ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक » पोलिस दलाचे सक्षमीकरण

पोलिस दलाचे सक्षमीकरण

॥ राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन |

पोलिसांना गुन्हेगारांचा प्रभावीपणे सामना करता यावा आणि त्याचबरोबर स्वत:च्या व नागरिकांच्या जीविताचेही संरक्षण करता यावे यासाठी त्यांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे दिली जावीत. ही शस्त्रे वापरण्याबाबतचे कौशल्यही त्यांच्यात निर्माण केले जावे. एक सत्य गोष्ट अशी आहे की हिंसक जमावाला काबूत आणण्यासाठी किंवा आवश्यक ती कठोर कारवाई करण्यासाठी महिला पोलिस सक्षम ठरू शकत नाहीत. महिला पोलिसांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

India Police

India Police

काँग्रेससह देशातील डाव्या पक्षांनी १०/०९/२०१८ ला इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या ‘भारत बंद’ला हिंसक वळण लागले. ‘बंद!’ला पाठिंबा देत कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर उतरले. बंद शांततेच्या मार्गाने आणि सरकारी मालमत्तेचं नुकसाने होऊ न देता आंदोलन करणार असल्याचं जाहीर करण्यात आले. मात्र अनेक भागात बसेस तोडण्यात आल्या.
पोलिस यंत्रणा मजबूत करा
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आणि एकूण देशात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. या हिंसाचारात सर्वाधिक बळी जातात ते सामान्य माणसांचे. स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक जे हिंसाचार घडत असलेल्या ठिकाणी अडकतात आणि ते मारहाण, जाळपोळ याला बळी पडतात. कामाकरिता बाहेर पडलेल्या लोकांना अचानक उसळलेल्या हिंसाचाराला बळी पडावे लागते. मग तो हिंसाचार भीमा कोरेगावचा हिंसाचार, औरंगाबादेतला गोंधळ असो, दूध आंदोलन, शेतकरी आंदोलन आणि आता मराठा आरक्षणातला हिंसाचार, यामध्ये सामान्य माणसांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
राजकीय नेते आणि त्यांचे दौरे यात पोलिस बळाचा बराच वापर होत असल्याने कायदा-सुव्यवस्थेकडे पोलिसांचेे अनेकदा दुर्लक्ष होते. पोलिसांवर अनेकदा राजकीय दबाव येत असल्याने पोलिसांचे हातही बांधलेले असतात. पोलिस यंत्रणा मजबूत केली जावी आणि राज्यात कायदा-सुव्यवस्था उत्तम असावी, यादृष्टीने काही उपाययोजना नक्कीच करता येतील.
पोलिसाच्या समस्या दूर करा
पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण असतो. कामाचे तास निश्‍चित नसल्याने शरीर आणि मन थकणे, भागणे साहजिक असते. पोलिस कर्मचार्‍यांनासुद्धा वैयक्तिक अडी-अडचणी असतात. वरिष्ठांनी कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. सारेजण एका विशाल कुटुंबाचे घटक आहे असे समजून सार्‍यांना समजून घेतल्यास त्याचे निश्‍चित सकारात्मक परिणाम दिसतील. यामुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढेल व ते अधिक आनंदाने आणि समाधानाने आपले कर्तव्य पार पाडतील. कामाच्या वेळा अनियमित असल्याने जवळपास घर असणे सोयीचे असते. मुख्य समस्या आहे कुटुंबाच्या सुरक्षिततेची आणि भवितव्याची. त्यावर लक्ष असावे.
पोलिस खात्यात सर्वांचे शरीर आणि मन कठोर असायला हवे. कामाचा अतिरिक्त बोजा तसेच अन्य कारणाने निर्माण होणार्‍या ताणाचे पोलिसांच्या आरोग्यावर विपरित परिणाम दिसतात. यामुळे पोलिसांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नियमित वैद्यकीय तपासणी, योगा तसेच मेडिटेशन यावर भर दिल्यास पोलिसांच्या आरोग्यविषयक समस्या आटोक्यात आणता येतील.
पोलिस दल सक्षम व्हावे
पोलिसांची मुख्य कर्तव्ये असल्या क्षुल्लक कामांमुळे बाजूला राहतात. पोलिसांची प्रमुख चार कामे असतात. ती म्हणजे, गुन्ह्यांचा तपास, कायदा व सुव्यवस्था राखणे, सामाजिक सुरक्षा आणि गुप्त वार्ता. परंतु याच्याशी थेट संबंध नसलेल्या कामांचा बोजा पोलिसांवर इतका असतो की मुख्य कर्तव्यांकडेच त्यांचे दुर्लक्ष होते. पोलिसांनी त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे यासाठी त्यांच्या सुवीधात वाढ केली जावी.
कोणत्याही आव्हानांना सामोरे जाणारे तत्पर पोलिस दल असावे, त्या करता तशा प्रशिक्षणाचीही सोय उपलब्ध करून दिली पाहिजे. अत्याधुनिक साधने त्यांना मिळाली पाहिजेत. पोलिसांची निवड करताना त्यांची मानसिक चाचणीसुद्धा घ्यायला हवी.
पोलिस दलात काम करणार्‍या अधिकार्‍यांना त्यांचे कर्तव्य प्रभावीपणे पार पाडता यावे यादृष्टीने काही निवडक हुशार अधिकार्‍यांची निवड करून त्यांना विदेशात प्रशिक्षणासाठी पाठविण्याची व्यवस्था करण्यात यावी. ब्रिटीश व अमेरिकन कार्यपद्धतींचा आणि अनुभवांचा अभ्यास करून, तसेच त्यावरून सुयोग्य धडे घेऊन आपल्याला लाभ होईल.
व्हीआयपी सुरक्षेचे प्रस्थही कमी करून अधिक पोलिस कर्मचार्‍यांना सामान्य माणसाच्या रक्षणासाठी रस्त्यावर आणले पाहिजे. पोलिसांकडे अनेक व्यवस्थापकीय कामे आहेत. त्यातून पोलिसांना मुक्त करता येईल का, हे सुद्धा तपासले पाहिजे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान द्यावीत
पोलिसांना दंगेखोरांवर काबू करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे गरजेचे आहेत. हे तंत्रज्ञान जम्मू काश्मीर पोलिस वापरत आहेत. यामुळे पोलिस दंगलखोरांवर काबू मिळवू शकतील. सध्या अश्रुधुराशिवाय दंगलखोरांवर काबू मिळवण्याचे इतर अनेक उपाय आहेत.
पोलिसांना गुन्हेगारांचा प्रभावीपणे सामना करता यावा आणि त्याचबरोबर स्वत:च्या व नागरिकांच्या जीविताचेही संरक्षण करता यावे यासाठी त्यांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे दिली जावीत. ही शस्त्रे वापरण्याबाबतचे कौशल्यही त्यांच्यात निर्माण केले जावे. एक सत्य गोष्ट अशी आहे की हिंसक जमावाला काबूत आणण्यासाठी किंवा आवश्यक ती कठोर कारवाई करण्यासाठी महिला पोलिस सक्षम ठरू शकत नाहीत. महिला पोलिसांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
सीसीटीएनएस अंमलबजावणीचा आढावा घ्या
तंत्रज्ञानाच्या मदतीने एकत्र येऊन कायदा सुव्यवस्था आव्हानांचा मुकाबला करणे जरूरी आहे. म्हणून एक्स्पर्ट कमिटीने सांगितल्याप्रमाणे काही महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरले.
या मधील पहिला भाग होता क्राईम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम (सीसीटीएनएस). याच्या मदतीने संपूर्ण देशात असणारी १४ हजार पोलिस ठाणी इंटरनेटच्या मदतीने एकमेकांशी जोडली जाणार होती. यामुळे एका पोलिस ठाण्याकडे असणारी गुन्हेगारांची माहिती ही इतर सर्व पोलिस ठाण्यांना ताबडतोब उपलब्ध होऊ शकणार होती. यामध्ये गुन्हेगाराचे नाव, त्याचे फोटग्राफ, फिंगरप्रिंट्स, मागील इतिहास त्यांच्या विषयीची सर्व प्रकारची गुप्तहेर खात्याला लागणारी माहिती एकत्र आल्याने काम करणे सोपे होणार होते. त्याचबरोबर कोणत्याही गुन्हेगाराबद्दलची महत्त्वाची माहिती कोणत्याही पोलिस ठाण्याला त्यांच्या ठाण्यातच उपलब्ध होणार होती. पाच हजारांहून जास्त संशोधन करणार्या अधिकार्‍यांना सर्व देशभरातील गुन्हेगारांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार होती. यामुळे गुन्हेगारी थांबवणे, दहशतवाद्यांना पकडणे हे सोपे होणार होते. ही कल्पना फार चांगली होती, पण भारताच्या आळशी लोकशाहीने त्याची अंमलबजावणी फार खराबरित्या केली. त्याचा वेग वाढवणे जरुरी आहे.
दरमहा प्रोजेक्ट अंमलबजावणीचा आढावा घ्या
पहिल्या नियोजनानुसार २००९ साली सीसीटीएनएस या प्रोजेक्टवर काम करण्याचे आदेश मिळाले होते व हे प्रोजेक्ट २०१२ पर्यंत पूर्ण करायचे होते. या प्रोजेक्टकरिता सरकार दोन हजार कोटी रुपये खर्च करणार होते. पण २०१२ मध्ये यावरून वेगवेगळ्या संस्थांमध्ये वादाला सुरुवात झाली. वेगवेगळ्या संस्थांच्या प्रमुखांना या संस्थेचेही प्रमुख पद हवे होते. त्यामुळे या प्रमुख पदाच्या वादात हे प्रोजेक्ट आजूनही पूर्णत्वास जाऊ शकलेले नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे प्रोजेक्ट कोणत्याही परिस्थितीत २०१८-१९ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे जाहीर केले. पण अनेक पोलिसठाण्यांना तांत्रिक अडचणीही येत आहेत. यासाठी या प्रोजेक्टची नीट अंमलबजावणी होण्याकरिता दर महिन्याला याच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्याची व त्यात काही अडचणी असल्यास त्या ताबडतोब दूर करण्या संदर्भात तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. हे लक्ष ठेवण्याचे आणि अडचणी सोडवण्याचे काम जर कॅबिनेट सेक्रेटरी पदासारख्या व्यक्तीकडे देण्यात आले तरच पुढे काही होण्याची शक्यता आहे. कारण आजही ५० टक्क्यांहून जास्त पोलिस ठाणी ही या नेटवर्कच्या बाहेर आहेत.
टेक्निकल इंटेलिजन्सने संशयित दंगलखोऱांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लक्ष ठेवणे शक्य आहे. या सर्व उपायामुळे पोलिसांना कुठे काही गडबड होणार असेल तर त्याची माहिती आधीच कळेल व ते हिंसाचार वेळेवर थांबवू शकतील. स्थानिक गुप्तवार्ता विभाग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने योजना आखली जावी.
नागरिकांनी पोलिसांचे कान डोळे व बनले पाहिजे
सामान्य माणसांनीही पोलिसांचे कान डोळे व बनले पाहिजे. कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कामात समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचे सहकार्य घेतले जावे. स्थानिक नागरिकांना गुप्त माहिती देण्यासाठी एक टोल फ़्री फोन क्रमांक दिला पाहिजे. जेणेकरून सामान्य नागरिक त्यांच्याकडील माहिती जलद पोलिसांपर्यंत पोहोचू शकतात. त्यांच्या नावाची गुप्तता बाळगली पाहिजे. मोबाईल फोन वरून हिंसक घटनेचे चित्रण करुन पोलिसांकडे पाठवले पाहिजे. जेणेकरुन हिंसक आंदोलकांना पकडणे सोपे जाईल.
येत्या २०१८-२०१९ मध्ये अनेक निवडणुका होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर या हिंसांचे, आंदोलनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या हिंसाचाराला रोखून सामान्य माणसाचे रक्षण केले पाहिजे.

Posted by : | on : 23 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक (172 of 1154 articles)

Winners 2018
॥ रोखठोक : हितेश शंकर | आधी हॉकी आणि कबड्डीत सारे जग आमचे प्रभुत्व मानत होते. परंतु, या दोन्ही खेळात ...

×