ads
ads
देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

►प्रधानमंत्री मोदी यांचा दावा, मुंबई, १८ डिसेंबर – साडेचार…

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

►राजनाथसिंह यांचे आवाहन, नवी दिल्ली, १८ डिसेंबर अयोध्येत राममंदिर…

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

नवी दिल्ली, १८ डिसेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी…

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

►जिगपिंग यांचा इशारा ►सुधारणा व उदार धोरणाला ४० वर्षे…

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

►सुटकेनंतर भोगावी लागली शिक्षा, नवी दिल्ली, १७ डिसेंबर –…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, ५२ संघटनांचा पाठिंबा, मुंबई, १८…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 17:55
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक » भारतीय ग्राहकांचा विजय असो!

भारतीय ग्राहकांचा विजय असो!

॥ अर्थपूर्ण : यमाजी मालकर |

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी काय म्हणते, याला नेहमीच महत्त्व दिले जाते आणि ते बरोबरच आहे. कारण, आपला देश भांडवलाअभावी नडला असून तो त्यासाठी परकीय गुंतवणुकीवर अवलंबून आहे. भारताने गेल्या काही वर्षांत केलेल्या संरचनात्मक आर्थिक सुधारणांमुळे भारताचा विकासदर अशीच गती घेत राहील, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अलीकडेच म्हटले आहे, हे त्यामुळेच महत्त्वाचे आहे. जीएसटी, नोटबंदीसारख्या आर्थिक सुधारणांचा पुढील विकासदरावर चांगला परिणाम होईल, असे नाणेनिधीला वाटते. अर्थात, हे सर्व शक्य आहे, ते भारतातील मागणी पुरवठ्याची सायकल चालू आहे म्हणून! लोकसंख्येची वाढ उणे असल्याने आणि कोणालाच काही घ्यायचे नाही, अशी स्थिती आल्याने युरोपमध्ये ही सायकल बिघडली आहे. ज्या ग्राहकावर सर्व अर्थव्यवहार अवलंबून आहेत, त्या ग्राहकाची भारतात मात्र अजिबात कमी नाही.
बाजार दोनच जाती ओळखतो-एक ग्राहक आणि दुसरी म्हणजे भिकारी. बाजाराला ग्राहक हवाहवासा असतो आणि भिकारी अगदी नकोसा असतो. कारण अगदी स्पष्ट आहे, भिकार्‍याकडून व्यवहार पूर्ण होत नाही मात्र ग्राहक असेल तेथे व्यवहार होतोच. व्यवहार सर्वश्रेष्ठ असतो, व्यवहाराला व्यवहार काटेकोर केला पाहिजे, असे म्हणण्याची पद्धत आहे, ती त्यामुळेच. जगातहा व्यवहार दोन व्यक्तीमधील असो, दोनसंस्थांमधील असो की दोन देशांतील असो, त्याच्या देवघेवीत फारसा फरक पडत नाही. मागणी आणि पुरवठ्याचे गणित चुकवून व्यवहाराला चालत नाही. हे इतके व्यवहारी चांगले की वाईट, यावर चर्चा होऊ शकते, पण जग व्यवहारावर चालले आहे, हे आपल्याला मान्यच करावे लागते. आणि तेच बरे आहे कारण त्यामुळेच समाजात आणि जगात व्यवस्था म्हणून एक निरपेक्षता टिकून राहण्यास मदत होते.
आपल्या देशाची लोकसंख्या १३४ कोटी आहे आणि त्यातील चांगली क्रयशक्ती असणार्‍या ग्राहकांची संख्या वाढत चालली आहे, हे जगातील व्यवहार म्हणून आपल्या फायद्याचे आहे. आज जेवढा ग्राहक भारतात आहे, तेवढा तो जगात फार कमी देशात असल्याने भारताकडे जग एक चांगली बाजारपेठ म्हणून पाहते आहे. सर्वाधिक विकासदर असणारी जगातील भारतीय अर्थव्यवस्था जगाच्या केंद्रस्थानी येते आहे, त्याचे हेच कारण आहे. विकसित जगाच्या तुलनेत भारतीय ग्राहकांची क्रयशक्ती तुलनेने कमीच आहे, पण जी आहे, तीत सातत्याने वाढ होते आहे, हे महत्वाचे. भारतीयांचे दरडोई उत्पन्न सरासरी ८० हजार रुपयांच्या घरात गेले, ही त्यामुळेच आनंदाची बाब आहे. सर्वच भारतीय नागरिक चांगले ग्राहक झाले पाहिजेत, ही आपली गरज आहे. म्हणजे सर्वांची क्रयशक्ती वाढली पाहिजे. पणसंपत्ती वितरणाची चांगली व्यवस्था अजून निर्माण झाली नसल्याने तो टप्पा अजून दूर आहे. त्यामुळे देशात वाढत चाललेल्या मध्यमवर्गावर सध्या ग्राहकांची ‘ग्रोथ स्टोरी’ विसंबून आहे.
गेल्या काही दिवसांत असे संकेत मिळत आहेत की, अनेक आघाड्यांवर भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होऊ लागली आहे. सुधारणेचा नेमका अर्थ काय, याविषयी एकमत कधीच होऊ शकत नाही. कारण, आपल्या देशात आर्थिक निकषांवर एवढे वैविध्य आहे की, या सुधारणेचा सार्वत्रिक लाभ सर्व समूहांपर्यंत कधीच पोचत नाही. या सुधारणेत जे भागीदार होतात किंवा ग्राहक होतात, ते या सुधारणेचे लाभधारक होतात. तशा लाभधारकांची संख्या वाढत असेल तर त्याला सुधारणा म्हटली पाहिजे. भारताच्या जीडीपीमध्ये ८० टक्के वाटा ज्यांचा आहे, ते उत्पादन आणि सेवा क्षेत्राची वाढ जूनमध्ये चांगली झाली आहे. बँकेची कर्ज घेणारे वाढत चालले आहेत. दुचाकी आणि मोटारींचा खप हा भारतात मागणी वाढते आहे की नाही, हे तपासण्याचा निकष मानला जातो, त्यात तर १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदविली गेली आहे. यावर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यांत गेल्या वर्षीच्या याच तीन महिन्यांपेक्षा १७ टक्के अधिक वाहनांचे उत्पादन झाले आहे. प्रवासी गाड्यांची विक्री या काळात २० टक्के वाढली आहे. व्यावसायिक वाहने तर ५० टक्के आणि दुचाकींची विक्री १५ टक्क्यांनी वाढली आहे. शेतीसह बँकेचे कर्ज घेण्याचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत १२.३ टक्क्यांनी वाढले आहे. कोळसा उत्पादन १० टक्क्यांनी तर विजेचे उत्पादन ३.५ टक्क्यांनी वाढले आहे.
भारतात ग्राहक वाढत आहेत, याचा सर्वाधिक फायदा विदेशी गुंतवणूकदार घेतात. मार्चमध्ये विदेशी गुंतवणूक कमी झाली होती, पण ही वाढ पाहताच एप्रिल आणि मेमध्ये तीत चांगली वाढ झाली आहे. भारतातील ग्राहक वाढतो आहे, याचा आणखी एक पक्का निकष म्हणजे परदेशी कंपन्यांची भारतात वाढत चाललेली गुंतवणूक. यावर्षी अशी गुंतवणूक आता ९८ अब्ज डॉलर (सुमारे सहा लाख कोटी रुपये) झाली आहे. वॉलमार्ट आणि ‘फ्लीफ कार्त’मध्ये झालेल्या १६ अब्ज डॉलर व्यवहाराचा यात समावेश आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धाने सर्व जग भयभीत झाले असले, तरी असे काही झालेच तर भारतासारख्या देशाला त्याचा फायदाच होईल, असे मानले जाते आहे. त्यामुळेच चीनसह इतर शेअर बाजार या बातम्यांनी गारठत असताना भारतीय शेअर बाजार नवे उच्चांक प्रस्थापित करतो आहे. अर्थात त्याचे कारण व्यापार युद्धापेक्षा पुन्हा भारतीय ग्राहकच आहेत.
दैनंदिन किंवा उपभोग क्षेत्रातील आघाडीवरील कंपन्यांची उलाढाल एप्रिल ते जून या तीन महिन्यांत जेवढी झाली, तेवढी ती गेल्या पाच वर्षांत या तिमाहीत झाली नव्हती. मारुती सुझुकी कंपनीने साडेपाच वर्षांतील सर्वाधिक वाढ नोंदविली आहे. (नफ्यातील वाढ २६.९१%) हिंदुस्थान लिव्हरने गेल्या सहा वर्षांतील तर डाबर, बजाज ऑटो आणि मारिकोने पाच वर्षांतील सर्वाधिक वाढ नोंदविली आहे. देशात ६५ टक्क्यांपेक्षा जास्त तरुण आहेत आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात विविध गरजांवर पैसा खर्च होताना दिसतो आहे. आतापर्यत क्रयशक्तीत ग्रामीण भागातील ६८ टक्के नागरिक मागे होते, पण मान्सूनचा दिलासा आणि सरकारचा विविध योजनांवर वाढलेला खर्च यामुळे तेथेही क्रयशक्ती वाढली आहे. अधिक मागणी ग्रामीण भागातून येत असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेत भविष्यात याहीपेक्षा मोठी वाढ उपभोक्ता क्षेत्रात होऊ शकते, असे म्हणण्यास वाव आहे. कारण भारतातील सेवा आणि वस्तू वापराची तुलना चीन आणि अमेरिकेशी केली तर अजून आपल्याला मोठा पल्ला गाठायचा असून त्यातील निम्मी वाटचाल केली गेली तरी आपल्या लोकसंख्येमुळे ती फारच मोठी झेप ठरणार आहे. उदा. अमेरिकेत विजेचा वापर ४६ हजार ३७० केजी डब्लूएच आहे, जो भारतात फक्त एक हजार ९० आहे. अमेरिकेत ‘स्मार्ट फोन’धारक लाखात ३२९ आहेत तर भारतात २३४ आहेत. अमेरिकेत घरगुती एअर कंडिशन ८८ टक्के आहे तर भारतात ते फक्त १३ टक्के आहे. घरगुती ब्रॉडबँड कनेक्शनचा विचार करता अमेरिकत लाखात १०० तर भारतात तेच प्रमाण १६ इतकेच आहे. रोज लागणार्‍या वस्तूंवरील प्रतिमाणशी खर्च (अमेरिकी डॉलरमध्ये) अमेरिकेत १६९४ तर भारतात फक्त ४२ इतका आहे. अमेरिकेत अनेक गोष्टींचा वापर भारताच्या तुलनेत खूप आहे, त्यामुळे ते करतात तसाच खर्च आपण केला पाहिजे, असे नव्हे. पण भौतिक संपन्नता वाढली की हा खर्च आपोआप वाढतो, असा जगाचा अनुभव आहे. त्यामुळे भारतात शहरीकरण वाढत जाणार, नागरिकांची क्रयशक्ती वाढणार आणि ग्राहक होण्याची ही प्रक्रिया आणखी वेगवान होणार आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताची ही ग्राहकशक्ती वाढली की जगाची दारे भारताला उघडणार आहेत आणि त्याचाही भारताला फायदाच होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्स सध्या व्यापार विषयावरून जगाला इशारे देत असताना भारताबाबतचे त्यांचे धोरण सबुरीचे आहे, याचे कारण ही ग्राहकशक्तीच आहे. चीनला आव्हान देताना भारताला अमेरिका दुखावत नाही, कारण एवढे ग्राहक सोडून देणे, हे अमेरिकेला परवडणारे नाही. आज भारत अमेरिका आयात-निर्यात व्यापार हा अमेरिकेच्या हिताचा आहे, त्यामुळे भारताने रशियाकडून शस्त्र घेणे अमेरिका मान्य करते, एवढेच नव्हे तर आशियात जपान आणि दक्षिण कोरियाशिवाय फक्त भारताला स्टॅटीजिक ट्रेड ऑथोरायजेशन (एसटीए – १) दर्जा देते, यातच सर्व काही आले. सध्याच्या जगात अर्थकारण हेच शस्त्र आहे, असे म्हटले जाते, ते शस्त्र म्हणजे भारताच्या नागरिकांची क्रयशक्ती वाढविणे आणि त्याच्या माध्यमातून भारताला जगाच्या सतत केंद्रस्थानी ठेवणे होय.

Posted by : | on : 19 Aug 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक (343 of 1228 articles)


तोरसेकर | शनिवारी पाकिस्तानचा बाविसावा पंतप्रधान म्हणून माजी क्रिकेटपटू इमरान खान याचा शपथविधी पार पडला. त्यासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांमध्ये नखशिखांत ...

×