागतिक टीकेमधून सुटण्यासाठी काश्मिरी तरुणांना दहशतवादी कृत्य करण्यास बाध्य करेल. २०१९ मधील भारतीय सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी पाकिस्तानी सेना मोदी सरकार आणि भाजपाला बदनाम करण्याचा आणि काश्मिर प्रश्‍नाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणण्यासाठी तेथील असंतोषाला वादळात बदलवण्याचा सर्वंकष प्रयत्न करेल. यासाठी पठाणकोट एयरबेसवरील हल्ला प्रणालीच्या सुधारित रुपांद्वारे, मिलिटरी कप्स आणि संसाधनांवर जबरदस्त आघात संभव आहेत. याच्या उत्तरात भारतीय सेनेला, शून्य सहिष्णुता आणि त्वरित प्रतीघात हे दहशतवाद विरोधी प्रखर धोरण अंगिकारावे लागेल. चीन पाकिस्तान सांगड आता प्रत्यक्षात आल्यामुळे इम्रान खानला ती दृढ कशी होईल याचा विचार करावा लागेल.
इम्रान खानच्या भारतासंबंधी सौदार्हाची चुणूक शाह महम्मद हुसैन कुरेशीला परराष्ट्र मंत्रीपद देण्याच्या बातमीवरून स्पष्ट होते. शाह महम्मद कुरेशी १९९३-९६ मधे पार्लामेंटरी अफेयर्स मिनिस्टर आणि २००७-११ मध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्र मंत्री असतांना त्यांनी भारताबरोबरचे संबंध सुधारण्याच्या वल्गना करतांना भारतविरोधी तीव्र जहादी हल्ल्यांविरुध्द काहीच पाऊल ऊचलले नाही. उलटपक्षी २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारताच्या संभाव्य प्रतीघाताविरुध्द चीनची मदत मिळवण्यासाठी त्यांनी चीनचा दौरा केला होता ज्या फलस्वरुप भारताला पाकिस्तानविरुध्द डायरेक्ट मिलिटरी अ‍ॅक्शन घेता आली नव्हती असा प्रवाद आहे.इस्लामी जिहाद्यांना देशाबाहेर घालवण्याच्या अमेरिकन इच्छेला पाकिस्तानी सेना भीक घालणार नाही. पाकिस्तान अमेरिकेला हवे असलेल पाऊल उचलत नसल्यामुळे त्याच्या वरील आर्थिक गर्तेतून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेच्या वर्चस्वाखाली जागतिक आर्थिक संस्थान, पाकिस्तानाला कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत देणार नाहीत. त्यामुळे, भविष्यात चीनवर अधिकाधीक अवलंबून राहाण्याशिवाय पाकिस्तानकडे दुसरा पर्यायच नसेल.
इम्रान खान पंतप्रधान बनणार हे स्पष्ट झाल्यानंतर चीनने पाकिस्तानला तत्काळ दोन बिलियन डॉलर्सची देणगी जाहीर केली आहे हा केवळ योगायोग नाही हे देखील ध्यानात ठेवण आवश्यक आहे. इम्रान पंतप्रधान बनल्यामुळे आणि त्याने दाखवलेल्या मैत्रीच्या गाजरामुळे खूश होणार्‍या भारतीयांनी ही खरी ऑफर आहे की पंतप्रधानपदी आरुढ होतांना पाकिस्तानी राजनेते वाजवतात तस नेहमीच तुणतूणे आहे आणि भारताबरोबर मैत्रीच्या ऑफरला इम्रान खान मूर्त स्वरूप देऊ शकेल याची खात्री काय या दोन प्रश्‍नांचे उत्तरे दिले पाहिजे.
२०१४ पासून पाकिस्तानी सेना प्रामुख्याने काश्मिरमधेच आतंकवादी हैदोस घालते आहे. पण चीनने केलेल्या आर्थिक मदतीच्या परत फेडीसाठी इम्रान खानच्या ११ ऑगस्टला होणार्‍या शपथविधीनंतर काश्मिरसह इतरत्र भारतातील संवेदनशील संसाधनांवर जिहादी हल्ले होण्याच्या मोठ्या संभावना निर्माण होतात. उत्तर भारतातील गोधनाचा वाद व तद्नुसार झालेले दंगे, पूर्वेकडील रोहिंग्या मुस्लीम/बांगला देशी इस्लामी घुसखोरांची जनगणना, मध्य भारतात नक्सल्यांचा शहरी भागातला वाढता वावर, आरक्षणाकरता सुरू झालेली आकस्मिक हिंसक आंदोलने या सर्व घडामोडी भारतात विविध सोज्वळ नावांनी वावरणारे पाकिस्तानी स्लीपर सेल्स नव्याने कार्यरत झाले आहेत याकडे दिशानिर्देश करतात. यांच्यावर मात करण्यासाठी भारतातील इंटलिजंस एजंसींनी यापुढे जोमाने काम करणे आणि सेना व पोलिसांच्या दहशतवाद विरोधी दस्त्यांना सत्वर अत्याधुनीक फायर पावर आणि मॅन पावर देणेही आवश्यक असेल.
युध्द झाले नाही म्हणजेच शांतता आहे ही भारतातील पाकिस्तान धार्जिण्या विचारवंतांची धारणा आहे. पण ते हे सोयीस्करपणे विसरतात की मागील सात दशक पाकिस्तानी आर्मीने भारताविरुध्द कोणत्या ना कोणत्या कारणाने, कोणत्या ना कोणत्याप्रकारे युध्दच छेडल आहे.त्यांची ही मानसिकता आजतायगत बदललेली नाही आणि या पुढेही बदलणार नाही. पंतप्रधान इम्रान खानमध्ये ती बदलण्याची क्षमता नाही आणि इच्छाही नाही कारण त्याचे भवितव्य पाकिस्तानी सेनेच्या हातात आहे. त्यामुळे भारत सरकारने स्वत:ची खुर्ची संभाळण्यात असमर्थ असलेल्या नव्या पाकिस्तानी पंतप्रधानांकडे मैत्रीचा हात त्याच्या हेतूविषयी संपूर्ण खात्री केल्याशिवाय पुढे करू नये. विदेशी संरक्षणतज्ञांनुसार ‘खान हॅज मॉर्टगेज्ड हिमसेल्फ टू द आर्मी अँड रिलिजियस एक्सट्रीमिस्ट फॉर्मेशन्स टू पिव्होट हिमसेल्फ अँड हिज पार्टी टू पावर. ही विल रिमेन देअर प्रिझनर ड्युरिंग हिज टेन्युअर अ‍ॅझ प्राईम मिनिस्टर.’ ‘नया पाकिस्तान विल लूक ए लॉट लाईक द ओल्ङ’.

Posted by : | on : 5 Aug 2018
Filed under : आसमंत, कर्नल अभय पटवर्धन, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, कर्नल अभय पटवर्धन, पुरवणी, स्तंभलेखक (543 of 1222 articles)

Shrikanth Bolla
अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव | श्रीकांत बोल्ला आज हैदराबादस्थित बोलॅण्ट इंडस्ट्रीजचा सीईओ असून, दृष्टिहीन असूनही आपण काहीही करू शकतो, हे ...

×