ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:

फेमि’नाझी’ !

॥ टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे |

Martyrs Of Marriage Deepika Bhardwaj

Martyrs Of Marriage Deepika Bhardwaj

मुंबई येथील मॉडेल मेघा शर्मा हिने तिच्या इमारतीच्या लिफ्टमध्ये आपले कपडे काढण्याचा व्हिडिओ बराच गाजला. तिनेही कृती का केली; याचे उत्तर देणारा तिचा व्हिडिओ एएनआय वर पाहिला. तिच्या सांगण्यानुसार; ‘बरेच सारे पुरुष माझ्यावर चाल करून येत असल्याने मी कृती केली.’ खरे तर या प्रकरणातील हे ‘बरेच सारे पुरुष’ म्हणजे अन्य कोणी नसून; मेघाच्याच तक्रारीवरून तेथे गेलेले मुंबई पोलीस होते. शिवाय त्यांनी तिच्या अंगावर जाण्याचा प्रश्‍नच नव्हता. ‘तुम्ही तक्रार करण्यास फोन केलात; आता तक्रार दाखल करण्यास पोलीस ठाण्यात चला’ अशी रास्त आणि कायद्यानुसार योग्य मागणी पोलिसांनी केली होती. त्यावर ‘महिला पोलीस बोलवा’ अशी मेघाने केलेली मागणीदेखील त्यांनी मान्य केली. मेघाने मात्र आपल्याला सकाळी शुटींग असल्याचे सांगत त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर आपल्याला त्यांच्या सोबत जावे लागू नये यासाठी खालची पातळी गाठत आपले कपडे काढण्यास सुरुवात केली! मुळात तिने पोलिसांना का बोलावले? यामागील कारण देखील मनोरंजक आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास तिने इमारतीच्या रखवालदाराला सिगरेट आणून देण्यास सांगितले. तिच्या सांगण्यानुसार; या गोष्टीला त्याने नकार देऊन तिला शिवीगाळ करत, अश्‍लील शेरेबाजी करत तिच्यावर हात उचलला. प्रत्यक्षात मात्र; इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीच रखवालदाराच्या अंगावर जाऊन त्याला थेट मारहाण करताना स्पष्ट दिसत आहे! मारहाण करताना तिने त्याच्या गुप्तांगावर लाथ मारल्याचेही दिसत होते. इतके स्पष्ट फुटेज पाहिल्यावर कदाचित पोलिसांना तिच्या तक्रारीत फोलपणा दिसून आला असावा; यासाठीच त्यांनी सोबत येण्यास सांगितले असावे. तिने मात्र एक स्त्री असल्याचे कारण पुढे करत हे सारे प्रकरण फिरवले. ती स्वतः नशेत असल्यानेच पोलिसांसोबत जाण्यास तयार नव्हती; अशीही चर्चा आहे.
खरेखोटे काय ते समोर येईलच. मात्र; स्वतःच्या स्त्रीत्वाचा अशा तर्‍हेने आपला गुन्हा लपवण्यासाठी वापर करणे हे लज्जास्पद आहे.अर्थात; अशी प्रकरणे ही काही नवीन नाहीत. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री झायरा वसीम हिने विमानप्रवास करताना आपल्या मागे बसलेल्या प्रवाशाने लैंगिक गैरवर्तणूक केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनीही तडक कारवाई करीत त्या प्रवाशाला अटक केली होती.त्याचे नाव सलग काही दिवस बातम्यांत झळकत होते, उलटसुलट चर्चा होत होत्या. विमानातील कर्मचारी आणि सहप्रवासी यांनी मात्र आरोपी हा आजारी असल्याने पूर्ण वेळ झोपून असल्याचे सांगितले. इतरही परिस्थितीजन्य पुरावे असे गैरवर्तन झाल्याचा आरोपाला पाठींबा देत नव्हते. हे प्रकरण आपल्या अंगलट येत आहे हे पाहून झायराने आपली तक्रार मागे घेतली. मात्र; या संपूर्ण काळात त्या आरोपीला सामोरे जावे लागलेल्या मानहानीचे काय? एकीकडे स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारत दुसरीकडे अशाप्रकारे आपल्या लिंगाचा गैरफायदा घेणे हे कोणत्याही सूज्ञ समाजास शोभणारे नाही. लिंगभेद होऊ नये; लैंगिक अत्याचारांवर कडक कारवाई व्हावी हे जितके सत्य; तितकेच असा गैरफायदा घेऊन कोणाचे आयुष्य उद्धवस्त होऊ नये; याकडेही लक्ष दिल्यास ती खरी लिंगनिरपेक्षता असेल.
बलात्कार हे हत्येहूनही अधम कृत्य. बलात्कार केल्याचे सिद्ध झाल्यावर देहदंडच देण्यात यावा. मात्र बलात्कार न होताच त्याची शिक्षा भोगावी लागली असेल तर? २००१ साली फरीदाबाद येथील एका खोट्या बलात्काराच्या आरोपामुळे जय सिंग आणि शाम सिंग या आरोपींनी अनुक्रमे १० आणि ७ वर्षांची शिक्षा भोगल्या ऑगस्ट २०१८ मध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सुटका केली. आजवर त्यांच्या आयुष्याची फुकट गेलेली वर्षे परत येतील का? एप्रिल २०१८ मध्ये मुलुंड रेल्वे स्थानकात दीपक पटवा यांचा गर्दीत एका महिलेला चुकून धक्का लागला. त्यांनी तत्काळ माफीही मागितली. ती महिला मात्र ऐकण्यास तयार नव्हती. तिने आणि गर्दीतील एका व्यक्तीने पटवा यांना धक्का दिला आणि ते मागून येणार्‍या ट्रेनखाली चिरडले जाऊन ठार झाले. ही सारी घटना सीसीटीव्हीवर दिसून आली. महिलेला अटकदेखील झाली; मात्र पटवा यांचा जीव परत येईल का? हे सारेजण ‘पुरुष’ आहेत हाच त्यांचा दोष होता का? तसेच दिसत असल्याने सध्या देशातील स्त्रीमुक्तीवादाची वाटचाल अतिशय उथळपणे सुरु आहे असे खेदाने म्हणावे लागते. प्रत्यक्षात हिंदुस्थानातील कायदे हे प्रामुख्याने स्त्रियांच्या बाजूने आहेत हे सत्य आहे. एखाद्या महिलेवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही; ही लिंगनिरपेक्षता आहे का?
केवळ कलम ३७५ च नव्हे तर कलम ४९८ अ सारख्या कलमांचाही गैरवापर होण्याचे प्रमाण लक्षणीय असून दिवसागणिक ते वाढतच आहे; ही सत्यस्थिती आहे. ४९८ अ अंतर्गत कौटुंबिक हिंसा ही शिक्षेस पात्र आहे. या कलमाच्या गैरवापराचे प्रमाण लक्षणीय आहे. अनेक महिला आपला पती, सासरची माणसे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यास या कलमाचा सर्रास वापर करत आहेत. आपल्याविरुद्ध या कलमाचा झालेला गैरवापर सहन न झालेल्या कित्येक पुरुषांनी आजवर आत्महत्या केल्या आहेत. दीपिका भारद्वाज यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी या विषयावर बनवलेली डॉक्युमेंटरी आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकता. या प्रकरणाची दाहकता आपल्या लक्षात येईल. ‘सगळेच पुरुष बलात्कारी असतात.’ हा उथळ सिद्धांत जोर धरत आहे. ‘पुरुष हे आपले शत्रू आहेत’ हे या उथळ स्त्रीवादाचे ब्रीद झाले आहे. असा विचार करणार्‍या स्त्रीमुक्तिवाद्याना ‘फेमिनिस्ट’ न म्हणता ‘फेमिनाझी’ म्हटले जाते. यांना शक्य झाल्यास; जगातील सर्व पुरुषांना गॅस चेंबरमध्ये घालून ठार करण्याचा फतवा काढायलाही कमी करणार नाहीत; म्हणून फेमि’नाझी’
निकोप समजासाठी कौटुंबिक हिंसा वा बलात्काराच्या घटनेत पीडितेच्या बाजूने जशी ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे तसेच या गैरवापराविरुद्ध बोलणेही आवश्यक आहे. कोणाही व्यक्तीला तिच्या लिंगामुळे हीन वागणूक देणे गैर; मात्र हा नियम स्त्री, पुरुष वा तृतीयपंथी यांना एकसमान लागू होणे आवश्यक आहे. पुरुषांना ‘पुरुष’ म्हणून डावलणे/आरोपांत गोवणे थांबायलाच हवे!

Posted by : | on : 11 Nov 2018
Filed under : आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक (198 of 1152 articles)

Subhash Babu
रोखठोक : हितेश शंकर | आझाद हिंद सरकारने असा देश घडविण्याचे वचन दिले होते, ज्यात सर्वांपाशी समान अधिकार असतील, सर्वांपाशी ...

×