ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:

पंधरा लाखांची गोष्ट!

॥संवाद : सोमनाथ देशमाने |

कुठे ती एक कोटीची गोष्ट आणि कुठे आमची पंधरा लाखाची गोष्ट! पंधरा लाखासाठी गेली साढे चार वर्षे आम्ही मोदींच्या मागे हात धुवून मागे लागलो आहोत! फुकट मिळत असलेले एक कोटी नाकारणारे स्विस नागरिक त्या चीनी रद्दीवालीसारखे बावळट आहेत. मोदी सरकारने पंधरा लाखाची ऑफर जाहीर केल्यानंतर जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो, यावर भारतीयांच्या राष्ट्रीय चारित्र्याचे मूल्यमापन करता येईल! आपण नाही केले, तरी जगातले कुणीतरी करणारच!

Swiss Peoples

Swiss Peoples

एक चीनी महिला चुई दररोज गल्लीबोळातून फिरत रद्दी विकत घ्यायचा व्यवसाय करीत असते. एके दिवशी एक चीनी गृहिणी रद्दी विकताना बरीच घासाघीस करते. चुई भाव वाढवून द्यायला तयार होते. हातगाडीवरील तराजू आणण्यासाठी चुई रस्त्यावर येते आणि त्या गृहिणीच्या मनात पाप येते. ती रद्दीच्या गठ्यात एक जाडजूड विट बेमालुमपणे सरकवून देते. रद्दीचा गठ्ठा विस्कटून न बघताच चुई त्याचे वजन करते आणि पैसे देऊन गठ्ठा घेऊन जाते.
संध्याकाळी नवरा घरी येतो तेव्हा बायको नटूनथटून तयार झालेली असते. नवर्‍याला म्हणते, आटपा लवकर, आज आपण सिनेमाला जाऊ आणि बाहेरच जेवण करुन येऊ. नवरा म्हणतो, माझ्याकडे पैसे नाहीत, पुढच्या आठवड्यात बघू. बायको म्हणते, माझ्याकडे आहेत पैसे! आज मी घरातली सगळी रद्दी विकली! नवरा लगबगीने आपल्या खोलीत जातो. बरीच शोधाशोध करतो आणि त्रासिक चेहर्‍याने बायकोवर खेकसतो, टेबलावर माझा एक जाडजूड लिफाफा होता, तो कुठाय? तू घेतलास का? बायको म्हणते, तो होय? मी रद्दीत विकून टाकला! नवरा मटकन खाली बसतो. काय केलंस तू हे? अगं, गेल्या काही महिन्यात टेबलाखालून घेतलेले पंधरा लाख होते त्यात?
आपल्या घरी रद्दीची वर्गवारी करीत असताना कागदात गुंडाळलेली विट चुईच्या नजरेस पडते. क्षूद्र स्वार्थासाठी लोक किती खालच्या पायरीवर घसरतात, हे बघून ती दुःखी-कष्टी होते. विट बाजुला ठेवते आणि कामाला लागते. तो लिफाफाही तिच्या हाती लागतो. आत पंधरा लाखाच्या कोर्‍या करकरीत नोटा! ती बघतच राहते. ती नोटा लिफाफ्यात होत्या तशा परत घालून, लिफाफा विटेवर ठेऊन शांतपणे झोपी जाते.
इकडे त्या नवराबायकोला रात्रभर झोप येत नाही. एकमेकांवर खेकसाखेकशी होते. सकाळ होताच त्या रद्दीवालीला शोधून काढले पाहिजे. रद्दीवालीच ती! रद्दीत एक लिफाफा मिळाला आणि त्यात पंधरा लाख मिळाले, हे ती कबूल करील का? त्यातली काही रक्कम तिने खर्च तर केली नसेल ना? पोलिसात तक्रार केली असेल का? पोलिसाचे नाव काढताच बायकोच्या पोटातही गोळा येतो. हरामाचा पैसा बुध्दी भ्रष्ट करतो म्हणतात! झोप कशी येणार?
दुसर्‍या दिवशी चुई नेहमीप्रमाणे, रद्दी विकत घेणार, उचित दाम देणार, असा पुकारा करत रस्त्यावरुन जात असते. नवरा धावत पळत जाऊन चुईला गाठतो. म्हणतो, काल तू माझ्या बायकोकडून रद्दी घेऊन गेलीस? त्यात तुला एक जाडसर लिफाफा मिळाला का? तुझ्यासाठी तो रद्दीचा भाग असला, तरी माझ्यासाठी तो लिफाफा फार महत्वाचा आहे. चुई त्याला आपादमस्तक न्याहळते. थोडीफार चौकशी करुन लिफाफा त्याच्या हातात ठेवते. तो नोटा मोजून बघतो आणि त्यातली एक नोट चुईला देऊ करतो. चुई त्याला नम्रपणे नकार देते आणि हातगाडी ढकलत पुढे निघून जाते.
नवरा-बायकोच्या आनंदाला उधान येते. नवरा म्हणतो, नाही तरी माझे हे पंधरा लाख गेलेच होते, घे तुला शॉपिंगला! रद्दीवाली खरंच बावळट आहे. आयुष्यभर पायपीट करुनही तिला पंधरा लाख मिळायचे नाहीत. ती खोटं बोलली असती, तर मी काय करु शकलो असतो? चोरीचा मामला! बायको म्हणते, अहो, मी पण तुमचीच बायको आहे म्हटलं! कमी समजू नका मला? त्या रद्दीवालीशी आधी घासाघीस करुन भाव वाढवून घेतला आणि नंतर रद्दीत विट सरकवून दहा किलोचे पैसेही लाटले! आहात कुठे? रद्दीवाली खरंच बावळट आहे!
नवरा-बायकोचे संभाषण ऐकत दाराआड उभी असलेली चुई म्हणते, ही घ्या तुमची विट. काल रद्दीत चुकून आली माझ्याकडे! रद्दीच्या व्यवसायात मी माझ्या आयुष्यभरात पंधरा लाख मिळवू शकेन की नाही, मला माहीत नाही, पण प्रामाणिकपणे जे काही मिळविते, त्यावर मी आयकरही भरते! दिवसभर रद्दी गोळा करत फिरते आणि रात्री शांतपणे झोपी जाते, कारण मी स्वतःला कधीच फसवत नाही! मी समाधानी आहे. तुमच्या घरातली रद्दी बाहेर काढण्यासाठी मला केव्हाही बोलवा. तुमच्या मनातली रद्दी मात्र तुम्हालाच बाहेर काढून फेकून द्यावी लागेल! कारण, ती मी विकत घेऊ शकत नाही आणि कुणी फुकटही घेणार नाही! येते मी!
युरोप, अमेरिकादी देशांचा दौरा करुन आलेली भारतीय मंडळी तिकडच्या शिस्तीबद्दल, चोख व्यवस्थांबद्दल कौतुकाने बोलत असतात. आपल्या देशातही तशा व्यवस्था असाव्यात म्हणून मागणी करतात, पण त्यासाठी योगदान द्यायला, आपल्या प्रवृत्ती बदलायला मात्र सहसा कुणी तयार होत नाहीत. आपल्यात तसा सकारात्मक बदल झाला की आपणही त्याच्यापेक्षा सरस व्यवस्था निर्माण करु शकू. जपानच्या बुलेट ट्रेनचे गोडवे गायचे, पण तशी व्यवस्था भारतात निर्माण करायचा निर्णय जेव्हा मोदी सरकार घेते, तेव्हा त्याला क्षूद्र विरोध करायचा, हा वैचारिक व्यभीचार झाला! गुजरातलाच फायदा होणार, महाराष्ट्राला काय मिळणार? जात-पंथ-प्रांत-भाषा याचा तुकड्यातुकड्यात संकुचित विचार करण्यापेक्षा समग्र भारतीयांचा, राष्ट्राचा उदात्त विचार करायला आणि त्याप्रमाणे वागायला आम्ही भारतीय कधी शिकणार? भारत जपानसारखा, चीन, इस्त्राईलसारखा व्हायचा असेल, तर भारतीयांना जपानी, चीनी, यहुदी लोकांसारखे राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेऊन आपली कार्यसंस्कृती बदलावी लागेल! माझी मातृभूमी सर्वप्रथम, हा महामंत्र हाडीमासी भिनवावा लागेल, तरच आपण त्यांची बरोबरी करु शकू!
युरोपातल्या अनेक शहरांमध्ये अफलातून कॉफी हाऊसेस आहेत! अफलातून आम्हा भारतीयांसाठी! त्यांच्यासाठी त्यांच्या कार्यसंस्कृतीचाच तो एक भाग आहे! स्वतःबरोबरच इतरांचाही तेवढाच विचार करणे! आमच्या सनातन भाहतीय संस्कृतीतही इतरांचाच नव्हे, तर चराचरातील तमाम सजीव-निर्जीवांचा विचार केला जात असे. आमच्या निसर्गानुकूल सणोत्सवांची रचनाही आमच्या दृष्ट्या ऋषीमुनींनी त्याच दृष्टीकोनातून केलेली आहे. त्यात विकृतींनी केव्हा प्रवेश केला, तेव्हापासून ते आजच्या आपमतलबी प्रवृत्तीपर्यंत उलटा प्रवास कसा झाला, हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. तो पुढे केव्हातरी! चला तर मग, त्या युरोपातल्या कॉफी हाऊसमध्ये जाऊया!
एक गिर्‍हाईक येते. ऑर्डर देते, एक कप कॉफी प्लिज! एक कप कॉफीचे बिल आणि कपभर वाफाळलेली गरमागरम कॉफी त्याच्या पुढ्यात येते. निवांतपणे कॉफीचा आस्वाद घेतल्यानंतर बिल अदा करुन गिर्हाईक निघून जाते.
दुसरे गिर्‍हाईक येते. दोन कप कॉफी प्लिज! एक मला आणि एक भिंतीवर! दोन कप कॉफीचे बिल आणि एक कप कॉफी त्याच्या समोर येते. एक कप कॉफीचा निर्देश करणारे बिल भिंतीवर डकविले जाते. एक कॉफीचा आस्वाद घेऊन गिर्‍हाईक दोन कप कॉफीचे बिल अदा करुन निघून जाते. कॉफी हाऊस चालक त्याला धन्यवाद म्हणायला विसरत नाही!
तिसरे गिर्‍हाईक तेवढ्याच रुबाबात येते. एक कप कॉफी प्लिज! भिंतीवरची! एक कप कॉफी तेवढ्याच अदबीने त्याच्या पुढ्यात येते आणि एक कप कॉफीचा निर्देश करणारे भिंतीवरचे बिल फाडून टाकण्यात येते! कॉफी हाऊस चालकाला धन्यवाद देऊन गिर्‍हाईक निघून जाते. त्याच्या कॉफीचे बिल आधीच कुणीतरी चुकते केलेले असते.
ना भिंतीवर कॉफी टाकणार्‍याच्या चेहर्‍यावर अहंकार, ना भिंतीवरची कॉफी पिणार्‍याच्या चेहर्‍यावर ओशाळलेपण! ना कॉफी हाऊस चालकाची लुडबूड! एका हाताने दिलेले दान दुसर्‍या हाताला समजू देऊ नये म्हणतात, ते हेच!
आपल्या भारतात अन्नदानाची परंपरा फार पुरातन आहे. आजही भारतातल्या अनेक देवस्थानांमध्ये जी अन्नछत्र चालविली जातात, ती कमी अधिक प्रमाणात युरोपातल्या कॉफी हाऊसेस सारखीच आहेत. किंबहुना गतकाळात ज्या अनेक चांगल्या गोष्टी भारतातून जगभर गेल्या, त्याचेच प्रतिबिंब ही कॉफी हाऊसेस असावीत! आपल्याकडील अन्नछत्रांना पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली पाहिजे. ती एक सामाजिक चळवळच व्हायला हवी! युरोपातल्या कॉफी हाऊसेसच्या धर्तीवर भिंतीवरचे जेवण ही सुविधा उपलब्ध असणारी भोजनालये देशभर सुरु करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचा विचार मोदी सरकार करत असल्याचे समजते. खरं तर कुणीही उपाशी राहाणार नाही याची काळजी घेणे, ही समाजाची जबाबदारी आहे. सरकार फक्त प्रोत्साहन देऊ शकते, क्वचित प्रसंगी हातभारही लाऊ शकते.
ही भोजनालये कशी असतील बघा! दोन राईस प्लेट्स प्लिज! एक मला आणि एक भिंतीवर! जेवण करणारा एक राईस प्लेट खाईल आणि दोन राईस प्लेट्सचे बिल देऊन जाईल. एक राईस प्लेट प्लिज! भिंतीवरची! भूक तर लागली आहे, पण खिशात पैसे नाहीत अशी व्यक्तीही उपाशी झोपणार नाही, कारण त्याच्या पोटात एक वेळचे अन्न जाईल, याची व्यवस्था कुण्यातरी अन्नदात्याने आधीच करुन ठेवलेली असेल! तरीही यदाकदाचित भिंतीवर उपलब्ध असलेल्या ताटांपेक्षा मागणारांची संख्या अधिक झालीच, तर तेवढे अनुदान देऊन तफावत भरुन काढण्याचा सरकार विचार करत असल्याचे समजते. दातृत्वासाठी प्रसिध्द असलेल्या भारतीय समाजात भिंतीवरचे जेवण भोजनालय चालकांवर सरकारकडून अनुदान घ्यायची वेळंच येणार नाही! भिंतीवरची कॉफी मिळाली नाही म्हणून कुणी गिर्‍हाईक हिरमुसून परत गेल्याचे उदाहरण तिकडे अजूनपर्यंत घडले नाही! आपल्या प्रस्तावित भिंतीवरचे जेवण भोजनालयांची अशीच कीर्ती तिकडे जाऊन धडकली पाहिजे.
स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची माहिती भारत सरकारला लवकरच प्राप्त होणार आहे. त्यातल्या ज्या खातेदारांच्या नावावर काळा पैसा जमा आहे, तो ताब्यात घेऊन भारतीय तिजोरीत जमा करण्याची रीतसर प्रक्रिया सुरु होणार आहे. प्रत्येक भारतीयाच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकता यायची शक्यता मात्र कमी आहे, कारण मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आयकर बुडवून पैसा जसा स्विस बँकेकडे गेला, तसाच तो मधल्या काळात काही अंशी भारतात आला असण्याची, जगात इतरत्र वळवला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही जी काही रक्कम भारत सरकारला उपलब्ध होईल, ती भारतीय नागरिकांना वाटून टाकण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला असल्याचे समजते! त्यासाठी विहित नमुन्यात ऑन लाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत. ज्यांना कुणाला पंधरा लाख रुपये हवे असतील, त्यांनी आपला बँक खाते क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक अर्जात नमूद करणे बंधनकारक असणार आहे. पारदर्शक व्यवहारासाठी अर्जदारांची नावं सार्वजनिक केली जाणार आहेत!
प्रतिकूल परिस्थितीवर मात करणार्‍या कष्टाळू नागरिकांचा चिमुकला देश, स्विट्झरलँड! निसर्गसौंदर्याने नटलेला, आर्थिकदृष्ट्या संपन्न देश स्विट्झरलँड! स्विस बँक नावाची खाजगी बँक याच स्विट्झरलँड देशात आहे. स्विस बँकेचे नियम आपल्याकडच्या बँकिंपेक्षा खूपच भिन्न आहेत. आपल्याकडे पैसे बँकेत ठेवल्यानंतर बँक आपल्याला त्यावर व्याज देते, परंतु स्विस बँकेचा व्यवहार उलटा आहे, सेफ डिपॉझिट लॉकरसारखा! स्विस बँक खातेदारांना व्याज तर देत नाहीच, उलट खातेदारांकडूनच सेवा कर वसूल करते. आपल्याकडे बँकेत खाते उघडण्यासाठी किती यातायात करावी लागते? पण स्विस बँकेत जगातला कुणीही घरबसल्या सहज खाते उघडू शकतो! तुमची कुठलीही चौकशी केली जात नाही. तुमच्या खात्याविषयी कमालीची गोपनीयता पाळली जाते. खातेदारांना एक खाते क्रमांक आणि एक पासवर्ड दिला जातो. बस्स! ज्याच्याकडे खाते क्रमांक आणि पासवर्ड असेल, तो बँकेशी व्यवहार करु शकतो! त्यामुळे स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची माहिती मिळविणे फार जिकिरीचे काम आहे.
जगभरातले चोर, बेईमान नेता, अभिनेता, माफिया, तस्कर, मोठमोठाली उद्योजक, राज-राजकीय घराणी यांची पहिली पसंती स्विस बँक! स्विस बँकेचा एक नियम आहे. सलग सात वर्षे एखाद्या खात्यावर कुठलाच व्यवहार झाला नाही, तर ते खाते गोठवले जाते आणि अशा खात्यातील रकमेवर स्विस बँकेचा मालकी हक्क स्थापन होतो. खातेदार मरण पावला, मारला गेला, आजीवन गजाआड गेला किंवा अन्य कारणाने तो बँकेकडे फिरकलाच नाही आणि अशा खातेदाराने आपला खाते क्रमांक, पासवर्ड कुण्या आप्तस्वकीयांकडे दिला नसेल, तर त्याचे खाते आपोआपच गोठवले जाते! अशी कितीतरी रक्कम स्विस बँकेत पडून होती, आजही असेल! इसवी सनाचे तिसरे सहस्त्रक सुरु झाल्याच्या प्रित्यर्थ स्विस बँकेने एक निर्णय घेतला. गोठवलेली खाती उघडली आणि स्विस बँक चक्रावून गेली! जगातल्या एकूण काळ्या धनापैकी ४०% काळे धन समोर आले, ज्याच्यावर हक्क सांगायला कुणीही समोर आले नव्हते. एवढ्या प्रचंड रकमेचे करायचे काय? स्विस बँक प्रशासनाने स्विट्झरलँड सरकारशी विचार विनिमय करुन नागरिकांकडून प्रस्ताव मागविण्याचा निर्णय घेतला. या पैशाचा विनियोग कसा करावा? नागरिकांची मतं जाणून घेण्याबरोबरच स्विस बँकेने आपल्याकडून एक प्रस्ताव देशवासीयांसमोर ठेवला. जर जनतेची इच्छा असेल, तर बँक प्रशासन ही रक्कम स्विस नागरिकांना वाटून द्यायला तयार आहे! प्रत्येक स्विस नागरिकाच्या वाटल्या एक कोटी येतील!
स्विस सरकारने त्यासाठी सतत पंधरा दिवस स्विस नागरिकांची मतं ऐकून घेतली. अनेक देशहितकारी प्रस्ताव आले. देशाची सुंदरता वाढविण्यासाठी, स्विट्झरलँड भेटीवर येणार्‍या परदेशी पर्यटकांना अधिक चांगल्या सेवासुविधा पुरविण्यासाठी, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी या रकमेचा उपयोग केला जावा, जेणेकरुन स्विट्झरलँडची आंतरराष्ट्रीय पतप्रतिष्ठा वाढेल असे ९९.२% स्विस नागरिक म्हणाले! सिम्पली ग्रेट! या स्विस नागरिकांनी फुकटच्या, हरामाच्या पैशाला बाणेदारपणे नकार दिला! याला म्हणतात राष्ट्रीय चारित्र्य! मोदीजी, आम्हाला पंधरा लाख रुपये कधी देणार आहात म्हणून भीक मागणार्‍या, त्यासाठी मोदींची निंदा नालस्ती करणार्‍या भारतीयांकडे कुठून येणार असले राष्ट्रीय चारित्र्य? भारताला स्वातंत्र्य बिना खड्ग बिना ढाल मिळाल्याचा खोटा डांगोरा पिटला आणि भारतीयांना भीक मागायची, फुकट खायची सवय लावली. कुठून येणार नकार द्यायचा बाणेदारपणा? उलट फुकट, सवलतीत काही न देणारी सरकारं आम्ही नाकारतो!
फुकट्या भारतीयांच्या डोळ्यात याहूनही झणझणीत अंजन घालणारी घटना वरील राष्ट्रीय सर्वेक्षण प्रसिध्द झाल्याच्या दुसर्‍या दिवशी घडली. २५ जानेवारी २०००! हातात मोठमोठाले बॅनर घेऊन हजारोंच्या संख्येने स्विस नागरिक रस्त्यावर उतरले! काय होती त्यांची मागणी? ०.८% फुकट्या स्विस नागरिकांची नावे सरकारने विना विलंब जाहीर करावीत, ज्यांनी एक कोटी रकमेची मागणी केली आहे! हे ०.८% लोक स्विस समाज आणि स्विट्झरलंडसाठी कलंक आहेत! आमच्या मातृभूमीची आंतरराष्ट्रीय बदनामी आम्ही कदापि खपवून घेणार नाही. त्यांनी सार्‍या देशाची माफी मागितलीच पाहिजे!
राष्ट्रभक्तीच्या उत्स्फूर्त जनसागरासमोर स्विस बँकेला, स्विट्झरलँड सरकारला नतमस्तक व्हावेच लागले. ०.८% फुकट्यांना दंडीत करायचे आश्‍वासन सरकारकडून मिळाल्यानंतरच ९९.२% प्रक्षूब्ध राष्ट्रभक्त स्विस नागरिकांचा क्रोध शमला.
कुठे ती एक कोटीची गोष्ट आणि कुठे आमची पंधरा लाखाची गोष्ट! पंधरा लाखासाठी गेली साढे चार वर्षे आम्ही मोदींच्या मागे हात धुवून मागे लागलो आहोत! फुकट मिळत असलेले एक कोटी नाकारणारे स्विस नागरिक त्या चीनी रद्दीवालीसारखे बावळट आहेत. मोदी सरकारने पंधरा लाखाची ऑफर जाहीर केल्यानंतर जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो, यावर भारतीयांच्या राष्ट्रीय चारित्र्याचे मूल्यमापन करता येईल! आपण नाही केले, तरी जगातले कुणीतरी करणारच!

Posted by : | on : 21 Oct 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक (393 of 1288 articles)

1975 Emergency
प्रासंगिक : शोभा फडणवीस | आज कुठे विरोधकांना न्यायालयाच्या अधिकाराची मुस्कटदाबी झालेली दिसते? तसे असते तर वरवरा राव, गौतम नवलखा, ...

×