ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक » प्रवासाच्या पाऊलखुणा

प्रवासाच्या पाऊलखुणा

॥ अर्थपूर्ण : यमाजी मालकर |

देशातील वाहतूक सेवा आणि साधने यांच्या एकीकरणाचे स्वागतार्ह प्रयत्न सुरू झाले आहेत. सेवा आणि साधनांचा अधिकाधिक वापर होण्यासाठी आणि प्रवाशांच्या सेवेसाठी ते अत्यंत आवश्यक आहे. हाच दृष्टिकोन इतर क्षेत्रातही देशाच्या हिताचा ठरणार आहे. हे बदल आज छोटे वाटत असले, तरी त्याचा वेग पुढील काळात वाढेल आणि भारतीय नागरिकांचा प्रवासही सुखकर होईल.

Metro Railway Platform

Metro Railway Platform

आपल्या देशात प्रवास करणार्‍या नागरिकांची संख्या वाढतच चालली आहे, पण प्रवासादरम्यानच्या सेवासुविधा त्या वेगाने वाढत नाहीत. पण त्यातकाही सकारात्मक बदल होत असून हा प्रवास थोडा सुखकर होणार आहे. हे बदल आज छोटे वाटत असले, तरी त्याचा वेग पुढील काळात वाढेल आणि भारतीय नागरिकांचा प्रवासही सुखकर होईल, अशी आशा आपण करू यात.
नव्या बदलांतील पहिला बदल आहे तो मुंबईतला. प्रवासाची सर्व साधने वापरण्यासाठी मुंबईत एकच तिकीट किंवा कार्ड मिळण्याची सोय लवकरच होऊ घातली आहे. विकसित जगात अनेक शहरांत असलेली ही सोय भारतात प्रथम मुंबईत होते आहे. लोकल, बेस्ट बस, मोनोरेल, मुंबई मेट्रो आणि कदाचित टॅक्सी, तुम्ही प्रवास कशानेही करा, आपण काढलेले एकच तिकीट सर्व ठिकाणी चालणार, ही सोय ही मोठा दिलासा देणारी आहे. दिसायला हा बदल फार छोटा वाटतो, पण भारताच्या वाहतूक क्षेत्रात हा बदल क्रांतिकारी ठरणार आहे. शहरीकरण, रोजगार संधींचे केंद्रिकरण आणि हातातील पैसा वाढल्यामुळे प्रवास करणार्‍यांची संख्या देशात प्रचंड वाढली आहे. त्यामुळे प्रवासाचे साधन समोर येऊन उभे राहिले की ते भरले नाही, असे चित्र भारतात दिसत नाही. दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूरू, कोलकोता अशा मेट्रो शहरात तर सर्व सेवा उपलब्ध असताना आणि त्यात सातत्याने वाढ होत असताना त्या पुरत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे आपल्या मालकीची चार चाकी गाडी घेणार्‍यांची संख्या त्याच वेगाने वाढते आहे. त्याचा काय परिणाम होतो आहे, त्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. म्हणता म्हणता केवळ मेट्रो शहरांतच नाही, तर आपल्या शहरांत वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्‍न हा राष्ट्रीय प्रश्‍न झाला आहे.
पुण्यातील काही भागांत चार महिन्यांपूर्वी सार्वजनिक सायकली दिसायला लागल्या, तेव्हा सर्वांनाच आश्‍चर्य वाटले होते. पण पुण्यातील वाहतूक कोंडीतून आणि वाढत्या प्रदूषणातून मार्ग काढण्याचा तो एक प्रयत्न आहे, असे लक्षात येऊ लागले. या सायकली आल्या कोठून, याचा शोध घेतल्यावर लक्षात आले की त्या बंगळुरू कंपनीच्या आहेत आणि तेथे आता त्या अतिशय चांगल्या पद्धतीने वापरल्या जात आहेत. तेथेच ही कंपनी का सुरू झाली, याचे कारण होते, तेथे तशी गरज निर्माण झाली. त्या शहराची गेल्या १५-२० वर्षांत एवढी वाढ झाली की वाहतूक कोंडी हा त्या शहराची डोकेदुखी झाली आहे. विशेषतः आयटीत नोकरी करणारे तरुण दररोज तीन ते चार तास केवळ प्रवासावर खर्च करत आहेत. त्यातील काही तरुण आता या सायकली वापरू लागले आहेत. एक अंदाजानुसार तेथे सायकल वापरणार्‍यांची संख्या ४५ हजारांवर गेली आहे, तर खासगी कंपन्यांनी साडे तीन हजार सायकली शहरात ठिकठिकाणी उपलब्ध केल्या आहेत. या सायकलीची कुलुपे, संचलन आणि भाडे हे डिजिटल असल्याने त्या वापरण्यास अतिशय सुलभ आहेत. अर्ध्या तासाला तीन रुपये हा दरही खूप कमी आहे. पण जोपर्यंत या सायकलींचा वापर वाढत नाही, तोपर्यंत त्या कंपनीला महापालिका मदत करते आहे. ही पद्धत जेव्हा सुरू झाली, तेव्हा सायकल चोरीला जाणे, त्यांची मोडतोड होणे असे प्रकार झालेच, पण ते गृहीत धरूनच ती योजना आली असल्याने ते प्रकार थांबले आणि सायकलींचा वापर सुरूच आहे. अर्थात, त्या चालविण्यासाठी पुण्याच्या रस्त्यांवर सुरक्षित जागा कोठून आणायची हा अडथळा आहेच.
याचा अर्थ एकच, तो म्हणजे वाहतुकीचे प्रश्‍न निर्माण होत आहेत आणि त्यांची नुसती चर्चा करत बसण्यापेक्षा ते प्रश्‍न एक आव्हान म्हणून सोडविणारे नागरिकही पुढे येत आहेत. विकसित देशातील लोकसंख्येची घनता खूपच कमी असल्याने तेथे ते प्रश्‍न खूप लवकर सोडविण्यात यश आले, मात्र आपले प्रश्‍न त्यापेक्षा खूपच जटील आहेत. अगदी उदाहरणच घ्यायचे तर अमेरिकेत लोकसंख्येची घनता केवळ ३३ आहे आणि आपली घनता ४२५ आहे! त्यामुळे आपल्याकडे जी वाहतूक साधने आहेत, त्यांचा एकमेकांशी संबंध जोडून त्यांचा वापर अधिकाधिक चांगला करणे, हे फार महत्त्वाचे आहे. वाहतूक कोंडीमुळे सर्वाधिक बदनाम झालेल्या बंगळुरूमध्ये इंट्रीग्रेटेड रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटीची सुरुवात होते आहे, हे साहजिकच आहे आणि अशा एका एजन्सीची आता देशभर गरज आहे. सिंगापूर आणि लंडनसारख्या शहरात अशा एजन्सी असून त्या मॉडेलवर हा सुसंवाद उभा करण्याचे हे स्वागतार्ह प्रयत्न आहेत.
आपल्या देशात वाहतूक साधनांची किती कमतरता आहे, पहा. सरकारी आकडेवारीनुसार देशात सध्या १९ लाख बसेस आहेत. त्यातील फक्त २.८ लाख बसेस सरकारी वाहतूक कंपन्यांकडे आहेत. देशातील सर्व प्रवाश्यांची गरज भागविण्यासाठी एकूण ३० लाख बसेसची गरज आहे. चीनमध्ये १००० प्रवाशांना मागे सहा बस आहेत तर भारतात हेच प्रमाण १०००० प्रवाशांमागे केवळ चार इतके कमी आहे. ९० टक्के नागरिकांकडे वाहतुकीचे साधन नसताना ही स्थिती आहे, यावरून याचे गांभीर्य लक्षात येते. कमतरता आणि अकार्यक्षमता यामुळे बसचा प्रवास चांगला तर मानला जात नाहीच, पण त्यावर विसंबून राहावे, अशीही स्थिती नसल्याने चार चाकी गाड्या घेणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. चार चाकी गाड्यांच्या खपाचे वाढत चाललेले आकडे हा त्याचा पुरावा आहे.
१३५ कोटी लोकसंख्येच्या या देशाला प्रवासी वाहतूक हा विषय वेगळ्या पद्धतीने हाताळावा लागेल, यासाठी कोणा ज्योतिष्याची गरज नाही, असे ही आकडेवारी सांगते. त्यामुळे मोठ्या शहरांत अनेक वाहतूक साधनांसाठी एकच तिकीट, मेट्रो, बुलेट ट्रेनसारखी खात्रीची आणि चांगली सार्वजनिक वाहतूक, कमी जागा लागणार्‍या ट्रामचा पर्याय मध्यम शहरांत खुला ठेवणे, प्रदूषण कमी होण्यासाठी पेट्रोल डिझेलऐवजी विजेवर चालणार्‍या मोटारी, डिझेल वाचविण्यासाठी रेल्वेवर ट्रक नेण्याचा मार्ग, सध्याच्या महामार्गांचा वापर सीएनजी, नैसर्गिक वायू अशी ऊर्जासाधने आणि दर्जेदार डाटा वहनासाठीच्या पायाभूत सोयी उभ्या करणे, अशा बहुविध मार्गांचा अवलंब करावाच लागेल.
ही झाली केवळ साधनांची चर्चा. पण त्यासोबत सार्वजनिक सेवा वापरण्यासाठी जी नागरिक म्हणून प्रगल्भता लागते, तीही पुढील काळात जाणीवपूर्वक वाढवावी लागेल. अर्थात, जेव्हा व्यवस्था म्हणून सेवासुविधा वाढतात, तेव्हा भारतीय नागरिक त्याला फार चांगला प्रतिसाद देतात, असा अनुभव आहे. त्याचे उदाहरण म्हणजे मेट्रोसारखी सुविधा दिल्ली, मुंबई आणि इतर शहरांत भारतीय नागरिकांनी इतकी चांगली स्वीकारली आणि जपली आहे की नागरिकांविषयी तक्रार करण्यास जागा नाही. दिल्लीत मेट्रो सेवा उत्तम चालली असून तिचा दररोज सरासरी २७ लाख प्रवासी (२७०० फेर्‍या) तर मुंबईच्या उपनगरी सेवेचा दररोज सरासरी ७५ लाख प्रवासी (२३४२ फेर्‍या) वापर करतात. प्रवासाच्या या सोयी या महाकाय देशात वाढविण्याची तर गरज आहेच, पण तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्यात सुसंवाद प्रस्थापित केला तरच देशातील हा प्रवास सुखद होणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट यामुळे साध्य होणार आहे, ती म्हणजे सेवा आणि साधनांची मालकी आणि संचालन करणारी व्यवस्था वेगळी असली, तरी त्यांचे एकीकरण करणे, हे शक्य आहे, हे त्यातून सिद्ध होईल. असेच एकीकरण आपण अनेक क्षेत्रांत करण्याचे धाडस त्यामुळे करू शकू, जे आपल्या देशाच्या हिताचे आहे.

Posted by : | on : 30 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक (390 of 1224 articles)

Naxal1
प्रासंगिक : शोभा फडणवीस | गेल्या ३० वर्षांत नक्षलवाद्यांनी घातलेला धुमाकूळ, चालविलेले हत्यासत्र, त्यांनी सुरू केलेला नरसंहार, पोलिसांवर केलेले अत्याचार, ...

×