ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक » ब्राह्मोसची हेरगिरी : देशगद्दारांना हवे कठोर शासन!

ब्राह्मोसची हेरगिरी : देशगद्दारांना हवे कठोर शासन!

॥ राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन |

हेरगिरी हादेखील युद्धनीतीचाच एक भाग आहे. त्यामुळे देशाशी गद्दारी करणार्‍या अशा बदमाशांवरील खटले भारतीय दंड विधानांतर्गत चालवण्याऐवजी आर्मी अ‍ॅक्ट अंतर्गत चालवले गेले पाहिजेत. कारण, देशाची संरक्षणव्यवस्था अभेद्य असणे हे महत्त्वाचे आहे. त्याला सुरुंग लावून केवळ पैशाच्या अथवा शरीरसुखाच्या मोहात अडकून संवेदनशील आणि गोपनीय माहिती कुणी लीक करत असेल, तर तो अक्षम्य गुन्हा आहे. आपल्याच दूतावासातील एक महिला, पाकिस्तानात असताना तिथल्या आयएसआय अधिकार्‍याच्या प्रेमात पडली होती. तिला किरकोळ शिक्षा झाली होती. असे घडता कामा नये.

Isi Agent Nishant Agrawal Bhramos

Isi Agent Nishant Agrawal Bhramos

ब्राह्मोस क्षेपणास्त्रासंबंधीची माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला पुरवत असल्याच्या संशयावरून, निशांत अग्रवाल या हेराला उत्तरप्रदेश एटीएस व सैन्य दलाच्या गुप्तचर यंत्रणेने पकडले. ब्राह्मोस एअरोस्पेस सेंटरजवळूनच त्याला अटक झाली. या सेंटरमध्येच तो काम करतो. शासकीय गुपिते अधिनियमांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशांत येथून तांत्रिक गुप्त माहिती पाकिस्तान आणि अमेरिकेच्या एजन्सींना पाठवायचा, असा त्याच्यावर आरोप आहे. ब्राह्मोस एरोस्पेस सेंटर नागपुरात आहे. हे केंद्र भारत आणि रशियामार्फत संयुक्तपणे चालवलं जातं. गेल्या वर्षी येथे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांंच्या प्रक्रियेचं परीक्षण करण्यात आलं होतं.
देशाच्या संरक्षणाविषयीची गोपनीय माहिती मिळवण्यासाठी शत्रुराष्ट्रांकडून सातत्याने छुप्या मार्गाने प्रयत्न सुरू असतात. यासाठी संरक्षण, संशोधन आदी क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या जवानांना, अधिकार्‍यांना, शास्त्रज्ञांना विविध प्रकारची आमिषे दाखवून आपल्या जाळ्यात ओढले जाते. सध्या उघडकीस आलेले निशांत अग्रवाल याचे प्रकरण याच मालिकेतील आहे. ही घटना धक्कादायक आणि चिंताजनक आहे. सुरक्षाव्यवस्थेला अशी खिंडारे पडू द्यायची नसतील, तर सर्वांचे सुरक्षासंबंधी आणि सतर्कतेसंबंधी प्रशिक्षण सातत्याने करत राहणे आवश्यक आहे.
जगातील दुसर्‍या क्रमांकाचा पुरातन व्यवसाय ‘हेरगिरी!’ :
जगातील दुसर्‍या क्रमांकाचा पुरातन व्यवसाय म्हणजे ‘हेरगिरी!’ जवळपास सर्वच देशांकडे आज त्यांच्या गुप्तचर संघटना अथवा संस्था आहेत. अगदी पुरातन काळापासून अस्तित्वात असणारर्‍या आहेत. या हेरांचा आर्य चाणक्यांच्या ‘अर्थशास्त्र’मध्येसुद्धा उल्लेख सापडतो. गेल्या महिन्यात बीएसएफ जवान अच्युतानंद अग्रवालला अटक करण्यात आली होती. त्या जवानाच्या चौकशीदरम्यान निशांत अग्रवाल याचं नाव समोर आलं. मिश्राला पाकिस्तानातील पत्रकाराने हनी ट्रॅपमध्ये फसवलं असावे.
वैचारिक भ्रम निर्माण करून पाकिस्तानसाठी काम करायला लावणे :
आपण ज्या वेळी देशाच्या सुरक्षिततेविषयी बोलतो, त्या वेळी सामान्य माणसाच्या डोळ्यांसमोर सीमेवर लढणारे सैनिक येतात. मात्र, राष्ट्रीय सुरक्षेचा अर्थ जास्त व्यापक आहे. राष्ट्राची सुरक्षा ही तीन भागांमध्ये विभागता येते. एकतर राष्ट्राविषयी महत्त्वाची माहिती जी शत्रुराष्ट्रांपर्यंत पोहोचता कामा नये, दुसरे, शत्रुराष्ट्रांनी बॉम्बस्फोट किंवा घातपात करायला नको आणि तिसरे म्हणजे, देशाच्या नागरिकांमध्ये वैचारिक भ्रम निर्माण करून त्यांना भारताऐवजी शत्रुराष्ट्रासाठी (पाकिस्तानसाठी) काम करायला लावणे. या तीन प्रकाराने पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय सदैव भारताचे नुकसान करण्याचा प्रयत्न करते. या सध्याच्या प्रसंगामध्ये आपल्याकडे असलेली महत्त्वाची माहिती एका भारतीयानेच पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयला दिली असावी. त्यात काही महत्त्वाच्या मुद्यांची चर्चा जरुरी आहे. अशा प्रकारची माहिती शत्रुराष्ट्र कशा प्रकारे गोळा करते? माहिती मिळवण्यासाठी आयएसआय, माहिती देणार्‍या व्यक्तींना कसे फसवते? आपल्याच पाकिस्तानसाठी काम करणार्‍यांना, नागरिकांना पकडण्यासाठी आपण नेमके करायला पाहिजे? जी माहिती पाकिस्तानने आपल्याकडून चोरली असेल, त्याचे रक्षण करण्यासाठी आपण अजून काय करायला हवे?
ब्राह्मोस : उत्कृष्ट क्षेपणास्त्र!
ब्राह्मोस कमी अंतराचं सुपरसॉनिक क्रुझ मिसाईल, भारत आणि रशियाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे तयार झालं आहे. रडारच्या नजरा चुकवून दहा मीटर उंचीवरून तसंच सर्व भूभागांवरून हे क्षेपणास्त्र सोडलं जाऊ शकतं. सर्वात महत्त्वाचे, ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र भारत आणि रशिया हे दोन्ही देश मिळून करताहेत. कमी अंतरापर्यंत वेध घेणारे हे क्षेपणास्त्र जमीन, विमान, जहाज आणि पाणबुडीत वापरले जाते. हवेतच मार्ग बदलणे आणि चालत्या लक्ष्यालाही उद्ध्वस्त करण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे. लष्कर, वायुदल आणि नौदल या तिन्ही सुरक्षा यंत्रणांसाठी ब्राह्मोस उपयुक्त आहे.
ब्राह्मोसविषयीची मूलभूत माहिती रशियाकडे असल्याने ही माहिती इतरांना कळणे, दुसर्‍यांना समजणे काही अवघड नाही. पण, ज्या वेळी भारतासाठी त्याचा वापर केला जातो त्या वेळी थोडा वेगळेपणा आहे, कारण आपली गरज वेगळी आहे. या शस्त्रांमध्ये आपल्या गरजेनुसार काही बदल केले जातात. ते बदल नेमके काय आहेत, ते समजण्याची गरज आयएसआय किंवा पाकिस्तानला आहे, जेणेकरून या क्षेपणास्त्राला शह देणारे अस्त्र ते निर्माण करू शकतील.
भारतीयांना कसे तयार केले जाते? :
माहिती चोरून आयएसआयला देण्यासाठी किंवा ती माहिती चोरण्यासाठी भारतीयांना कसे तयार केले जाते? गुप्तहेर संस्था व्यक्तींना फोडण्याचे काम नेहमीच करत असतात. आपल्या देशाच्या कॅण्टोन्मेंट किंवा शस्त्रास्त्र कारखाने आणि इतर महत्त्वाच्या जागांची, हेर पाठवून माहिती काढण्याचा प्रयत्न शत्रुदेश पाकिस्तान करत असतो. कॅण्टोन्मेंटमध्ये असलेल्या सैनिकांशी, त्यांच्या नातेवाईकांशी परदेशी हेर मैत्री करतात. म्हणूनच पहिले कॅण्टोन्मेंट शहरी भागापासून वेगळे ठेवले जायचे. पाकिस्तान अशा व्यक्तींनाच शोधतो ज्या मानसिक रीत्या कमजोर आहेत.
त्यांना कुठलेतरी आमिष दाखवले जाते. पैशाचे, स्त्री उपभोगाचे किंवा इतर कुठलेही असू शकते. अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडलेल्या लोकांचे चित्रण करून त्याद्वारे त्यांना ब्लॅकमेल केले जाते. त्यामुळे तो माणूस घाबरून पाकिस्तानला माहिती देण्यासाठी राजी होतो. यापैकी नेमके या प्रकरणात काय झाले, हे येणारा काळच सांगेल.
हेरगिरी करणार्‍यांना कसे ओळखावे? :
पाकिस्तानकरिता अशा प्रकारे चोरीचे किंवा हेरगिरीचे काम जेव्हा एक व्यक्ती सुरू करते, तेव्हा तिला कसे ओळखावे? ज्या वेळी एखादी व्यक्ती शत्रुराष्ट्राकरिता काम करते तेव्हा ती घाबरलेली असते. तिची वर्तणूक बदलते. ती व्यक्ती, आपल्यावर कोणी लक्ष ठेवत नाही ना यासाठी सतत आजूबाजूला लक्ष ठेवते. काही वेळा त्या व्यक्तीकडे खूप जास्त पैसा येतो. आपल्या सैन्यातील किंवा सैनिकी कारखान्यातील माणसे अशा प्रकारचे वर्तन करतात, त्या वेळी त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना पकडणे गरजेचे असते. जरुरी माहिती मेसेज, ई-मेल, फोटो काढून शत्रुराष्ट्राला पाठवली जाते. त्यावर पाळ्त ठेवणे जरुरी आहे.
देशगद्दारांविरुद्ध कठोर पावले उचलल्याखेरीज… :
सद्य:स्थितीत सरकारी गोपनीय माहिती उघड केली जात असेल अथवा दुसर्‍याला विकली जात असेल, तर ऑफिशियल सीक्रेट अ‍ॅक्ट अंतर्गत कारवाई केली जाते. जर अशी माहिती दहशतवाद्यांना दिली जात असेल, तर अनलॉफुल अ‍ॅक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन अ‍ॅक्टनुसार कारवाई केली जाते. याखेरीज भारतीय दंड विधानातील तरतुदींनुसारही कारवाई करता येते; पण या परंपरागत कायद्यांनी आणि मार्गांनी होणार्‍या कायदेशीर प्रक्रियेला बराच वेळ लागू शकतो. त्यातून शिक्षेचा हेतू साध्य होत नाही.
हेरगिरी हादेखील युद्धनीतीचाच एक भाग आहे. त्यामुळे देशाशी गद्दारी करणार्‍या अशा बदमाशांवरील खटले भारतीय दंड विधानांतर्गत चालवण्याऐवजी आर्मी अ‍ॅक्ट अंतर्गत चालवले गेले पाहिजेत. कारण, देशाची संरक्षणव्यवस्था अभेद्य असणे हे महत्त्वाचे आहे. त्याला सुरुंग लावून केवळ पैशाच्या अथवा शरीरसुखाच्या मोहात अडकून संवेदनशील आणि गोपनीय माहिती कुणी लीक करत असेल, तर तो अक्षम्य गुन्हा आहे. आपल्याच दूतावासातील एक महिला, पाकिस्तानात असताना तिथल्या आयएसआय अधिकार्‍याच्या प्रेमात पडली होती. तिला किरकोळ शिक्षा झाली होती. असे घडता कामा नये.
यासाठी आपल्याला कायद्यात दुरुस्ती करावी लागेल. विशेष लष्करी न्यायालये स्थापन करून अशा गुन्ह्यांत कठोर शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे. तशी तरतूद केली गेली पाहिजे. तरच ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या तत्त्वानुसार, भविष्यात देशाशी अशाप्रकारची गद्दारी करण्याची हिंमत करण्यास कुणीही धजावणार नाही.
अलीकडेच इंटरपोलप्रमुखाला चीनने डांबून ठेवल्याची घटना समोर आली. हा प्रमुख एकेकाळी चिनी पोलिस दलात होता. त्याने भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून, चीनने त्याला शिक्षा करणार असल्याचे जगाला सांगितले. देशगद्दारांविरुद्ध अशाप्रकारची कठोर पावले उचलल्याखेरीज या घटनांना आळा बसणार नाही.
सदैव सतर्क राहा :
प्रत्येक वर्षी १०-१५ हस्तक जे पाकिस्तानसाठी काम करतात, त्यांना पकडण्यात यश मिळते. आपले गुप्तहेर खाते आणि संरक्षण दले चांगली कामगिरी करून अशा लोकांना पकडण्यामध्ये यशस्वी होतात. मात्र, ही लढाई कायमच चालू राहणार आहे. म्हणून वाढत्या सुरक्षा एजन्सीला, गुप्तहेर खात्यांना, सैनिकी कारखाने, खाजगी कारखाने-जिथे सैनिकी संशोधन होते, त्यांनी सदैव सतर्क राहण्याची गरज आहे.
पाकिस्तानने बांग्लादेशी घुसखोर, रोहिंग्या व इतर यांच्या मदतीने भारतामध्ये अनेक सेल उभारले आहेत. आशा करू या की आपण त्यांच्यावरती लक्ष ठेवून त्यांना भारताची काही महत्त्वाची माहिती देण्याआधी पकडण्यात यश मिळो! ही लढाई सुरू राहणार आहे. आपल्या सुरक्षा दलांना आणि इतर संस्थांना सतत सतर्क राहण्याशिवाय पर्याय नाही. देशसुरक्षेला प्राधान्य देत सतर्कतेशिवाय पर्याय नाही. सैन्याच्या गुप्तहेर संस्थांचे ब्रीदवाक्य आहे- ‘सदैव सतर्क राहा!’ या ब्रीदवाक्याचे पालन करून, यापुढे होणार्‍या देशाच्या नुकसानाला आपण लवकरात लवकर थांबवण्याचा प्रयत्न करून शत्रूचे डावपेच उधळून लावण्यास सक्षम होऊ.

Posted by : | on : 28 Oct 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक (379 of 1299 articles)

Sonia Ad In Thehindu
जागता पहारा : भाऊ तोरसेकर | पाच वर्षापुर्वी एक जाहिरात काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलेली होती. लोकशाही व विवेकवादाचा तितका ...

×