ads
ads
काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक » बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव

बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव

॥ अर्थपूर्ण : यमाजी मालकर |

Berojgar

Berojgar

भारतीय समाजासमोरील अनेक गंभीर समस्यांमध्ये वाढती बेरोजगारी ही समस्या अग्रक्रमाने पुढे येत आहे. भयावह बेरोजगारी आणि समाजातील आजची अस्वस्थता याचा थेट संबंध जोडता येऊ शकतो. केवळ प्रश्‍न उभे करण्यापेक्षा त्यांची उत्तरे शोधणार्‍या अर्थक्रांतीनेसुमारे १८ वर्षांपूर्वी देशासमोर आमूलाग्र आर्थिक बदलासाठी पाच कलमी प्रस्ताव ठेवला, ज्याचा उद्देश करचोरीतून निर्माण होणार्‍या, देशविघातक काळ्या पैशाधारित समांतर अर्थव्यवस्थेचे संपूर्णपणे निर्मूलन त्याचबरोबर प्रभावी शासनव्यवस्थेसाठी अत्यावश्यक असलेल्या पुरेशा राजस्वासाठी, निश्‍चित स्वरूपाची संरचना निर्माण करणे हा होता.
आजच्या बेरोजगारी या अत्यंत ज्वलंत प्रश्‍नावर प्रभावी उत्तर ठरू शकणारा सहा तासांचा कार्यकाळ प्रतिपाळी (शिफ्ट) हा अर्थक्रांती-पुरवणी प्रस्ताव व्यापक मंथनासाठी अर्थक्रांती देशासमोर ठेवत आहे. वाढत्या बेरोजगारीचे गांभीर्य लक्षात घेता या प्रस्तावाची देशव्यापी खुली चर्चा तर झालीच पाहिजे, त्याचबरोबर देशाच्या आनंदांकाशी आणि एकोप्याशी थेट संबंध असलेल्या या प्रस्तावाची योग्य त्या सुधारणांसह शक्य तितक्या लवकर अंमलबजावणीही केली गेली पाहिजे.
शेवटचा दिस गोड व्हावा, या मूलभूत मानवी प्रेरणेमुळे व कृषिसंस्कृतीचे ठळक वैशिष्ट्य असलेल्या सशक्त कुटुंबव्यवस्थेमध्ये सर्वसामान्य भारतीय माणसाचा आनंद, व्यक्तिगत सुखापेक्षा कौटुंबिक सौख्यातच जास्त सामावलेला असल्याने आतापर्यंत कौटुंबिक प्रतिष्ठा व सौख्यासाठी भारतीय माणूस कुठल्याही काबाडकष्टाला आनंदाने सामोरा जात होता. कारण भारतीय माणसाचे सुख व दु:ख कुटुंबातच विभागले जात होते. या उलट पाश्‍चात्त्य समाज मात्र आजचा दिवस, वर्तमान, वैयक्तिक स्वातंत्र्य/आनंद महत्त्वाचा, या मानसिकतेपोटी जास्तीतजास्त व्यक्तिकेंद्री पर्यायाने कुटुंब विघटनाकडे ओढला गेला व त्या समाजात मोठ्या प्रमाणातील कुटुंब संकोचापायी मानवी सुख व दु:ख ही व्यक्तिगत धारणा बनली.
भारतीय समाजाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला अनौपचारिक आयुष्य जगायला आवडते. ही अनौपचारिकता त्याला शेतीसंस्कृतीतून मिळाली आहे. शेती आधारित जीवन हे खडतर, कष्टप्रद होते मात्र ते मोठ्या प्रमाणात तणावमुक्त असल्याने भारतीय माणसाला जगण्याचा ताण जाणवतच नव्हता. पण, आधुनिक काळात औद्योगिकीकरण आणि तंत्रज्ञानाने त्याला बदलण्यास भाग पाडले आहे. आज त्याला औपचारिक आयुष्य जगावे लागते आहे. त्याचे आयुष्य जोपर्यंत निसर्गाच्या जवळ जाणारे होते, तोपर्यंत त्याच्या आयुष्यात एवढी गुंतागुंत नव्हती आणि आनंद, समाधानाचे एवढे परावलंबत्वही नव्हते. मुलांना महत्त्व द्यायचे की आपल्या घरातील आईवडिलांना असा पेच पडत नव्हता. घरातील हे दोन्हीही घटक तेवढेच महत्त्वाचे होते. नव्या परिस्थितीमध्ये मात्र भारतीय जीवनशैलीची मूलभूत चौकटच उखडून गेली. मजबूत कौटुंबिक धाग्यांची शिवण उसवत जाऊन नवी सूक्ष्म कुटुंबव्यवस्था अस्तित्वात येत आहे. या नव्या कुटुंबव्यवस्थेमध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्य व प्रगतीच्या अनेक संधींबरोबरच, पाश्‍चात्त्यांनी अनुभवलेल्या अनेक अवांच्छित पण अटळ अशा अनेक गोष्टींचा शिरकाव झाला आहे, मानसिक ताणतणाव ही त्यातीलच एक. हा मानसिक तणाव, माणसाच्या आनंदाचा बळी घेण्यास पुरेसा आहे.
माणसाच्या जगण्याचे जीविका आणि उपजीविका असे दोन भाग पडतात. पूर्वी भारतीय समाज जीविकेला अधिक वेळ देत होता आणि त्यातून त्याला समाधान आणि आनंद मिळत होता. आता उपजीविका महत्त्वाची ठरते आहे. तिच्यासाठी द्यावा लागणारा वेळ वाढला आहे, भौतिक, संसारिक गोष्टी मिळविण्यासाठी त्याला आता स्वत:मधील चैतन्याचा बळी द्यावा लागतो आहे. उपजीविका करतानाचा जो दबाव आणि क्षोभ वाढला आहे, त्यामुळे त्याला दैनंदिन जीवन हे नीरस वाटू लागले आहे. दबाव आणि क्षोभातून मुक्ती मिळाल्याशिवाय निखळ आनंद मिळू शकत नाही. येथे तर संधी कमी असल्याने अपेक्षांचीही ओझी तयार झाली आहेत. ज्याच्याकडून अपेक्षा केली जाते तो दबावाचा शिकार होत आहे आणि जो अपेक्षा करतो आहे, त्याच्या मनातील क्षोभ वाढतो आहे. भारतीय समाजाच्या आनंदाचा बळी अशा दबावी अपेक्षांनी घेतला असून, सर्व समाजच त्यात भरडून निघतो आहे.
भारतीय समाज जो वेळ गुणात्मक विकासावर खर्च करू इच्छित होता, तो त्याला आता उपजीविकेसाठी खर्च करावा लागत आहे. त्याचे आनंद आणि समाधान हे कौटुंबिक सौख्याशी निगडित होते, पण त्या सौख्यालाच भारतीय माणूस मोठ्या प्रमाणात पारखा होऊ लागला आहे. जगण्यासाठीची त्याची पैशांची गरज एवढी वाढली आहे की, तो मिळविणे, हेच त्याचे जीवनकर्तव्य होऊन बसले आहे. आपल्या पुढील पिढीची काळजी करावी, मागील पिढीची काळजी घ्यावी की वर्तमानात चांगले जगण्याला प्राधान्य द्यावे, हा पेच सुटेनासा झाला आहे. त्याचे कारण, आधुनिक जीवनशैलीत बहुतांश भौतिक प्रश्‍नाचे उत्तर बाजारपेठेच्या माध्यमातून शोधले जाते आहे. त्यामुळे क्रयशक्तीला अनन्यसाधारण असे महत्त्व आले असून त्यासाठी पैशांची कमतरता ही जगण्यातील सर्वात मोठी उणीव आहे, असे बहुतांश समाजाला वाटू लागले आहे. पुरेसा (?) पैसा मिळविण्याची गरज भागविताना भारतीय समाज आनंद आणि समाधान हरवत चालला आहे. त्याला काहीतरी वेगळे, चांगले जगायचे आहे, पण उपजीविका त्याला तसे जगू देत नाहीये.
भारत एक देश म्हणून आणि समाज म्हणून पाश्‍चात्त्य देश/समाजापेक्षा खूप वेगळा आहे, हे आपल्याला समजून घ्यावेच लागणार आहे. अगदी देश म्हणून पहायचे असले तरी भारत हा एक खंडप्राय देश आहे. त्याची लोकसंख्या १३२+ कोटींवर पोहोचली आहे. याचा अर्थ जगाचे प्रतिनिधित्व करणार्‍या प्रत्येक सात माणसांत एक भारतीय माणूस असला तरच ती रांग पूर्ण होणार आहे. भारतात उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तीन समतोल ऋतूंमुळे व मुबलक जमीन आणि इतर नैसर्गिक वरदानामुळे भारतीय संस्कृतीचा विकास निसर्गपूरक झाला होता. पाश्‍चात्त्य देशांसारखी हाडे फोडणारी थंडी, हिमवादळे, शहरे पाण्याखाली नेणारा पाऊस असे भारतात तुलनेने कमी घडते. दरवर्षी नित्यनेमाने येणारा मान्सून या देशाची तहान आणि भूक भागवितो. जोपर्यंत आजच्यासारखा बाजारपेठेचा अतिरेकी हस्तक्षेप आणि जगाचा इतका संबंध भारतीय जीवनाशी आला नव्हता, तोपर्यंत भारतीय माणसाला अनौपचारिक जगण्याची मुभा होती. पण, आधुनिक जगाने ही मुभा काढून घेतली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या विश्‍वव्यापी विस्तारामुळे आख्या जगाचेच एका वैश्‍विक गावात रूपांतर झाले आहे. या उत्क्रांती प्रवासात परतीच्या वाटा नसल्याने वैश्‍विक व्यवहाराचा भारतीय आनंदसापेक्ष सुधारणा व स्वीकार करूनच भारतीय समाज आपल्या हरवलेल्या गोष्टी परत मिळवू शकतो. अर्थक्रांती चळवळ अशाच सुधारणांची मांडणी करीत आहे. अर्थात ही मांडणी अर्थक्रांतीच्या तत्त्वप्रणालीशी सुसंगत अशीच आहे.
अर्थक्रांतीची तत्त्वप्रणाली…
सर्व १३२+ कोटी भारतीय नागरिक हा एका वैश्‍विक कुटुंबाचा भाग आहे. लोकशाही आणि भारतीय राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत अशीच कुठलीही प्रस्तावित सुधारणा अथवा बदल असले पाहिजेत तसेच अशा बदलांचा उद्देश्य, प्रत्येक भारतीय नागरिकाला भेदभावमुक्त, भ्रष्टाचारमुक्त व प्रगतीच्या समान संधींनी युक्त आयुष्य जगता आले पाहिजे, हा असला पाहिजे ही अर्थक्रांतीची तत्त्वप्रणाली आहे. ढोबळपणे भारताचा आनंदांक या चौकटीतच शोधावा लागणार आहे. त्याचे कारण तरच तो व्यवहारात उतरू शकतो. जेथे नैसर्गिक आणि मानवी साधनसंपत्तीला काहीच तोटा नाही, अशा भारतात संपत्तीची निर्मिती तर झालीच पाहिजे याशिवाय तिच्या वितरणाची सर्वमान्य पद्धतही असली पाहिजे, ज्याद्वारे ही संपत्ती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय्य पद्धतीने पोहोचली पाहिजे ही आज आपल्या देशाची गरज आहे आणि तेच आजच्या अनेक गंभीर आणि गुंतागुंतीच्या वाटणार्‍या प्रश्‍नांचे उत्तर आहे.
गेल्या १८ वर्षांच्या प्रवासात अर्थक्रांती चळवळीच्या मांडणीकडे अनेकांनी केवळ एक स्वप्न म्हणून पाहिले आहे. मात्र जेव्हा त्यावर एक पर्याय म्हणून विचार करण्याची वेळ येते तेव्हा बहुतेक विचारी नागरिकांना, आपण मानत असलेल्या विचारसरणीचे काय करायचे, असा प्रश्‍न पडतो. खरे म्हणजे एखादी विचारसरणी हा एक आदर्शवाद असतो आणि त्याची प्रतिष्ठापना त्या देशात आणि समाजात कशी होऊ शकते, हे सांगण्याची वेळ येते तेव्हा त्याची पद्धत कोणालाच माहीत नसते. त्यासाठी एखादा महापुरुष जन्म घेण्याची वाट पाहिली जाते व त्याने ती पद्धत राबवावी, अशी त्या विचारसरणीसाठी लढणार्‍या कार्यकर्त्यांची अपेक्षा असते! पण, या प्रक्रियेत एक विचारसरणी व्यक्तिवादी होत जाते, हे कोणी लक्षातच घेत नाही. जगाचे लोकशाहीकरण होत असताना आणि या प्रक्रियेस अन्य कोणताही पर्याय नाही, हे लक्षात घेता यापुढील बदल हे कोणा एखाददुसर्‍या व्यक्तीला वाटतात, म्हणून नव्हे तर समाजात व्यापक प्रमाणात वैचारिक घुसळण झालेले आणि तावूनसुलाखून निघालेले बदलच पुढे जातील. उदाहरणादाखल ज्या बदलाविषयी अर्थक्रांतीने गेली १८ वर्षे ही घुसळण केली आहे त्या ई-मुद्रीकरणाला गेल्या वर्षभरात चालना मिळाली आहे.
ई-मुद्रीकरण हा विषय स्वतंत्र आहे आणि त्यावर गेले वर्षभर पुरेसे मंथन पण होत आहे. आता गेले वर्षभर ज्या सामाजिक आव्हानाची गांभीर्याने चर्चा होत आहे, त्या बेरोजगारी किंवा रोजगार संधीच्या संकोचाविषयी, अर्थक्रांती चळवळ एक उत्तरात्मक प्रस्ताव मांडत आहे. हा प्रस्ताव अनघड र्(ींळीसळप) आहे. मात्र तो आजच्या काळाची गरज आहे, अशी अर्थक्रांतीची धारणा आहे. बेरोजगारीच्या स्फोटक आव्हानाचा मुकाबला यापेक्षा चांगल्या प्रस्तावाने केला गेला तर त्याचे स्वागतच आहे. पण, आज भारतीय नागरिकाचे आयुष्य ज्या पेचात सापडले आहे, त्या पेचातून बाहेर पडण्याचा अर्थक्रांती सुचवीत असलेला हा एक व्यवहार्य मार्ग आहे, असा अर्थक्रांतीचा ठाम विश्‍वास आहे.
रोजगार संधी वाढल्या पाहिजेत, यावरच प्राधान्याने का बोलायचे, याचे कारण त्यावर बोलल्याशिवाय पुढेच जाता येत नाही, ही आजची वस्तुस्थिती आहे. १३२+ कोटी नागरिकांच्या या देशाने मोठ्या कष्टाने अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवल्याने वितरण व्यवस्थेतील त्रुटी सोडल्या तर भुकेच्या आव्हानातून देश पुढे आला आहे, असे आज आपण म्हणू शकतो. जगातली दुसर्‍या क्रमांकाची लोकसंख्या असताना आपल्या देशाने गाठलेला हा टप्पा सर्वार्थाने महत्त्वाचा आहे. पण केवळ पोट भरले म्हणजे माणसाला मानवी प्रतिष्ठा मिळाली, असे होत नाही, तो आनंदी आणि समाधानी झाला, असेही होत नाही. म्हणूनच गेल्या काही वर्षांत भौतिक संपत्तीत मोठी वाढ होऊनही आनंदाच्या निर्देशांकात भारत मागे मागे ढकलला जातो आहे. अगदी पाश्‍चात्त्य सर्व निकष जसेच्या तसे मान्य करण्याचे काही कारण नाही, हे मान्य केले तरी आज आपला समाज आनंदी आणि समाधानी नाही, हे नाकारता येण्यासारखे नाही.
लाचारी आणि मुजोरीमुक्त आयुष्य हा मानवी प्रतिष्ठेचा एक अपरिहार्य भाग आहे. तो मिळण्यासाठी व्यवस्थाच अशी हवी की मानवी जन्म मिळाला की काही गोष्टी व्यवस्था म्हणूनच मिळायला हव्यात. त्यासाठी कोणाची लाचारी करण्याची गरजच पडता कामा नये, मुजोरीचा तर प्रश्‍नच उद्भवत नाही, कारण ती कोणीच कोणावर करता कामा नये. व्यवहारात हे शक्य होण्यासाठीचा सुयोग्य मार्ग म्हणजे, चांगली व्यवस्था म्हणजे काय ते सांगणे आणि ती कशी शक्य होईल, याची सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी करणे. अर्थक्रांतीचा पुरवणी प्रस्ताव ही अशीच सूत्रबद्ध मांडणी (डिझाईन) आहे. या मांडणीत प्रत्येक हाताला काम मिळणे, याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. केवळ हाताला काम मिळाले पाहिजे, येथेच थांबूनही चालणार नाही, तर त्या कामाचे योग्य दामसुद्धा मिळाले पाहिजे. प्रत्येकाला आपल्या कुटुंबाच्या सुखदु:खात सहभागी होता आले पाहिजे. चांगले मानवी जीवन म्हणून जे आज किंवा त्या त्या वर्तमानात प्रचलित आणि मान्य आहे, ते ते त्याला मिळाले पाहिजे किंवा ते मिळविण्याची संधी भेदभावमुक्त व्यवस्थेने प्रत्येकाला दिली पाहिजे ज्यामुळे माणूस म्हणून असलेली आत्मप्रतिष्ठाही राखली जाऊ शकते. भाकरी की स्वातंत्र्य हा काही आजच्या जगात वादाचा मुद्दा होऊ शकत नाही, हे दोन्ही मिळाल्याशिवाय माणसाचा आनंदांक वाढूच शकत नाही.
कोणाला कशामुळे आनंद होतो, समाधान मिळते आणि आनंदांक म्हणजे काय, याच्या व्याख्येविषयी वाद होऊ शकतात, पण एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर राखून आत्मप्रतिष्ठा जपणारी रोजगाराची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे, हे कोणीच नाकारू शकणार नाही. (उत्तरार्ध पुढील अंकात)

Posted by : | on : 24 Dec 2017
Filed under : आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

2 Responses to

बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव

 1. वर्धमान दिलीप मोहेकर Reply

  25 Dec 2017 at 6:52 pm

  हाच एक योग्य पर्याय आहे देशातल्या वाढत्या बेरोजगारीवर! सरकारी आणि खाजगी नोकरीमध्ये जवळपास अजून २५% रोजगार निर्माण होईल! शिवाय त्यामुळे बाजारात खरेदीदार वाढतील! त्यामुळे जीडीपी वाढेल! बाजारात उत्साह निर्माण होईल! ह्यावर खरच मंथन करणे गरजेचं आहे! पण हा विचार लवकरच अंमलात येणं गरजेचं आहे!

 2. वर्धमान दिलीप मोहेकर Reply

  25 Dec 2017 at 7:06 pm

  उत्तरार्ध द्या! लिंक प्लीज!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

  छायाचित्रातून

 • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
 • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
 • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
 • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
 • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक (1024 of 1225 articles)

Khadim Hussain Rizvi
परराष्ट्रायन : प्रमोद वडनेरकर | पाकिस्तानातील खदिम रिझवी या मौलवीने मागील तीन आठवड्यांपासून तेथील इस्लामाबाद ते रावळपिंडी हा महामार्ग रोखून ...

×