ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक » पापस्तान : अवलक्षणी शेजारी!

पापस्तान : अवलक्षणी शेजारी!

॥ टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे |

Pakistan Map Flag

Pakistan Map Flag

१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, हे आपण शाळेपासून घोकतो. स्वातंत्र्यप्राप्ती ही फार मोठी आनंदाची घटना होतीच. मात्र, त्याचसोबत देशाची फाळणी होऊन पापस्तान नामक एक बांडगूळ आपला शेजारी म्हणून जन्माला आले. १४ ऑगस्ट हा त्यांचा स्वातंत्र्यदिन. आपल्या या शेजार्‍याबद्दल काही अशा गोष्टी ज्या आपल्याला बहुतेक वेळा माहिती नसतात…
पापस्तानमध्ये शिकवला जाणारा इतिहास-
जो समाज इतिहास विसरतो त्याला कधीच इतिहास घडवता येत नाही. पण, आपल्याला शिकवला जाणारा इतिहासच जर खोटा असेल तर? इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून फक्त थापांची थप्पी माथी मारली असेल तर? पापस्तानात नेमक्या अशाच थापा इतिहास म्हणून शिकवल्या जातात. पापस्तानचा जन्म कधी झाला? १४ ऑगस्ट १९४७ हे उत्तर तातडीने आपल्या डोक्यात येईल. पण थांबा, हे उत्तर नाही. मग १९३३ साली… जेव्हा चौधरी रहिमत अलीने पाकिस्तान हा शब्द पहिल्यांदा वापरला. अहं… पुन्हा चूक. पापस्तानच्या इतिहासाच्या पुस्तकानुसार; त्याचा जन्म झाला आठव्या शतकात! महंमद बिन कासीम हा त्याचा जन्मदाता. अखंड आशिया खंडात तेव्हा म्हणे फक्त पापस्तानच पसरला होता. अरबांपासून ते रोमनांपर्यंत म्हणे यांचे व्यापारी संबंध होते (काय विकायचे ते मात्र सांगत नाहीत बरं!), तर पुढे या ‘पापस्तान’च्या सलतनतीचा आलमगीर झाला तो औरंगजेब. त्यानेच खर्‍या अर्थाने जगात पापस्तानला उच्च पदावर नेऊन ठेवलं. नंतर मग मराठ्यांनी पापस्तानचे राज्य खिळखिळे करण्याचा पहिला प्रयत्न केला. त्यांनंतर मात्र ब्रिटिशांचे राज्य आले आणि पापस्तानच्या या राजवटीचा शेवट झाला! पुढे १९४७ साली हिंदू आणि शीख यांनी दंगल घडवून पापस्तानची फाळणी केली आणि हिंदुस्थान नामक देश जन्माला आला! आहे ना गंमत? पण खरी मजा पुढे आहे, नवीनच जन्म घेतलेल्या हिंदुस्थान नामक युद्धखोर देशाने भाबड्या पापस्तानवर ६५, ७१, सियाचीन आणि कारगील अशी चार युद्धे लादली. या प्रत्येकाचा पापस्तानने ‘मूँहतोड जवाब’ दिला. तरीही हिंदुस्थानची युद्ध करण्याची भूक मिटत नसल्याने त्यांच्याकडून सीमेवर सतत गोळीबार होत असतो!
घड्याळ विरुद्ध दिशेने सुरू आहे असे वाटत असले, तरी असाच इतिहास पापस्तानच्या शाळांत शिकवला जातो. या विषयावरील विस्तृत लेख ‘ढहश ऊरुप’ या पापस्तानी वर्तमानपत्रात १७ ऑगस्ट १६ रोजी प्रकाशित झाला आहे. या देशातील शाळा-शाळांतून हाच खोटा इतिहास शिकवला जातो. हिंदुस्थान हा आपला शत्रू आहे, असंही ठासून सांगितलं जातं. हे शिकणारे विद्यार्थी पुढे जाऊन हिंदुस्थानाबद्दल नेमका काय विचार करत असतील, हे सांगण्याकरिता मानसोपचारतज्ज्ञ वा ज्योतिषी यांपैकी कुणाचीही गरज नाही. पापस्तानची सामान्य जनता ही हिंदुस्थानला भाऊ मानते; त्यांना युद्ध नको शांतता हवी आहे, असे माझ्या देशातल्या काही नादान पुरोगाम्यांना वाटत असते. त्यांनी आयुष्यभर याच गैरसमजात राहून आतिफ अस्लमची गाणी ऐकावी आणि शांततेची कबुतरे उडवावी!
पापस्तान : आपला ‘राष्ट्रीय दिन’देखील चुकीच्या दिवशी साजरा करणारा देश-
२३ मार्च हा पापस्तानचा ‘राष्ट्रीय दिवस.’ यालाच ‘यौम-ए-पाकिस्तान’ म्हणजेच पाकिस्तान दिन असे म्हटले जाते. आपल्याकडे प्रजासत्ताक दिनाला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व पापस्तानात या दिवसाला आहे. राष्ट्रीय सुट्टी, लष्करी प्रदर्शने वगैरे तामझाम करून हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे १९४० साली झालेला ‘लाहोर ठराव.’ या ठरावानुसार ब्रिटिश इंडियातील मुस्लिमबहुल प्रांतांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळावी, ही मागणी मुस्लिम लीगद्वारे मान्य करण्यात आली. ‘पाकिस्तान’ या शब्दाचा सर्रास वापर सुरू झाला तो या ठरावानंतरच. मजेची गोष्ट अशी की, जो ठराव मंजूर केल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ २३ मार्चला ‘यौम-ए-पाकिस्तान’ साजरा केला जातो; तो प्रत्यक्षात २३ नसून २४ मार्च १९४० रोजी मंजूर करण्यात आला होता! थोडक्यात, पापस्तान आपला राष्ट्रीय दिन एक दिवस अगोदर साजरा करतो. किंबहुना आपला ‘राष्ट्रीय दिन’देखील चुकीच्या दिवशी साजरा करणारा एकमेव अडाणी देश म्हणजे पापस्तान!
राष्ट्रगीतातही उसनवारी!-
कौमी तराना म्हणजे राष्ट्रगीत. पापस्तानच्या राष्ट्रगीताचे बोल आहेत- ‘पाक सरजमीं शाद बाद.’ हाफ़ीज जलंदरी नामक शायराने लिहिलेले हे गीत १ मार्च १९५० पासून पापस्तानचं राष्ट्रगीत आहे. मग १९४७ ते १९५० या तीन वर्षांत या देशाकडे राष्ट्रगीत नव्हते का? उत्तर आहे, होते. त्याचे बोल होते ‘ए सरजमीन-ए-पाक.’ मग हे गीत का बरे बदलण्यात आले? कारण जरी स्वतः बॅ. महंमद अली जिनांच्या विनंतीनुसार या गीताची रचना करण्यात आली असली, तरी या गीताचा रचयिता हा एक हिंदू होता! प्रा. जगन्नाथ आझाद हे त्यांचे नाव. एका मुस्लिम देशाचा कौमी तराना काफराने लिहिलेला कसा काय असू शकतो? याहून मोठी शरमेची बाब नाही, असे वाटल्याने हा बदल करण्यात आला. त्याहून मजेची गोष्ट म्हणजे या देशात राष्ट्रगीत लिहावे म्हणून दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झालेल्या एका मुसलमान व्यापार्‍याने पैसे देऊन बक्षीस जाहीर केले होते. म्हणजे राष्ट्रगीताच्या निर्मितीसाठीसुद्धा या भिकारड्या देशाला बाहेरून पैसे घ्यावे लागले!
अखेरीस १९४९ साली हे गीत कौमी तराना म्हणून स्वीकारलं गेले. असे असले तरी १९५४ सालपर्यंत या गीताची फक्त धूनच वाजवण्यात येत असे! का? कारण हे संपूर्ण गीत फारसी भाषेत असल्याने सर्वसामान्य पापस्तानी नागरिकाला म्हणताच येत नसे! संपूर्ण राष्ट्रगीतात केवळ ‘पाक सरजमी का निझाम’ या ओळीतील ‘का’ हा एकमेव शब्द वगळता अन्य सर्वच्या सर्व शब्द फारसी आहेत. थोडक्यात, राष्ट्रगीतासारख्या अस्मितेच्या प्रतीकातल्या भाषेच्या बाबतीतही भिकारडेपणा. १९५४ सालपर्यंत रट्टा मारून झाल्यावर हा कौमी तराना पहिल्यांदा गायला गेला. आज पापस्तानला जे गीत आपल्या अभिमानाचे बाब वाटते, ते प्रत्यक्षात मात्र धर्मांधता, लाचारी आणि उसनवारी यांचा नमुना आहे.
गेल्या सत्तर वर्षांत हिंदुस्थानने जी प्रगती केली, तिच्या नखाचीही सर नसलेला आणि तरीही मिजासखोर असलेला असा हा आपला अवलक्षणी शेजारी!

Posted by : | on : 12 Aug 2018
Filed under : आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक (350 of 1226 articles)


रोखठोक : हितेश शंकर | संपुआचे राज्य होते. तीन लॉर्ड साहेब होते. तिघांनाही कामाला लावण्यात आले. तिघांनीही संविधानाची शपथ घेऊन ...

×