हज सबसिडी बंद

हज सबसिडी बंद

►मुस्लिमांना प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार देणार ►नकवी यांची घोषणा, नवी…

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

►लवकरच पुराव्यांसह समोर येणार, अहमदाबाद, १६ जानेवारी – १०…

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

►सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश, नवी दिल्ली, १६ जानेवारी…

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

वॉशिंग्टन, १४ जानेवारी – अमेरिकेच्या हवाईक्षेत्रातील हवाई बेटावर क्षेपणास्त्र…

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

►अमेरिकेची पर्यटकांना सूचना, वॉशिंग्टन, ११ जानेवारी – अमेरिकेने भारतात…

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

लंडन, १० जानेवारी – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी…

भाजपाची तिरंगा रॅली

भाजपाची तिरंगा रॅली

►संविधान बचाव रॅलीला प्रत्युत्तर ►•रावसाहेब दानवे यांची घोषणा, मुंबई,…

ना. स. फरांदे कालवश

ना. स. फरांदे कालवश

पुणे, १६ जानेवारी – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधान…

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

सांगली, १६ जानेवारी – पश्‍चिम महाराष्ट्रात ‘रॉबिनहूड’ प्रमाणे आयुष्य…

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

॥ तरंग : दीपक कलढोणे | ‘हर्र बोला हर्र’…

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

॥ विशेष : मुकुल कानिटकर | एकीकडे जग भारताकडे…

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | हा वारस…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:12
अयनांश:
Home » आसमंत, स्तंभलेखक » बहुरूप्याचे राजेपण…

बहुरूप्याचे राजेपण…

•रसार्थ : चंद्रशेखर टिळक

बहुरूप्याचे राजेपण
कोठून टिके बाजारी
ही ओळ आता अचानक आठवली आणि असं पटकन मनात आलं की हे कोणत्याही काळातील, कोणत्याही स्थितीतील, कोणत्याही देशातील शेअर – बाजाराचे हे किती चपखल वर्णन आहे. आजमितीला आपल्या शेअर – बाजाराचा निर्देशांक अशा पातळीवर आहे की त्याबाबत जरा नीट विचार करा असे कोणी कोणाला सांगायला गेले, तर लगेचच त्याची संभावना ‘नतद्रष्ट’ अशी केली जाईल. पण अशा बाजारात हौशी – नवशे – गवशे असे शेअर्स आणि गुंतवणूकदार असे दोघेही एकदम दिमाखात, तोर्‍यात मिरवत असतात. कारण अशा बाजारात इंद्राचा ऐरावत आणि श्यामभटाची तट्टानी या दोघांचेही भाव चढे असतात.

shree-gajanan-maharajगजानन महाराजांच्या पोथीची पारायणं मी काही वेळा केली आहेत. दररोज त्याचा एक तरी अध्याय वाचायचा असेही कितीतरी वेळा केले आहे. त्याची सीडी अखंडपणे ऐकत कितीतरी वेळा प्रवासही केला आहे. पण याआधी कधी झाले नाही असे आज झाले. मी आत्ता यातले काहीही करत नसतानाही अचानक माझ्या मनात आले की संतकवी श्री दासगणू महाराज कृत श्रीगजानन विजय या पोथीमधल्या अनेक ओव्या शेअर-बाजारांच्या संदर्भात लागू पडतात.
आता हेच बघा ना! या पोथीच्या दहाव्या अध्यायाच्या १६१ व्या ओवीत एक ओळ आहे . . .
बहुरूप्याचे राजेपण
कोठून टिके बाजारी
ही ओळ आता अचानक आठवली आणि असं पटकन मनात आलं की हे कोणत्याही काळातील, कोणत्याही स्थितीतील, कोणत्याही देशातील शेअर – बाजाराचे हे किती चपखल वर्णन आहे. आजमितीला आपल्या शेअर – बाजाराचा निर्देशांक अशा पातळीवर आहे की त्याबाबत जरा नीट विचार करा असे कोणी कोणाला सांगायला गेले, तर लगेचच त्याची संभावना ‘नतद्रष्ट’ अशी केली जाईल. पण अशा बाजारात हौशी – नवशे – गवशे असे शेअर्स आणि गुंतवणूकदार असे दोघेही एकदम दिमाखात, तोर्‍यात मिरवत असतात. कारण अशा बाजारात इंद्राचा ऐरावत आणि श्यामभटाची तट्टानी या दोघांचेही भाव चढे असतात. त्यामुळे एखादा शेअर घेताना जरी चूक झाली, तरी ती चूक अशा बाजारात निस्तरताना सुद्धा नफा पदरी पडतो आणि म्हणूनच अशा बाजारात वावरताना याच पोथीच्या तिसर्‍या अध्यायातील ९९ व्या ओवीतील एक ओळ लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ती ओळ अशी :
उगीच पाहून पिवळेपण
सोने पितळेस मानू नका
कारण उतरत्या बाजारात सोने आणि पितळ यातला फरक उघड होत राहातो. तेजीच्या बाजारात पितळ बहुरूप्यासारखे सोने म्हणून कितीही वावरले तरी याच ओवीचा पूर्वार्ध आठवावा लागतो. तो पूर्वार्ध असा :
म्हणून बहुरूप्या कारण
जपणं आहे अवश्य जाण
अशी जाणीव आपल्याला होत राहाण्यासाठी अनेकदा तज्ज्ञ सल्लागारांची मदत घ्यावी, असे सांगितले जाते. ते योग्यच आहे. पण असा सल्लागार निवडताना त्याबाबतचे निकष काय असावेत याचे विवेचन गजानन महाराजांच्या पोथीच्या तिसर्‍या अध्यायातील ८८ व्या ओवीत फार छान पद्धतीने सांगितले आहे. ती ओवी अशी :
मात्र औषधी देणारा
शास्त्रात असला पाहिजे पुरा
औषधीचा पसारा
आहे अवगत जयासी
कदाचित अशा मदतीची या क्षेत्रातील माहीर माणसांना आवश्यकता वाटत नसेलही. कारण त्यांची अवस्था या पोथीच्या चौदाव्या अध्यायातील १४५ व्या ओवीच्या
स्वानुभवाच्या ठायी जाणा
वाव न तर्काकारणे
अशी तरी असते नाहीतर याच पोथीच्या एकोणिसाव्या अध्यायातील १०६ व्या ओवीच्या
मुक्कामास गेल्यावर
मार्गांचा न उरे विचार
अशी असते. पण ‘अर्थ’ असो, नाहीतर ‘परमार्थ’ अशी चांगल्या अर्थाने पोचलेली माणसे कमीच असतात. बाकी सगळेच तुमच्या – माझ्यासारखे. रस्ता शोधणारे. त्यामुळे याच पोथीत एकोणिसाव्या अध्यायाच्या १२३ व्या ओवीत म्हटले आहे तसे
जो मुक्कामास जाई
त्याचे कौतुक करणे असे
अशीच भूमिका स्वीकारणे योग्यच असते. पण हे कौतुक केवळ शाब्दिक असून पुरत नाही. तसे प्रयत्नही करावे लागतात.
हे लिहीत असताना मला यश हे प्रयत्नांती असते; वाच्यान्ती नव्हे या लोकमान्य टिळकांच्या विधानाची अतिशय आठवण होत आहे. नाहीतरी या पोथीच्या पंधराव्या अध्यायाचा जवळजवळ निम्मा भाग लोकमान्य टिळक यांच्याविषयीच आहे ना! एखाद्या आध्यात्मिक पोथीत असे स्थान मिळवणारे लोकमान्य टिळक सोडले, तर दुसरा कोणताही भारतीय राजकीय नेता नसेल. असो.
असे कृतिशील प्रयत्न न करणार्‍या मंडळीविषयी (अर्थात पोथीतील ओवीला शेअर-बाजार अपेक्षित नाही) या पोथीच्या पाचव्या अध्यायातील १०६ व्या श्‍लोकात एकदम झणझणते अंजन घालण्यात आले आहे. ती ओवी अशी :
तुझ्यासारखे निरुद्योगी
जन्मले आमच्यात जागजागी
म्हणून झालो अभागी
आम्ही चहू खंडात
त्यामुळे हे किटाळ टाळण्यासाठी काय मार्गाने जायचे याचा विचार करावा लागतो. मुक्कामाला पोचलेल्याला मार्गाचे महत्त्व नसले तरी इतरांना असतेच असते. या पोथीच्या एकोणिसाव्या अध्यायाच्या १०६ व्या ओवीत याचे वर्णन अशा शब्दांत केले आहे :
जो मार्गी चालतो नर
महत्त्व त्याचे त्यास
मार्ग असो कोणताही
त्याचे मुळी महत्त्व नाही.
असा मार्ग कसा आणि काय असावा याचे अतिशय मार्मिक वर्णन या पोथीच्या अनेक ओव्यांत जागोजागी येत राहाते. याची काही उदाहरणे खालीलप्रमाणे :
१. शक्याशक्य विचार ़़| सुज्ञे करावा निरंतर
उगीच पूल सागरावर | बांधावया जाऊ नये
(अध्याय विसावा, ओवी १४९ )
२. कोल्हा न राही उपोशीत | उसाचिया फडामधे
वा पाहून बाटूकाला | बैल नाही पुढे गेला
३. हीरे गारा एक्या ठायी | मिसळल्या असती जगा ठायी
पारखी तो निवडूनी घेई | गार टाकून हिर्‍याते
(पहिला अध्याय, १०७ वी ओवी)
४. स्थान एक आहे म्हणुनी | किंमत नाही समान
तेज हिर्‍याचे हिर्‍यालागून | भूषवी न गारेला
(तिसरा अध्याय, ११३ वी ओवी)
५. मोगरा, निवडूंग आणि शेर | ही जमिनीची लेकरं
परी किंमतीचा प्रकार | निरनिराळा तो तिघांचा
(तिसरा अध्याय, १४५ वी ओवी)
असो .
हा झाला संकल्पनात्मक भाग.
गुंतवणूक क्षेत्रात सहभागी होत असताना, कार्यरत राहाताना बाळगायच्या ‘आचार-संहिता’ (उेवश ेष उेपर्वीलीं) किंवा ‘कृती – आराखडा’ (अलींळेप झश्ररप) याचा विचार केला तर …
अर्थातच संतकवी श्री दासगणू महाराज यांच्या श्री गजानन विजय या पोथीच्या आधारे, असा विचार करत असताना आपण एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्रात, त्यातही विशेषतः शेअर-बाजारात, सहभागी होत असताना या बाजारात तर राहायचे पण आपली वैचारिक तटस्थता सोडायची नाही, हे पथ्य न विसरता सांभाळत राहावे लागते. तरच या क्षेत्रात यशस्वी होता येते आणि यशस्वी राहाताही येते. याबाबतचा अतिशय सुंदर दृष्टांत या पोथीच्या सहाव्या अध्यायातील ६८ व्या ओवीत दिला आहे. ती ओवी अशी आहे :
गार पाण्यात राहाते | परी न पाणी शिरू देते
तैसेचि वागते साचे | या प्रपंच माझारी
ही ओवी इतकी स्वयं-प्रकाशित आहे की त्याचे आणखी विवरण करण्याची आवश्यकताच उरत नाही.
हे जमवून आणणे सहज-सोपं निश्‍चितच नाही. निदान आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांसाठी तर नाहीच नाही. कारण आपल्या सगळ्यांचीच अवस्था, ‘‘आऊ गेली देवापाशी, चित्त तिचे चपलांपाशी’’ अशीच असते. एकनाथ महाराजांच्या अनेक भारुडांतही त्याचे मोठे बोलके वर्णन वारंवार येत असते. पण हे जमणारच नाही असंही नसतं ना! त्यासाठी सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र करत राहावं लागतं. त्याचं पहिले पाऊल म्हणजे काम करत राहाणे. हा पैलू या पोथीच्या सहाव्या अध्यायातील ११९ व्या ओवीत असा शब्दबद्ध होतो :
कर्ममार्ग सोडू नको | विधि निरर्थक मानू नको
मात्र त्यात होऊ नको | लिप्त बाळा केव्हाही
यात असणारी सगळ्यात मोठी अडचण म्हणजे आपले स्वत:चे मन. अगदी
मन सदा आशाळभूत | ते ना कदा स्थिर होत
नाना विकल्प मनात | येऊ लागती वरच्यावरी
(अध्याय सातवा, सातवी ओवी) अशीच परिस्थिती.

शेअर-बाजारात तर हे सततच होत असते. कारण तिथे गमतीने म्हणायचे तर लोकशाहीचा अतिरेक सुरू असतोच असतो. नाना मती, नाना रीती अशी सदा स्थिती. पण यावर आपले मत अभ्यासांती तयार करून त्यावर स्थिर राहावे, असे सांगताना या पोथीची सातव्या अध्यायातील ५२ वी ओवी सहजच म्हणते की :
जन्बुकाच्या चेष्टेला | गजपती न मानी भला
श्‍वानाचिया भुंकण्याला | व्याघ्र न दे किंमत
हे जमले नाही तर ‘‘दारिद्र्याचे मनीच्या मनी, जाती जिरोनि मनोरथ’’ हे विधिलिखितच!
अर्थातच अशा ओव्या लिहिताना संतकवी श्री दासगणू महाराजांना गुंतवणूक क्षेत्र किंवा शेअर-बाजार अभिप्रेत नव्हता हे उघडच आहे. पण वेळ ही गोष्ट, आणि त्यातही वेळ साधणे ही गोष्ट, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आणि तेही प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाची ठरते. ‘‘ ढळाश ळी शीीशपलश ेष लेपींीरलीं ’’ हा गुंतवणूक क्षेत्राचा पायाभूत सिद्धांत आहे. त्याचं समर्पक वर्णन याच पोथीच्या चौथ्या अध्यायाच्या ११४ व्या आणि ११५ व्या ओवीत अशा शब्दांत येते :
तरुणपणी ब्रह्मचारी | म्हातारपणी करसी नारी
अरे वेळ गेल्यावरी | नाही उपयोग साधनाचा
जे करणे ते वेळेवर | करावे की साचार
घर एकदा पेटल्यावर | कूप खणणे निरर्थक
असे प्रयत्न करताना वेळ जशी आणि जितकी महत्त्वाची आहे आणि असते, तेवढीच आणि तितकीच अपेक्षा वास्तव असण्याची नितांत गरज असते. हे संपूर्ण आयुष्याबाबतीत लागू पडणारे आहे. याला शब्दांकित करताना या पोथीच्या २० व्या अध्यायातील १४९ वी ओवी सांगत राहाते :
शक्याशक्य विचार | सुज्ञे करावे निरंतर
उगीच पूल सागरावर | बांधावया जाऊ नये
हे जमवायचे असले तर ‘अहो साजेल ते बोलावे, जे का पचेल तेच खावे; उसने ना कधी आणावे, अवसान ते अंगात’ ( अध्याय अकरावा , ओवी १५३ ) हे जसे खरे तसेच असे वास्तव अपेक्षांचे अविरत प्रयत्न कुठे करायचे तेही ठरवणे महत्त्वाचे निश्‍चितच असते. कारण
बीज पेरता खडकावरी | ते वाया जाते साचार
त्यास कधी ना येणार | मोड हे ध्यानी धरावे
( तेरावा अध्याय, चोविसावी ओवी)
अशा प्रयत्नातून मिळणार्‍या यशाची अपेक्षा मोठी ठेवण्यास काहीच आडकाठी नाही हे सांगायला ना गुंतवणूक क्षेत्र विसरत; ना ही पोथी. श्री गजानन विजय या संतकवी श्री दासगणू महाराज विरचित या पोथीची १५० वी ओवी निःसंदिग्धपणे सांगते की
कल्पवृक्षाच्या तळवटी | बसून इच्छिली गारगोटी
वा मागितली करवनटी | कामधेनूपासून…
सदा-सर्वकाळ, तिन्ही-त्रिकाल या कसोट्यांवर उतरतो तो राजा.
बाकीचे सगळे बहुरूपी.
बहुरूपी एखाद्या क्षणाला असं काही बेमालूम काम करून जातो की तो त्या क्षणाला खरंच राजा वाटतो.
तो राजा वाटतो. राजा नसतो.
तो असतो फक्त बहुरूपी .
शेअर – बाजार तर स्वतःच एक बहुरूपी आहे.
‘‘बहुरूप्याचे राजेपण कोठून टिके बाजारी’’
•••

तिवारींच्या इ‘शाप’नीती
पाकिस्तानच्या धोरणकर्त्यांना चिंता आहे, ती मोदी आणि संघाची. भारतीय सेनेसाठी निर्णय घेण्याचे अधिकार मोदी किंवा संघाचे संस्कार असलेल्या कोणाकडे असतील, तोपर्यंत आपली धडगत नाही, अशी भीती पाकिस्तानला सतावते आहे. त्यामुळे भारताची सत्तासूत्रे व पर्यायाने भारतीय सेनेची अधिकारसूत्रे कॉंग्रेसच्या हातामध्ये आली पाहिजेत; असे पाक संसदेने ठरवलेले धोरण आहे. म्हणजे भारतीय सेनेच्या मुस्क्या कॉंग्रेस बांधणार आणि पाकसेनेला गोळीही न झाडता भारतीय सैनिकांचे मुडदे पाडता येणार; अशी ही रणनीती आहे.

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under आसमंत, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसमंत, स्तंभलेखक (1384 of 1414 articles)


•वेधक : शेफाली वैद्य || काही काळापूर्वी आपले सण कधी आहेत ते फक्त कालनिर्णय बघितल्यावरच कळायचं, पण हल्ली मला सोशल ...