ads
ads
भारत-पाक चर्चा रद्द

भारत-पाक चर्चा रद्द

►इम्रान सरकारचाही खरा चेहरा दिसला ►भारताचा स्पष्ट आरोप, वृत्तसंस्था…

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

►अमित शाह यांचा आरोप, वृत्तसंस्था रायपूर, २१ सप्टेंबर –…

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

►भारतीय जवानांची मोठी कामगिरी, वृत्तसंस्था श्रीनगर, २१ सप्टेंबर –…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:21
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, सतीष भा. मराठे » पाकिस्तान ‘वीप’च्या विळख्यात!

पाकिस्तान ‘वीप’च्या विळख्यात!

॥ विशेष : सतीश भा. मराठे |

‘पाकिस्तान- कोर्टिंग द ऍबिस’ या २०१६ साली हार्पर कॉलिन्स प्रकाशकाद्वारे प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक तिलक देवाशेर यांनी ‘दि वीप ऍनालिसिस’ या नावाचे प्रकरण पुस्तकात समाविष्ट करून भारतीय वाचकांपुढे पाकिस्तानचे भयानक, पण वास्तववादी चित्र रेखाटले आहे. या प्रकरणाच्या अंतर्गत वॉटर- रनिंग ड्राय, एज्युकेशन- ऍन इमर्जन्सी, इकॉनॉमी- स्ट्रक्चरल विकनेसेस आणि पॉपुलेशन- रीपिंग द डिव्हिडंट, या चार लेखांचा समावेश केला आहे. यातून लेखकाने तेथील विदारक स्थितीचे वास्तववादी वर्णन केले आहे.

Pakistan Weep

Pakistan Weep

लेखाचे हे शीर्षक वाचून अनेकांना आश्‍चर्य वाटण्याची शक्यता आहे. ‘पाकिस्तान- कोर्टिंग द ऍबिस’ या २०१६ साली हार्पर कॉलिन्स प्रकाशकाद्वारे प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक तिलक देवाशेर यांनी ‘दि वीप ऍनालिसिस’ या नावाचे प्रकरण पुस्तकात समाविष्ट करून भारतीय वाचकांपुढे पाकिस्तानचे भयानक, पण वास्तववादी चित्र रेखाटले आहे. या प्रकरणाच्या अंतर्गत वॉटर- रनिंग ड्राय, एज्युकेशन- ऍन इमर्जन्सी, इकॉनॉमी- स्ट्रक्चरल विकनेसेस आणि पॉपुलेशन- रीपिंग द डिव्हिडंट, या चार लेखांचा समावेश केला आहे. यातून लेखकाने तेथील विदारक स्थितीचे वास्तववादी वर्णन केले आहे. या चार लेखांच्या आद्याक्षरांच्या जुळणीतून उपरोक्त शीर्षकाची उकल होते. ती अशी water, education, economy आणि population यातील w, e , e, p मिळून वीप शब्द तयार होतो. या ‘वीप’ची चिकित्सात्मक बाजू सविस्तरपणे पुढे आल्यावर उरते ते भयाण आणि भेसूर पाकिस्तान नामक अयशस्वी राष्ट्र! लेखकाने विपुल विवरण (डाटा) आपल्या देशापुढे व जगापुढे मांडले आहेत. याकडे डोळेझाक करणे शक्य नाही. इतके ते विश्‍वासक असून समर्पकपणे मांडण्यात आले आहेत. लेखक भारत सरकारच्या कॅबिनेट सचिव पदावरून २०१४ साली निवृत्त झाले असून ‘पाकिस्तान’ विषयाचे गाढे अभ्यासक आहेत.
आज ७० वर्षांनंतर पाकिस्तानातील बुद्धिजीवी विचारत आहेत, ‘व्हेअर इज जिनाज पाकिस्तान?’ जिनांना नेमका कोणता पाकिस्तान हवा होता, याबाबत आपल्या देशातील विचारवंतांमध्येही मतभिन्नता आढळते. यानुषंगाने २३ मार्च १९४० रोजी पाकिस्ताननिर्मितीचा ठराव पारित झाला तेव्हा जिनांचे भाचे मेहमुदाबादचे राजे यांचे काय विचार होते, हे जाणून घेणे उचित ठरेल. त्यांचे म्हणणे होते- ‘आमचा आदर्श मुस्लिम राष्ट्र निर्माण करणे नसून इस्लामिक राष्ट्र निर्माण करणे हा आहे. पहिले इस्लामिक राष्ट्र जर १३०० वर्षार्ंपूर्वी मदिनेत अस्तित्वात आले, तर पाकिस्तान हे असे दुसरे इस्लामिक राष्ट्र ठरेल.’ या मेहमुदाबादच्या राजांना त्यांनी निर्माण केलेल्या राष्ट्राची निरर्थकता दहा वर्षांतच अनुभवायला मिळाली. जगातील ८ व्या क्रमांकाचे मोठे लष्कर आणि अण्वस्त्रसज्जता याच्या पडद्याआड आता पाकिस्तानला आपले दारिद्र्‌य, इस्लामचे केलेले विकृतीकरण, फसलेले आर्थिक धोरण व नियोजन या बाबी लपवणे शक्य होणार नाही. आपणच पाकिस्तानी विचारधारेचे म्हणजेच पर्यायाने इस्लामचे रक्षणकर्ते आहोत, हा तेथील लष्कराचा दावा व तोरा आता उघडा पडू लागला आहे. अर्थात, जिनांना याची चाहूल पाकिस्तानच्या निर्मितीनंतर लगेच लागली असावी असे दिसते.
जिनांना तेव्हा वाटत असणारी भीती आता वास्तवात उतरली असून तो देश ‘मल्टी ऑर्गन फेल्युअर’च्या अवस्थेला पोचला आहे. मृत्यूच्या काही दिवस अगोदर थकलेल्या व हताश झाालेल्या जिनांनी तत्कालीन पाक पंतप्रधान लियाकत अली यांच्यापुढे विलाप केला की- ‘बाय क्रिएटिंग पाकिस्तान आय हॅव कमिटेड बिगेस्ट ब्लण्डर ऑफ माय लाईफ.’ याविषयीचे सविस्तर वर्णन नोव्हेंबर १९८७ मध्ये पेशावरच्या फ्रण्टियर पोस्ट या वृत्तपत्रात प्रकाशित झाले होते.
तिलक देवाशेर यांनी ‘वॉटर- रनिंग ड्राय’ या लेखात जे वास्तव मांडले आहे ते विदारक असून तो देश भीषण अवर्षणाच्या दाराजवळ उभा आहे, हे स्पष्टपणे जाणवते. १९५१ साली पाकिस्तानात दरडोई पाण्याची उपलब्धता ५६५० क्युबिक मी. इतकी होती. २०१५ साली ती घसरून ९४० क्युबिक मी. या पातळीवर येऊन ठेपली. २०३५ सालापर्यंत उपलब्धतेची पातळी ५०० क्युबिक मी.पेक्षाही कमी राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे तेथील इंडस वॉटर सिस्टिम ऍथॉरिटी या संस्थेच्या प्रमुखांनी २५ फेब्रु. २०१५ रोजी संघीय सचिवांना पत्र लिहून मागणी केली की, पुढील ५ वर्षांपर्यर्ंत देशातील सर्व विकासकामांवर बंदी घालण्यात यावी. यातून वाचलेला पैसा पाणलोटक्षेत्र निर्माण करण्यासाठी उपयोगात आणावा. एका अनुमानानुसार, पाकिस्तानातील ९० टक्के जमीन कोरडवाहू किंवा आंशिक कोरडवाहू असून अन्न उत्पादनासाठी शेती पूर्णपणे ओलितांच्या सुविधांवर अवलंबून आहे. पाकिस्तानची कृषी मुख्यत: सिंधू नदी व तिच्या उपनद्यांच्या पाण्यावर विसंबून आहे. सिंधू नदीच्या पश्‍चिमेकडील झेलम व चिनाब नद्यांचे यात महत्त्वाचे योगदान आहे.
पाकिस्तानातील सिंध व पंजाब प्रांतादरम्यान पाणिवाटपाच्या संबंधीचा वाद सन १८७० सालापासून सुरू आहे. यावर त्या देशाला तोडगा काढणे शक्य झाले नाही. असे असले तरी पाकिस्तान नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांच्या पाणीसमस्येसाठी भारताला दोषी ठरवत आला आहे. वस्तुस्थिती मात्र याच्या नेमकी विपरीत आहे. आजपर्यंत दोन्ही देशात जे करार झाले त्यापैकी सिंधू पाणीवाटप कराराचेच प्रामाणिकपणे पालन झाले आहे. याचे कारण उघड आहे. या कराराच्या पालनाचे दायित्व भारतावर आहे. पाकिस्तानला भारताकडून जे त्याला हिंदू भारत म्हणतात, अविरत पाणीपुरवठा हवा आहे. हिंदूंचा उत्कर्ष मात्र त्यांना बघवत नाही, अशी तेथील राज्यकर्त्यांची मतलबी व विकृत मानसिकता आहे. भारताप्रतीच्या टोकाच्या आकसापायी ७ मार्च २०१६ रोजी पाक सिनेटमध्ये एक ठराव पारित करण्यात आला. यात मागणी करण्यात आली की, १९६० सालच्या सिंधू पाणीवाटप कराराचा पुनर्विचार करण्यात यावा. तेथील डॉन वृत्तपत्राने मात्र या ठरावाचे वर्णन ‘घातक’ असे केले होते. आंधळ्या भारतविरोधापायी आपण स्वत:च्या पायावर कुर्‌हाड मारून घेत आहोत, याचे भान तेथील राजकारण्यांना राहिले नाही. १९६० साली झालेल्या सिंधू पाणीवाटप करारानुसार पूर्वेकडील रावी, बियास आणि सतलज या नद्यांतील फक्त ३० एम. ए. एफ. पाणी भारताला वापरता येईल. पाकिस्तानला मात्र ८० टक्के म्हणजेच १४० एम. ए. एफ. पाणी वापरता येईल. (एम. ए. एफ. म्हणजे मिलियन एकर फिट.) वास्तविकता मात्र अशी आहे की, भारत स्वत:च्या वाट्याला आलेल्या २० टक्के पाण्यापैकी १० टक्क्‌यांपेक्षा कमी पाणी वापरू शकत आहे. आता मात्र परिस्थिती बदलत आहे. भारताने किशन गंगा आणि रतले ही धरणे बांधण्याचे ठरविल्यावर पाकिस्तानच्या पोटात गोळा उठला आहे. यामुळे त्या देेाने या प्रकल्पांना आक्षेप घेतले असून जागतिक बँकेकडे दाद मागितली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी जागतिक बँकेने १४ व १५ सप्टेंबर २०१७ रोजी वॉशिंग्टन येथे भारत व पाकिस्तानच्या प्रतिनिधी मंडळाची बैठक आयोजित केली होती. पाकिस्तानच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ही चर्चा निष्फळ ठरली. आपल्या अधिकारातील २० टक्के पाण्याचा भारत पुरेपूर उपयोग करू शकला, तर पाकिस्तानात हाहाकार माजेल, अशी स्थिती आहे. अशी हातातोंडाची परिस्थिती असूनही पाकिस्तानला भारताशी सामंजस्य ठेवण्याची सुबुद्धी होत नाही, हीच खरी समस्या आहे. या गोंधळलेल्या वातावरणातही तेथील इंडस वॉटर सिस्टिम ऍथॉरिटी या संस्थेने तेथील सरकारला घरचा अहेर देत बजावले की, भारत संधीतील तरतुदीनुसार त्याच्या वाट्याला आलेल्या पाण्यापेक्षा कितीतरी कमी पाण्याचा वापर करीत आहे. या संस्थेने ठाम भूमिका घेतली आहे की, पाकिस्तानातील पाणी समस्येसाठी शेजारी देशाला दोषी ठरविता येणार नाही.
एज्युकेशन : ऍन इमर्जन्सी- यात लेखकाने असे मत मांडले की, युनेस्कोच्या अहवालानुसार शिक्षणप्रसाराच्या बाबतीत १२० देशांमध्ये पाकिस्तानचा ११३ वा नंबर लागतो. पाकिस्तानात साक्षरतेचे प्रमाण ५७ टक्के आहे. ग्रामीण भागात तर हे प्रमाण ५० टक्क्‌यांपेक्षाही कमी आहे. शिक्षणावर त्या देशात जी.डी.पी.च्या जेमतेम २ टक्के खर्च केला जातो. एका पाकिस्तानी एन.जी.ओ.च्या मते, तेथील अडीच कोटी मुले जी एकूण मुलांच्या संख्येच्या ४७ टक्के आहेत ती शाळेबाहेर आहेत. यापैकी ६८ टक्के मुलांनी कधी शाळेचे तोंडही पाहिले नाही! यावर कळस म्हणजे गेल्या ७० वर्षांत तेथील अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करून त्याचे इस्लामीकरण करण्यात आले आहे. यात भारतविरोधी आणि हिंदूविरोधी लिखाणाचा मोठा भरणा आहे. ङ्गजिहादङ्ख या संकल्पनेचाही प्रभावी पगडा आहे. पाणी समस्येबरोबरच शैक्षणिक समस्येने ग्रस्त झालेला पाकिस्तान यातून बाहेर पडू शकतो, याची जगाला खात्री वाटेनाशी झाली आहे. १८५७ च्या इंग्रजांविरुद्धच्या उठावानंतर ब्रिटिश एक धडा शिकले. तो म्हणजे एकसंध भारतीय समाज हा इंग्रजी साम्राज्याला धोका आहे. यामुळे हा समाज विभाजित ठेवून दोन्ही मुख्य धार्मिक गटांना झुंजत ठेवण्यातच इंग्रजांचे हित आहे. याला मुस्लिम विचारवंत सर सैयद अहमद यांनी तत्काळ उचलून धरले. इंग्रजी शिक्षणाचा गंध नसल्याने मुस्लिम समाज हिंदूंच्या तुलनेत मागासलेला आहे, असा मुद्दा त्यांनी इंग्रज सरकारपुढे मांडला. इंग्रजी शिक्षणाची कास धरून ब्रिटिश शासकांशी न लढता मुस्लिमांनी त्यांना साथ देऊन स्वत:चे भले करावे, असा आग्रह धरला. हिंदू-मुस्लिम यांच्यात दुही निर्माण करण्याचे काम इंग्रजांच्या मदतीने सर सैयद अहमद यांनी १९ व्या शतकाच्या मध्यात केले. जिनांनी नंतर १९ व्या शतकात त्यावर कळस चढविला. हिंदूंपासून वेगळे होऊन ७० वर्षे उलटल्यावरही पाकिस्तानात मुस्लिमांचे मागासलेपण दूर होऊ शकले नाही हे कटु सत्य आहे.
इकॉनॉमी : स्ट्रक्चरल विकनेसेस- यात लेखक असे म्हणतो की, १९६० साली पाकिस्तानचा विकासदर ६.८ टक्के होता. २०१५/१६ साली तो घसरून ४.७ टक्क्‌यांवर आला. या विकासदराच्या आधारे त्या देशाची अर्थव्यवस्था वर्षाला १० लाखांपेक्षा कमी रोजगारनिर्मिती करू शकते. एका अहवालानुसार ६ कोटी पाकिस्तानी लोकांना अन्नटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाकिस्ताननिर्मितीच्या वेळी वीज उत्पादन ६० मेगॅवॅट इतके होते. २०१५ साली उत्पादनक्षमता २३ हजार मेगॅवॅट इतकी असूनही प्रत्यक्ष उत्पादन १२ हजार मेगॅवॅट इतकेच होऊ शकले. हे सगळे फसलेल्या नियोजनाचे द्योतक आहे.
बेसुमार लोकसंख्यावाढ : १९५१ साली पाकिस्तानची लोकसंख्या ३ कोटी ५० लाख होती. २०१४ सालापर्यंत यात साडेपाच पट वाढ होऊन ती १९ कोटी १७ लाख इतकी झाली. या गतीने त्या देशाची लोकसंख्या २०५० सालापर्यंत ३९ कोटी ५० लाख इतकी होण्याचा अंदाज आहे. कुटुंबनियोजनाच्या प्रयत्नांना धर्माचा अडसर असल्याने यात सुधारणेची शक्यता नाही. वास्तविक, मोठी लोकसंख्या ही त्या देशाला वरदान ठरू शकते. नियोजनाच्या अभावी तसे होताना दिसत नाही. यामुळे ती शाप ठरण्याचीच शक्यता आहे. पाकिस्तानी कामगार मोठ्या संख्येने जगभर पसरले आहेत. पाकिस्तान हा जगातील एक मोठा कामगार निर्यात करणारा देश म्हणून गणला जातो. तेलाच्या सतत कमी होणार्‌या किमतींमुळे मध्यपूर्व व खाडी देशातील पायाभूत विकासाच्या खर्चात मोठी कपात होण्याची शक्यता असून, यामुळे पाकिस्तानी कामगारांवर बेकारीची कुर्‌हाड कोसळू शकते. आधीच जर्जर झालेली पाकिस्तानी अर्थव्यवस्था हा भार सहन करू शकणार नाही, हे उघड आहे.
इतकी दारुण परिस्थिती असूनही तेथील राज्यकर्त्यांना दिशा ठरविता येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्यात खोलवर रुजलेली भयग्रस्तता, अनागोंदी व आजपर्यंत रसातळाच्या दिशेने त्यांची झालेली वाटचाल.
पाकिस्तान भारतापेक्षा आर्थिकदृष्ट्‌या बराच मागे आहे. त्या देशातील अनेक संस्था प्रभावहीन व शक्तिहीन आहेत. तेथील बलुच, सिंधी, पश्तु, शिया, मोहाजीर व अहमदिया या वांशिक गटामधील संघर्षास पायबंद घालणे तेथील प्रशासनास आजपर्यंत शक्य झाले नाही. या सर्व वांशिक गटांवर पंजाबी लोकांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. सैन्यावरही पंजाबी लोकांचाच नेहमी पगडा राहिला आहे. पाकिस्तानातील नैसर्गिक साधनसंपदा तुटपुंजी आहे. पाण्यासाठी ते पूर्णपणे भारताच्या सद्भावनेवर अवलंबून आहेत. यामुळे भारताकडून काश्मीर हिसकावून घेण्यासाठी जो दीर्घ संघर्ष ते करत आहेत त्याने त्यांचा विकास होऊ शकला नाही. या सतत संघर्षाचा ताण त्यांची अर्थव्यवस्था सहन करू शकत नाही. याच्या विपरीत स्थिती भारताची आहे. भारताने गेल्या ६९ वर्षांत सर्वच आघाड्यांवर मोठीच प्रगती केली आहे. नेमकी हीच बाब पाकिस्तानी सैन्याला खुपते. भारताची ही प्रगती कशी रोखायची किंवा किमान त्यात अडथळे कसे आणायचे, याची पूर्ण जबाबदारी तेथील सैन्याने शिरावर घेतली आहे. भारताबरोबर तडजोडी केल्यानेच पाकिस्तान आर्थिक प्रगती करून त्यांच्या नागरिकांचे जीवनमान उंचावू शकतो. परंतु, पाकिस्तानी सेना हे मान्य करायला तयार नाही. भारताचा उत्कर्ष रोखण्यासाठी युद्धभूमीवर कितीही पराभव स्वीकारावे लागले तरी ते आपली हटवादी भूमिका बदलणार नाहीत. भारताबरोबर तडजोड करणे, यालाच पाकिस्तानी सेना त्यांचा पराभव मानते. सैन्याची ही विचारसरणी ‘देशाची सुरक्षा’ या बिंदूभोवती केन्द्रित नसून ती तथाकथित आदर्शवादाने प्रेरित आहे. याचमुळे भारताने काश्मीर प्रश्‍नावर कितीही तडजोडी केल्या, तरी त्यांची ताठर भूमिका बदलणे शक्य नाही. उलट, भारताच्या समन्वयवादी भूमिकेने त्यांना प्रोत्साहन मिळून दु:साहस करण्याची संधी प्राप्त होईल.
या अशा परिस्थितीत पाकिस्तानचा सर्वनाश अटळ आहे. जगाला मात्र हे सर्व उघड डोळ्यांनी पाहण्याशिवाय पर्याय नाही, हे निश्‍चित!

Posted by : | on : Oct 1 2017
Filed under : आसमंत, पुरवणी, सतीष भा. मराठे.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, सतीष भा. मराठे (688 of 952 articles)

Keep Out Refugees
उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मुळनिवासी निरपेक्ष समाजाला आपली ओळख जपण्याची गरज वाटली नसती. म्यानमारचे बुद्ध, भारतात हिंदू वा ...

×